Maharashtra News Updates 07 December 2022 : अधिवेशनाआधी होणारा मंत्रिमंडळ विस्तार लाबणीवर
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
अधिवेशनाआधी होणारा मंत्रिमंडळ विस्तार लाबणीवर पडलाय. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपतील नेत्यांना मंत्रिपदासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. लाबंलेला मंत्रिमंडळ विस्तार हा अधिवेशनानंतर होण्याची शक्यता आहे.
राज्यपालांविरोधात 13 डिसेंबरला पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. विरोधी पक्ष आणि विविध संघटनांनी याबाबतची घोषणा केलीय.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दूरध्वनी करून सीमा प्रश्नावर तसेच गेल्या आठवड्यातील घडामोडींची संपूर्ण माहिती दिली. काल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या दूरध्वनी संवादाचा दाखला सुद्धा त्यांनी यावेळी दिला. महाराष्ट्राचा विषय अमित शाह यांनी अतिशय गांभीर्यपूर्वक ऐकून घेतला. कालच माध्यमांशी बोलताना हा विषय आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मांडू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.
बॉम्बे हायकोर्टाचे नाव बदलून महाराष्ट्र हायकोर्ट करा, अशी मागणी भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकसभेत केलीय. 1995 ला बॉम्बेचं मुंबई झालं, त्यानंतर या नावाचं कुठलंही शहर अस्तित्वात नाही. सुप्रीम कोर्टाने पण याबाबत संसदीय मार्गाने बदल होईल असं म्हटलं आहे. त्यामुळे देशातल्या सर्वच राज्यांमध्ये हायकोर्ट त्या त्या राज्याच्या नावाने ओळखलं जावं.
Ahmednagar News: नगर-पाथर्डी-शेवगाव रस्ता, नगर-राहुरी-कोपरगाव रस्ता, नगर-मिरजगाव-टेंभुर्णी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे.
वेळोवेळी आंदोलने करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. लंके यांच्या उपोषणाला काँग्रेस, मनसे, शिवसेना, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे.
Maharashtra Karnataka Dispute: महाराष्ट्र कर्नाटक वादाचे लोकसभेत पडसाद; खासदार सुप्रिया सुळे आणि विनायक राऊत यांनी उपस्थित केला मुद्दा
Ajit Pawar-Eknath Shinde Meet : महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद प्रश्नी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळ मागितली आहे. बेळगाव भागात गाड्यांवर झालेले हल्ले आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांशी बातचीत करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज दुपारी दोन वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे या दोघांची भेट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विकासकामे आणि शेतकरी समस्या यावर देखील बैठकीत चर्चा होणार आहे.
Beed News: बीड जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात 102 क्रमांकाची हेल्पलाइन असलेल्या 37 रुग्णवाहिका चालकांचे वेतन पाच महिन्यापासून मिळाले नसल्यान या रुग्णवाहिका चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुंबई येथील आडवांस कंपनीकडून या चालकांची भरती करण्यात आली होती मात्र वेतन मिळत असल्याने तात्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार करून देखील अद्यापही या चालकांना वेतन मिळालेल नाही त्यामुळे तात्काळ वेतन मिळाल्यास या रुग्णवाहिका चालकांनी रुग्णवाहिका बंद ठेवून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
PM Modi Live : आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाआधी पंतप्रधान मोदी यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी तरुण खासदारांना आवाहन केलंय. जी-20 चं अध्यक्षपद मिळाल्यामुळे भारताला आपलं सामर्थ्य दाखवण्याची संधी मिळाली आहे, विश्वात ताकद दाखवण्याची संधी आपल्याला मिळत आहे. दरम्यान देशाचे आणि जी-20 संबंधित महत्वाचे निर्णय अधिवेशनात होतील. असं ते म्हणाले.
Sindhudurg News : कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचं वेळापत्रक कोडमडलं. वैभववाडी रेल्वे स्टेशनला गेल्या तासाभरापासून कोकण कन्या एक्स्प्रेस इंजिन बिघाडामुळे अडकून आहे. अजूनही अर्धा तास इंजिन बिघाड दुरुस्ती करण्यासाठी लागणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांचे हाल होत आहेत.
Sanjay Raut: महाराष्ट्र अस्थिर करण्याचा डाव, दंगली घडवण्याचा भाजपचा डाव; संजय राऊत यांचा आरोप
Sanjay Raut: बेळगाव भाग हा केंद्रशासित प्रदेश करा, संजय राऊत यांची मागणी
Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर त्यांच्या गटाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विविध उपमा दिल्या जाताहेत,खोक्यांचे सरकार, बंडखोर, गद्दार यानंतर आता तोतया अशी उपमा देण्यात आली आहे शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांनी परभणीत शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये हे सर्व तोतया असून हे काही दिवसांचेच महिमान असल्याचं वक्तव्य केले.
परभणीच्या पुर्णा शहरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.ज्याला शिवसेनेचे नेते तथा परभणीचे संपर्कप्रमुख रवींद्र वायकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पदाधिकाऱ्यांना बोलताना वायकर यांनी एक बंड तोतयांचे झाले होते ते इतिहासात नोंदले गेले मात्र आपल्या मधल्या काही तोतयांनी बंड केले आहे हे सर्व तोतया काही दिवसांचेच मेहमान असुन नियती त्यांचे बंड मोडून काढेल आणि रसातळाला पोचवलं असेही वायकर म्हणाले आहेत.
Maharashtra Karnataka Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद आता संसदेतही उमटणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्याकडून राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस देण्यात आली आहे.
Kolhapur News : महाराष्ट्राने केलं धाडस! कोल्हापुरातून पहिली बस बेळगावच्या दिशेने रवाना
24 तासानंतर कोल्हापुरातून कर्नाटकात बससेवा झाली सुरु
बसने सौंदत्तीला जाणाऱ्या भाविकांकडून समाधान व्यक्त
निपाणी, संकेश्वर, हत्तरगीसह सर्व थांबे घेऊन बस बेळगावमध्ये पोहचणार
Ratnagiri News : शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मालमत्तेबाबत नोटीस पाठवली आहे. राजन साळवी हे 13 डिसेंबर रोजी अलिबाग येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहे. एसीबीच्या नोटीसनंतर आमदार साळवी यांच्या समर्थनार्थ ठाकरे गट सरसावला आहे. येत्या शुक्रवारी लांजा तहसील कार्यालयावर ठाकरे गट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे हजर राहणार आहेत.
Aurangabad News : औरंगाबादमध्येही कर्नाटकच्या बसला ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी काळे फासले. कर्नाटकाच्या विरोधात औरंगाबादमध्ये युवा सेना आक्रमक झाली आहे. कर्नाटकच्या गाड्यांवर जय महाराष्ट्र लिहित कर्नाटकच्या नावावर काळे फासले. सोबतच कर्नाटक सरकार, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली. सकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास औरंगाबादमधून कर्नाटकला गाड्या सुटतात. त्यावेळी ही घटन घडली.
Yavatmal News : यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अपघात विभागात सशस्त्र गुंडानी धुमाकूळ घातला. अक्षय राठोड टोळीतील आठ ते दहा जणांनी तिघांवर चाकूने हल्ला केला. तिन्ही जखमी हे बाभूळगाव तालुक्यातील रहिवासी आहेत. अपघात कक्षासमोरील पोलीस चौकशीसमोरच हा प्रकार घडला. शहरातील धाब्यावर या तिघांसोबत वाद झाला होता. यावेळी मारहाण झाल्याने तिघे उपचारांसाठी रुग्णालयात आले होते. यानंतर अक्षय राठोड टोळीशी संबंधित असलेल्या आठ ते दहा जणांनी येऊन हल्ला केला. मागच्या वर्षी क्षुल्लक कारणावरुन एमबीबीएसच्या डॉ अशोक पाल यांची चाकूने भोसकून हत्या झाली होती. या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले होते. आता टोळीने धुमाकूळ घातल्याने जिल्हा रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असल्याचं चित्र आहे.
Mumbai Local Train : टिटवाळा स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत अडचण, मध्य रेल्वे मार्गावरील गाड्या 20 मिनिटं उशिराने, कामावर जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा
Baramati News : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी कन्नडिगांनी महाराष्ट्रातील गाड्यांवर हल्ला केला, तोडफोड केली. याचा निषेध म्हणून रात्री बारामतीत एसटी स्थानकावर राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाच्या वतीने कर्नाटकातील गाड्यांना काळे फासून निषेध करण्यात आला. यावेळी कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनाआधी पंतप्रधान मोदी हे सकाळी 10 वाजता माध्यमांशी संवाद साधतील. संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र कर्नाटक वादाचे पडसाद उमटणार असून शिवसेना ठाकरे गट या प्रश्नावर सभागृहात आवाज उठवणार आहे. तर दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्याच्या तयारीत आहे.
मुंबई- राष्ट्रवादीतर्फे पवईमध्ये कर्नाटक बँकेसमोर आंदोलन
राष्ट्रवादीतर्फे पवईमध्ये कर्नाटक बँकेसमोर सकाळी 11 वाजता आंदोलन केले जाणार आहे. कर्नाटकनं हे हल्ले ताबडतोब थांबवावेत. सरकरनं 48 तासांत परिस्थिती नियंत्रणात आणावी अन्यथा वेगळी भूमिका घ्यावी लागेल असा इशारा शरद पवारांनी दिला आहे.
आज दिल्ली एमसीडीचा निकाल
आज दिल्ली महापालिकेचा निकाल लागणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. भाजपनं तब्बल 7 मुख्यमंत्री, 17 कॅबिनेटमंत्री या निवडणुकीच्या प्रचारासाठी लावले होते. मात्र एक्झिट पोलनुसार आप या निवडणुकीत भाजपचा पराभव करेल असं दिसतंय. दिल्लीत 250 वॉर्डसाठी 1349 उमेदवारांचं भवितव्य आज ठरणार आहे. निकालानंतर दुपारी 3 वाजता अरविंद केजरीवालांचं भाषण होणार आहे.
आज दत्तजयंती
दत्तजयंती निमित्त भद्रावतीच्या दत्तमंदिर येथे दत्तजन्म सोहळा साजरा करण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता हा सोहळा होणार असून या वेळी 81 जोडप्यांच्या हस्ते महाआरती करण्यात येईल.
नाशिक - दत्त जयंती निमित्ताने नाशिकच्या प्रसिद्ध एकमुखी दत्त मंदिरात भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहेत.
शिर्डी- शिर्डीत दत्त जयंती महोत्सव साजरा होतो. दत्त मंदिरात दत्त जन्माचे स्वागत करण्यात येते. अनेक पायी पालख्या देखील दत्त जयंतीला पोहचतात. नेवासा श्री क्षेत्र देवगड येथेही मोठा दत्तजयंती उत्सव होतो. दैदीप्यमान सोहळा साजरा होतो. लाखो भाविक या सोहळ्यात सहभागी होतात.
नांदेड : नागरिकांची आज संवाद यात्रा निघणार
जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील नागरिकांची आज संवाद यात्रा निघणार आहे. देगलूर तालुक्यातील जागतिक वारसा असणारे ऐतिहासिक होट्टल (हेमाडपंथी मंदिर), बिलोली, धर्माबाद, उमरी ते संगमपर्यंत संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आलंय. देगलूर येथील होट्टल मधून सकाळी 9 वाजता संवाद यात्रा निघणार आहे. सीमावर्ती भागातील नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी या कृति समितीकडून संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आलंय. सीमावर्ती भागातील 150 खेड्यातील नागरिकांशी संवाद साधत जाणार ही यात्रा निघेल.
राज्यापलांबाबात पुढील भूमिका ठरवण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि इतर काही संघटनांची बैठक
पुणे - राज्यापलांबाबात पुढील भूमिका काय घ्यायची हे ठरवण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि इतर काही संघटनांची बैठक. शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, दुपारी 2.30 वाजता
राज्यपालांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जालना जिल्हा बंदचं आवाहन
जालना- राज्यपाल भगतसिंग कोशारी तसेच भाजप नेत्यांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जालना जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं असून यामध्ये महाविकास आघाडीसह विविध संघटनांनी पाठिंबा दिलाय. सकाळपासून शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठान बंद ठेवण्याचा आवाहन व्यापाऱ्यांना तसेच नागरिकांना करण्यात आलंय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -