Maharashtra News Updates 8th March 2023 : हक्कभंग नोटीशीला उत्तर देण्यासाठी संजय राऊत यांना मुदतवाढ; विधानसभा अध्यक्षांची माहिती
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
पंढरपूर येथील वन विभागाच्या लाखो रुपये खर्चून उभारलेल्या तुळशी वृंदावना मधील संत चोखामेळा यांचे संगमरवरी मंदिर पडल्याने खळबळ उडाली आहे . तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 26 जनेवरी 2019 रोजी या प्रकल्पाचे उदघाटन झाले होते . केवळ चार वर्षात यातील संत चोखामेळा यांचे मंदिर कोसळल्याने ठेकेदारांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे . तीन दिवसांपूर्वी अचानक हे मंदिर कोसळल्याने मूर्ती देखील भंग झाली आहे . चार वर्षांतच मंदिर पडल्याने इतर संतांच्या मंदिरांच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित झाला आहे . दरम्यान या संपूर्ण कामाची चौकशी करण्याची मागणी होउ लागली आहे .
आदित्य ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होतील विधानपरिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी रश्मी ठाकरे यांना दिला शब्द
सुनील शिंदे, विधानपरिषद आमदार ठाकरे गट भाषण
रश्मी वहिनी तुम्ही कार्यक्रमाला आलात
ही वरळी शिवसेनेची आहे, ही वरळी उद्धव साहेबांची आहे, ही वरळी आदित्य साहेबांची असेल
वहिनी मी तुम्हाला शब्द देतो कि आदित्य ठाकरे इथूनच मुख्यमंत्री होतील
मुख्यमंत्री झाल्यानंतर याच मंचावर आम्ही त्यांचा सत्कार करू
Mumbai Crime News : घाटकोपर पूर्वेला पंतनगर कुकरेजा टॉवर मध्ये दांपत्य मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.दीपक शाह आणि रीना शाह अशी त्यांचे नाव आहेत. ते कुकरेजा टॉवर मध्ये जी 501 या घरात राहत होते.मंगळवारी धुळवड खेळून हे दांपत्य घरी गेले.काल जेव्हा त्यांची घरकाम करणारी बाई घरी आली तेव्हा ते दरवाजा उघडत नव्हते.त्या महिलेने शहाच्या नातेवाईकांना कळवले.त्यानी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले
जादूटोणा करून तुमची कामे करून देतो म्हणून सांगत अकलूज येथील व्यापार्यांची 70 लाखांची फसवणूक .. भिवंडी परिसरातील 6 जणं ताब्यात .. त्यांच्याकडून मौल्यवान काळी हळद आणि इतर जादूटोणा साहित्य ताब्यात घेतले आहे .. ही पावडर रेडिओ ऍक्टिव्ह असल्याचे सांगत या मंत्रिकांनी त्यासाठीचे खास सूट देखील आणले होते .. तुम्हाला हात न लावता कुलुपे उघडून दाखवतो असे सांगून त्यांनी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला मात्र कुलूप न उघडल्यावर या मंत्रिकांनी अमेरिकेतून एक पावडर मागवावी लागेल असे सांगितले . आपली फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येताच या पटेल नावाच्या व्यापाऱ्याने पोलिसांना बोलावले . पोलिसांनी फॉरचूनर , इनोव्हा , तवेरा सह एक गाडी आणि सहा मंत्रिकांनी ताब्यात घेतले आहे
घाटकोपर पूर्वेला पंतनगरच्या हद्दीत एक दाम्पत्य घरात मृतावस्थेत सापडले आहे
दीपक शाह 42 आणि रीना शाह 39 अशे त्यांचे नाव असून ते कुकरेजा टॉवर, G-501, इथे राहत होते.
आज सकाळी या सांदरबत पोलिसांना माहिती भेटली होती.
उद्या पोस्ट मॉर्टेम होणार असून नेमका मृत्यूचा कशी झाली हे स्पस्ट होणार.
शहा पूर्वी कपड्यांचा व्यवसाय करत होते. मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पंत नगर पोलिस पुढील तपास करत आहेत.
सध्या कार ला आगी लागण्याच्या घटनां मध्ये सुध्दा मोठी वाढ झाली असून भिवंडी शहरातील भादवड येथील व्यवसायिकाने उभी करून ठेवलेल्या कार ने अचानक पेट घेतल्याने या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली आहे . भादवड गावातील इमारत बांधकाम साईट वर आलेले राजेश जयसवाल यांनी आपली हुंडाई ऑरो कार कार्यालया बाहेर उभी केली असता अवघ्या दहा मिनिटा नंतर धूर दिसू लागला.व पाहता पाहता कार क्रमांक होंडाई ओरा MH04 4993 ने आग पकडली.अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्या पूर्वीच आगी मध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली आहे .
अहमदनगर पाथर्डी रस्त्यावर करंजी घाटात एका अज्ञात व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडालीये... घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले... करंजी घाटात एका अज्ञात व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेत कवटी आणि हाडाचा सापळा सापडल्याची माहीती करंजी पोलीसांना मिळाली...हा मृतदेह लहान मुलाचा कि मोठ्या व्यक्तीचा स्त्री चा कि पुरुषाचा हे वैद्यकीय अहवालानंतर समजू शकणार आहे...संध्याकाळपर्यंत पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती...घातपात करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा मृतदेह जाळण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय.
इंजिनिअरिंग, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश परीक्षेच्या ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरवात
या सीईटी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी आणि ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 7 एप्रिल असणार आहे तर लेट फी भरून 15 एप्रिल पर्यत विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरू शकणार.
भाजपा कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके आणि त्यांच्या पत्नी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी आंदोलन केलं.. यावेळी बोलताना आमदार प्रकाश सोळंके यांचे पुतणे जयसिंह सोळंके म्हणाले की, गेल्या साठ वर्षांमध्ये माजलगावच्या राजकारणात अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती मात्र बाहेर तालुक्यातील भाजपचे काही लोक माजलगाव तालुक्यात येऊन खालच्या स्तराच राजकारण करत असल्याचा आरोप जयसिह सोळंके यांनी केला।आहे..
पालकमंत्री अतुल सावे आणि जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांच्या सांगण्यावरून प्रकाश सोळंके यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.. त्यामुळे प्रकाश सोळंके यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे न घेतल्यास याचाच निषेध करण्यासाठी येत्या दोन दिवसात जिल्ह्यातील प्रत्येक गावात निषेध मोर्चा काढून पालकमंत्र्यांना जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे.
Sanjay Raut : हक्कभंग नोटीशीला उत्तर देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मुदतवाढ देत असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने 14 मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आले आहे.. त्यामध्ये नागपूर महानगरपालिकेतील इंटक संघटनेशी जोडलेल्या कर्मचारी आणि शिक्षकानी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे...
महापालिका कर्मचाऱ्यांना तसेच शिक्षकांना सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यात यावी.. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी.. दहा, वीस आणि तीस वर्षे सेवा झालेल्या कर्मचारी आणि शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करावी... अशा विविध मागण्यांसाठी राज्यभरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदेचे कर्मचारी 14 मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहे... आणि त्याच संपात पूर्ण क्षमतेने सहभागी होण्याचा निर्णय नागपूरातील इंटक या संघटनेची जोडलेल्या महापालिकेच्या कर्मचारी आणि शिक्षकांनी घेतला आहे...
मुंबई नाशिक महामार्गावर इगतपुरीजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. दुपारी चार वाजेच्या सुमारास नाशिकहुन मुंबईकडे भरधाव वेगाने जात असतांना गाडीचा पुढील टायर फुटल्याने कार दुसऱ्या बाजूने मुंबईहबन नाशिककडे अपघातग्रस्त वॅगनर कार घेऊन जाणाऱ्या टोइंग व्हॅनवर जोरदार आदळली. या भिषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय. यात लहान मुलांसाह महिलांचा समावेश आहे. अपघात मुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती महामर्ग पोलिसांनी सर्व्हिस रोडने वाहतूक वळवली..
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे केंद्र सरकारच्या विरोधात इचलकरंजीत तिरडी आंदोलन
महिला दिना दिवशी महिलांनी केंद्र सरकारच्या विरोधात प्रांत कार्यालयावर काढला मोर्चा
गॅस,पेट्रोल, डिझेल व इतर महागाईच्या विरोधात प्रांत कार्यालयावर मोर्चा
स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
संगीता राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला तिरडी मोर्चा.
आमचा पाठिंबा नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना आहे, भाजपला नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलेय.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजाचे अतोनात नुकसान झालय. मात्र या बळीराजाला राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव मदत केली जाईल असे आश्वासन खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे.
खासदार कल्याण डोंबिवली महापालिकेत एका विषया संदर्भात महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी आले होते. आधीच्या सरकारने फक्त घोषणा केल्या, मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यापासून एन.डी.आर.एफचे निकष बाजूला ठेवून राज्यातील बळीराजाला तब्बल १२ हजार कोटींची मदत या केली आहे. आताच्या अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात देखील अशाच प्रकारे मदत केली जाईल असं खासदार शिंदे म्हणाले .
शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांची गाडी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी रोखली
साहेब गद्दारी का केली? असं म्हणत खासदार माने यांना शिवसैनिकांनी जाब विचारला.
हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथील घटना
बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना रोखल
बळाचा वापर करत पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना केलं बाजूला
ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने आक्रमक
बारावीचे परीक्षा केंद्र ऐनवेळी बदलण्यात आल्याने विद्यार्थ्यांची धावपळ झाली . नांदेड मधील वाजेगाव येथे हा प्रकार घडला .. वाजेगाव मधील राष्ट्रमाता उच्च माध्यमिक महाविद्यालयात बारावीची परीक्षा सुरू आहे . आज जीवशास्त्राचा पेपर होता .. विदयार्थी वेळेवर या परीक्षा केंद्रावर आले .. तेव्हा त्यांना तुमचं परिक्षा केंद्र बदलण्यात आल्याचं सांगण्यात आल . याच गावातील जिल्हा परिषद शाळेत या विद्यार्थ्याना परीक्षा देण्याची सोय करण्यात आली .. दहावी आणि बारावीचा पेपर एकाच दिवशी आणि एकाच वेळी आल्याने राष्ट्रमाता उच्च माध्यमिक महाविद्यालयात सगळ्याच विद्यार्थ्याना बसण्याची व्यवस्था नव्हती .. त्यामूळे बारावीच्या 126 विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र ऐनवेळी बदलण्यात आल्याचे सांगण्यात आले .. ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलल्याने विद्यार्थ्यांची धावपळ झाली . काही विद्यार्थ्याना तीन ते पाच मिनिट उशीर झाला .. दरम्यान गावातच दुसरे परीक्षा केंद्र देण्यात आले .. त्यामूळे कोणत्याही विद्यार्थ्याची गैरसोय झाली नाही , अडचण देखील आली नाहीं असा दावा शिक्षण विभागातून करण्यात आला ...
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची निवड झाली. जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे शिवाजीराव कर्डिले आणि महाविकास आघाडीचे चंद्रशेखर घुले यांच्यात ही लढत होती. शिवाजीराव कर्डिले यांचा एक मतांनी विजय झाला. शिवाजीराव कर्डिले यांच्या विजयामागे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांनी महत्वाची भूमिका बजावली. शिवाजीराव कर्डिले यांच्या विजयाबरोबरच काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व असलेली जिल्हा सहकारी बँक आता विखेंच्या म्हणजेच भाजपच्या ताब्यात गेली आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी शेवटच्या क्षणी भाजपतर्फे शिवाजीराव कर्डिले यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली. निवडणूक अटीतटीची होणार, असे चित्र निर्माण झाले. कर्डिले यांच्यासह विखे पिता-पुत्रांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आणि विजयाचे गणित जुळवून आणले. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक अध्यक्षपदाची निवड मतदानाद्वारे झाली. या निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांना दहा मते मिळाली. चंद्रशेखर घुले यांना नऊ मते मिळाली तर एक मत बाद झाले.
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची निवड झाली असून जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे शिवाजीराव कर्डिले आणि महाविकास आघाडीचे चंद्रशेखर घुले यांच्यात ही लढत होती. शिवाजीराव कर्डिले यांचा एक मतांनी विजय झाला....शिवाजीराव कर्डिले यांच्या विजयामागे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांनी महत्वाची भूमिका बजावली... शिवाजीराव कर्डिले यांच्या विजयाबरोबरच काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व असलेली जिल्हा सहकारी बँक आता विखेंच्याच म्हणजेच भाजपच्या ताब्यात गेली आहे....अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी शेवटच्या क्षणी भाजपतर्फे शिवाजीराव कर्डिले यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता... त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली... निवडणूक अटीतटीची होणार, असे चित्र निर्माण झाले...कर्डिले यांच्यासह विखे पिता-पुत्रांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आणि विजयाचे गणित जुळवून आणले...अहमदनगर जिल्हा सहकारी बँक अध्यक्षपदाची निवड मतदानाद्वारे झाली... या निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांना दहा मते मिळाली...चंद्रशेखर घुले यांना नऊ मते मिळाली तर एक मत बाद झाले.
राज्यातला उकाडा पुन्हा वाढणार
राज्यातील तापमानात 4 ते 6 अंश सेल्सिअसने वाढण्याचा भारतीय हवामान विभागाचा इशारा
आज आणि उद्या कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील काही भागात उष्माघाताचा इशारा
कमाल तापमानात मोठी वाढ दिसणार असल्याचा अंदाज
विदर्भात मात्र काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
Beed News : बीड जिल्ह्यातल्या धारुर तालुक्यातील कानपूर गावामध्ये 14 गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तुकाराम महाराज यांच्या बीजेनिमित्त कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं आहे. विशेष म्हणजे या कीर्तन महोत्सवामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रबोधन करण्यात येत आहे. तर संत तुकाराम महाराजांनी संगीतल्याप्रमाने परमार्थ बरोबरच विज्ञानाचे देखील आपण अवलंब केला पाहिजे असा संदेश या अनोख्या कीर्तन महोत्सवातून देण्यात येत आहे. या कीर्तन महोत्सवामध्ये आलेल्या महाराज मंडळी आणि भाविकांची भोजनाची व्यवस्था व्हावी यासाठी प्रत्येक गावातून भाकरी जमा करण्यात येतात. मात्र होळीचा सण असल्याने बोधेगाव आणि कावळ्याचीवाडी या गावातील महिलांनी चक्क पुरणपोळ्या या सप्ताहामध्ये भोजनासाठी पाठवल्या होत्या
Navi Mumbai : मुंबई ते नवी मुंबई प्रवास जलद आणि सुखकर व्हावा यासाठी जलवाहतूक सुरु करण्यात आली आहे. मात्र ही जलवाहतूक नवी मुंबई, उरण परिसरातील स्थानिक मच्छिमारांच्या उपजिवीकेवर घाला घालत आहे. दिवाळे, मोहा, नाव्हा गावातील मच्छिमारांना महाराष्ट्र प्रादेशिक बंदर विभागाने मासेमारी करण्यासाठी टाकण्यात येणारे जाळे न टाकण्याची सूचना पत्राद्वारे केल्या आहेत. जाळ टाकल्यास कायदेशीर कारवाई करण्याची ताकीद या पत्रात देण्यात आली आहे. यामुळे स्थानिक मच्छिमारांमध्ये संतापाची लाट उसळली असून नोटीस मागे घेण्याची मागणी करण्यात येत आहे. एकट्या दिवाळे गावात 225 नोंदणीकृत मच्छिमार सदस्य असून ते बेलापूर ते भाऊचा धक्का या भागात मासेमारी करत आपली उपजीविका करत आहेत. जाळे टाकण्यास मनाई केल्यास पारंपरिक उत्पन्नाचं साधन बंद पडणार असून हा प्रश्न त्वरित सोडवण्याची मागणी मच्छिमार बांधवांनी केली आहे. चॅनल बनवताना मच्छिमारांना विश्वासात घेतले नाही. यासोबातच जलमार्गात या मच्छिमारांच्या जाळ्यांचा कुठलाही अडथळा येत नसताना देखील नोटीस बजावण्यात आल्याने या प्रकरणी अधिवेशनात आवाज उचलणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली आहे.
Indapur News : शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना इंदापूर तालुक्यातील काटी गावात घडली. ओंकार दादाराम मोहिते असं 22 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. ओंकार शेतात संध्याकाळी काम करत असताना वीज कोसळली. ओंकारचा टी-शर्ट जळालेल्या अवस्थेत आढळल्याने गावकऱ्यांना वीज अंगावर पडून त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दादाराम मोहिते यांना ओंकार आणि दोन मुली आहेत. ओंकार हा पोलीस भरतीची तयारी करीत होता अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. दरम्यान काल संध्याकाळी काटीत एका नारळाच्या झाडावरही वीज कोसळली. त्यामुळे वीज कोसळल्यानेच ओंकारचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज ग्रामस्थांनी वर्तवला आहे. इंदापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Nawab Malik News : नवाब मलिक यांचा कारागृहातील मुक्काम वाढला
नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत नियमित 14 दिवसांची वाढ
कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात मलिक अटकेत
नवाब मलिक यांच्यावर सध्या न्यायालयाच्या परवानगीने कुर्ल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु
नवाब मलिकांचा जामीन अर्ज हायकोर्टात प्रलंबित
Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत गव्या रेड्याने शेतीत धुडगूस घातला आहे. आंबोलीतील नांगरतासवाडी येथील अशोक गावडे यांच्या चार एकर ऊस शेतीचे आणि एक एकर मक्याच्या शेतीच गवारेड्यांनी नुकसान केले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांकडून शेतीचे नुकसान होत आहे. मात्र वनविभागाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे येथील शेतकरी आक्रमक बनले असून तात्काळ कार्यवाही न केल्यास वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय चंद्रकांत पाताडे यांच्याही ऊस शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र वनविभाग केवळ तात्पुरते पंचनामे करुन कागद रंगवण्याचे काम करत आहेत. शेतकऱ्यांना प्रत्यक्षात नुकसान भरपाई दिली जात नाही. आंबोलीत मोठ्या प्रमाणात हत्ती, गव्यांची आणि माकडांची तसेच वन्य प्राणी शेतीचं नुकसान करत आहेत. मात्र वनखात्याकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी वनखात्यावर संताप व्यक्त केला असून आता तात्काळ कार्यवाही ना झाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
Bhandara Accident : भंडाऱ्यात भरधाव जाणाऱ्या मालवाहू ऑटोने दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू तर, एक गंभीर जखमी झाला. दीपक परतेती (वय 23 वर्षे) असं मृताचं नावं असून जितू उईके (वय 22 वर्षे) असं गंभीर जखमीच नावं आहे. ही घटना भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील कलेवाडा मार्गावर रात्री घडली. अधिक तपास गोबरवाही पोलीस करत आहे.
Sangli News : सांगली जिल्ह्यात द्राक्ष निर्यातीला गती आली आहे, मात्र निर्यातक्षम द्राक्षाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. नाशवंत माल असल्याने द्राक्ष व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दरात द्राक्ष खरेदी करत आहेत. 25 ते 30 रुपये प्रति किला इतका कमी दर द्राक्षाला मिळत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमागील दराच्या घसरणीचे शुक्लकाष्ट संपत नाही. दरवर्षाच्या तुलनेत यावर्षी द्राक्षाचे बाजारभाव कोसळल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त दिसून येत आहे. मार्च महिन्यात तरी भाव वाढतील, अशी आशा असलेला द्राक्ष उत्पादक शेतकरी सध्या तरी निराश दिसत आहे. मागील दोन वर्षे कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर खर्च अधिक आणि उत्पादन शून्य झाले. यावर्षी सुद्धा 'येरे माझ्या मागल्या' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत स्थानिक बाजारपेठाअंतर्गत चांगल्या द्राक्षाला प्रति किलो 25 ते 30 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेअंतर्गत निर्यातक्षम प्रतीच्या द्राक्षाला प्रति किलो 60 ते 70 रुपये इतकाच भाव मिळत आहे. त्यामुळे त्यापासून मिळणारे उत्पन्न हे खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही अशी परिस्थिती आहे.
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असून ग्रामीण भागातील नागरिक आक्रमक झाले आहेत. शहादा आणि तळोदा तालुक्यातील 47 गावातील रस्त्यांची अत्यंत दूरवस्था झाली आहे. या रस्त्यावर खाजगी वाहनचालकही वाहन आणायला तयार नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. तसेच शेतीच्या मालाची काढणी सुरु असून शेतमाल बाजारपेठेत घेऊन जाण्यासाठीही नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. हे रस्ते नंदुरबार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात येत असून त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या गावातील नागरिकांनी केला आहे. खराब रस्त्यांमुळे छोटे-मोठे अपघात होत असून त्यातून नागरिक जखमी होत आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांना आठवडाभरात गती दिली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी प्रशासनाला निवेदनातून दिला आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच 47 गावातील नागरिकांनी एकत्र येऊन गावाच्या रस्त्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Bhandara News : धुळवळीच्या दिवशी भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी गरदेव देवाची यात्रा भरते. कोरोनामुळ मागील दोन वर्षात एकही सण साजरे झाले नाहीत. मात्र, या वर्षी ही यात्रा सर्वत्र भरवण्यात आली. एक उभा खांब आणि त्याला पंचेचाळीस अंशात टेकून ठेवलेला दुसरा खांब लावलेला असतो. दोन्ही खांबाला दोर बांधून दोन व्यक्ती एकमेकांविरुद्ध दिशेने हवेत झोके घेतात. श्रद्धेपोटी यात्रेत येणारे अनेक भाविक हा खेळ खेळतात. विशेषतः तरुण मुलांमध्ये याचे आकर्षक मोठ्या प्रमाणात असते. या यात्रेत सहभागी होणारे नागरिक देवाची पूजा करुन आशीर्वाद घेऊन गावाकडे परत जातात. यात हजारो नागरिक आपल्या कुटुंबासह सहभागी होतात. या यात्रेत पारंपरिक वाद्य वाजवणारे वादक खास आकर्षणाचा मध्यबिंदू असतो. मागील 150 वर्षांपासून ही परंपरा सुरु असून सर्व प्रकारचं संकट दूर होतात, अशी आख्यायिका आहे.
Women Protest in Mumbai Local Train : मध्य रेल्वेच्या उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या महिला आज काळ्या फिती बांधून महिला दिन साजरा करणार आहेत. रेल्वेत वाढत जाणारी गर्दी आणि प्रवासातील महिलांची असुरक्षितता याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी महिला निषेध आंदोलन करणार आहेत. उपनगरीय रेल्वेत मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे तरीही महिलांच्या प्रवासासाठी कोणतीही खबरदारी आणि उपाययोजना रेल्वे प्रशासन करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. 8 मार्च जागतिक महिला दिन हा सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रातील महिलांना समान संधी व अधिकार देणे याची आठवण करुन देण्यासाठी आहे. मात्र उपनगरीय रेल्वे प्रवासी महिलांना आजही त्यांच्या समान हक्क व अधिकारापासून वंचित राहावे लागत आहे, त्यामुळे उपनगरीय रेल्वे महासंघ आणि तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटना निषेध आंदोलन होणार आहे.
Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसानंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणावर दाट धूक्याची चादर बघायला मिळत आहे. तापमानातही मोठी घट झाली असून वाढलेल्या थंडीमुळे मानवी आरोग्यावर आणि गुरांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर दाट धुक्यामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आजपासून विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. विधिमंडळ आजही विरोधक शेतमालाला हमी भाव आणि इतर मुद्यांवर आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा आठवडा वादळी ठरण्याची चिन्ह आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान तीन दिवसाच्या भारत दौऱ्यावर असणार आहेत. त्यांच्या भारत दौऱ्याची सुरुवात गुजरातपासून होणार आहे. तर, जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
मुंबईत आज घडणाऱ्या इतर महत्त्वाच्या घडामोडी
- कसबा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आज मुंबईत महाविकास आघाडीमधील नेत्यांची भेट घेणार आहे.
- मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पहिल्या एमसीए महिला लीगचं सकाळी 8.45 वाजता उद्घाटन होणार आहे.
- राज्य महिला आयोगाच्यावतीनं आयोजित महिला दिनानिमीत्त जागर स्त्रीत्वाचा, सन्मान कर्तृत्वाचा हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता बालगंधर्व रंगमदिर वांद्रे येथे होणार आहे.
- अँटिलिया स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्याकांड प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सुनील मानेचा माफीचा साक्षीदार होण्याकरता विनंती केली आहे. सुनील मानेच्या अर्जावर आज तपास यंत्रणा आपलं उत्तर कोर्टात दाखल करण्याची शक्यता आहे.
- कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. तपास यंत्रणेकडून चालढकल सुरू असल्याचा पानसरे कुटुंबियांचा हायकोर्टात आरोप करण्यात आला आहे.
बेशिस्त वाहन चालकांमुळे लातूरमध्ये वेगवेगळ्या अपघातात दोन ठार, दोघांवर गुन्हा दाखल
लातूर शहरातील बाह्यवळण रस्त्याहून चाकूरकडे निघालेल्या टाटा सुमो गाडीने सारोळा चौकात समोरून आलेल्या एका दुचाकीस्वाराला जोराची धडक दिल्याची घटना घडली. त्यामध्ये दुचाकीस्वार सूमोमध्ये अडकला, तरीही न थांबता चालकाने वाहन भरधाव चालवले. यामध्ये दुचाकीस्वार काही अंतरावर फरपटत गेल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. नयूम खाजामिया शेख टकारी (वय 40) असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
भाजपने पंकजा मुंडेसह अनेक नेत्यांना वापरुन बाजूला केलं, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल
भाजपने पंकजा मुंडे यांनाच नाही तर अनेकांना वापरून घेतलं. यात लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, सदाभाऊ खोत, राजु शेट्टी, महादेव जानकर आदी नेत्यांना भाजप पक्षाने वापरून घेत बाजूला केल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज अहमदनगर दौऱ्यावर होत्या, यावेळी त्या बोलत होत्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -