Maharashtra News Updates 10th January 2023 : Shiv Sena: विधीमंडळातील बहुमत आमच्याकडे, धनुष्यबाण निवडणूक चिन्ह देण्यास हरकत नाही; शिंदे गटाचा दावा
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
पुण्यामधील प्रसिद्ध असलेल्या सारसबाग गणपतीला स्वेटर घालण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. डहाणू-वाणगाव दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. डाऊन आणि अप मार्गावरील लांब पल्याच्या गाड्या पालघर , बोईसर , डहाणू , वाणगाव रेल्वे स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत. डाऊन मार्गावरील वाहतूक उशिराने तर अप मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जवळपास एक तासाने गाड्या उशिराने धावत असून रात्री 8.25 वाजण्याच्या सुमाराम दोन्ही बाजूची वाहतूक सुरू झाली असून, रेल्वे वाहतूक एक तास उशिराने धावत आहे.
उद्योगपती गौतम अदानी हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. या भेटीमागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
उद्योगपती गौतम अदानी हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. या भेटीमागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
दिल्ली टू बेंगलोर जात असलेला गुटख्याचा कंटेनर पकडण्यात यवतमाळच्या वडकी पोलिसांना यश आले. यामध्ये विविध कंपन्यांचा तब्बल 39 लाख सहा हजाराचा गुटखा व कंटेनर असा एकूण 75 लाख 6 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई वडकी पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या देवदरी घाटात करण्यात आली.
आष्टी कडा रोडवर सहा लाख रुपये लुटल्याची फिर्याद एका तरुणानी आष्टी पोलिसात दिली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनं या घटनेचा तपास केला असता तक्रार देणारा आदेश बोखारे हाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
नागपूर : काँग्रेसची विस्तारित कार्य समितीची बैठक आज नागपूरमध्ये पार पडली. यावेळी काँग्रेसचे पदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधारी सरकारवर शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप केला. याबरोबरच त्यांनी काँग्रेच्या हात से हात जोडो संदर्भात माहिती दिली. "हात से हात जोडो या संदर्भात शेवटच्या माणसापर्यंत राहुल गांधी यांचा संदेश पोहोचवण्यासंदर्भात नियोजन झालं आहे. आजच्या बैठकीत पाच महत्त्वाचे ठराव करण्यात आले आहे. अतिवृष्टीच्या संदर्भात शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे या संदर्भात ठराव करण्यात आला. धान उत्पादक शेतकऱ्यांना शिंदे- फडणवीस सरकारने फसवले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहे, मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत आहेत. त्यामुळे पीक कर्ज सरसकट माफ करण्यात यावे अशी मागणी आहे. याबरोबरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे शेती पंपाचे वीज बिल माफ करावे अशी आमची मागणी आहे. सध्या महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे प्रयत्न होत आहेत, त्याचाही आम्ही निषेध करतो, सुरजागड प्रकल्प फार मोठा असून भिलाई स्टील प्लांटच्या धरतीवर त्या ठिकाणी कारखाना उभारला पाहिजे. स्थानिक तरुणांना रोजगार दिला पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केलीय.
65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पहिल्या कुस्तीत 86 किलो वजनी गटात चंद्रपूरच्या फैजल शेखने भंडाऱ्याच्या पुष्पक मिश्राचा पराभव केलाय.
Shiv Sena: धनुष्यबाण निवडणूक चिन्हासाठी खासदार-आमदारांची संख्या निर्णायक असून बहुमत शिंदे यांच्याकडे आहे, असा मुद्दा जेठमलानी यांनी निवडणूक आयोगासमोर मांडला.
महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक संपली आहे. या बैठकीला राष्ट्रादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, अंबादास दानवे, सुभाष देसाई उपस्थित होते.
Shiv Sena: सत्ता संघर्षाबाबत कोर्ट निकाल देईपर्यंत कोणतीही सुनावणी करू नये; ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी
Shiv Sena: शिवसेना आणि निवडणूक चिन्ह धनुष्य बाण कोणाचा, याबाबतची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर थोड्याच वेळेत सुनावणी सुरू होणार. सुनावणी आधीच दोन्ही बाजूने लाखोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्रे आणि इतर कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली आहेत.
महाविकास आघाडीकडून कोकण शिक्षक मतदार संघात बाळाराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे उद्या उपस्थित राहणार आहेत. तर विक्रम काळे हे उद्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत भरतील.
आदित्य ठाकरे यांच्या महालक्ष्मी रेस कोर्स संदर्भात प्रतिक्रिया म्हणजे वराती मागून घोडे अशा आहेत, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केलीय. 2013 ला महालक्ष्मी रेस कोर्स लीज संपली तेव्हा महापालिकेच्या सत्तेत कोण होतं? त्यानंतर राज्य सरकारची जमीन असेल तर राज्य सरकारमध्ये कोण होतं. रेसच्या बाबतीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रतिक्रिया येत आहेत. महालक्ष्मीच्या रेस कोर्सवर मुंबईकरांचा अधिकार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नाही किंवा मग आदित्य ठाकरेंच्या पेंग्विन सेनेचा देखील नाही, अशी टीका शेलार यांनी केलीय.
नांदेड शहरातील बाफना परिसरात मध्यरात्री गोळीबाराची घटना घडलीय. काल रात्री 11 च्या सुमारास बाफना पुलावरून स्कुटीवर जात असणाऱ्या महिलेवर गुंडाकडून गोळीबार करण्यात आला असून यात सदर महिला गंभीर जखमी झालीय. या घटनेत गोळी महिलेच्या दंडातून आरपार निघाली असल्याची माहिती आहे.सदर महिला काँग्रेसची कार्यकर्ती असून सविता बाबुराव गायकवाड असे जखमी महिलेचे नाव आहे. दरम्यान गोळीबार करणारे आरोपी हे परभणी येथील असून दोन मोटारसायकलवर आलेल्या तीन आरोपींनी महिलेस रस्त्यात अडवणूक करून गोळीबार केल्याचे निष्पन्न झालं आहे. दरम्यान इतवारा पोलीसांचे पथक आरोपींना ताब्यात घेण्यासाठी रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
जिल्ह्यातील चर्चेतील म्हैसाळ उपसा सिंचन योजना सौरउर्जेवर कार्यान्वित होणार आहे. जर्मनीच्या KFW बँकेचे कर्ज आणि त्या कर्जाच्या हमीस भारत सरकारने मंजुरी दली आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची वीज बिले भरण्यासाठी शेतकऱ्यांवर पडणारा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सौर उर्जा प्रकल्प राबविण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळावी, अशी मागणी जिल्ह्याचे खासदार संजयकाका पाटील यांनी केली होती. या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनी दौऱ्यादरम्यान याबाबत करार केला होता. ज्याला जर्मनीच्या KFW बँकेने प्रतिसाद देत कर्ज देण्यास व भारत सरकारने या कर्जाची हमी देण्यास मंजुरी दिली आहे.
सर्वपक्षीय नेत्यांना गिरगाव कोर्टाने दिलासा दिलाय. 2016 मधील मराठा आरक्षणासाठी काढलेल्या बाईक रॅलीच्या आयोजनात सहभागी झालेल्या सर्व नेत्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. सर्वपक्षीय सहा नेत्यांवर गुन्हा दाखल झाला होता. यात भाजप नेते आशिष शेलार, काँग्रेस नेते भाई जगताप, शिंदे गटाचे नेचे भरत गोगावले, विनोद घोसाळकर, राजन घाग आणि वीरेंद्र पवार यांचा समावेश होता. विनापरवाना बाईक रॅली काढणं, जमावबंदीचं उल्लंघन, वाहतुकीस अडथळा निर्माण केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
मुंबई : आज चार वाजता महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते हजर राहणार आहेत. काँग्रेसची नागपुरात बैठक असल्याने काँग्रेस नेत्यांची फोनवरून चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ आणि अमरावती पदवीधर मतदार संघातील उमेदवारांबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.
- राज्य वेतन सुधारणा समिती ( बक्षी समिती) चा अहवाल खंड-2 स्वीकारला. अनेक पदांच्या वेतन त्रुटी दूर. अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभ
(वित्त विभाग) - महानगरपालिकांमध्ये नामनिर्देशित पालिका सदस्यांच्या संख्येत सुधारणा
(नगर विकास विभाग ) - संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ अनाथांपर्यंत पोहचविण्यासाठी तर्पण फाऊंडेशन समवेत करणार
(सामाजिक न्याय विभाग) - शासकीय जमिनीवर बेकरी व्यवसायासाठी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीस मॉडर्न फूड एंटरप्राइझेसबरोबर व्यावसायिक करारास मान्यता
(महसूल विभाग) - गुरे ढोरे रस्त्यावर ने आण करण्यासंदर्भात आता कैदेऐवजी दंडाची तरतूद
(ग्रामविकास विभाग)
Makar Sankrant 2023 : नववर्षाचा पहिला सण अर्थातच मकर संक्रांत आता अवघ्या काही दिवसांवर आला असून या पहिल्याच सणावर महागाईचं सावट बघायला मिळतय. तिळाच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 40 रुपयांनी वाढ झालीय, तिळीने 200 चा आकडा पार केला असून 210 रुपये किलोवर जाऊन पोहोचलीय. तिळीचे दर गगनाला भिडल्याने साहजिकच याचा परिणाम तिळगुळाच्या लाडूवरही झाला असून लाडूही 20 ते 25 टक्क्यांनी महागले आहेत. गुजरातमध्ये तिळीचे उत्पादन घेतले जाते, सध्या मागणी वाढल्याने आणि त्या तुलनेत आवक कमी झाल्याने भाव वाढले आहेत. हल्लीच्या धावपळीच्या युगात घरी लाडू बनवणं अनेक महिलांना शक्य होत नसल्याने रेडिमेड लाडू खरेदीला त्या अधिक पसंती देतात.
Bhiwandi News : भिवंडी महानगरपालिका अभियंता सचिन नाईक यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती क्रमांक दोन मध्ये काम करणाऱ्या ठेकेदारांवर कोणतेही नियंत्रण न ठेवल्याने निकृष्ट रस्ते व गटार बांधले गेले आहेत. यास सर्वस्वी अभियंता सचिन नाईक हे जबाबदार असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणी साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी शहर अध्यक्ष मनोज गुळवे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालय प्रवेशद्वारे साखळी उपोषण सुरू केले आहे. अभियंता सचिन नाईक यांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेषतः भादवड, टेमघर पाडा, सुभाष नगर या भागात काही ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी यांना खुश करण्यासाठी काम करीत असताना रस्ते दुरुस्ती ही नागरीकांना त्रासदायक ठरेल अशी केली आहे
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाने 14 रानडुकरांना चिरडले. काल मध्यरात्रीची सुमारास नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात आजनगाव जवळ ही घटना घडली. अपघातानंतर क्षतिग्रस्त वाहन घेऊनच वाहनचालक फरार झाला आहे. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने रानडुक्कर समृद्धी महामार्गावर आलेच कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. समृद्धी महामार्गाचे दोन्ही बाजूला संरक्षण भिंत असून वन्यप्राणी समृद्धी महामार्गावर येऊ शकणार नाही असा दावा केला गेला होता. त्यामुळे काल रात्री अंजनगाव जवळ रानडुकरांचा कळप समृद्धी महामार्गावर कसा आला असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Beed : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी सीएससी सेंटर मधून पीक विमा भरला होता.. याच पीक विम्याच्या अर्जामध्ये विमा कंपनीने तब्बल सहा महिन्यानंतर शेतकऱ्यांनी भरलेल्या अर्जामध्ये अनेक त्रुटी काढल्या असून ते अर्ज परत सीएससी सेंटर कडे दुरुस्तीसाठी पाठवण्यात आले आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात बीड जिल्ह्यातील 16 लाख 48 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. मात्र त्याच शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये कंपनीने त्रुटी काढल्या असून ते अर्ज परत पाठवण्यात आल्याने अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Mahabaleshwar : महाबळेश्वरमध्ये आज विविध हिंदुत्ववादी संघटनानी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात महाबळेश्वरसह तालुक्यातील शेकडो लोक सहभागी झाले होते. लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत लोक यात सहभागी झाले होते. लव जिहाद, गोहत्या, धर्मांतर विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. महाबळेश्वरमधील छत्रपती शिवाजी चौक ते महाबळेश्वर नगरपालिकेपर्यंतचे या मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. हातात भगवे झेंडे आणि घोषणाबाजीमुळे महाबळेश्वरची संपूर्ण बाजारपेठ भगवी झाली होती. लवजिहाद, धर्मांतर, गोहत्या विरोधी कायदा राज्यात तसेच संपूर्ण देशात लागू करण्याची मागणी या मोर्चादरम्ययान करण्यात आली. मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Ratnagiri : रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहातील कर्मचारी संपावर गेले आहेत. मागील दोन महिन्यांपासून पगार झालेला नाही. परिणामी कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसले आहे. पगार होत नाही तोवर कामावर येणार नाही अशी भूमिका या कर्मचाऱ्यांची आहे. गुरुवारी हरवलेल्या पत्यांचा बंगला हे नाटक या ठिकाणी आहे. पण कर्मचारी मात्र संपावर आहेत.
Angarak Chaturthi 2023 : अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या मोरगाव येथे अंगारिका चतुर्थीच्या निमित्ताने राज्यभरातील भाविकांनी गर्दी केली आहे. पहाटे पाच वाजता मयुरेश्वर मंदिर उघडल्यानंतर भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी रांगा लावल्यात. सकाळी सात वाजता श्रींना नैवेद्य दाखवण्यात आला. तसेच दुपारी बारा वाजता पुन्हा नैवेद्य दाखवल्यानंतर चिंचवड दिवसांच्या वतीने खिचडीचा महाप्रसाद सुरू करण्यात आला. या वर्षातील हा अंगारिका चतुर्थीचा पहिला व शेवटचा योग असल्याने भाविकांची गर्दी केली आहे.
सायरस मिस्त्री अपघात प्रकरणी हायकोर्टात जनहित याचिका
तपास योग्यरितीनं झाला नसल्याचा याचिकेत आरोप
दोन महिन्यांनी दाखल झाला होता गुन्हा
स्थानिक रहिवासी संदेश जेधे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टानं उपस्थित केले सवाल
याचिकेतील मागण्यांकरता दंडिधिकारी कोर्टातही दाद मागता येईल - हायकोर्ट
गाडी चालवणा-या अनाहिता पंडोले नशेत असल्याचा याचिकाकर्त्यांचा वकिलांचा आरोप
मात्र सरकारी वकिलांनी हे आरोप फेटाळलेत, तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचा दावा
याचिकेवरील सुनावणी 17 जानेवारीपर्यंत तहकूब
के. पी. बक्षी समितीच्या अहवालावरती आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी बक्षी समिती नेमली होती
5400 पेक्षा अधिक ग्रेड पे असलेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे तीन आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणार
या निर्णयामुळे सहाव्या वेतन आयोगातील तबा होत दूर होणार
या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक 240 कोटी रुपयांचा अधिकचा बोजा पडणार
अँटालिया स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्याकांड प्रकरण
आरोपी सचिन वाझेचा विशेष NIA कोर्टात अर्ज
NIA नं तपासात जप्त केलेल्या सर्व पुराव्यांची माहिती देण्याची मागणी
NIA तपास अधिकाऱ्यांनी जप्त केलेली काही कागदपत्र आणि पुराव्यांची एक्झिबीट मध्ये नोंद नसल्याचा दावा
कोर्टानं अर्ज स्वीकारला, मात्र त्यावर अद्याप कोणतेही निर्देश नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 तारखेला मुंबई दौऱ्यावर
महासत्तांतरानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच मुंबईत दाखल होणार
मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपची जोरदार तयारी
आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर होणार महत्वपुर्ण बैठक
मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्रभुमीवर मोदींचा दौर्याला मोठ महत्व
मोदी स्वागतासाठी आज भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेत्या मुंबईतील सर्व आमदार आणि पदाधिकार्यांची महत्वपुर्ण बैठक
संध्याकाळी 8.30 वाजता सह्याद्रीवर होणार बैठक
ICICI-Videocon Loan Case: आयसीआयसीआय बँक व्हिडिओकॉन लोन घोटाळा
धूत यांच्या याचिकेवर सीबीआयला उत्तर देण्याचे निर्देश
वेणूगोपाल धूत सध्या -हदयातीली 99 टक्के ब्लॉकेजनं ग्रस्त
तातडीनं उपचारांची गरज असल्याचा धूत यांच्या वकिलांचा दावा
वेणुगोपाल धूत यांची सीबीआयचा गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका
शुक्रवारी सुनावणी घेण्याचं हायकोर्टाकडून मान्य
Nagpur News : 28 वर्षीय तरुण अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील राहणारा असून रविवारी संध्याकाळी तो कतारवरून नागपूरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला होता. त्या ठिकाणी त्याची कोरोना चाचणी झाली. काल त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील आरोग्य पथकाने त्याच्याशी संपर्क साधून त्याला गृहविलगीकरणात राहण्यास सांगितले आहे.
Mumbai Local : काल रात्री नालासोपारा रेल्वे स्थानकात एसी लोकलचे दरवाजे न उघडल्याने नालासोपाराचे प्रवासी थेट विरारला पोहचल्याची माहिती समोर आली आहे. तेथे प्रवाशांनी अर्धा तास गोंधळ घातला होता.
काल सोमवार रात्री 11.16 ला नालासोपारा रेल्वे स्थानकात चर्चगेट हून येणारी एसी लोकलचे दरवाजे तांत्रिक कारणामुळे उघडले गेले नाहीत. फक्त गार्डच्या बाजूचे तीन दरवाजे उघडले. आणि बाकीचे नऊ दरवाजे उघडलेच गेले नाहीत. त्यामुळे नालासोपाराचे प्रवासी थेट विरार रेल्वे स्थानकात पोहचल्याने नालासोपारा प्रवाशांनी एसी लोकल च्या ड्रायव्हरच्या केबिन समोर अर्धा तास गोंधळ घातला. शेवटी 12.15 ची शेवटची विरार चर्चगेट लोकल ने प्रवासी नालासोपारा रेल्वे स्थानकात पोहचले. या गोंधळामुळे शेवटची लोकल ही उशिराने सुटली होती.
Parbhani Wether Update : परभणी जिल्ह्यात मागच्या 4 दिवसांपासून थंडीची लाट कायम असुन तापमान हे अत्यंत कमी झाले आहे. काल जिल्ह्याचे तापमान हे 5.7 अंशावर होते आजही जिल्ह्याचे तापमान 6.4 अंश असुन सर्वत्र गारठा पसरलाय. ग्रामीण भागासह शहरी भागातही शेकोट्या पेटत असुन सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या ही घटलीय. दरम्यान दिवसभर सर्वत्र थंडगार वारे सुटत असून ज्यामुळे जिल्हा गारठून गेलाय.
Andheri News : मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरातील रेस्टॉरंट आणि बार मालकांनी दोन ग्राहकांना हॉकी स्टिक आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमात व्हायरल होत आहे. अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रो स्थानक खाली ग्रीटिंग बार आणि मेट्रो बार या दोन्ही बार मधील ग्राहकांनी जेवण लवकर मागितल्याने ही मारहाण झाल्याचा दावा ट्विटर वापरकर्त्याने हे व्हिडिओ ट्विट करताना केला आहे. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंधेरी पोलिसांनी फिर्यादींना बोलावून काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करून घेतला आहे.
Kalyan News: धावत्या रिक्षामधून महिलेची पर्स हिसकावून दुचाकीने धूम ठोकनाऱ्या तीन चोरट्यांना कल्याण खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे चोरटे सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाले होते .संकेत केळकर ,जय थोरात, अथर्व चव्हाण अशी अटक आरोपींची नावे आहेत.ही तिघे उल्हासनगर मध्ये राहणारे असून झटपट पैसे कमवण्याच्या लालसेपोटी त्यांनी चोरीचा मार्ग पत्करला.
Amravati News: अमरावती शहरात तब्बल 50 वर्षानंतर राष्ट्रीय किन्नर संमेलन 3 ते 11 जानेवारीपर्यंत आयोजित केला आहे. आज किन्नरांसाठी महत्वाचा दिवस आहे.
अमरावती शहरातून देशभरातून आलेले किन्नर सजून डजून या कलश यात्रेत सहभागी झालेत. यावेळी अनेक किन्नरांनी एक ते दिड किलो सोन्याचे दागिने परिधान करून या कलश यात्रेत सहभागी झालेत.
कलश यात्रेसाठी गंग्रोत्री वरून गंगाजल आणण्यात आले आहे. शहरातून ही कलश यात्रा भ्रमंती करणार.
कलश यात्रा काढण्याचं उद्देश हा आहे की, सगळ्यांच आरोग्य चांगलं राहावं, कोरोना सारखी महामारी कायमस्वरूपी हद्दपार व्हावी, ज्यांना नोकऱ्या नाही त्यांना नोकरी मिळो, ज्यांना मुलं-बाळं होत नाही त्यांच्यासाठी आणि अमरावती वासीयांचं आरोग्य उत्तम राहो यासाठी ही कलश यात्रा.
Maharashtra Wethr Updates : गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीने उत्तर महाराष्ट्र सध्या चांगलाच गारठला आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर कडाक्याची थंडी पडली असून नाशिक, धुळे चांगलेच गारठले आहे. धुळे जिल्ह्यातील तापमान पाच अंश सेल्सिअसवर आले असून यामुळे दिवसभर वातावरणात गारठा पसरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला असून, रोज सकाळी सात वाजता भरणार शाळा आता पाऊण तास उशिरा भरविण्यात येणार आहे. या कडाक्याच्या थंडीचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. तसाच रब्बी हंगामाच्या पिकांवर देखील झाला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर धुक्याची चादर पसरत असल्याने याचा परिणाम गहू हरभरा आणि कांदा या पिकांवर होत आहे. जिल्ह्यातील काही भागांत गव्हाच्या पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील जनतेचे वातावरण पसरले आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
10 January Headlines : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. याबरोबरच शिवसेना कुणाची? यावर निवडणूक आयोगासमोर आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. शिवाय आज राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. याबरोबरच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक आज नागपुरात होणार आहे.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुनावणी
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाऐवजी सात न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर व्हावी, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाने सुप्रिम कोर्टाकडे केलीये. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्णमुरारी, न्या. हिमा कोहली, न्या.पी. एस. नरसिंहा यांच्या घटनापीठासमोर आज या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
शिवसेना कुणाची? यावर केंद्रीय निवडणूक आयोगत सुनावणी
ठाकरे की शिंदे, शिवसेना कुणाची? यावर निवडणूक आयोगासमोर आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी आवश्यक कागदपत्रं सादर केली आहे. त्यामुळं आता पक्षावर हक्क कोणत्या गटाचा असणार, याबाबत निवडणूक आयोगात आज सुनावणी होणार आहे.
आज वर्षातली पहिली आणि शेवटची अंगारकी चतुर्थी
मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी रांगेत उभे रहातात. अंगारकी चतुर्थी निमित्त सिद्धीविनायकाचे दर्श घेण्यासाठी मुंबईज्या आसपारच्या परिसरातून लोक येत असतात.
राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक पार पडेल या बैठकीमध्ये आगामी विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भामध्ये चर्चा करण्यात येईल. सध्या राष्ट्रवादीच्या कोट्यात असणाऱ्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी विक्रम काळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर मित्र पक्ष शेतकरी कामगार पक्षाला कोकण शिक्षक मतदार संघासाठी बाळाराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र अद्याप अमरावती आणि नागपूरच्या जागांचे उमेदवार ठरलेले नाहीत.
नागपुरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक आज नागपुरात होणार आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुका, राज्यातील ज्वलंत समस्या या विषयावर या बैठकीत विचारमंथन करण्यात येणार आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रभारी एच. के. पाटील, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, बाळासाहेब थोरात, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महत्वाचे नेते उपस्थित रहाणार आहेत.
मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर डोळ्याचे ऑपरेशन
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात एका डोळ्याचे ऑपरेशन करण्यात येणार आहे. यासाठी शरद पवार सकाळी रुग्णालयात दाखल होणार आहे.
जोशीमठवर आज सुप्रिम कोर्टात सुनावणी
उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये जमीन खचत असल्याप्रकरणी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलीये. या याचिकेत प्रभावित क्षेत्रात लोकांना अर्थ सहाय्य, संपत्तीचा विमा उतरवण्याची मागणी करण्यात आलीये.यावर आज सुनावणी होणार आहे.
पुण्यात 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरूवात
65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला संध्याकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -