Maharashtra News Live Updates :  बालाजीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंध्रप्रदेशमध्ये ; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 2023 11:15 PM
मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, दोन ठार 

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झालाय. यात दोन ठार झाले असून तिघे जण जखमी झाले आहेत.  मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर जवळील कुमार गार्डन हॉलजवळ मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या टोयोटो गाडी, रिक्षा आणि स्कूटी अशा तीन वाहनांचा अपघात झालाय. यात स्कूटी आणि रीक्षाचा चक्काचूर झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होत की, शहापूर तालुक्यातील अश्विनी गोळे युवती जागीच ठार झाली असून उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला आहे. रिक्षा मधील तीन जण जखमी असून त्यांच्यावर शहापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत. 

 बालाजीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंध्रप्रदेशमध्ये 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंध्रप्रदेश येथील प्रसिद्ध देवस्थान तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी आंध्रप्रदेशमध्ये दाखल झाले आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ते सहकुटुंब तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले आहेत. उद्या पहाटे तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री पून्हा मुंबईच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत. 

मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 1.22 कोटी रूपयांचं अंमली पदार्थ जप्त, निघांना अटक 

मुंबई क्राईम गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थ विरोधी घाटकोपर युनिटने 1.22 कोटी रुपये किमतीच्या 610 ग्रॅम मेफेड्रोनसह एका विदेशी महिलेसह तिघांना अटक केली आहे. हे अंमली पदार्थ 31 डिसेंबर रोजी मुंबई शहरात आयोजित विविध पार्टी पुरवला जाणार होता. ANC अधिकार्‍यांनी माहितीच्या आधारे प्रथम दोन स्थानिक ड्रग पेडलरला अटक केली आणि त्यांच्याकडे 150 ग्रॅम मेफेड्रोन सापडले. तपासात त्यांनी हे मेफेड्रोन एका अफ्रिकन वंशाच्या महिलेकडून विरार पूर्व येथून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. 


 पोलिस पथकाने नायजेरियन महिलेला अटक केली असून त्यांच्याकडून 460 ग्रॅम मेफेड्रोन सापडले आहे. असे एकूण 610 ग्राम मेफेड्रोने जप्त करून तिघांना अटक केले आणि पुढची साकळी शोधत आहेत. 
अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात रिमांडकामी हजर केले असता न्यायालयाने  6 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  

केशवराव धोंडगे यांच्या निधनाने एका संघर्षशील अध्यायाचा अंत; विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : "शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणातला एक संघर्षशील अध्याय संपला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन लढणारं, विधीमंडळात जोरदार आवाज उठवणारं निर्भिड नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत दरारा असलेला 'मन्याडचा वाघ' हरपला आहे. मराठवाड्याचा, महाराष्ट्राचा बुलंद आवाज शांत झाला आहे. देशाचा स्वातंत्र्यलढा, हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, आणिबाणीविरुद्धचा लढा लढणाऱ्या केशवराव धोंडगे साहेबांचं जीवन संघर्षशील होतं. त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन हजारो मोर्चे, सत्याग्रहं, आंदोलनं केली. त्यांचं एकशेदोन वर्षांचं जीवन दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या कल्याणासाठी समर्पित होतं. विधीमंडळातीन भाषणांनी महाराष्ट्र दणाणून सोडण्याची त्यांची ताकद  होती. त्यांच्यासारख्या नेतृत्वाचं निधन ही महाराष्ट्राच्या राजकारणाची, वंचितांच्या हक्काच्या चळवळीची मोठी हानी आहे. केशवराव धोंडगे साहेबांचं जीवन हे राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांना सदैव मार्गदर्शन, प्रेरणा देत राहील, " अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

जंगल सफारी साठी वन विभागाला "बुलढाणा अर्बन" ने दिले तीन वाहने

बुलढाणा जिल्ह्याला ज्ञानगंगा, अमबा बरवा व लोणार अशी तीन अभ्यारण्य लाभले आहेत. या तिन्ही अभ्यारण्याच क्षेत्रफळ खूप मोठ असल्याने यातील पर्यटनाला चालना मिळावी म्हणून व त्यातील  विविध जंगली प्राण्यांना जवळून बघण्यासाठी वन विभागाला मदत म्हणून बुलढाणा अर्बन हे पाऊल उचलले आहे. या अभयारण्यात बिबट , अस्वल, हरण, निलंगाय, अस्वल, या सह विविध प्राण्याचा वावर आहे. या अभ्यारण्यात हे प्राणी व अभ्यारण्य पाहण्यासाठी वन्यजीव विभागाने जंगल सफारी सुरु केली आहे. ही जंगल सफारी करण्यासाठी वाहनांची आवश्यकता होती  म्हणून बुलढाणा अर्बन पतसंस्थेने तीन वाहणे जंगल सफारीसाठी उपलब्ध करून दिले आहे.

कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातील कुदनूर येथील सिद्धेश्वर कारखान्यात भीषण आग, एक कोटी रूपयांचं नुकसान

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कुदनूर या गावातील सिद्धेश्वर कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत सुमारे एक कोटी रूपयांचं नुकसान झालंय. शशिकांत शिवराम सुतार आणि बंधू यांचे श्री. सिद्देश्वर साँ मिल, ऑइल मिल, लाकुड मिल आणि फॅब्रिकेशनचा कारखाना आहे. या कारखान्यात आज पहाटे 4 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये कारखान्यातील सर्व मशीनरी, मोटरसायकली आणि दोन बकरी असा सुमारे एक कोटीच्या मालमत्तेचं जळून नुकसान झालंय, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. आग लागल्याची माहिती मिळताच गडहिंग्लज नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही.

 औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव एकावर जीवघेणा हल्ला

औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून राष्ट्रवादीच्या युवक जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सात जणांविरोधात बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.  निवडणुकीत पराभव झाल्याने शिंदे गटाकडून हा हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप तरमळे यांच्या गटाकडून करण्यात आला आहे. 

New Year 2023 : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांनी विविध देवस्थानांवर गर्दी

New Year 2023 : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांनी विविध देवस्थानांवर गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भिवंडी तालुक्यातील श्री वज्रेश्वरी देवी मंदिरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. दरवर्षी मंदिरात भाविकांची गर्दी होत असते. यंदा मात्र नववर्षाच्या स्वागतासाठी नेहमीपेक्षा जास्त गर्दी असल्याचं चित्र दिसत आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी श्री वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थेचे विश्वस्त प्रयत्न करत आहेत. 

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट, पाच ते सहा जण जखमी 

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झालाय. बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ ही घटना घडली आहे. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना भीषण स्फोट झाला. फटाका फॅक्टरीमध्ये जवळपास 40 कर्मचारी काम करत होते अशी प्राथमिक माहिती. स्थानिकांच्या माहितीनुसार 6 ते 7 कर्मचारी जखमी झाले आहेत. जीवितहानी बद्दल अधिकृत कोणीतीही माहिती मिळालेली नाही. अग्निशमन दल आणि पोलिस  घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

Nanded News: जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई केशवराव धोंडगे यांचे वयाच्या 103 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन

Nanded: नांदेड येथील क्रांतिवीर जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई केशवराव धोंडगे यांची आज प्राणज्योत मालवली. ते 103 वर्षांचे होते. नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील मूळ रहिवाशी असलेले भाई केशवराव धोंडगे यांनी विधानसभा आणि लोकसभेतही प्रतिनिधीत्व केले.  गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे औरंगाबाद येथील MGM रुग्णालयात उपचार त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

Happy New Year : 2023 मध्ये 'या' दिवशी आहे हिंदू नववर्ष, इतर धर्मियांसाठी नवीन वर्ष कधी? वाचा सविस्तर...

Happy New Year 2023 : संपूर्ण जगभरात सर्वसाधारणपणे 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष (New Year 2023) साजरे केले जाते. पण नवीन वर्ष फक्त एक जानेवारीलाच नाही तर इतरही दिवशी साजरे केले जाते, असे नाही. जगभरात नवीन वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तारखांना साजरे केले जाते. वेगवेगळे धर्म आणि पंथही वेगवेगळ्या तारखांना नवीन वर्ष साजरे करतात. 2023 वर्षामध्ये हिंदू नववर्ष तसेच इथर धर्म आणि पंथीयांचे नवीन वर्ष कधी येणार आहे, ते जाणून घ्या.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


 

Beed Hunger Strike : परळीत आठ दिवसांपासून प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण, तिघाची प्रकृती खालावली
बीड : परळीमध्ये गेल्या आठ दिवसापासून औष्णिक वीज निर्मिती केंद्रासमोर प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन सुरू आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने तीन आंदोलकांची प्रकृती गंभीर झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वीज वितरण कंपनीसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना शासकीय नोकरीत सामावून घेऊ असा आश्वासन देण्यात आलं होतं मात्र, अद्याप एकालाही नोकरी न मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांनी हे आंदोलन सुरू केले आहे. आठ दिवसापासून हे आंदोलन सुरू असून अद्याप एकही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेतली नसल्याने आंदोलक संतप्त झाले आहेत.

 
Belgaon Kudnur Fire : कुदनूर येथील कारखान्याला भीषण आग, लाखोंचे नुकसान

बेळगाव : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कुदनूरमधील चंदगड येथील शशिकांत शिवराम सुतार आणि बंधू यांच्या लाकूड कापण्याचे अरायंत्र (सिद्धेश्वर सॉ मिल), तेल गिरणी (सिद्धेश्वर ऑइल मिल) आणि शिवराम फॅब्रिकेटर्स या कारखान्यांना आग लागली. या भीषण आगीत सुमारे 70 लाखांचे नुकसान झाले. या आगीत कारखान्यात बांधलेली दोन बकरी आणि दोन मोटर सायकलही जळून खाक झाल्या. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना आज पहाटे 4 वाजता घडली. शशिकांत सुतार, त्यांचे बंधू  गजानन सुतार, तुकाराम सुतार, दिलीप सुतार, जानबा सुतार कुटुंबीय गेली अनेक वर्षे कुदनुर येथे कालकुंद्री मार्गानजीक आरायंत्र चालवतात. गेल्या काही वर्षात त्यांनी याच कारखान्यालगत तेल गिरणी आणि फॅब्रिकेटर्सचा मोठा व्यवसाय सुरू केला होता. या कारखान्याला पहाटे अचानक भीषण आग लागली. आगीमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, त्यात तिन्ही कारखान्यांचे मिळून सुमारे 50 लाखांचे नुकसान झाल्याने सुतार कुटुंबियांवर संकटाचा डोंगर कोसळला आहे. 

Pandharpur Vitthal Temple : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 3 लाख भाविक विठुरायाच्या चरणी

नवीन वर्षाची सुरुवात विठुरायाच्या दर्शनाने करण्यासाठी देशभरातून जवळपास 3 लाखांच्यापेक्षा जास्त पर्यटक आणि भाविक आज पंढरपूरमध्ये असून देवाच्या दर्शनाने नवीन वर्षाचा संकल्प करत वर्षाची सुरुवात केली जात आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी विठ्ठल मंदिराला फळे आणि फुलांची आकर्षक सजावट केल्याने विठ्ठल मंदिर फुलांच्या सुवासाने दरवळून निघाले आहे. विठुरायाच्या जयघोष करीत आणि नाचत हे विठ्ठल भक्त दर्शनाचा आनंद घेत आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या मनातील इच्छा आणि संकल्प विठुरायाला सांगून नवीन वर्षाची सुरुवात करण्याची भावना या भाविकांच्या असल्याने प्रत्येकाला विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागून राहिलेली आहे. भाविकांची रांग चंद्रभागा घाटावरून पुढे विप्र दत्त घाटापर्यंत पोचली असून दर्शनाला सात ते आठ तासांचा  अवधी लागत आहे. 

Nagpur Murder : नागपुरात नवीन वर्षाची पहिलीच सकाळ रक्तरंजित

उपराजधानी नागपूरातील नवीन वर्षाची पहिलीच सकाळ रक्तरंजित ठरली आहे... नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत कमाल टॉकीज रोडवर भररस्त्यात सर्वांदेखत सकाळी दहा वाजता तरुणाची हत्या झाली आहे.. राजेश मेश्राम असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून चार ते पाच हल्लेखोर त्याचा पाठलाग करत होते... राजेश एका पानटपरी वर गुटखा घेण्यासाठी थांबलेला असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने अनेक वार करून त्याचा जीव घेतला.. राजेशचा मिनरल वॉटर सप्लायचा व्यवसाय होता अशी माहिती असून जुन्या वैमानस्यातून हत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे... घटनास्थळी पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून पुरावे गोळा करत हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे...

Beed Marhan : घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी बीडमध्ये नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बीड शहरामध्ये शुल्लक कारणावरून एका महिलेला घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी नऊ जणाविरोधात बीडच्या शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. सत्यजित गुरखुदे आणि गुडबा जाधव यांच्यामध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला आणि याच वादातून जाधव यांनी गुरखुदे यांच्या घरात घुसून महिलांना मारहाण केली तर गाड्यांची ही तोडफोड केली असून त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nagpur Hindu Rashtra Rally : 'भारताला लवकर हिंदू राष्ट्र जाहीर करा', या मागणीसाठी नागपुरात रॅली

भारताला लवकरात लवकर हिंदू राष्ट्र जाहीर करा या मागणीसाठी आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात रॅली काढण्यात आली आहे... हिंदू धर्म जागरण समितीच्या वतीने नागपूरच्या पारडी परिसरात ही रॅली काढण्यात आली आहे... परिसरातील शिवशक्ती  हनुमान मंदिरात सामूहिक हनुमान चालीसा पठण केल्यानंतर ही रॅली निघाली असून या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले आहे... जगात अनेक मुस्लिम राष्ट्र आहेत, अनेक ख्रिश्चन राष्ट्र आहेत... त्यामुळे भारतात बहुसंख्येने हिंदू असताना भारताला हिंदू राष्ट्र जाहीर करण्यात यावे, अशी मागणी रॅलीमध्ये सहभागी असलेल्यांनी केली आहे... दरम्यान, भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र असताना तुमची मागणी अवाजवी आणि घटनेच्या विरोधात नाही का या प्रश्नावरही रॅलीत सहभागी असलेले तरुण सहमत नाही... भारतात बहुसंख्येने हिंदू असल्यामुळे भारताला हिंदू राष्ट्र जाहीर केलेच पाहिजे असा त्यांचा मत आहे...

Asteroid : पृथ्वीवर मोठं संकट? पृथ्वीच्या दिशेने सरकतोय 72 फूट लघुग्रह

72 Foot Asteroid Alert : एकीकडे संपूर्ण जग नवीन वर्ष (New Year Celebration) जल्लोषात आणि उत्साहात साजरे करताना दिसत आहे, मात्र दुसरीकडे पृथ्वीवर (Earth) एक मोठं संकट येण्याची शक्यता आहे. एक विशाल उपग्रह (Asteroid) पृथ्वीच्या दिशेने सरकत आहे. अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाने (NASA) याबाबत एक धोक्याचा इशारा दिला आहे. एक विशाल 72 फूट लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने सरकत असल्याची माहिती नासाने दिली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Nashik News: नाशिक: इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनीमध्ये मोठी आग, काही जण अडकल्याची भीती; आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

Nashik News:  नाशिक:  इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनीमध्ये मोठी आग लागली आहे. कारखान्याला लागलेल्या आगीत काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

Jalgaon Crime News : नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनला अटकाव, बिहारी मजुरांनी स्थानिक मजुराला संपवलं; जळगावमधील धक्कादायक घटना

Jalgaon Crime News : सगळीकडे नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे जळगाव जिल्ह्यामधील (Jalgaon) धरणगाव तालुका (Dharangaon Taluka)  एका हत्येच्या घटनेने हादरलं. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ताट वाजवताना हटकल्याने रागाच्या भरात चार ते पाच जणांनी एकाची हत्या केली. धरणगाव तालुक्यातील कृष्णा कापूस जिनमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

BHANDARA BURNING MINI TRUCK : कापूस वाहतूक करणाऱ्या मिनी ट्रॅकने अचानक घेतला पेट
भंडारा : नागपूर जिल्ह्यातील मौदा येथून भंडाऱ्याकडे कापूस वाहतूक करणाऱ्या एका मिनी ट्रॅकने अचानक पेट घेतला. यात संपूर्ण मिनी ट्रॅक आणि कापूस जाळून खाक झाला. ही थरारक घटना नववर्षाच्या सकाळी राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा तालुक्यातील जवाहरनगर येथे घडली. ट्रॅक मधून अचानक धुर निघाल्याने चालकाने ट्रक थांबविला. स्वत:सह क्लीनर बाहेर आले. काही क्षणात बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. महामार्गावरील वाहतूक काही काळ प्रभावित झाली होती.
Cotton Price : जळगावमध्ये पांढऱ्या सोन्याला झळाळी, दरात 500 ते हजार रुपयांची वाढ, शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा

Cotton Price News : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Cotton Farmers) एक दिलासा देणारी बातमी आहे. कापसाच्या (Cotton) दरात 500 ते 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. मागील आठवड्यात कापूस दरात एक ते दीड हजार रुपयांची घसरण झाली होती. त्यामुळं राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी (Farmers) चिंतेत होते. मात्र, आज जळगाव बाजारपेठेत कापसाच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे. त्यामुळं काही प्रमाणात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आणखी कापसाच्या दरात वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

Beed Police : गंभीर गुन्ह्याची फाईल गहाळ झाल्या प्रकरणी हवालदाराच निलंबन

बीड : गंभीर गुन्ह्याच्या दस्तऐवजाची फाईल गहाळ झाल्याप्रकरणी बीडच्या पाटोदा पोलीस ठाण्यातील एका हवालदाराला निलंबित करण्यात आल आहे. सुनील सोनवणे असा या हवालदाराचा नाव असून एका गंभीर गुन्ह्यातील फाईल पोलीस उपाधीक्षक यांना दाखवून ते परत येत असताना त्यांच्याकडून जामखेड येथील कला केंद्रामध्ये गहाळ झाली होती चर्चा पोलीस दलात होती आणि आता याच प्रकरणी बीडचे पोलीस अधीक्षक यांनी सुनील सोनवणे यांना तात्काळ निलंबित केल आहे.

LPG Price : वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा चटका; एलपीजी गॅस सिलेंडर दरात वाढ

LPG Price:  नव्या वर्षाची सुरुवात महागाईच्या चटक्याने झाली आहे. इंधन कंपन्यांनी आज एलपीजी गॅस सिलेंडरचे दर (LPG Cylinder Price) जाहीर केले आहेत. प्रति सिलेंडरमागे 25 रुपयांची दरवाढ ( Price Hike) करण्यात आली आहे. ही दरवाढ व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडरसाठी लागू करण्यात आली आहे. तर, घरगुती वापरासाठीच्या एलपीजी (LPG) गॅस सिलेंडरच्या (Gas Cylinder) दरात कोणताही बदल झाला आहे. वाढत्या महागाईच्या काळात दिलासा देण्यासाठी एलपीजीचे दर (LPG Price) कमी करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, सरकारकडून, इंधन कंपन्यांनी कोणताही दिलासा दिला नाही.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Tulajabhavani Temple : तुळजाभवानीच्या दर्शनासाठी वर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी
Kolhapur : महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी नव्या 2023 वर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.  नव्या वर्षांची सुरुवातच रविवारने सुरू झाल्याने महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी च्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. सध्या भवानीचा शाकंभरी नवराञोत्सव सुरू आहे. नववर्ष ,रविवार सुट्टी, आणि शाकंभरी नवराञोत्सवा निमित्ताने  आज मांडण्यात येणारी रथअलंकार महापुजा हा दुग्धशर्करा योग साधण्यासाठी भाविकांनी देवीदर्नशनार्थ प्रचंड गर्दी केल्याचे चित्र तुळजापूर दिसत आहे.
Shanishinganapur New Year : शनिशिंगणापुरात मोठ्या प्रमाणात भाविक दाखल
Ahmednagar : नववर्ष स्वागततासाठी देश, विदेशी, राज्यांच्या कानाकोपऱ्यातील भाविक मोठ्या प्रमाणात शनिशिंगणापुरात दाखल झाले आहेत. शनिवारी लाखो भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. शिंगणापुरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता आठ दिवसासाठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. दिवसभर भाविकांसाठी महाप्रसाद, बर्फीचा प्रसाद उपलब्ध करून देण्यात आले आहे.
Dhule Marathon : मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करून नववर्षाचे स्वागत
धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले या मॅरेथॉन स्पर्धेत 500 हून अधिक तरुण-तरुणींनी सहभाग घेतला होता, बोरकुंड येथील इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान यांच्या वतीने या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलें होते. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. 

 

 
Kolhapur Breaking कोल्हापुरात हिंदू गर्जना मोर्चाचं आयोजन... धर्मांतर बंदी आणि लव्ह जिहादविरोधात मोर्चा

कोल्हापुरात हिंदू गर्जना मोर्चाचं आयोजन... धर्मांतर बंदी आणि लव्ह जिहादविरोधात मोर्चा





Ahmednagar News: नववर्ष स्वागततासाठी शनिशिंगणापूरात भाविकांची मांदियाळी

Ahmednagar News: नववर्ष स्वागततासाठी राज्यांच्या कानाकोपऱ्यातील भाविक मोठ्या प्रमाणात शनिशिंगणापुरात दाखल झाले आहेत. शनिवारी लाखो भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. शिंगणापुरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता आठ दिवसासाठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. दिवसभर भाविकांसाठी महाप्रसाद, बर्फीचा प्रसाद उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

Pandharpur : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विट्ठल मंदिराला आकर्षक सजावट

पंढरपूर : नवीन इंग्रजी वर्षाचे स्वागत विठ्ठल मंदिरात आकर्षक अशी फळे आणि फुलांच्या सजवटीने करण्यात आले आहे. नवीन वर्षासाठी विठ्ठल मंदिर प्रशासनाने मंदिराच्या वेळेत कोणताही बदल केला नसेल तरी मंदिर चौखांबी, सोलाखांबी, रुक्मिणी चौखांबी येथे या फुले आणि फळांनी मनमोहक सजावट केली आहे. आळंदी येथील भाविक प्रदीप ठाकूर याने ही सजावटीची सेवा केली आहे. यात सफरचंद, डाळिंब, बोरे, मोसंबीसह विविध फळांचा वापर या सजावटीत करण्यात आली आहे.  झेंडू, गुलाब, आर्चेड, गुलछडी, मोगरा, शेवंती आशा फुलांच्या रंगसंगती चा वापर या सजावटीत करण्यात आला आहे.


सजावटीचे फोटो येथे पाहा.

Tipeshwar Sanctuary : टिपेश्वर अभयारण्य पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल

Yavatmal : नववर्षाच्या पहिल्या दिवशी पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्य पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल होत आहे. वाघाचे हमखास दर्शन होत असल्याने पर्यटकांना टिपेश्वरची भुरळ पडली आहे. त्यामुळे अनेकांची पाऊले आपोआप टिपेश्वर अभयारण्यकडे वळली आहे. यवतमाळ जिल्ह्यासह मुंबई, पुणे, औरंगाबाद, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहे. याठिकाणी पर्यटकांनी आधीच सकाळच्या सत्रासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. टिपेश्वर आणि व्याघ्र दर्शन असे हमखास समीकरण झाले आहे.

Shirdi Crowd : नवीन वर्षाच्या सुरुवात साईदर्शनाने

नवीन वर्षाचा स्वागत करताना नवीन वर्षाची सुरुवात साईंच्या दर्शनाने करण्यासाठी साई भक्तांनी मोठी गर्दी केलेले आहे. साई नामाचा जयघोष करत काल रात्रीपासूनच साईभक्त मोठ्या उत्साहात आणि जल्लोष समय वातावरणात शिर्डी नगरीत दाखल झाले आहेत. आज सकाळपासूनच शिर्डीतील दर्शन रांगा या भक्तांनी फुलून गेल्या आहेत. दर्शन रांगांमध्ये साई नामाचा जयघोष करत साईंच्या समाधीवर डोकं टिकवण्यासाठी साईभक्त आतुर झालेले आहेत. 

Sharad Pawar : शरद पवार इंदापूर दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. इंदापूर तालुक्यातील बोरी आणि कळस या गावांना शरद पवार भेटी देणार आहेत. बोरीमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शरद पवार पाहणी करणार आहेत. शेतकऱ्यांची संवाद साधणार आहेत. तर कळस मध्ये ऊस उत्पादक शेतकरी यांच्या शेताला भेट देणार तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

New Year Celebration : नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनानं, राज्यातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी

New Year Celebration : आजपासून नवीन वर्षाला (New Year) सुरुवात झाली आहे. सर्वजण नवीन वर्षाचं जल्लोषाच स्वागत करत आहेत. नवीन वर्षानिमित्त राज्यातील प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी गेली आहे. देवदर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात करण्याला नागरिकांनी पसंती दिली आहे. देवस्थानच्या ठिकाणी लाखो लोकांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळालं. आज पहाटेपासूनचं दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. राज्यातील पंढरपूर (Pandharpur), शिर्डी (Shirdi), अक्कलकोट (Akkalkot), दगडूशेठ हलवाई मंदिर पुणे, सिद्धिविनायक मंदिर मुंबई, जेजुरीचे खंडेरायाचे मंदिर या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Maharashtra Doctors Strike : राज्यभरातील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर

Maharashtra Doctors Strike:  महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर उद्यापासून (2 जानेवारी 2023) संपावर जाणार आहेत. निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड आणि सरकारमध्ये मागण्यांबाबत शनिवारपर्यंत कोणतीही चर्चा न झाल्याने संघटना संपावर ठाम आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

New Rules From 1st January 2023 : आजपासून 'हे' नियम बदलणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होईल? जाणून घ्या...

New Rules 2023 : सर्वत्र नवीन वर्षात उत्साह पाहायला मिळत आहे. या नवीन वर्षात म्हणजे आजपासून अनेक व्यावसायिक क्षेत्रांमध्ये बदल होणार आहेत. या बदलांचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे. 1 जानेवारी 2023 पासून बँकिंग, विमा, पोस्ट ऑफिस इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये मोठे बदल होणार आहेत. याचा परिणाम तुमच्या बजेटवर होणार आहे.



  • वाहने महागणार

  • पोस्ट ऑफिस योजनेचा व्याजदर वाढणार

  • क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल

  • बँक लॉकरचे नियम बदलणार

  • विमा प्रीमियम महागण्याची शक्यता


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Mega Block : वर्षाच्या पहिल्या दिवशी घराबाहेर पडताय? मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक

मुंबईकरांनो, नवीन वर्षाच्या (New Year 2023) पहिल्या दिवशीही तुमची मेगाब्लॉकपासून (Local Train Mega Block) सुटका नाही. वर्षाच्या पहिल्याच दिवशी घराबाहेर पडणार असाल तर, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी लोकल मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Petrol Diesel Price Today : नवीन वर्षात पेट्रोल डिझेलच्या दरात बदल, ग्राहकांना दिलासा? जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात (Crude Oil Price) मागील काही दिवसांपासून चढ-उतार सुरू आहेत. नव्या वर्षातही कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. कोरोना महासाथीचे संकट (Coronavirus Pandemic) आणि आर्थिक मंदीची छाया गडद झाल्यास त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या दरावर होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol Diesel Price 1st January 2023) जाहीर केले आहेत. इंधन कंपन्यांनी आजही ग्राहकांना कोणताही दिलासा दिला नाही. पेट्रोल डिझेलचे इंधन दर स्थिर आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Doctors Strike: नवीन वर्षाच्या सुरुवातीला राज्यभरातील 5 हजारांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर

नवीन वर्षाच्या सुरुवातीला राज्यभरातील 5 हजारांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर संपावर 


विविध मागण्यांसाठी मार्डचा संपाचा इशारा, संपाला बंधपत्रित डॉक्टरांच्या संघटनेचा पाठींबा 


अतिदक्षता विभाग वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्याचा संघटनेचा इशारा


मुंबईत केईएम, नायर, सायन, कूपर आणि जे जे रुग्णालयाला फटका बसण्याची शक्यता लक्षात घेत प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्थेच्या सूचना


शनिवार पर्यंत वेळ देउन देखील चर्चेचं निमंत्रण न मिळाल्याने उद्यापासून संघटना संपावर ठाम

New Year Celebration सिडनी, दिल्ली ते मुंबई... नव्या वर्षाचं जगभरात दणक्यात स्वागत, पाहा फोटो



 
Koregaon Bhima : आज 205 वा शौर्य दिन, विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा इथं नागरिकांची गर्दी

Koregaon Bhima : कोरेगाव भीमा या ठिकाणी आज 205 वा शौर्य दिन साजरा होत आहे. शौर्य दिनाच्या (Shaurya Din) पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) इथे विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांना मोठी गर्दी केली आहे. आज दिवसभरात लाखो आंबेडकर अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे सकाळी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. तर मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil), प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar), केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार जितेंद्र आव्हाड हे नेतेही कोरेगाव भीमा या ठिकाणी येणार आहेत.

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.


सर्वत्र नववर्षाचा उत्साह...


आजपासून 'या' गोष्टी बदलणार 
 
- पोस्ट ऑफिस योजनेचा व्याजदर वाढणार
- वाहने महागणार 
- क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल
- बँक लॉकरचे नियम बदलणार
- विमा प्रीमियम महागण्याची शक्यता


कोरेगाव भीमा शौर्य दिन


कोरेगाव भीमा इथल्या विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकर अनुयायी येणार. अजित पवार (सकाळी 6 वाजता), चंद्रकांत पाटील, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, जितेंद्र आव्हाड हे नेतेही कोरेगाव भीमाला भेट देतील.


ठाकरे सरकारच्या 19 बंगले घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्या एफआयआर दाखल करणार


मुंबई- ठाकरे सरकारच्या 19 बंगले घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्या रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करणार आहेत, सकाळी 11.30 वाजता. 


सिल्लोडला राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार 


औरंगाबाद-  सिल्लोडला राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, अर्थराज्यमंत्री भागवत कराड उपस्थित राहणार आहेत, दुपारी 2 वाजता. 


शरद पवार इंदापूर दौऱ्यावर


इंदापूर- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार इंदापूर दौऱ्यावर येत असून ते दत्तात्रय भरणे यांच्यासोबत आधुनिक द्राक्ष बागेची पाहणी करणार आहेत, सकाळी 10.15 वाजता. 


हिंदू समाजाकडून लव्ह जिहादच्या विरोधी मोर्चा


कोल्हापूर- सकल हिंदू समाजाकडून लव्ह जिहादच्या विरोधी मोर्चा काढण्यात येणार आहे, सकाळी 10 वाजता


भाजप मेळावा आणि नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य यांचा सत्कार


सांगली- भाजप मेळावा आणि नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य यांचा सत्कार होणार आहे. कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार संजय काका पाटील आणि जिल्ह्यातील आमदार उपस्थित राहतील, सकाळी 11 वाजता. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.