Maharashtra News Updates 09 November 2022 : Sharad Pawar: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे 'भारत जोडो' यात्रेत सहभागी होणार नाहीत; सूत्रांची माहिती
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणूकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 113 ग्रामपंचायतीतील सदस्य पदासह थेट सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी निवडणूक होत असलेल्या संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली असून दि.23 डिसेंबर पर्यंत आचार संहिता लागू राहणार आहे.
18 नोव्हेंबर रोजी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द होईल. दि.28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजता पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागविणे व सादर करण्यात येईल. दि.5 डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येणार आहे. दि.7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. याच दिवशी दुपारी 3 वाजता नंतर निवडणूक चिन्ह वाटप व अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. दि.18 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजता आवश्यकता असल्यास मतदान घेण्यात येईल. दि.20 डिसेंबर रोजी मतमोजनी व निकाल घोषित करण्यात येईल. दि.23 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल.
गुजरात मधील सक्करबाग येथील सिंहाची जोडी नोव्हेंबर अखेरीस मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल होणार आहे. 26 सप्टेंबर रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गुजरात दौऱ्याच्या वेळी गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्याशी याविषयी चर्चा झाली होती. त्यावेळी गुजरातमधील सिंहाची जोडी मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठविण्याबाबत एकमत झाले होते. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकारणाच्या परवानगीसाठी हा विषय थांबला होता. आता ही परवानगी मिळाल्याने गुजरात येथील सक्करबाग प्राणी संग्रहालयातील आशियायी सिंहाची जोडी (एक नर व एक मादी ) आता नोव्हेंबर अखेरीस मुंबईत दाखल होणार आहे.
Beed News : राज्यामध्ये आरोग्य विभागामध्ये 3200 आरोग्य सेविकांच्या पदभरतीला मान्यता देण्यात आली होती मात्र त्यामध्ये 597 पदांना अद्याप देखील मंजुरी देण्यात आली नसून बीड जिल्ह्यातील तीस आरोग्य सेविकांना कामावरून कमी करण्यात आला आहे.. वेगवेगळ्या आरोग्य उपकेंद्रामध्ये काम करणाऱ्या या आरोग्य सेविकांना त्या ठिकाणी डिलिव्हरी वार्ड नसल्याचे कारण सांगून कामावरून कमी केल्याने आरोग्य सेविकांनी संताप व्यक्त केलाय.
केरळ सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपालांना कुलपती पदावरून हटवण्यासाठी अध्यादेश आणण्याचा निर्णय घेतला आहे. कुलपतींच्या जागी तज्ज्ञ आणण्याचे नियोजन असल्याची माहिती मिळत आहे.
Sharad Pawar Bharat Jodo Yatra: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे 'भारत जोडो' यात्रेत सहभागी होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, राजेश टोपे हे यात्रेत सहभागी होणार आहेत.
Sharad Pawar Bharat Jodo Yatra: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे 'भारत जोडो' यात्रेत सहभागी होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, राजेश टोपे हे यात्रेत सहभागी होणार आहेत.
CJI Chandrachud: देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून न्या. धनंजय चंद्रचूड यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांना दोन वर्षांचा कालावधी मिळणार आहे.
CJI Chandrachud: देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून न्या. धनंजय चंद्रचूड यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांना दोन वर्षांचा कालावधी मिळणार आहे.
Pune News : पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक
जुने कैदी आणि नवीन कैद्याता झाली एकमेकावर तुफान दगडफेक
दगडफेक सुरू असताना दगडफेक अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारागृह पोलीस हवालदारांला कैद्याच्या जमावाने केली मारहाण
येरवडा कारागृहातील हॉस्पिटल सेप्रेट 7 जवळ असलेल्या बरेक नंबर 27 ते 31 या बॅरिक जवळ तुफान दगडफेक
येरवडा जेल मधील भांडणात दोन पोलीस जखमी झाल्या आहेत.
Mumbai News : अग्नीसुरक्षा यंत्रणेतील त्रुटी प्रकरणी मुंबईतील दादरमधल्या छबिलदास हायस्कूलला नोटीस बजावण्यात आली असून दुसऱ्या मजल्यावरील उपाहारगृह देखील बंद करण्यात आलं आहे. फायर फायटिंग सिस्टम बंद, पंपातून कमी पाण्याचे प्रेशर आणि सिलेंडरसाठीअग्निशमन दलाची परवानगी नव्हती, अशा विविध त्रुटींमुळे दादर पश्चिम येथील छबिलदास हायस्कूलला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या मजल्यावरील उपाहारगृह बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भविष्यात उपाहारगृह सुरु केल्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून योग्य ती कारवाई करण्याचा इशारा शाळा व्यवस्थापनाला देण्यात आला आहे. दादर पश्चिम येथील छबिलदास हायस्कूलमध्ये बुधवार 2 नोव्हेंबर रोजी शाळेतील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कॅटिनमध्ये गॅस गळतीमुळे सिलेंडरचा स्फोट झाला होते. यामध्ये तीन कर्मचारी जखमी झाले होते. स्फोट इतका मोठा होती की खिडकीच्या काचा थेट समोरील घरांपर्यंत पोहोचल्या होत्या.
Mumbai Goa Expressway : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकच्या पेढे परशुराम ते खेरशेत पर्यंतचे 34 किलोमीटर चौपदरीकरणाचे काम 31 मे पर्यंत पूर्ण होऊन महामार्गावरील दोन्ही लेंथ वाहतूकीसाठी खुल्या होणार असल्याची माहिती ईगल इंफ्रा इंडीया कंपनी ने दिली आहे.
Kolhapur News : मालमत्तेच्या वादातून शौचालयास गेलेल्या वडिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न
घटनेत देवबा हजारे जखमी, त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु
माणुसकीला काळीमा फासणारी घटना कागल तालुक्याच्या व्हन्नूर गावातील
वडील शौचालयास गेल्यावर बाहेरुन कडी लावून रॉकेल टाकून पेटवलं
या घटनेत देवबा हजारे जखमी तर मुलगा शिवाजी आणि सून सरला यांच्याविरोधात गुन्हा दाखल
मालमत्तेच्या वाटणीवरुन वडील आणि मुलगा, यांच्यात सुरु होता वाद
Ratnagiri Kokan Rail : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एलटीटी डबल डेकर या ट्रेनच्या धडकेत एका गवा रेड्याचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर ते कडवई या दरम्यान ट्रेनच्या गव रेड्याला धडक बसली. जवळपास 500 मीटरपर्यंत या गव रेड्याला ट्रेनने फरफटत नेले. मोटर आणि प्रवाशांनी जवळपास अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर बफर जॉईंटमध्ये अडकून पडलेल्या गार्डला बाजूला केले मी त्यानंतर ट्रेन पुढे मार्गस्थ झाली.
Amravati News : गुरुकुंज उपसा सिंचन योजनेच्या प्रकल्पातील पाणी अखेर तब्बल 15 वर्षांनी शेतकऱ्यांच्या शेत शिवारात पोहोचलं. गुरुकुंज उपसा सिंचन योजनेच्या सुमारे 22 गावातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला. "अमृतासारखं पाणी माझ्या शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचलं, आज सोन्यासारखा दिवस आहे. वडील भैय्यासाहेब ठाकूर यांनी पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झालं. गेल्या दहा वर्षापासूनच्या संघर्षाला यश मिळालं. अखेर झोपलेला जलसंपदा विभाग जागा झाला आणि माझा बळीराजा सुखावला," असं मत माजीमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं.
Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातील बुलढाणा-खामगाव रोडवर बिबट्या मार्गावर आल्याचे पाहायला मिळाला. रस्त्याने जाणाऱ्या एका कारसमोर हा बिबट्या आला होता. कारमधील एका व्यक्तीने आपल्या मोबाईल फोनच्या कॅमेरामध्ये हा बिबट्या कैद केला. मात्र या रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारांमध्ये भीतीचं वातावरण बघायला मिळत आहे.
Sangli News : ऊस आंदोलनाची सांगली जिल्ह्यात ठिणगी पडली. वाळवा तालुक्यात बळीराजा संघटनाच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडले. ऊसाला एकरकमी चार हजार रुपये दर मिळावा, या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आले. जिल्ह्यातील काही कारखानदारांनी ऊसाला एकरकमी एफआरपी घोषित न करता गाळप हंगाम सुरु केल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
SUGAR CANE FARMERS AGITATION : ऊस आंदोलनाची सांगली जिल्ह्यात ठिणगी पडली
वाळवा तालुक्यात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या टायरी बळीराजा संघटनाच्या कार्यकर्त्यानी फोडल्या
उसाला एकरकमी चार हजार रुपये दर मिळावा, या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आल्या
जिल्ह्यातील काही कारखानदारांनी ऊसाला एकरकमी एफआरपी घोषीत न करता गाळप हंगाम सुरू केल्याने शेतकरी संघटना आक्रमक
Mumbai News : आंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुली प्रकरणात निलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी आज (9 नोव्हेंबर) तपास अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत. तपासात सहकार्य करण्याचं आणि हजर राहण्याच निर्देश कोर्टाने दिले होते. कोर्टाने सौरभ त्रिपाठी यांना 15 नोव्हेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. आंगडिया खंडणी वसुली प्रकरणात सौरभ त्रिपाठी यांच्याविरोधात एल टी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. सौरभ त्रिपाठी हे अनेक महिन्यांपासून पोलिसांना सापडत नव्हते.
Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर धावणारी सीएसएमटी मुंबई-मडगांव जनशताब्दी एक्सप्रेस 9 नोव्हेंबरपासून म्हणजेच आजपासून विद्युत इंजिनावर धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने मंगळवारी (8 नोव्हेंबर) सायंकाळी स्पष्ट केलं. यामुळे प्रवास वेगवान आणि प्रदूषणमुक्त होणार असून रेल्वेच्या खर्चातही बचत होणार आहे.
Jan Shatabdi Express : कोकण रेल्वे मार्गाने धावणारी सीएसएमटी मुंबई-मडगांव जनशताब्दी एक्सप्रेसही 9 नोव्हेंबरपासून विद्युत इंजिनावर धावणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं मंगळवारी सायंकाळी स्पष्ट केलं आहे. यामुळे प्रवास वेगवान आणि प्रदूषणमुक्त होत असून रेल्वेच्या खर्चातही बचत होत आहे.
Bharat Jodo Yatra : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra LIVE Updates) आजचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसातील पहिलं सत्र सकाळी सहाला सुरू झाले गुलाबी थंडी आणि त्यात राहुल गांधी यांनी सहा वाजता सहा वाजता ही यात्रा सुरू केली आहे. शंकर नगर ते पुढे नायगाव लॉन्स या ठिकाणी ही पहिला हॉल्ट या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर चारच्या नंतर दुसरं सत्र सुरु होणारे सध्या राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चालतात इतर नेतेही त्यांच्या सोबत चालत आहेत.
Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज तिसरा दिवस आहे. आज ही यात्रा सकाळी सहा वाजता रामतीर्थ, बिलोली येथील शंकर नगर येथून सुरु होणार आहे. ही यात्रा नांदेड जिल्ह्यातील वजीरगांव फाटा येथे रात्री विश्रांतीसाठी थांबणार आहे.
Dhananjay Chandrachud will take oath as Chief Justice : न्या. धनंजय चंद्रचूड आज भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असेल. आज सकाळी 10 वाजता त्यांचा शपथविधी होईल. न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झाला. त्यांचे वडील वायव्ही चंद्रचूड हेही देशाचे सरन्यायाधीश राहिले आहेत. न्या. चंद्रचूड यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी शबरीमाला, समलैंगिकता, आधार आणि अयोध्या प्रकरणांसह अनेक मोठ्या खटल्यांमध्ये न्यायाधीश म्हणून काम पाहिलं आहे.
पार्श्वभूमी
देशाचे सरन्यायाधीस उदय लळीत आज निवृत्त होत असून त्यांच्या जागी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आज सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे देशाचे 50 वे सरन्यायाधीश असतील. तसेच आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा राज्यातील दुसरा दिवस असणार आहे. त्याचसोबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. या महत्वाच्या बातम्यांसह आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम, घटना-घडामोडींबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची थोड्यात माहिती देणार आहोत.
धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार
न्या. धनंजय चंद्रचूड आज भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असेल. आज सकाळी 10 वाजता त्यांचा शपथविधी होईल. न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झाला. त्यांचे वडील वायव्ही चंद्रचूड हेही देशाचे सरन्यायाधीश राहिले आहेत. न्या. चंद्रचूड यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी शबरीमाला, समलैंगिकता, आधार आणि अयोध्या प्रकरणांसह अनेक मोठ्या खटल्यांमध्ये न्यायाधीश म्हणून काम पाहिलं आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा तिसरा दिवस
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज तिसरा दिवस आहे. आज ही यात्रा सकाळी सहा वाजता रामतीर्थ, बिलोली येथील शंकर नगर येथून सुरु होणार आहे. ही यात्रा नांदेड जिल्ह्यातील वजीरगांव फाटा येथे रात्री विश्रांतीसाठी थांबणार आहे.
संजय राऊतांना जेल की बेल?
पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीनावर आज फैसला होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्ट त्याचा राखून ठेवलेला फैसला जाहीर करणार आहे. तपासयंत्रणेचे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊत यांच्या वतीनं करण्यात आला आहे. तर संजय राऊतच संपूर्ण घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप ईडीने केला आहे. संजय राऊतांची न्यायालयीन कोठडीही संपत असल्यानं त्यांनाही आज कोर्टापुढे हजर केलं जाईल.
अनिल देशमुखांच्या जामीनावर सीबीआय आपलं उत्तर सादर करणार
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनावर सीबीआय आपलं उत्तर आज हायकोर्टात सादर करणार आहे. मुंबई सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्याच्या निर्णयाला देशमुखांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. सीबीआयच्या याच एफआयआरवरून ईडीनं दाखल केलेल्या ईसीआयआरमध्ये हायकोर्टानं दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवल्यानंतरही सीबीआय कोर्टानं देशमुखांना जामीन नाकारणं अयोग्य असल्याचा देशमुखांच्यावतीनं हायकोर्टात दावा करण्यात आला आहे.
आदित्य ठाकरे यांचा सोलापूर दौरा
शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर असून ते सांगोल्यातील संगेवाडी आणि मांजरी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.त्यानंतर आदित्य ठाकरे महूद मार्गे जेजुरीला जातील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -