Maharashtra News Updates 02 November 2022 : शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगात आज अडीच लाख प्राथमिक सदस्यत्वाचे अर्ज दाखल

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Nov 2022 10:48 PM
शेतकरी नेते माधवराव मोरे यांचं निधन

शेतकरी नेते माधवराव मोरे यांचं निधन झालं आहे. शेतकरी नेते माधवराव मोरे यांच वृद्धापकाळाने निधन झालं. 

Mumbai : उद्या मुंबईत रोजगार मेळावा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रं मिळणार 

उद्या मुंबईत रोजगार मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते युवकांना नियुक्तीपत्रं मिळणार आहेत. 

Mumbai : उद्या मुंबईत रोजगार मेळावा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रं मिळणार 

उद्या मुंबईत रोजगार मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते युवकांना नियुक्तीपत्रं मिळणार आहेत. 

शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगात आज अडीच लाख प्राथमिक सदस्यत्वाचे अर्ज दाखल, ठाकरे गटाकडून एकूण दहा लाखांपेक्षा जास्त प्राथमिक सदस्यता अर्ज आयोगाला सादर

शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगात आज अडीच लाख प्राथमिक सदस्यत्वाचे अर्ज दाखल, ठाकरे गटाकडून एकूण दहा लाखांपेक्षा जास्त प्राथमिक सदस्यता अर्ज आयोगाला सादर


याआधी साडेआठ लाख आणि आज दोन लाख सदस्यत्व अर्ज दाखल


सोबत एकूण 2 लाख 62 हजार शपथपत्र देण्याचा इरादा, त्यापैकी आतापर्यंत 70 हजार शपथ पत्र दाखल



शिंदे गटाकडूनही याआधी कागदपत्रं सादर, आयोगात कागदपत्रांच्या लढाईचा सिलसिला सुरूच

महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी सोलर योजना जाहिर

महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी सोलर योजना जाहिर केली आहे. 4 हजार मेगावॅट विज निर्मीतीसाठी सरकार शेतकऱ्यांची जमिन भाडे पट्ट्यांवर घेणार आहेत. कृषी वाहिनीचे सौर उजीकरण करण्याच्या दृष्टीने लागणारी खाजगी जमीन महावितरण/ महानिर्मिती कंपनीला तसेच महाऊर्जा संस्थेस भाडेपट्ट्याने उपलब्ध करुन दिली जाणार आहे. 

Bachchu Kadu : रवी राणांनी वेळ सांगावी, मी त्यांच्या हातून मरायला तयार; बच्चू कडूंची प्रतिक्रिया

रवी राणा यांचे स्वागत करतो, त्यांनी तलवार घेऊन यावं, मी फुल घेऊन तयार राहतो. मी कुठल्या चौकात यावं हे सांगावं, मी तयार आहे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. मी मंगळवारी बोलताना कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. त्यामुळे राणांच्या या वक्तव्याची दखल मी घेत नाही. असं ते म्हणाले. यासंबंधी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचंही बच्चू कडू म्हणाले. 

Ravi Rana : कोणी दम देऊन बोलत असेल तर त्याला घरात घुसून मारणार; बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर रवी राणांचे प्रत्युत्तर

वेळच सांगेल की बच्चू कडू निवडून येणार की नाही, जर धमकीची भाषा करणार असाल, कोणी दम देत असेल तर घरात घुसून मारणार असल्याचं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं आहे. 

Boisar News : बोईसरमधील भगेरिया कंपनीतील जखमी कामगारांची अंबादास दानवेंकडून विचारपूस

Boisar News : बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक सुरक्षा विभाग अकार्यक्षम असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. बोईसरमधील भगेरिया कंपनीत मागील आठ दिवसांपूर्वी स्फोट होऊन चार कामगारांचा मृत्यू झाला होता.  तर, बारा कामगार जखमी झाले असून जखमी कामगारांची अंबादास दानवे यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. अंबादास दानवे यांनी दुर्घटनाग्रस्त कंपनीची पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. रिऍक्टर आणि बॉयलरबाबत सरकारने योग्य कायदे करण्याची आवश्यकता असल्याचं सांगत या कंपन्यांवर नियंत्रण ठेवणारे अधिकारी आणि कंपन्यांची मिली भगत असून यामुळे कामगारांना नाहक जीव गमावावा लागत असल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला.

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत समाजसेविका मेघा पाटकर सहभागी होणार

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत समाजसेविका मेघा पाटकर देखील सहभागी होणार आहेत. काँग्रेस प्रदेश सरचिटणीस माजी आमदार नामदेव पवार यांनी या संदर्भात माहिती दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मेघा पाटकर यांना आमंत्रित केले असून या भारत जोडो यात्रेत त्यांनी सहभागी होण्याची संमती दर्शवली असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यात भारत जोडो यात्रेला नांदेड येथून सुरुवात होणार असून या यात्रेत जालना येथील 5 हजार कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचं देखील पत्रकार परिषेदेत सांगण्यात आलं.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची 5 नोव्हेंबरला पत्रकार परिषद

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे 5 नोव्हेंबर रोजी एकत्रित पत्रकार पदिषद घेणार आहेत. 

Sharad Pawar : शरद पवार यांना आज डिस्चार्जची शक्यता नाही, रुग्णालयातील मुक्काम एक दिवसाने वाढला 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यांचा रुग्णालयातील मुक्काम एक दिवसाने वाढल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार उद्या सकाळी शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादीच्या शुक्रवार आणि शनिवारी पार पडणाऱ्या अधिवेशनासाठी उद्या संध्याकाळी रवाना होणार आहेत.

60-40 नुसार भाजप, शिंदे गटात महामंडळाचं वाटप? शिंदे-फडणवीस अधिकृत घोषणा करणार

खासदार संजय राऊत पत्राचाळ घोटाळा प्रकरण; नोव्हेंबरला राऊतांच्या जामिनावर फैसला

नंदूरबार जिल्ह्यात मजुरांची टंचाई, शेतकरी हैराण

Nandurbar  News : उत्तर महाराष्ट्रात देखील अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडं तयार झालेली पिकं काढणीला आलीआहेत. या पिकांची काढणी करणं हे शेतकऱ्यांसमोरील मोठं आव्हान ठरत आहे. कारण सध्या  मजुरांची टंचाई भासत आहे. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात शेतकरी शेती कामासाठी मजुरांची शोधाशोध करत आहेत. मजुरांचे मोठ्या प्रमाणावर जिह्यातून स्थलांतर झाले आहे. त्यामुळं मजुरांची टंचाई भासत आहे.

Buldhana News: 'आनंदाचा शिधा' वाटप केला नसल्याच्या कारणावरून रेशन दुकानदारावर हल्ला, हल्लेखोर अटकेत

'आनंदाचा शिधा' वाटप केला नसल्याच्या कारणावरून रेशन दुकानदारावर हल्ला करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वडगाव वाण गावात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. तर, दुसरीकडे या हल्ल्याविरोधात रेशन दुकानदार संघटना आक्रमक झाल्या आहेत.

टोमॅटोच्या दरात मोठी घसरण, शेतकरी अडचणीत

Tomato Price : सध्या राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी (Farmers) अडचणीत आला आहे. कारण सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे. बाजारात टोमॅटोची आवक वाढल्यानं दरात घसरण झाली आहे. 80 रुपयांवरुन टोमॅटोचे दर थेट  25 ते 30 रुपयांवर आले आहेत, त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. सध्या टोमॅटोची निर्यातही मंदावली आहे. त्यामुळे दहा दिवसांत दर जवळपास निम्म्यावर आले आहेत.

Maharashtra Cabinet Meeting : आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक

Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक आहे. या बैठकीत राज्यातील उद्योगांसंदर्भात चर्चा होईल. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी श्वेतपत्रिकेची घोषणा केलेली आहे. यावरती सुद्धा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.

Kolhapur News : कोल्हापुरात लव जिहादवरुन नितेश राणेंचा ठिय्या

Kolhapur News : लव्ह जिहाद झाल्याच्या संशयावरून भाजपचे आमदार नितेश राणे कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन करणार आहेत. एक अल्पवयीन मुलगी पंधरा दिवसांपासून बेपत्ता आहे. एका मुस्लिम तरुणाने तिला फूस लावून पळून नेल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीसांनी तपासासाठी 3 पथकं तैनात केली आहेत.

Sharad Pawar : शरद पवार भारत जोडो यात्रेला उपस्थित राहणार का? आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मागील दोन दिवसांपासून मुंबईतील प्रसिद्ध ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल आहेत. आज त्यांची एक महत्त्वाची टेस्ट होणार असून त्यानंतरच त्यांना डिस्चार्ज मिळणार की त्यांची ट्रीटमेंट सुरू राहणार याबाबतीत डॉक्टर निर्णय घेणार आहेत. जर सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या तर आज दुपारी दोन पर्यंत शरद पवार यांना डिस्चार्ज मिळू शकतो आणि त्यानंतर ते शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनासाठी जाणार आहेत. दुसरीकडे भारत जोडो यात्रेत शरद पवार सामील होणार असल्याचं अशोक चव्हाणांनी म्हटलंय. या अनुषंगाने निलेश बुधावले बातमी देईल.

Maharashtra Politics : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे पुन्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एका कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार आहेत.  महेश मांजरेकरांच्या ‘वीर दौडले सात’ या सिनेमाच्या मुहूर्तासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. 

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू... 


राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे पुन्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एका कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार आहेत.  महेश मांजरेकरांच्या ‘वीर दौडले सात’ या सिनेमाच्या मुहूर्तासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. ताज लँड्स एंड, वांद्रे, संध्याकाळी 7.30 वाजता


शरद पवार भारत जोडो यात्रेला उपस्थित राहणार का? आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मागील दोन दिवसांपासून मुंबईतील प्रसिद्ध ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल आहेत. आज त्यांची एक महत्त्वाची टेस्ट होणार असून त्यानंतरच त्यांना डिस्चार्ज मिळणार की त्यांची ट्रीटमेंट सुरू राहणार याबाबतीत डॉक्टर निर्णय घेणार आहेत. जर सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या तर आज दुपारी दोन पर्यंत शरद पवार यांना डिस्चार्ज मिळू शकतो आणि त्यानंतर ते शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनासाठी जाणार आहेत. दुसरीकडे भारत जोडो यात्रेत शरद पवार सामील होणार असल्याचं अशोक चव्हाणांनी म्हटलंय. या अनुषंगाने निलेश बुधावले बातमी देईल.


कोल्हापुरात लव जिहादवरुन नितेश राणेंचा ठिय्या


लव्ह जिहाद झाल्याच्या संशयावरून भाजपचे आमदार नितेश राणे कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन करणार आहेत. एक अल्पवयीन मुलगी पंधरा दिवसांपासून बेपत्ता आहे. एका मुस्लिम तरुणाने तिला फूस लावून पळून नेल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीसांनी तपासासाठी 3 पथकं तैनात केली आहेत.


आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक


राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक आहे. या बैठकीत राज्यातील उद्योगांसंदर्भात चर्चा होईल. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी श्वेतपत्रिकेची घोषणा केलेली आहे. यावरती सुद्धा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.


अंधेरी पोटनिवडणूक मतदान तयारी


गुरुवारी 3 तारखेला अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे.  काही लोकांना नोटा देऊन नोटा बटण दाबण्यासाठी दबाव टाकला जातोय, असा आरोप करत ऋतुजा लटकेंनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय. तसेच, या पोटनिवडणुकी संदर्भात मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांची पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी 2 वाजता


आज भारत वि. बांग्लादेशमध्ये लढत


आज टी- 20 वर्ल्डकपमध्ये अँडलेडमध्ये भारत वि. बांग्लादेश सामना होणार आहे. द.आफ्रिकेविरोधात झालेल्या पराभवामुळे भारतानं हा सामना जिंकल्यास भारताची उपांत्य फेरीची वाट सोपी होईल. मात्र, या सामन्यावर पावसाचं सावट आहे.


आज शाहरुखचा वाढदिवस आहे 


शाहरुख खानचा आज 56 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त रात्रीपासूनच त्याच्या चाहत्यांनी मन्नतबाहेर गर्दी केली आहे. 


विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनावर तोडगा निघणार? आंदोलनकर्त्या शिक्षकांची शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक 


राज्यभरातील विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बोलावलेल्या आंदोलक शिक्षकांच्या शिष्ट मंडळाला शिक्षण मंत्र्यांनी बोलून बैठकीत सहभागी करून न घेतल्याने आंदोलन शिक्षक आक्रमक झालेत. मागील 23 दिवसांपासून आझाद मैदानावर राज्यभरातील विनाअनुदानित शिक्षकांचा आंदोलन सुरू आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी १ नोव्हेंबरला दुपारी चार वाजता वेळ दिली होती. मात्र या बैठकीमध्ये फक्त शिक्षक आमदारांसोबत शिक्षण मंत्र्यांनी चर्चा करून कुठलाही तोडगा न काढल्याने आंदोलन शिक्षक मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाहीत. शिवाय दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या शाळा सुद्धा बंद ठेवणार असल्याचं शिक्षकांनी म्हटलं आहे. आता शिक्षण मंत्र्यांनी आज दुपारी 2 वाजता या शिक्षकांना चर्चेसाठी बोलावलं आहे.


इंदापूर : राजू शेट्टी हे ऊस परिषद घेणार 


तालुक्यातील सनसर गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे ऊस परिषद घेणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता.


सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रेत जाहीर सभा 


जळगाव- उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रेत जाहीर सभा होणार आहे, सकाळी 8 वाजता.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.