Maharashtra News Updates 11 December 2022 : मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाटात सहल घेऊन गेलेली बस पलटी, अपघातात दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Dec 2022 09:48 PM
Mumbai Pune Express Way Accident : मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाटात सहल घेऊन गेलेली बस पलटी, अपघातात दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

रायगड : मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाटात खाजगी आराम बस पलटी...


मावळ येथून मुंबईच्या दिशेने निघालेल्या बसला अपघात.. 


खाजगी क्लासेसच्या ४८ विद्यार्थ्यांना घेऊन गेली होती सहल...


बसमधील जखमी विध्यार्थ्यांना खोपोलीतील रुग्णालयात दाखल..


सहा ते सात विद्यार्थी जखमी, एक विद्यार्थिनी गंभीर जखमी...

Mumbai News: मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात वर्णी

Mumbai News: मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात वर्णी


सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केलेल्या शिफारशीवरून केंद्र सरकारचा निर्णय

शैक्षणिक सहलीची बस आणि एसटीत समोरा समोर धडक; 22 जण जखमी, सहा जणांची प्रकृती गंभीर

Parbhani Accident: परभणीच्या गंगाखेड-राणीसावरगाव रस्त्यावरील खंडाळी पाटीवर शैक्षणिक सहल घेऊन जाणारी बस आणि एसटीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 22 जण जखमी झाले असून यातील 6 जणांची गंभीर आहे. सर्वांवर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


गंगाखेड येथील संत जनाबाई विद्यालयाची शैक्षणिक सहल घेऊन जाणारी स्कूल बस चाकूरकडे जात होती. तसेच, अहमदपूर येथून बुलढाण्याच्या जाणारी बस गंगाखेड-राणीसावरगाव रस्त्यावरील खंडाळी पाटीवर आली, असता दोन्ही बसची समोरा समोरच धडक झाली, ज्यात दोन्ही बसमधील 22 जण जखमी झाले. घटना कळतच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमींना बाहेर काढून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जिथे त्यांच्यावर उपचार केले जात असून यातील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती ही डॉक्टरांनी दिली आहे. या पूर्ण अपघातात 10 ते 15 वर्षाचे 3 विद्यार्थी जखमी आहेत. नेमका अपघात कुणाच्या चुकीने झाला हे मात्र अद्याप कळलं नसून घटनेचा तपास पिंपळदरी पोलीस करत आहेत. 

Cyclone Mandous Updates: मंदोस चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर परिणाम, ढगाळ वातावरण आणि पावसामुळे आंबा, काजू पिकांवर परिणाम

Cyclone Mandous Updates: मंदोस चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर परिणाम


जगप्रसिद्ध हापूस आंब्यावर चक्रीवादळाचा परिणाम होणार


कोकणात सकाळपासून ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी रिमझिम पाऊस


ढगाळ वातावरण आणि पावसामुळे आंबा, काजू पिकांवर परिणाम


आज आणि उद्या कोकणात मंदोस चक्रीवादळाचा परिणाम जाणवणार असून पाऊस पडण्याची शक्यता


ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजूचा मोहोर गळून पडण्याची आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता


चक्रीवादळाचा मासेमारीवरही काहीसा परिणाम

Cyclone Mandous Updates: मंदोस चक्रीवादळाचा जोर कमी, तामिळनाडूमध्ये 4 जणांचा मृत्यू

Cyclone Mandous Weakens in Tamil Nadu : तामिळनाडूतील (Tamil Nadu) किनारपट्टी ओलांडल्यानंतर मंदोस चक्रीवादळाचा(Mandous Cyclone) जोर कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात मंदोस चक्रीवादळाचं अस्मानी संकट पाहायला मिळत आहे. मंदोस चक्रीवादळ चेन्नईच्या किनाऱ्यावर धडकलं, त्यानंतर शनिवारी तामिळनाडूमध्ये चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळाला. तामिळनाडूमध्ये चक्रीवादळामुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Mumbai Local Mega Block: मुंबई लोकलच्या तिनही मार्गांवर आज मेगाब्लॉक

Mumbai Local Mega Block: आज मुंबईत लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रुळांची दुरूस्ती, सिग्नल यंत्रणांच्या तांत्रिक कामांसाठी हा मेगाब्लाॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर हा मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे लोकलसेवा उशिरानं धावणार आहे. तसंच काही एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूकही वेगळ्या मार्गांवर वळवण्यात येणार आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकप्रकरणी 11 पोलीस कर्मचारी निलंबित

चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकप्रकरणी 11 पोलीस कर्मचारी निलंबित


8 कर्मचारी आणि 3 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन





Virar News: वसई विरार शहर महापालिकेच्या दहाव्या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात

विरार : वसई विरार शहर महापालिकेच्या 10 वी राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहाटे सहा वाजता फुल मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. कोरोना नंतर प्रथमच दोन वर्षा नंतर मॅरेथॉन स्पर्धा होत आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत 15 हजारच्या वर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. आज वसई विरार मधील वाहतुकीच्या मार्गावर बदल करण्यात आले आहेत. वसई विरार पालिकेच्या पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात नवीन विवा कॉलेज, विरार पश्चिम येथून अर्ध मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात वसई गाव येथून झाली आहे. स्त्री भ्रूण हत्या टाळा, निसर्गाचा संमतोल पाळा हा संदेश देत यंदाची मॅरेथॉन स्पर्धा होत आहे. घटनास्थळावरुन आढावा घेतलाय

Pimpri Chinchwad News: चंद्रकांत पाटलांवर पुण्यात शाईफेक; अन्य दोन कार्यकर्त्यांना अटक

Pimpri Chinchwad News: उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पिंपरी दौऱ्यावर असताना शाईफेक प्रकरणी समता सैनिक दल संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांना तर वंचित बहुजन आघाडीच्या पिंपरी चिंचवड सचिव यांना अटक करण्यात आलं आहे. 


आरोपी मनोज भास्कर घरबडे, समता सैनिक दल संघटक आणि धनंजय भाऊसाहेब इजगज पद समता सैनिक दल सदस्य आणि वंचित बहुजन आघाडी सचिव विजय धर्मा ओवाळ यांना हे कृत्य केल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी केली अटक.


भादवि कलम 307,353,294,500,501,120 (ब) 34 क्रिमिनल अमेंन्डमेंन्ट ऍक्ट कलम 7 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)135 अन्वे गुन्हा दाखल.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


 


समृद्धी महामार्गाचं लोकार्पण; 75,000 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी, असा आहे पंतप्रधानांचा नागपूर दौरा


PM Modi to visit Maharashtra Nagpur: आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे. मेंदोस वादळामुळे विदर्भात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे कार्यक्रमावर पावसाचं सावट राहू शकतं. अवघ्या काही तासांनी पंतप्रधानांच्या हस्ते 55 हजार कोटींचा खर्च असलेला समृद्धी महामार्ग देशाला समर्पित केला जाणार असून प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी केली आहे... समृद्धी महामार्गावर पंतप्रधानांच्या आगमन आणि उपस्थितीच्या वेळी या ठिकाणी काही वेळासाठी सर्वांनाच प्रवेश बंद राहणार आहे.


पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील रु. 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान लोकार्पण करणार आहेत. समृद्धी महामार्ग किंवा नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन द्रुतगती मार्ग हे देशभरातील सुधारित कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांबाबत पंतप्रधानांचा दृष्टिकोन साकार करण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. नागपुरातील नागरी वाहतुकीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी, नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे राष्ट्रार्पण आणि नागपूर मेट्रो टप्पा II ची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधानांनीच जुलै 2017 मध्ये पायाभरणी केलेले एम्स नागपूर पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करणार आहेत. नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार आहेत. नागपूर रेल्वे स्थानक आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्याशिवाय राष्ट्रीय वन हेल्थ संस्था , नागपूर आणि नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान करणार  आहेत.


पंतप्रधानांची गोवा भेट
पंतप्रधान गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज उद्घाटन करणार आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी या विमानतळाच्या उभारणीच्या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. सुमारे 2,870 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा विमानतळ शाश्वत पायाभूत सुविधांच्या मध्यवर्ती संकल्पनेवर बांधण्यात आला असून त्यात सौर उर्जा संयंत्रे, पर्यावरण स्नेही इमारती, धावपट्टीवर एलईडी दिवे, पर्जन्य जल संधारण, पुनर्वापर प्रक्रियेच्या व्यवस्थेसह अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र यांसह अशा इतर अनेक सुविधांचा समावेश आहे. या विमानतळाच्या उभारणी कामात, त्रिमित मोनोलिथिक प्रीकास्ट इमारत, स्टॅबिलरॉड, रोबोमॅटिक हॉलो प्रीकास्ट भिंती, 5 जी तंत्रज्ञानाशी अनुरूप माहिती तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा अशा सर्वोत्तम दर्जाच्या विशेष तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला आहे. विमानतळाच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये, जगातील सर्वात मोठ्या विमानांच्या परिचालनाची क्षमता असणारी धावपट्टी, रात्रीच्या वेळी विमाने उभी करून ठेवण्यासाठी विशेष व्यवस्थेसह 14 पार्किंग बेज, सेल्फ-बॅगेज ड्रॉप सुविधा, अत्याधुनिक आणि स्वायत्त हवाई दिशादर्शन सुविधा इत्यादींसह अनेक सोयींचा समावेश आहे. त्याशिवाय पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते यावेळी तीन राष्ट्रीय आयुष संस्थांचे उद्घाटन देखील होणार आहे. तसेच ते 9 व्या जागतिक आयुर्वेद संमेलनाच्या समारोप प्रसंगी उपस्थितांना संबोधित करतील.


आज जळगाव जिल्हा दूध संघाचा निकाल
आज जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे, सकाळी आठ वाजता. शहरातील रिंग रोड वरील सत्यवलभ हॉल या ठिकाणी ही मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्यासह पाच आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  


 गुरव समाज महाअधिवेशन 
सोलापूर- राष्ट्रीय गुरव समाजातर्फे गुरव समाज महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्यमंत्री तानाजी सावंत इत्यादी नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत, सकाळी ११ वाजता कार्यक्रम सुरु होईल. मुख्यमंत्री दुपारी ४ वाजता सहभागी होतील. 


मराठवाडा  संमेलनाचा दुसरा दिवस 
जालना- मराठवाडा  संमेलनाचा दुसरा दिवस आहे. मराठवाड्यातील 'राजकीय चित्र दशा आणि दिशा' या विषयावर परिसंवाद होणार आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भाजप नेत्या पंकजा मुंडे, अंबादास दानवे, राजेश टोपे यांच्या उपस्थितीत हा परिसंवाद होईल, दुपारी 2 वाजता. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत समारोप सोहळा होणार आहे, संध्याकाळी 6 वाजता


मेंदौस वादळाचा परिणाम
राज्यात येत्या 3, 4 दिवसात काही ठिकाणी गडगडाटासह मध्यम ते हलका पाउस पडण्याची शक्यता आहे. तामीळनाडूला धडकलेल्या मेंदौसचक्रीवादळाच्या नंतरच्या प्रभावामुळे राज्याच्या काही भागात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. आज सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.