Maharashtra News Updates 5th March 2023 : Mumbai Light: मुंबईतील प्रभादेवी परिसरातील लाईट गेल्या 10 मिनीटांपासून गायब

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Mar 2023 10:35 PM
Mumbai Light: मुंबईतील प्रभादेवी परिसरातील लाईट गेल्या 10 मिनीटांपासून गायब

एकीकडे दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असताना मुंबईतील प्रभादेवी परिसरातील वीज गेल्या 10 मिनीटांपासून गायब आहे. वीजपुरवठा खंडीत होण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

Beed News : संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी प्राचार्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल

Beed News : संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी वडवणीच्या एका प्राचार्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. बीडमध्ये सुरू असलेल्या संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये डमी विद्यार्थी बसवण्याचा प्रकार उघडकीस झाला होता आणि त्यानंतर वडवणी येथील एका संस्थेवर प्राचार्य असलेले शिवदास तोंडे यांनी परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्रामध्ये विनापरवानगी प्रवेश केला त्यामुळे केंद्रप्रमुखांच्या तक्रारीवरून परीक्षेमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी प्राचार्य शिवदास तोंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Shivsena BJP Ashirwad Yatra : मुंबईत ठाकरेंना भाजप आणि शिवसेनेचं आव्हान, अयोध्येवरून आणलेल्या धनुष्यबाणासह उपनगरात शिवसेना शक्तिप्रदर्शन

उद्धव ठाकरेंची रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभा होत असताना भाजप आणि शिवसेना मुंबईत ठाकरेंना आव्हान देणार आहे. मुंबईत आज भाजप आणि शिवसेनेची आशीर्वाद यात्रा निघणार आहे. अयोध्येवरून आणलेल्या धनुष्यबाणासह उपनगरात शिवसेना शक्तिप्रदर्शन करणार आहे. थोड्याच वेळात घाटकोपर ते मुलुंड दरम्यान भव्य बाईक रॅलीसह आशीर्वाद यात्रा सुरु होणार आहे. तर संध्याकाळी पाच वाजता आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातदेखील आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर जनजागृती करण्यासाठी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय.

Coronavirus : होळीवर कोरोनाचं सावट! देशात 24 तासांत 324 नवीन कोरोना रुग्ण

ऐन सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा कोरोनाचं (Covid 19 Updates) संकट वाढत आहे. देशात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत असताना आता मात्र कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्याभरात देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 324 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 22 फेब्रुवारी रोजी 95 नवीन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, शुक्रवारी कोरोनाबाधितांची संख्या 300 होती, आज हीच रुग्ण संख्या 324 वर पोहोचली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांमुळे देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 791 पर्यंत वाढली आहे.

Beed News : बीडच्या जिल्हा रुग्णालयात करता येणार बेरा तपासणी

Beed News : बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आता रुग्णांना बेरा तपासणी करता येणार आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या हस्ते बेरा टेस्ट तपासणी सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं आहे. ज्यांना कानाने कमी ऐकू येतं अशा कर्णबधिर व्यक्तींसाठी, अतिशय महत्त्वाची समजली जाणारी बेरा टेस्ट तपासणी, ही बीड जिल्ह्यात केवळ अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयातच होत होती. मात्र, आता जिल्ह्यातील रुग्णांना अंबाजोगाईला जायची गरज नाही. बीडच्या जिल्हा रुग्णालयातच बेरा टेस्ट तपासणी होणार आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या हस्ते या बेरा टेस्ट तपासणी केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं आहे.

Dule News : अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Dule News : धुळे जिल्ह्यामध्ये साक्री, शिंदखेडा, शिरपूर या तालुक्यांसह धुळे तालुक्यात देखील मध्यरात्रीनंतर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, या आवकाळी पावसामध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, गहू, हरभरा, पपई यांसारख्या पिकांना या अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. 


हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार मध्यरात्रीनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, त्याचबरोबर विजांचा कडकडाट व वादळी वारा यासह झालेल्या या अवकाळी पावसामुळे कापणीला आलेला गहू अक्षरशः जमीनदोस्त झाला आहे, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चांगलाच अडचणीत सापडला असून मायबाप सरकारने या नुकसानीची गांभीर्याने दखल घेत लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे.
Palghar News : पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागात अवकाळी पाऊस आंबा बागायतदारांचे नुकसान

Palghar News : हवामान खात्याने दिलेल्या ईशारानुसार 4 फेब्रुवारी रोजी रात्री 2.30 ते 3.30 दरम्यान पालघर जिल्ह्याच्या पूर्वेच्या विक्रमगड वाडा आणि काही भागात अचानक विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसू लागल्या. या मुळे  शेतकऱ्याची रब्बी पिके यात तुर, हरभरा, वाल काढणीस शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. असे असताना अचानक अवकाळी पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्याची तारांबळ उडाली, तसेच वीट भट्टी मालकांची दाणादाण उडाली. आंबा बगायतदारांचे ही या मध्ये मोठे नुकसान झाले आहे. आंबाच्या झाडाना मोहराला असुन काही भागात सुपारीच्या आकाराचे आंबे लागले आहेत. जोरदार पावसाचे माऱ्याने हे छोटा आकाराचे आबे झाडावरून गळून गेले असुन काही भागातील मोहर ही गळून गेला आहे. अचानक विजेच्या गडगडाट वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे आंबा बागायतदाराचे मोठे नुकसान होणार आहे. काही दिवसापासुन तालुक्यात तापमानात चढ-उतार होत आहे. आज रात्री अचानक 2.30 ते 3.30 च्या दरम्यान विजेच्या कडकडाटी सह जोरदार पावसाची सुरुवात झाली 45 मिनिट सतत पाऊस झाल्याने नंतर पाऊस थांबला असला तरी आंबा बागायतदार, वीट भट्टी मालकांचे नुकसान झाले. असून, शेतकऱ्यानी लावलेल्या रब्बी पिक भाजीपाला तसेच उडीदाचे पिक, तुरीचे कडधान्यां बरोबरच काकडी, कलिंगड,  चवळी, वांगी, मिरची,गवार, टाॅमेटो, भोपळा, मेथी, मुळा, पालक,आदी या पिकांना ही अवकाळी पाऊसाचा तसेच ढगाळ वातावरणाचा फटका बसणार आहे.

Sanjay Raut : कागदावरचा निर्णय कागदावरच राहील, नाव आणि चिन्ह मिळालं पण.... राऊतांचा निशाणा   

Sanjay Raut : ज्यांना निघून जायचं ते निघून गेले आहेत. आता जे आहेत ते निष्ठावान असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलं. काही लोक निघून गेल्यानंतरसुद्धा शिवसेना (Shivsena) त्याच ताकदीनं उभी आहे. शिवसेनेवर कोणताही परिणाम काही झाला नसल्याचे राऊत म्हणाले. तुम्हाला कागदावर नाव आणि चिन्ह मिळालं. पण शिवसैनिक आणि जनतेचं प्रेम तुम्हाला मिळाली नसल्याची टीका संजय राऊतांनी शिंदे गटातील आमदारांवर केली. निवडणूक आयोगाला तो अधिकार नाही. हा कागदावरचा निर्णय कागदावरच राहील असेही राऊत म्हणाले.

Buldhana : पेपर फुटी प्रकरणामध्ये दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक

Buldhana news:


पेपर फुटी प्रकरणामध्ये दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक .


व्हॉट्स ॲप ग्रुप बनवून केला जात होता कॉपीचा प्रकार .


99 जणांचा बनवलेला होता ग्रुप.


पास करgन देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 10 ते 12 हजार रुपये घेतले जात असल्याची सूत्रांची माहिती.


घटना समोर आल्यावर व्हॉट्स एप ग्रुप करण्यात आला डिलीट.


याबाबत पोलिसांच्या सायबर सेल कडून लवकर डिलीट करण्यात आलेल्या डेटा रिकव्हर करण्यात येणार असल्याची पोलिस अधिकाऱ्यांची माहिती.

Beed : राष्ट्रवादीच्या आमदाराने घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट, बीड जिल्ह्यात खळबळ 

Beed News : बीड जिल्ह्यातील माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी भारत राष्ट्र समितीचे प्रमुख (BRS) आणि तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (CM K. Chandrashekar Rao) यांची भेट घेतली आहे. सोळंके यांनी हैदराबादमध्ये त्यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. या भेटीनंतर बीड (Beed) जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

Hasan Mushrif: राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका


ईडीनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी


फसवणुकीच्या आरोपाखाली कोल्हापुरात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी हसन मुश्रीफ यांची हायकोर्टात याचिका


अंमलबजावणी संचालनालयाच्या  खटल्यांमध्ये मुश्रीफ यांच्यावर सूड बुद्दीनं कारवाई होत असल्याचा याचिकेत आरोप


याचिकेवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोणतीही कारवाई तसेच आरोपपत्र दाखल करू न देण्याची याचिकेत मागणी


23 फेब्रुवारी रोजी कोल्हापुरातील मुरगूड पोलीस ठाण्यात मुश्रीफ यांच्याविरोधात विवेक कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज रत्नागिरीत सभा होणार आहे. ही सभा खेडमध्ये रामदास कदम यांच्या बालेकिल्ल्यात होणार आहे. यावेळी काहींचे पक्ष प्रवेश देखील होणार आहेत. तर, दुसरीकडे मुंबईत भाजप- आणि शिवसेना शिंदे गटाची आशिर्वाद यात्रा निघणार आहे. जाणून घ्या आज दिवसभरातील घटना...








रत्नगिरी 








- खेडच्या गोळीबार मैदानात संध्याकाळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार. संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरेंची जाहीर सभा. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांचाही ठाकरेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. माजी मंत्री रामदास कदम यांचे निकटवर्तीय माजी बांधकाम सभापती विश्वासकाका कदमदेखील पक्षात प्रवेश करणार आहेत.


नागपूर


 - आज उपराजधानी नागपूर ते राजधानी मुंबई एक पेन्शन मार्च निघणार आहे. जुनी पेन्शन या मुद्द्यावर नव्याने निवडून आलेले काँग्रेस आमदार सुधाकर अडबाले हे या मोर्चामध्ये सहभागी होणार.


- वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मागच्या 13 दिवसापासून सुरु असलेले विदर्भात फिरत असलेले विदर्भ निर्माण यात्रा आज नागपूरात पोहचणार. एक यात्रा गडचिरोलीच्या कालेश्वर व एक यात्रा बुलढाण्याच्या सिंदखेडराजा येथून निघाल्या होत्या. दोन्ही एकत्र येऊन संविधान चौकात त्याचा समारोप होणार आहे.


मुंबई 


- अयोध्या वरून आणलेल्या धनुष्यबाणासह भाजप शिवसेना - शिंदे गट करणार मुंबई पूर्व उपनगरात शक्ती प्रदर्शन. सकाळी 9 वाजता सहा हजार बाईकसह घाटकोपर अमृतनगर सर्कल ते मुलुंड अशी भव्य आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार. 


पुणे 


- पुण्यात पहिल्यांदाच होत असलेल्या साधू-संत-महंत संमेलन व दर्शन सोहळ्याचे उद्घाटन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थितीत उद्घाटन होणार  आहे.


- गॅस दरवाढीच्या विरोधात AAP आम आदमी पार्टीचं पुण्यातील बालगंधर्व चौकात सकाळी 10 वाजता आंदोलन करण्यात येणार


सातारा 


- शरद पवार दौरा सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. रयत शिक्षण संस्थांच्या इमारतीचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 


नवी मुंबई


-  सचिन धर्माधिकारी यांना (डॉक्टरेट ऑफ लिटरेचर ) डी. लिट पदवी प्रदान सोहळा नवी मुंबईत होत आहे. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संचालक सचिन धर्माधिकारी यांच्या पदवी प्रदान कार्यक्रम सकाळी 10 वाजता नवी मुंबईत पार पडत आहे. जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाल विद्यापीठ राजस्थान डी. लिट पदवी प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील मंत्री यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न होणार आहे.  


अमरावती


- आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत येत आहेत. अमरावतीत 1 ते 5 मार्च दरम्यान कृषी विभागाकडून भव्य कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आज या कृषी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहे. 


सांगली 


-  राज्यस्तरीय ओपन रायफल शुटिंग स्पर्धेचे आयोजन. स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि शहिद अशोक कामटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ओपन रायफल शूटिंग स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे.


सोलापूर 


- सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आजही सोलापूर शहरात आहेत. त्यांच्या उपस्थितीत आत्मा अंतर्गत कृषी महोत्सवचे उदघाटन होणार आहे.


परभणी 


- माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोनार समाजाचा सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. लोणीकरही राहणार उपस्थित


जळगाव 


- जळगाव तालुक्यात वराड येथे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ होणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.