Maharashtra News Updates 03 October 2022 : अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाला पाठिंबा देणार : शरद पवार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नाशिक जिल्ह्यात निवडणुकांचा बिगुल वाजला असून सर्वत्र मतदानाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच दिंडोरी तालुक्यातुन विस्मयकारक निवडणूक झाली आहे. जऊळके येथील ग्रामपंचायतीत सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड बिनविरोध झाली असून यात विशेष म्हणजे पती सरपंच तर पत्नी उपसरपंच बिनविरोध निवडून आले आहेत.
नाशिक जिल्ह्यात निवडणुकांचा बिगुल वाजला असून सर्वत्र मतदानाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच दिंडोरी तालुक्यातुन विस्मयकारक निवडणूक झाली आहे. जऊळके येथील ग्रामपंचायतीत सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड बिनविरोध झाली असून यात विशेष म्हणजे पती सरपंच तर पत्नी उपसरपंच बिनविरोध निवडून आले आहेत.
नागपूर : 'दसरा' दिनानिमित्त बुधवारी, 05 ऑक्टोंबरला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या 2 ऑक्टोबर रोजीच्या स्थगित साधारण सभेतील मंजुरी नुसार नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार पाच ऑक्टोंबर रोजी 'दसरा' दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. या संदर्भातील आदेश उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ.गजेन्द्र महल्ले यांनी निर्गमीत केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महानगरपालिकेच्या भरारी पथकाव्दारे कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Belgaon News : खासगी ट्रॅव्हल्स बसचे ब्रेक फेल झाल्याने बस एका इमारतीला जाऊन धडकली. सुदैवाने या धडकेत कोणतीही प्राणहानी झाली नाही. बेळगावात आरटीओ सर्कल येथे हा अपघात घडला. ट्रॅव्हल्स बस राणी कित्तुर चन्नमा चौकातून आरटीओ सर्कलकडे येत होती. बस उतारावरुन खाली येत असताना तिचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या ध्यानात आले. बस चालकाने प्रसंगावधान राखून बस बाजूला घेतली. फूटपाथवरील रेलिंग तोडून बस इमारतीला जाऊन आदळली. पोलीस खात्याची बांधकाम अर्धवट झालेली इमारत निर्मनुष्य असल्याने कोणतीही हानी झाली नाही. बस चालकाने प्रसंगावधान दाखवले नसते तर मोठा अनर्थ घडला असता, असे तेथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बसमधे प्रवासी नव्हते त्यामुळे देखील अनर्थ टळला. इमारतीला बस धडकल्याने बसचे समोरील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे.
अहमदाबाद : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष खोखो संघाने उपांत्य फेरीत कर्नाटक संघाचा डावाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. महाराष्ट्र संघाने उपांत्य लढत 26-24 एक डाव आणि 4 अशी जिंकली. पुरुष गटातील पहिल्या उपांत्य लढतीत महाराष्ट्र संघाने आक्रमक डावपेच आखत अप्रतिम कामगिरी बजावली. महाराष्ट्राच्या आक्रमण आणि बचावात्मक खेळासमोर कर्नाटक संघाचा टिकाव लागू शकला नाही.
ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यापाऱ्याकडून टिटवाळा आरपीएफ जवानांनी एक कोटी 17 लाखाची रोकड आणि 56 लाखाचे दागिने हस्तगत केले आहे. जी. पी. मंडल असे या व्यापाऱ्याचे नाव असून त्याच्याकडे सापडलेल्या रक्कमेची कागदपत्रे नसल्याने पुढील कार्यवाहीसाठी आरपीएफने आयकर विभागाकडे रोकड आणि दागिने व्यापार्याला सूपूर्द केले आहे. 1 ऑक्टोबर रोजी लखनऊहून मुंबईकडे येणारी पुष्पक एक्सप्रेस मध्य रेल्वेच्या टिटवाळा रेल्वे स्थानकात स्लो झाली. याचा फायदा घेत टिटवाळा एक प्रवासी ट्रेनमधून खाली उतरला. त्याच्या हातात एक मोठी बॅग होती. या व्यक्तिची हाचलाची संशयास्पद होत्या. हे पाहून आरपीएफ जवानी एल. बी. बाग आणि शुभम खरे यांनी त्याला हटकले. त्याला टिटवाळा आरपीएफ कार्यालयात घेऊन गेले. या बाबत आरपीएफचे सिनिअर इन्स्पेक्टर अंजली बाबर यांनी या व्यक्तिची कसून चौकशी केली. जी माहिती समोर आली ते ऐकून अधिकारी हैराण झाले. जी. पी. मंडल असे या व्यक्तिचे नाव असून तो नवी मुंबईतील कळंबोली येथे राहतो. त्याचे मुंबईतील झवेरी बाजारात दुकान आहे. त्याच्याकडून आरपीएफ जवानांनी एक कोटी 17 लाखाची रोकड आणि 56 लाखाचे दागिने हस्तगत केले आहे. रोकड आणि दागिन्याची कागदपत्रे त्याच्याकडे नव्हते त्यामुळे आरपीएफने याची माहिती आयकर विभागाला दिली. सध्या या प्रकरणाचा तपास आयकर विभाग करीत आहे.
यंदाच्या दसरा मेळाव्याला ठाकरे गटाचं नवं गाणं येणार, आनंद शिंदेंच्या आवाजात ठाकरे गटाचं गाणं शिवतीर्थावर वाजणार, नुकतीच उद्धव ठाकरे आणि आनंद शिंदे भेटीत गाण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती, शिंदे गटाला गाण्यातून लक्ष केल्याची सूत्रांची माहिती, उद्धव ठाकरेंची परवानगी मिळताच सोशल मीडियात गाणं प्रसिद्ध कऱण्यात येणारं
गांधीनगर : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज झालेल्या स्क्वॉश स्पर्धेत महाराष्ट्र संघाने तेलंगणा संघाला 3-0 ने हरवून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. या सामन्यात प्रथम उर्वशी जोशी हिने अपूर्वा अडली 3-0 (11-4, 11-4, 11-0) विरूद्ध असा सामना जिंकला. त्यानंतर अंजली सेमवाल हिने आर्या दिवेदी हिचा 3-0 (11-5,11-1, 11-7) अशा फरकाने पराभव केला. जेनेट विधीने 2-0 (11-7,11-4) ने सामना जिंकला व सेमी फायनल मध्ये प्रवेश केला.
पुण्याहून पावस परिसरात फिरण्यासाठी आलेल्या चार मित्रांपैकी एकजण रविवारी 11.30 च्या दरम्याने गावखडी समुद्रात बुडाला होता. आकाश पांडुरंग सुतार (28) असे बुडालेल्या तरुणाचे नाव असून.त्याचा मृतदेह काल रात्री उशीरा पर्यंत शोध घेऊन देखील मिळाला नव्हता.आज सकाळपासून परत शोध मोहीम सुरु करण्यात आली. सकाळी 9.15 च्या दरम्यान मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.
Ratnagiri news: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासनमान्य आर्थिक मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्याने जिल्ह्यातील कर्मचारी आता आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आज जि.प कार्यालायासमोर धरणे आंदोलन आणि निदर्शने करीत आहेत.जिल्हा स्तरावरील काही शासनस्तरावरून मंजुर झालेल्या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही असा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा दावा आहे. यामध्ये किमान सुधारित वेतन दर लागू करणे, राहणीमान भत्याची अदाई करणे, भविष्यनिर्वाह निधीचे खाते अद्ययावत करणे तसेच काही ठिकाणी सेवा पुस्तिका सुध्दा अद्ययावत नोंदीने परिपूर्ण करण्यात आलेल्या नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. सेवा पुस्तके अद्ययावत करण्याबाबतची कार्यवाही करणे, तसेच शासनाकडील निर्देशानुसार संघटनांचे प्रतिनिधी समवेत स्वतंत्र समन्वय बैठकीचे आयोजन करणे या सर्व बाबीसंदर्भात आपल्या स्तरावर योग्य पध्दतीने अंमलबजावणी होत नाही, असा कर्मचाऱ्यांचा आक्षेप आहे. त्यामुळेच हे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्यावतीने धरणे, निदर्शने आंदोलन करण्यात आले.
शिवसेनेची आढावा बैठक थोड्याच वेळात सुरू होणार, दसरा मेळावा नियोजन संदर्भात होणार बैठक, शिंदे गटाकडून शिवसैनिकांची अडवणूक होवू शकते या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता, जास्तीत जास्त शिवसैनिक शिवतीर्थावर नेण्यासाठी होणार नियोजन, शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी राहणार उपस्थित, दोन आमदार, एक खासदार शिंदे गटात गेल्यानंतर सर्वसामान्य शिवसैनिक जाणार शिवतीर्थावर
शिंदेंच्या बंडा नंतर ठाकरे विरुद्ध शिंदे लढाई होणारी पहिली पोटनिवडणूक जाहीर, अंधेरी पूर्व विधानसभेसाठी 3 नोव्हेंबरला मतदान तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी, पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने चिन्हाचं काय होणार याबाबतही सस्पेन्स वाढला
इराणहून चीनकडे
निघालेल्या विमानात
बॉम्ब असल्याची धमकी
............
धमकीनंतर भारतीय
वायू दलाकडून
विमानाला सुरक्षा
.............
भारताच्या सुरक्षेत
विमान चीन एअरस्पेसमध्ये
सुरक्षित दाखल
गोव्यातून विनापरवाना 1 बॉटल जरी मद्य आणल्यास मोक्का, एकच व्यक्ती तीन वेळा अशा प्रकारच्या गुन्ह्यात सापडल्यास मोक्का लावणार
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांचा इशारा
गोव्यातून अवैधरित्या आणल्या जाणाऱ्या मद्य वाहतुकीला चाप लावणार
कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना
Dhule News: धुळे मध्यवर्ती कारागृहामध्ये अमली पदार्थ शेती संदर्भात न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या 70 वर्षीय आरोपीने कारागृहाच्या संडासामध्ये गळफास घेऊन केली आत्महत्या, जामसिंग पावरा वय वर्ष 70 असे आरोपीचे नाव, रात्री तीन वाजून वीस मिनिटांनी आरोपीने गळफास घेऊन केली आत्महत्या, आत्महत्या केलेल्या आरोपीचे शव उत्तरिय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आले पाठवण्यात
Kolhapur News : गोव्यातून विनापरवाना 1 बॉटल जरी मद्य आणल्यास मोक्का
एकच व्यक्ती तीन वेळा अशा प्रकारच्या गुन्ह्यात सापडल्यास मोक्का लावणार
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांचा इशारा
गोव्यातून अवैधरित्या आणल्या जाणाऱ्या मद्य वाहतुकीला चाप लावणार
कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना
पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया वर केंद्र सरकारने लावलेल्या बंदी नंतर नक्षलवादी पीएफआयच्या समर्थनासाठी समोर आले आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादीच्या सेंट्रल कमिटीने पीएफआयवर बंदीचा निषेध करत हे केंद्र सरकारच्या हिंदुत्ववादी एजेंडाचा भाग असल्याचं म्हटलं आहे. हे मुस्लिमांना चिरडण्याचा काम असल्याचं नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीने एका पत्रकाच्या माध्यमातून म्हटले आहे.
Mumbai News : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला एकच दिवस शिल्लक आहे. या दसरा मेळाव्यापूर्वी दादर, वरळी परिसरात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी पक्षाकडून देखील या मेळाव्यासाठी शुभेच्छा देणारे बॅनर पाहायला मिळत आहेत. मेळाव्यापूर्वी ठाकरे गटाकडून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे.
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. रस्त्यांच्या दूरवस्थेमुळे अनेक अपघात होत आहेत. संबंधित बांधकाम विभाग या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. मात्र नंदुरबार तालुक्यात बांधकाम विभागाचा अजबच कारभार समोर आला आहे. ढेकवत ते पाचोरा भारी दरम्यान रस्ता खराब असल्याने संबंधितांनी रस्त्याची दुरुस्ती करण्याऐवजी रस्ता खराब असून वाहने सावकाश चालवा आशयाचा फलक लावला आहे. सर्वसामान्य नागरिक रस्त्यांच्या दूरवस्थेमुळे त्रस्त असताना रस्त्यांची दुरुस्ती करावी हा फलक लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांनी बांधकाम विभागाच्या कारभारावर टीका केली आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी ग्रामीण भागाच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल, अशा इशारा त्यांनी दिला आहे.
Kolhapur Crime : लग्नाला नकार दिल्याने महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील लाईन बाजार परिसरात ही घटना घडली. कविता जाधव असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. खून केल्यानंतप आरोपी राकेश संकपाळ स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला.
Com. Kumar Shiralkar: मागील चार दशकांहून अधिक काळ आदिवासी, शेतमजूरांसह समाजातील वंचित घटकांसाठी आयुष्य वेचणारे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि विचारवंत कुमार शिराळकर (Com. Kumar Shiralkar Death) यांचे रविवारी रात्री निधन झाले. नाशिकमधील कराड रुग्णालयात (Nashik Karad Hospital) त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते 81 वर्षांचे होते. वर्ष 2019 पासून कर्करोगाने त्यांना ग्रासले होते. मात्र, मागील काही महिन्यात त्यांचा आजार बळावला. त्यांच्या निधनाने ध्येयवादी, तत्वनिष्ठ विचाराने वंचितांसाठी झटणाऱ्या एका समर्पित पर्वाची अखेर झाल्याची भावना व्यक्त होत आहे. आज सायंकाळी चार वाजता शहादा येथील मोडमधील कॉ. बी.टी. रणदिवे हायस्कूल प्रांगणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडणार आहेत.
PFI : पीएफआयच्या अटकेतील कार्यकर्त्यांकडून दहशतवादाचो प्रशिक्षण दिले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. याशिवाय आरोपींच्या वेगवेगळ्या बँक खात्यातून अनेक मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचही उघड झालंय.
Supriya Sule Baramati Visit : खासदार सुप्रिया सुळे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्या बारामती तालुक्यातील गावांना भेट देणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बारामती दौऱ्यानंतर सुप्रिया सुळेंचा गावभेटीचा वेग वाढला आहे. तत्पूर्वी स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये बारामती नगरपरिषद देशात नववी आहे. तर इंदापूर नगरपालिकेला इंडियन स्वच्छता लीगमध्ये विशेष बहुमान मिळाला असून सासवड नगरपालिका वेस्ट झोनमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
उल्हानगर कॅम्प नंबर 5 मध्ये महाशिव ही धोकादायक इमारत आहे. ही इमारत धोकादायक असून महापालिकेने बिल्डिंग खाली करण्याचे नोटीस दिली आहे. या इमारतीत 10 दुकान असून त्यातील एका सिंधी व्यापाऱ्याचे गाऊन चे दुकान आहे ह्या दुकाना वरील स्लॅप चा तुकडा आज पडला. सुदैवाने ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हे दुकान, दुकान मालकाने तातडीने खाली केले आहे. महाशिव 20 फ्लॅटची इमारत आहे. त्यातील 17 फ्लॅट हे रहिवाश्यांनी खाली केले आहेत. परंतु उरलेले तीन रहिवासी घरे आणि 10 दुकान आहेत ते खाली केलेले नाहीत, त्यांना महापालिकेने तातडीने इमारत खाली करण्याचे आदेश दिले आहेत. या आधी ही उल्हासनगर मधील कॅम्प नंबर 5 मधील मानस टॉवर या इमारतीचा स्लॅप कोसळला होता. त्यात दुर्दैवाने 4 जणांचा मृत्यू झाला होता. वारंवार उल्हासनगरमध्ये इमारतींचे स्लॅब कोसळत असल्याने उल्हासनगर शहरात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
खासदार संजयकाका पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे झाले मनोमिलन, पडळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांनी वादाला तिलांजली देत असल्याचे दिले दाखवून
मागील लोकसभा निवडणुकीत हे दोघेजण एकमेकांविरोधात होते उभे, निवडणूक प्रचारात दोघांनी एकमेकांवर जहरी केली होती टीका
संजयकाका पाटील भाजप कडून तर गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडी कडून लढवली होती निवडणूक
Telecom Stocks Price in India : देशात नुकतीच 5G सेवा (5G Service) सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात 5G इंटरनेट (5G Internet) सेवा देशातील फक्त काही शहरांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे, दिल्लीसह 13 देशांचा समावेश आहे. 5G नेटवर्कमुळ टेलिकॉम कंपन्यांमध्ये (Telecom Company) मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. लिलावात रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या कंपन्यांनी 5G स्पेक्ट्रमची खरेदी केली. त्यामुळे लवकरच या कंपन्यांकडून 5G सर्विस लाँच करण्यात येईल. त्याआधी या टेलिकॉम कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
Fire in Navratri Pandal : संपूर्ण देशभरात नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी दुर्गापुजा जल्लोषात पार पडत आहे. अशातच उत्तर प्रदेशमधील भदोही (Bhadohi) मध्ये नवरात्रीचा (Navratra) मंडप घालण्यात आला होता. याच मंडपात रविवारी रात्री भीषण आग लागल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या आगीत तब्बल 64 जण होरपळल्याची माहिती मिळत आहे. तसेच, आगीत होरपळून आतापर्यंत दोन जणांनी आपले प्राण गमावले आहेत. आगीत होरपळल्यामुळे जखमी झालेल्यांवर वाराणसी (Varanasi) आणि प्रयागराज (Prayagraj) येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी संपणार
पत्राचाळ घोटाळााप्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांची आज न्यायालयीन कोठडी संपतेय. त्यामुळे आज त्यांना पुन्हा पुढील रिमांडसाठी मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
बीडच्या शिरूर कासारमध्ये मोर्चा
मराठा समाजाला 50 टक्केमधून कुणबी मराठा म्हणून आरक्षण देण्याच्या मागणी साठी आज शिरूर कासारमध्ये सकाळी 10.30 वाजता मोर्चा होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भंडारा दौऱ्यावर
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. या बैठकीला नाना पटोले उपस्थित रहाणार आहेत.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते औरंगाबाद आणि जालना रेल्वे स्थानकांवर कोच देखभाल सुविधांच्या विकासासाठी पिटलाईनच्या पायाभरणीचा शुभारंभ
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते औरंगाबाद आणि जालना रेल्वे स्थानकांवर कोच देखभाल सुविधांच्या विकासासाठी पिटलाईनच्या पायाभरणीचा शुभारंभ केलं जाणार आहे. याला रावसाहेब दानवे, भागवत कराड उपस्थित रहाणार आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना ‘महर्षी’ पुरस्कार देण्यात येणार
नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी दिला जाणारा मानाचा ‘महर्षी’ पुरस्कार यंदा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज दिला जाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात होणार आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील सोलापूर दौऱ्यावर
उच्च आणि तंत्रक्षिण मंत्री चंद्रकांत पाटील आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात ते विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावतील.
जामखेडच्या खर्ड्यात आज महाराष्ट्रातील सर्वात उंच रावण दहन
जामखेडच्या खर्ड्यात आज महाराष्ट्रातील सर्वात उंच रावण दहन होणार आहे. संभाजीराजे छत्रपतींसह रामायण मालिकेतील कलाकार या रावण दहनासाठी उपस्थित राहणार आहेत. महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, स्त्री असुरक्षा, जाती-धर्म भेद, बालमजुरी, शेतकरी आत्महत्या, पर्यावरण नाश, अवैज्ञानिकता, दारिद्रय अशी दहा तोंड असलेल्या रावणाच्या प्रतिकृतीचे दहन होणार आहे. 75 फुटी रावणाची प्रतिकृती असणार आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले जळगाव दौऱ्यावर
केंद्रीय मंत्री रामदास आठवले जिल्हा दौऱ्यावर आहेत. दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद होणार आहे.
जोधपूर
भारतीय हवाई दलात आजपासून लढाऊ हेलीकॉप्टर (एलसीएच) सहभागी होणार आहे. मंत्री राजनाथ सिंग आणि एअर चीफ मार्शल वी आर चौधरी यांच्या उपस्थित आजपासून 10 हेलिकॉप्टर कमिशन होणार आहे.
अमित शाह आजपासून जम्मू आणि काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसांच्या व्यस्त कार्यक्रमाला सुरुवात करणार आहेत.
जयपूरमध्ये अशोक गेहलोत यांची पत्रकार परिषद
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आज दुपारी 12.30 वाजता राज्य सचिवालयात पत्रकार परिषदेला संबोधित करतील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -