Maharashtra News Live Updates : काँग्रेस खासदार रजनीताई पाटील यांचं निलंबन, सभागृहातील विरोधकांच्या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणी कारवाई 

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Feb 2023 10:34 PM
Devendra Fadnavis : पत्रकार शशिकांत वारिसे अपघात मृत्यू प्रकरण अतिशय गंभीर, संपूर्ण सखोल चौकशी करणार: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : पत्रकार शशिकांत वारिसे अपघात मृत्यू प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्ह्याचा हेतू काय आहे, अजून कोण आहेत याची चौकशी करण्यात येणार आहे. हा खटला संपूर्ण  फास्ट ट्रॅकमध्ये नेणार असल्याचे त्यांनी म्हटले.

काँग्रेस खासदार रजनीताई पाटील यांचं निलंबन, सभागृहातील विरोधकांच्या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणी कारवाई 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभागृहातील भाषणादरम्यान विरोधकांचा गोंधळ चित्रित केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार रजनीताई पाटील यांना निलंबीत करण्यात आले आहे. उर्वरित अधिवेशनासाठी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना निलंबन करण्याची सत्ताधारी पक्षाने मागणी केली होती. 


विरोधकांचा गोंधळ चित्रीत करून तो इतरांना दिल्याबद्दल आणि सोशल मीडियावर व्हायरल केल्याबद्दल रजनीताई पाटील यांच्यावर  कारवाई करण्यात आली आहे. राज्यसभेचे सभागृह नेते पियुष गोयल यांनी या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करत आणि वारंवार इशारे देऊनही असे प्रकार घडत असल्याबद्दल तातडीने कारवाई करण्याची मागणी सभापतींकडे केली होती. दरम्यान, या कारवाईनंतर खासदार पाटील यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे. "स्वातंत्र्य सैनिकांच्या घरातून मी येते आहे. मला या अधिवेशनासाठी काय पूर्ण टर्म निलंबित करा. परंतु, ज्या पद्धतीने भाजपाने नाव घेऊन सभागृहात अपमान केला आहे तो सहन करणार नाही, असे रजनीताई पाटील यांनी म्हटले आहे. 

आदित्य ठाकरे यांनी घेतली तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची भेट 

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची भेट घेतली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी श्री करुणानिधी आणि शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीची स्मृती एम के स्टॅलिन यांना भेट दिली. तामिळनाडू राज्य शाश्वत विकास, पर्यावरण आणि हवामान कृतींमध्ये मोठी प्रगती करत आहे. त्यामुळे तामिळनाडू राज्याचा चांगला विकास होत आहे, असे कौतुक आदित्य ठाकरे यांनी या भेटीदरम्यान केले.  

राहुल कलाटेंच्या बंडखोरीनंतर मविआची महत्वाची बैठक

राहुल कलाटे यांनी चिंचवड विधानसभेत बंडखोरी केली त्यानंतर आता महाविकासआघाडीची बैठक पार पडत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर, नेत्या निलम गोरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, उमेदवार नाना काटे आणि इतर घटक पक्ष ही बैठकीत असतील. या बैठकीत राहुल कलाटे यांची शिवसेनेनं हकालपट्टी करावी अशी मागणी केली जाऊ शकते.

Indapur News : इंदापूर तालुक्यातील 3200 किलो मांगुर मासे केले नष्ट

Indapur News : इंदापूर तालुक्यातील कालठण नंबर 1 गावातील अवैद्य मांगूर पैदासकारांवर पुणे मत्स्य व्यवसाय विभागाने मोठी कारवाई करत या मांगूर पैदासकारांच्या मुसक्या आवल्यात. या केलेल्या कारवाईमुळे अवैद्यरित्या मांगूर माशाची पैदास करणारांचे धाबे दणालले आहे. आरोग्यास धोकादायक असलेला व राष्ट्रीय हरित लवादाने बंदी केलेल्या मांगुर माश्याची उजनी पाणलोट क्षेत्रात अतिशिय मोठ्या प्रमाणात आणि खुलेआम पणे संवर्धन केले जाते अशी माहिती मस्त्य विभागाला मिळाली होती. त्यामुळे मत्स व्यवसाय विभागाने ही कारवाई केली आहे. कालठण गावातील मांगुर तळ्यातील 3200 किलो मासे नष्ट करण्यात आले आहेत.

Beed Mosambi : संत्री, मोसंबीवर कोळी किडीचा प्रादुर्भाव

Beed Mosambi : गेल्या काही दिवसांमध्ये तापमानात मोठा बदल होत असताना या वातावरणामधील बदलण्याचा परिणाम संत्री मोसंबी बरोबरच लिंबूवर्गीय फळ पिकावर होताना पाहायला मिळतोय.. मोसंबी वर सध्या कोळी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून हीच कीड संत्र्यावर सुद्धा पाहायला मिळत आहे.. दरम्यान या किडीचा प्रादुर्भाव लक्षात न आल्यास फळाचा रंग बदलतो त्यामुळे बागेची वेळोवेळी पाहणी करणे गरजेचे आहे

Sangali Grapes Farmer : द्राक्ष उत्पादक शेतकरी पुन्हा जादा दराच्या मोहात

Sangali Grapes Farmer : सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक  शेतकरी आपल्या द्राक्षाला थोडाफार जास्त दर मिळतोय, म्हणून अनोळखी व्यापाऱ्याला लाखो रुपयांची द्राक्षे विना ओळख देऊन टाकतो आणि नंतर हा व्यापारी त्या द्राक्ष व्यापाऱ्यांना लाखो रुपयांना गंडा लावतो. ही द्राक्ष शेतकऱ्यांची फसवणुकीची मालिका थांबायचं नाव घेत नाही. मागील काही वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आणि पोलीस, जिल्हा प्रशासनाकडून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी ओळखीच्या आणि नोंदणी,  कागदपत्रे असलेल्याच व्यापाराकडे द्राक्ष विकावीत असे सातत्याने आवाहन करण्यात येत होतं.  तरीही द्राक्ष उत्पादक शेतकरी चार पैसे जास्त मिळतील या अपेक्षेने अनोळखी व्यापाऱ्यांना आपली लाखोची द्राक्षे देऊन टाकतो आणि नंतर फसवणूक करून घेत आहेत. 


 
Wardha NCP Janajagran Yatra : वर्ध्यात राष्ट्रवादीची जिल्हाभर जनजागरण यात्रा

Wardha NCP Janajagran Yatra :  वर्ध्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून  जनजागरण यात्रेची सुरुवात झाली आहे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तसेच आगामी निवडणुका लक्षात घेता वातावरण निर्मीतीच्या दृष्टीकोणातून कार्यकर्त्याना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रम येथून यात्रेला सुरुवात झाली असून ही यात्रा सेवाग्रामच्या बापूकुटी ते सावंगी टी-पॉईंट पर्यंतचा राहणार आहे. देशात महागाई,बेरोजगारी,पेट्रोल डिझेल वाढ झाली आहे. यांविरोधात ही यात्रा काढण्यात आली असून केंद्र सरकारच्या विरोधात या यात्रेत घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादीची ही यात्रा तीन दिवस चालणार आहे. वर्धा जिल्ह्याच्या आठही तालुक्यातील प्रत्येक चौकातुन ही यात्रा निघणार आहे.

Ahmednagar Dara Male Buffalo : अहमदनगर महोत्सवात 'दारा' रेडा ठरतोय आकर्षक, 12 कोटी किंमत
Ahmednagar Dara Male Buffalo : अहमदनगर येथे आजपासून सुरू झालेल्या'अहमदनगर महोत्सव 2023' या कृषी प्रदर्शन, महिला बचत गट आणि पशुप्रदर्शनामध्ये हरियाणा येथील दारा नावाचा बारा कोटी रुपयांचा रेडा हे प्रमुख आकर्षण ठरत आहे. 5 फूट 10 उंच एवढी दाराची उंची आहे आणि तीन वर्षे वय आहे. 
Indapu Crime : इंदापूर पोलिसांकडून 60 लाखांचा गांजा जप्त
Indapu Ganja Seized : इंदापूर पोलिसांनी सरडेवाडी टोल नाका परिसरात कारवाई करत तब्बल 240 किलो गांजा पकडला आहे. विषाखपट्टनम येथून पुण्याच्या दिशेने या अवैद्य गांज्याची वाहतूक होत होती. दरम्यान पोलीसांना मिळालेल्या टीप वरुन सापळा लावत ही कारवाई करण्यात आलीय. या कारवाईत पोलीसांनी तब्बल 60 लाख रुपयाचा गांजा जप्त केला आहे. हुंदाई कंपनीच्या क्रेटा कार मध्ये गांजा व्यवासाया करीता घेऊन जाताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय खबरीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये कारसह 70 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

 
Pimpri Chinchwad By Election : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत मविआ उमेदवारासमोर आव्हान

Pimpri Chinchwad By Election : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत मविआ उमेदवारासमोर आव्हान... राहुल कलाटे यांच्या बंडखोरीनं नाना काटे यांची चिंता वाढली... राहुल कलाटे मविआचं बंडखोर उमेदवार...


IND vs AUS : भारत वि.ऑस्ट्रेलिया सामना, नागपूर स्टेडिअमधून सट्टा लावणाऱ्या चौघांना अटक

Nagpur News : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघादरम्यान जामठा स्टेडिअमवर सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चौघांना आज अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे चौघेही स्टेडिअममध्येच सट्टा लावत होते. गुन्हे शाखेने चौघांनाही अटक केली आहे. या चौघांजवळील फोन पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. 


 

PM Modi Mumbai Visit Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

PM Modi Mumbai Visit Live Updates :  पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल





Nagpur Girl Death : पाच वर्षीय मुलीचा अर्धवट बांधलेल्या टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू

Nagpur Girl Death : नागपूरात पाच वर्षीय मुलीचा प्लॉटवरील अर्धवट बांधलेल्या टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. ज्योती साहू असं मृतक मुलीचं नाव असून ती मुकी (तिला बोलता येत नव्हतं) होती.. गुरुवारी दुपारपासून ती घराजवळून खेळता-खेळता बेपत्ता झाली होती. तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी संध्याकाळच्या सुमारास बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. संध्याकाळपासूनच तिचे कुटुंबीय आणि पोलीस ज्योतीचा शोध घेत होते. मात्र रात्र उशिरापर्यंत ती कुठेच मिळून आली नव्हती. आज सकाळी वडील राजू शाहू हे शोध घेत असताना घरालगत काही अंतरावर अर्धवट बांधकाम झालेल्या घरा समोर अर्धवट बांधकाम झालेल्या टाकी जवळ गेले. शंका आल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली आणि तेव्हा त्याचं टाकीत पडून पाण्यात बुडाल्यानं ज्योतीचा मृत्यू झाल्याचं उघड झाले. ज्योती ही त्या प्लॉटवर असलेल्या बोराच्या झाडाजवळ बोर खाण्यासाठी गेली असावी आणि पाण्याच्या टाकीत पडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

GONDIA DOG BITE : कुत्रा पिसाळलाय का सिद्ध करा? एसपी ऑफिसने पोलिसाला उपचारासाठी सुट्टी नाकारली

GONDIA DOG BITE : तुम्ही सरकारी नोकरीत असाल, तुम्हाला कुत्रा चावला असेल आणि उपचारासाठी तुम्हाला सुटी हवी असेल तर तुम्हाला आधी प्रमाणपत्र सादर करावे लागेल. चावणारा कुत्रा पिसाळलेला होता, असे प्रमाणपत्र सादर केले तरच सुटी मिळू शकते. प्रमाणपत्र नसेल तर अर्ज नामंजूर होऊ शकतो. एका पोलिस कर्मचाऱ्याला कार्यालयीन अधीक्षकाने सुटीच्या संबंधाने नुकतेच तसे पत्र दिले असून, त्या पत्राची प्रत व्हायरल झाली आहे.

Nandurbar Adivasi Akrosh Morcha : आदिवासींच्या नावाने सरकारी बोगस भरतीविरोधात आदिवासी आक्रोश मोर्चा

Nandurbar Adivasi Akrosh Morcha : महाराष्ट्रात अनेक बोगस आदिवासी सरकारी सेवेत कार्यरत आहेत. हे लोक खरे आदिवासी नसून बोगस आदिवासी आहेत, मात्र सरकारी सेवेतील जात प्रमाणपत्र अवैध ठरलेले कर्मचारी आणि जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या जवळपास 12 हजार 500 कर्मचारी सेवेत असून या कर्मचाऱ्यांची तात्काळ सेवेतून काढलं पाहिजे. मात्र शिंदे आणि फडणवीस सरकार तसं न करता या बोगस आदिवासींना संरक्षण देण्याचं काम करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासाठी कॅबिनेटमध्ये या बोगस आदिवासींच्या संरक्षणावर कायदा देखील आणला गेला आहे. या कायद्याला राज्याच्या आदिवासी विकास मंत्री यांनी विरोध देखील केला नाही आहे त्यामुळे हा कायदा तात्काळ रद्द करावा हा कायदा आदिवासींच्या विरुद्धच्या आहे. आदिवासींच्या नावाने सरकारी नोकरीत घेणाऱ्या लोकांना तात्काळ सेवेतून काढावे आणि खरे आदिवासींना सरकारी नोकरीत समाविष्ट करून घ्यावे आणि धनगर समाजाला आदिवासी समाजात प्रवर्गात समावेश करू नाही, अशी मागणी या मोर्चात करण्यात आलेली आहे. सरकारने या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष घेतले नाही तर यापेक्षाही मोठा मोर्चा येता काळात काढावा लागणार आहे असा इशारा माकापेचे आमदार निकोलो यांनी दिले आहे. या मोर्चासाठी माकापाचे आमदार विनोद भिवा निकोले गटाचे आमदार मंजुळा गावित माजी मंत्री पद्माकर वळवी आणि अनेक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Cotton Price : कपाशीच्या भावात चढउतार; शेतकऱ्यांना चिंता

Cotton Price : शेतकऱ्यांना यावर्षी कपाशीला मिळणारा भाव परवडणारा नाही. त्यामुळेच डिसेंबर महिन्यापासून शेतकरी कपाशीच्या दरात वाढ होण्याची प्रतीक्षा करीत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या घरी कापूस साठवून ठेवला आहे. तर काही शेतकरी आपल्या गरजेनुसार कापूस बाजारात विकायला आणत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कापूस 9 हजार रुपये क्विंटलच्या आसपास गेला होता. त्यांनतर लगेच हा दर 8 हजार 200 वर आला. कापूस दरातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. आणखी भाव गडगडले तर, अशीच चिंता शेतकऱ्यांना आहे. दुसरीकडे कापूस जिनिंगसह सूतगिरण्यामध्ये मुबलक कापूस नाही. त्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्राला देखील याचा फटका बसत आहे.

Yavatmal Crime : जन्मदात्या मातेकडून चिमुकलीला विकण्याचा प्रयत्न, अधिकाऱ्यांनी डाव हाणून पाडला

Yavatmal Crime : यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका बाळा जन्म देणाऱ्या मातेने आपल्या पोटच्या गोळ्यालाच विकण्याचा घाट रचला. मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळून लावण्यात आला. शेवटी या बाळाला बाल विकास अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आणि शिशुगृहात पोहोचवण्यात आलं. यवतमाळ शहरापासून जवळच असलेल्या ऐका खेडे गावातील 25 वर्षीय महिलेचा काही दिवसापूर्वीच विवाह झाला. परंतु अवघ्या काही दिवसाचं ती पतीपासून विभक्त झाली. अशाच तिचे तिसऱ्याशीच प्रेम संबंध जुळले. यातूनच ती गर्भवती राहिली. तिला प्रसूतीसाठी वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी तिने ऐका गोंडस बाळाला जन्म दिला.  मात्र हे बाळ गावात घेऊन कसे जायचे असा प्रश्न तिला पडला. शेवटी बदनामीच्या भीती पोटी तिने हे बाळ विकण्याचा घाट रचला. 

Beed Andolan : कापसाच्या दरवाढीसाठी चिंचवड गावात शेतकऱ्यांचा आंदोलन

Beed Andolan : कापसाला जास्तीचा भाव देण्यात यावा यासाठी वडवणी तालुक्यातल्या चिंचवन गावातल्या शेतकऱ्यांनी शेतातच आंदोलन केल आहे.. केंद्र सरकारणे विदेशातून कापसाची आयात बंद करावी अशी देखील मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या कापसाला सात ते आठ हजार रुपयांचा भाव मिळत असून अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठं आर्थिक नुकसान होत असल्याने या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातच कापसाच्या दरवाढीसाठी आंदोलन केलं.

Nandurbar Bus Accident : बसच्या आणि ट्रॅक्टरच्या अपघात, 21 विद्यार्थी जखमी

Nandurbar Bus Accident : शहादा तालुक्यातील खैरावे ते शहादा सप्तशृंगी पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर विद्यार्थ्याघेऊन जाणारी बसच्या आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या अपघात झाला असून या अपघातात 21 विद्यार्थी जखमी झाले आहेत. सध्या उसाच्या गळीत हंगाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक होत आहे. मात्र क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असल्याने अपघाताच्या प्रमाण वाढलेलं आहे. आज सकाळी देखील तापी नदीच्या पुलावर ट्रॅक्टरच्या अपघात झाला होता तर, पुन्हा खरवेश आधार बसला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली आहे. या धडके 21 विद्यार्थी किरकोळ जखमी आहेत. मात्र, या अपघातामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे, त्यामुळे आरटीओ विभागाने क्षमतेपेक्षा अधिक वाहन वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे.

Ratnagiri : पत्रकाराचा संशयास्पद अपघाती मृत्यू, राज्यभरात पत्रकारांची निदर्शनं

शशिकांत वारीसे या पत्रकाराचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर आता रत्नागिरीसह राज्यभरात पत्रकारांनी निदर्शने केली आहेत. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमावी आणि शशिकांत वारीसे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, तसेच दोषीवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी पत्रकार संघटना करत आहेत.

Yavatmal Urus : 94 वर्षांची परंपरा; बाबा कंबोलपोष उरुस
यवतमाळच्या आर्णी येथे हिंदू-मुस्लिम बांधवांचे ऐक्याचे ठिकाण असलेल्या बाब कंबोलपोष उरुसला सुरुवात झाली. हे ठिकाण सर्व धर्मसमभावचे प्रतीक बाबा कंबोलपोष यांच्या उरुसला 94 वर्षांची परंपरा आहे. उरुसच्या निमित्ताने विदर्भतील ही सर्वात मोठी यात्रा मानली जाते. सात दिवस चालणाऱ्या या यात्रेत मराठवाडा, तेलंगणा, विदर्भातील अनेक भाविक या ठिकाणी मनोकामना मागण्यासाठी दर्शनासाठी हजारो भाविक या ठिकाणी भेट देतात. या यात्रेदरम्यान करोडो रुपयांची उलाढाल होते. हजारो हाताना या यात्रेच्या माध्यमातून काम मिळते.

 
Nanded Kusalwadi Network Issue : गावकऱ्यांना मोबाईलच्या नेटवर्कसाठी जावे लागते डोंगरावर

Nanded Kusalwadi Network Issue : नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील कुसळवाडी गावात कुठल्याच कंपनीचे नेटवर्क उपलब्ध नसल्याने गावकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागतंय, गावकऱ्यांला एखादा फोन करायचा असेल तर गावाच्या बाजूला असलेल्या डोंगरावर जावं लागत. गावात सरकारी योजनेच्या अंमलबजावणी साठी इंटरनेटच उपलब्ध नसल्याने गावकऱ्यांना अनेक शासकीय सोयी सुविधा पासून वंचित राहावे लागतंय. शाळा सुस्थितीत असूनही विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळू शकत नाही तर गावात उच्च शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य नाही. इंटरनेट उपलब्ध नसल्यामुळे आम्ही पुरातन काळात असल्याचा भास होत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केलीय. तसेच सरकारने याकडे लक्ष देऊन गावात मोबाईलचे नेटवर्क उपलब्ध करून द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय

Panvel News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल येथे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. उद्योग मंत्री आणि रायगड जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या कार्यालयाचे उदघाटन झाले. यावेळी जिल्हासंपर्क प्रमुख रामदास शेवाळे उपस्थित होते.  पनवेल महानगर पालिका निवडणूक लागणार असल्याने शिंदे गटाने येथे आपली ताकद लावण्यास सुरवात केली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचे काम केले जात असून येत्या काही दिवसात चार ते पाच माजी नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. सुरू करण्यात आलेल्या कार्यालयातून मोठ्या प्रमाणात लोकांची सेवा करा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

Vidarbhavadi Andolan : बेरोजगारीच्या मुद्द्यावर विदर्भवाद्यांचं आंदोलन, काही विदर्भवादी पोलिसांच्या ताब्यात

Vidarbhavadi Andolan : बेरोजगारीच्या मुद्द्यावर आज विदर्भवाद्यांच्या आंदोलनात काही विदर्भवाद्यांनी जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने लागलेले बॅनर फाडण्याचे प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी काही विदर्भवाद्यांना ताब्यात घेतले आहे. नागपूरच्या जगनाडे चौकावर आज दुपारी विदर्भवाद्यांचे बेरोजगारीच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू असताना काही विदर्भवाद्यानी चौकावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवस निमित्ताने लागलेले बॅनर फाडून बॅनरवर चपला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी काही विदर्भवाद्यांना ताब्यात घेतलं आहे.

Bohara Samaj : बोहरा समजचा आज दुग्धशर्करा योग
Bohara Samaj : अंधेरी येथील बोहरी मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह या समाजाचे धर्मगुरू डॉ. सैयद्दना अली कदर मुफ्फदल सैफुदिन हे देखील सहभागी होणार आहेत. त्यांचे दर्शन व्हावे म्हणून देखील बोहरी मुस्लिम समाज उत्सुक आहे. त्यांचे दर्शन आणि पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घांटन असा दुग्धशर्करा योग बोहरी समाजाला मरोळ मध्ये लाभला आहे. यासाठी गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विविध राज्यातून बोहरी मुस्लिम समाजाचे नागरिक मरोळ मध्ये दाखल झाले आहेत.
Washim Band : मानोरा शहर कडकडीत बंद

Washim Band : वाशीमच्या  मानोरा शहरात गुरुवारी दिग्रसवरून अकोला येथे गोवंशाचं मास घेऊन जाणारे वाहन मानोरा शहरात सतर्क नागरिकाने पकडले आणि चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र काहीसमाज कंटकाने वाहन पेटवून दिल्याची घटना काल घडली होती. मात्र ज्या नागरिकांनी हे वाहन पेटवून दिले त्या दोषीवर कारवाई सामान्य नागरिकांना ताब्यात घेऊन पोलिसां कडून कारवाई करण्यात आली याच घटनेचा निषेध म्हणून मानोरा शहर व्यापारी संघटनेनेसह सामाजिक संघटनेने आज कडकडीत बंद ठेवण्यात आले.

Indapur Crime : इंदापुरात भीमा नदीत आढळला पाच तुकडे केलेला अन् शीर नसलेला मृतदेह; घटनेने खळबळ

Indapur Crime : एकाच कुटुंबातील सात जणांची हत्या (Murder) करुन त्यांचे मृतदेह (Crime) नदीत फेकून दिल्याची दौंड तालुक्यातील घटना ताजी असतानाच इंदापूर (Indapur) तालुक्यातील तक्रारवाडी येथे भीमा नदी पात्रात 30 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने अतिशय क्रूरपणे खून करुन त्याचे पाच तुकडे करत शीरविरहित मृतदेह प्लॅस्टिक पिशवीत आढळून आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना समजताच भिगवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Ajit Pawar : अजित पवारांच्या नातेवाईकांच्या घरातून पिस्तूल चोरीला; घटनेने एकच खळबळ, पोलीस तपास सुरु

Ajit Pawar : एकीकडे पुण्यात पोटनिवडणुकीचे (Bypoll Elections) वारे वाहत आहेत तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नातेवाईकांच्या घरातच चोरी झाली आहे. यात चोरांनी घरात असलेली पिस्तूल (Pistol) पळवली आहे. यासंदर्भात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. पुण्यातल्या औंध परिसरात ही घटना घडली आहे. गुरुवारी मध्यरात्री ही चोरी झाली आहे. याबद्दल चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 

चिंचवडमध्ये 43 लाख रुपयांची रोकड जप्त


चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सगळीकडे काटेकोरपणे नजर ठेवण्यात येत आहे. त्यात चिंचवडच्या दळवी नगर मध्ये 43 लाख रुपयांची रोकड मिळाली आहे. ही रोकड नेमकी कशासाठी वापरली जाणार होती? किंवा कोणासाठी वापरली जाणार होती. हे चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही मात्र चालकाकडून चौकशीत समाधान कारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांना बोलवत कारवाई करण्यात आली आहे.

चिंचवडमध्ये 43 लाख रुपयांची रोकड जप्त


चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सगळीकडे काटेकोरपणे नजर ठेवण्यात येत आहे. त्यात चिंचवडच्या दळवी नगर मध्ये 43 लाख रुपयांची रोकड मिळाली आहे. ही रोकड नेमकी कशासाठी वापरली जाणार होती? किंवा कोणासाठी वापरली जाणार होती. हे चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही मात्र चालकाकडून चौकशीत समाधान कारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांना बोलवत कारवाई करण्यात आली आहे.

संभाजी ब्रिगेड पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणूकीतुन माघार

 संभाजी ब्रिगेड पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणूकीतुन माघार घेणार घेतली आहे. पुण्यातील कसबा आण चिंचवडच्या पोटनिवडणीसाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटी तारीख आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते सचिन अहिर यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि उमेदवारी अर्ज मागे घेऊन शिवसेनेला पाठिंबा देण्याची विनंती केली. या विनंतीला मान देऊन दोन्ही मतदार संघाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर यांनी ही माहिती दिली आहे. 

Tiktok Layoffs : टिकटॉकनं सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

Tiktok Layoffs : शॉर्ट व्हिडीओ ॲप (Short Video App) टिकटॉक (Tiktok) कंपनीकडूनही नोकरकपात करण्यात आली आहे. टिकटॉकनं सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे. टिकटॉकनं सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. कंपनीने 40 कर्मचाऱ्यांना पिंक स्लीप (Pink Slip) म्हणजेच कामावरून कमी केल्याची नोटीस दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टिकटॉक कंपनीने सोमवारी भारतीय कर्मचाऱ्यांना एक फोन केला त्यानंतर कामावरून कमी केल्याची नोटीस पाठवली आहे.

कलाटेंच्या भेटीनंतर ठाकरे गटाचे सचिन आहिर माध्यमांसमोर

कलाटेंच्या भेटीनंतर ठाकरे गटाचे सचिन आहिर माध्यमांसमोर


 





Beed Granth Dindi : बीडमध्ये रंगणार दोन दिवस ग्रंथोत्सव
बीडमध्ये दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा आयोजन करण्यात आला असून त्यामुळे बिडकांना नवनवीन साहित्याची मेजवानी मिळणार आहे बीड शहरातील चंपावती शाळेमध्ये दोन दिवस हा ग्रंथ स्वतःला असून आज ग्रंथ दिंडी काढून या ग्रंथोत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे.. या ग्रंथ दिंडीमध्ये वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.. या ग्रंथोत्सवामध्ये बालकवी संमेलन कथाकथन यासारख्या अनेक नव नवीन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल आहे.

 
Digital Credit : कर्ज घेणं आणखी सोपं, लवकरच डिजिटल क्रेडिट उपलब्ध होणार

UPI Service Digital Credit : भारतीयांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. आता कर्ज (Loan) घेणं आणखी सोपं होणार आहे. केंद्र सरकार यावर्षी डिजिटल क्रेडिट (Digital Credit) सेवा सुरु करणार आहे. डिजिटल क्रेडिट सेवेमुळे रस्त्यावरील लहान विक्रेतेही मोठ्या बँकांकडून कर्ज घेऊ शकतील. यामुळे भारतीयांचाच नव्हे तर अनिवासी भारतीयांचा व्यवहार सुखकर होणार आहे. 10 देशांतील अनिवासी भारतीयांनाही UPI सेवा उपलब्ध होईल. केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री (Telecom and IT Minister) अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी गुरुवारी (9 फेब्रुवारी) यासंदर्भात माहिती देत मोठी घोषणा केली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ISRO Launch : इस्रोचं SSLV D2 लाँच; 'बेबी रॉकेट'मधून तीन उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण

ISRO SSLV D2 Launch : भारतीय अवकाश संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजे इस्रो (ISRO) कडून SSLV D2 रॉकेट (Small Sataellite Launch Vehicle) लाँच करण्यात आलं आहे. श्रीहरीकोटा इथून या उपग्रहाचं प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पडलं आहे. या रॉकेटमधून अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट (EOS 07), अमेरिकन कंपनी अँटरीसचा 'जानस 1' आणि देशभरातील विद्यार्थिनींनी बनवलेल्या 'आझादीसॅट 2' या लहान उपग्रहांना पृथ्वीभोवती 450 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत सोडण्यात आलं आहे.

Sharad Pawar at Nashik : शरद पवार आज नाशकात, वीज कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार

Nashik News: राज्यात सत्तांतर (Maharashtra Political News) झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज (10 फेब्रुवारी) नाशिक दौऱ्यावर आहेत. वीज कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात ते उपस्थित राहणार आहेत. अलीकडेच झालेल्या पदवीधर निवडणुकीमुळे (MLC Election) कॉंग्रेसमध्ये (Congress) निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पवार काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

BJP State Executive Meeting : नाशिकमध्ये भाजपचं प्रदेश कार्यकारणीचं पहिलंच अधिवेशन

Maharashtra Nashik News: राज्यात सत्तांतर (Maharashtra Political Crisis) घडवून आणल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पहिल्यांदाच नाशिक शहरात (Nashik News) पक्षीय अधिवेशनाच्या निमित्ताने येत आहेत. भाजपच्या (BJP) दोनदिवसीय प्रदेश बैठकीसाठी ते नाशिकमध्ये (Nashik) येत असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) तसेच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal), रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), भागवत कराड (Bhagwat Karad), कपिल पाटील (Kapil Patil), डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांच्यासह ज्येष्ठ नेते राम नाईक, राज्यातील ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit), गिरीश महाजन (Girish Mahajan), अतुल सावे (Atul Save), सुरेश खाडे (Suresh Khade) अशी भाजपच्या नेत्यांची मांदियाळी शुक्रवारी आणि शनिवारी नाशिकात अवतरणार आहे.

Nashik Crime : स्नॅपचॅटवरील मैत्री अल्पवयीन मुलीला महागात; नाशिकमध्ये महिनाभरात 12 विनयभंगाच्या घटना

Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) देवळाली कॅम्प परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय शाळकरी मुलीचे आक्षेपार्ह व्हिडीओ स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल करुन तिचा विनयभंग (Molestation) करण्यात आला आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा गारठा वाढणार, 'या' भागात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

Maharashtra Weather News : राज्यातील तापमानात (Temperature) सातत्याने चढ उतार होत आहेत. कधी थंडीचा कडाका (Cold Weather) तर कधी ढगाळ वातावरण जाणवत आहे. या तापमानातील चढ उताराचा शेती पिकांवर (Agriculture Crop) देखील परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, 12,13 आणि 14 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे. यामुळे उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Nashik Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाशिकमध्ये आगमन, छगन भुजबळ यांच्याकडून स्वागत

Nashik Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार हे विविध कार्यक्रमांसाठी आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहे. आज त्यांचे मेट भुजबळ नॉलेज सिटी हेलिपॅड येथे आगमन होताच छगन भुजबळ यांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केले.

Thane Vande Bharat Express : मुंबई-शिर्डी पहिल्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'चे ठाणे स्थानकात होणार जंगी स्वागत

मुंबई-शिर्डी पहिल्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'चे ठाणे स्थानकात जंगी स्वागत दुपारी 3.20 वा करण्यात येणार आहे.


यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.

Ahmednagar News : आज ग्रामस्थांचा राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा गावात प्रशासनाने कानिफनाथ मंदिरात जमावबंदी आदेश लागू केल्याने गुरुवारी तणावाची परीस्थीती निर्माण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून दोन प्रार्थना स्थळांमधील जागेवरून न्यायालयीन लढाई सुरू आहे. यातच प्रशासनाने जमावबंदी लागू केल्याने ग्रामस्थ आज राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार असून आमरण उपोषणला देखील सुरुवात करणार आहेत. गुरुवारी प्रशासनाने आरती करण्यास मज्जाव केल्यानंतर ग्रामस्थांनी थेट गावच्या वेशीवरच कानिफनाथ महाराजांची आरती केली होती.

Jalgoan News : नवरीला घेण्यासाठी सासऱ्याने पाठवलं चक्क हेलिकॉप्टर; वधू परिवाराला सुखद धक्का

Maharashtra Jalgaon News: लग्न म्हटलं की, अनेक गोष्टी येतात. वर पक्षाकडून विवाह सोहळ्यात ऐनवेळी पैशांसाठी अडून राहिल्याच्या अनेक घटनाही आपण नेहमी पाहतो. मात्र या मानसिकतेविरुद्ध असलेला एक अनोखा विवाह सोहळा जळगावात (Jalgaon News) पाहायला मिळाला. लग्नासाठी सासरच्यांनी वधू परिवाराला एक रुपया खर्च करु न देता त्यांच्या होणाऱ्या सुनेला घेण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवून मुलीसह तिच्या कुटुंबियांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Turkey Syria Earthquake : भूकंपातील मृतांचा आकडा 21000 पार, भारतीय बचाव पथकाने वाचवला चिमुकलीचा जीव

Turkey Syria Earthquake : तुर्की (Turkey) आणि सीरियामध्ये (Syria) विनाशकारी भूकंप (Earthquake) झाला आहे. भूकंपामुळे आतापर्यंत सुमारे 21 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासन मदत बचावकार्यामध्ये गुंतलं आहे. अनेक भागांत अद्याप मदतीचं साहित्य पोहोचलेलं नाही. भारताने संकटात सापडलेल्या तुर्कीला मदतीचा हात दिला आहे. भारताने NDRF च्या तीन पथकांसह मदतीचं साहित्य तुर्कीमध्ये पाठवलं आहे. भारतीय NDRF कडून श्वान पथकाच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. 

PM Modi Mumbai Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. दुपारी तीन वाजता पंतप्रधानांचे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आगमन होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ परिसरामध्ये बोरी मुस्लिम समाजाकडून उभारण्यात आलेली अल जामिया युनिव्हर्सिटीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

Ajitb Pawar Hingoli Tour : अजित पवार हिंगोली जिल्हा दौऱ्यावर

Ajitb Pawar : आज विरोधी पक्ष नेते अजित पवार हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या हस्ते आदिवासी आश्रम शाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन होणार असून चार वाजता ते शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहतील.

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.


पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर


आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi In Mumbai) यांचा मुंबई दौरा आहे. एका महिन्याच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्याशिवाय, पुणे जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. राज्यात इतरही महत्त्वाच्या घडामोडी आहेत. जाणून घेऊयात आज दिवसभरातील महत्त्वाचे कार्यक्रम...


मुंबई 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. दुपारी तीन वाजता पंतप्रधानांचे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आगमन होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ परिसरामध्ये बोरी मुस्लिम समाजाकडून उभारण्यात आलेली अल जामिया युनिव्हर्सिटीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.


- आज सकाळी ११ वाजता संत गुरु कांचनगिरी माता राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ' येथे भेट घेणार आहेत


- पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यू प्रकरणी आज मुंबईत पत्रकार संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. पत्रकारांचे राज्यव्यापी आंदोलन होणार आहे. 


पुणे 
- चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. दुपारी 3 वाजल्यानंतर दोन्ही विधानसभा मतदार संघाच चित्र स्पष्ट होणार आहे. 


अहमदनगर 
- कोरोनामुळे तीन वर्षांपासून होऊ न शकलेले जिल्हा परिषदेचे साईज्योती बचतगटांचे प्रदर्शन यंदा 10  ते 14 फेब्रुवारी दरम्यान अहमदनगर शहरातील न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे. यंदा यात कृषी महोत्सव आणि पशू प्रदर्शन यांचाही समावेश असणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार सुजय विखेंचीही उपस्थिती होणार आहे. जगातील सर्वाधिक उंचीचा आणि तीन वेळा राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेला हरियाणातील मुरा जातीचा बारा कोटी रुपये किंमतीचा दारा नावाचा रेडा या प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहे.


- मुंबईवरून सुटणाऱ्या वंदे भारत रेल्वेचे शिर्डी रेल्वे स्थानकावर आगमन होणार असून साईबाबा संस्थान आणि भाजपच्यावतीने प्रवाशांचे स्वागत करण्यात येणार आहे.


नाशिक 


- भारतीय जनता पक्षाच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठकीला आजपासून सुरुवात होणार आहे. या बैठकीचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने होणार आहे. रात्री 9.30 वाजल्यानंतर फडणवीस कार्यक्रमाला येतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी करणे, सरकारची कामकाज जनतेपर्यंत पोहचविणे आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे.


- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे तीन दिवसीय महाअधिवेशन शरद पवार यांच्या उपस्थितीत सुरू होणार आहे.


- कादवा सहकारी साखर कारखाना इथेनॉल प्रकल्पाचे सायंकाळी शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.