Maharashtra News Updates 4th March 2023: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Mar 2023 11:06 AM
HSC Exam : बारावीच्या गणिताच्या पेपरफुटीची मुंबई कनेक्शन; विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये पेपर, तीन विद्यार्थ्यांसह अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा

HSC Exam 2023 Maths Paper Leak : बारावीच्या (HSC Board) गणिताच्या पेपरफुटी (Maths Paper Leak) प्रकरणाचा संबंध मुंबईतील विद्यार्थ्यांशीही असल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये गणित पेपरचा काही भाग आढळला आहे. डॉ. अँथोनी डिसिल्वा हायस्कूलमधील विज्ञान शाखेतील (Science Stream) परीक्षार्थीच्या मोबाईलमध्ये दहा वाजून 17 मिनिटांनी गणिताचा पेपर सापडला. या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांसह अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आला आहे. 

Thane News : विद्युत ट्रान्सफार्मर चोरीचा प्रयत्न फसला; लिगांयत गावातील घटना

Thane News :  शहापूर तालुक्यातील लिगांयत गावामध्ये शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी असलेल्या कृषी पंपाचा विद्युत ट्रान्सफार्मर रात्रीच्या सुमारास चोरण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान ग्रामस्थांनी किन्हवली  पोलिस स्थानकात तक्रार दिली असुन वारंवार घडणारे प्रकार थांबविण्याची मागणी केली आहे. 

Beed News : अपंगत्वाचे बोगस सर्टिफिकेट देणाऱ्या 78 निलंबित शिक्षकांना मिळाला दिलासा; हायकोर्टातून निलंबन रद्द

Beed News :   अपंगत्वाचे बोगस सर्टिफिकेट देणाऱ्या 78 निलंबित शिक्षकांना मिळाला दिलासा


बीड जिल्हापरिषदेतील कथित बोगस दिव्यांगत्व प्रकरणात जिल्हापरिषदेच्या केलेले शिक्षकांचे घाऊक निलंबन मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द  


शिक्षकांची जेजे रुग्णालयातील अपीलेट बोर्डाकडून दिव्यांगत्वाची फेरतपासणी करून घेण्याची मागणी देखील न्यायालयाकडून मंजूर

नंदुरबारमधील धडगाव तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी 

नंदुरबारमधील धडगाव तालुक्यात हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस झालाय. धडगाव शहर आणि तोरणमाळ परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यामुळे काढणीला आलेला गहू आणि इतर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

  सांगलीतील कवठेमंकाळ येथील महांकाली साखर कारखान्याच्या परिसरात भीषण आग 

सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ मधील महांकाली साखर कारखान्याच्या परिसरात भीषण आग लागली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कारखाना गेल्या काही वर्षांपासून बंद असल्यामुळे कारखाना परिसरातील गवताने पेट घेतला. कारखान्याच्या गोडाऊनच्या चारीही बाजूंनी भीषण आगीने रूप धारण केले. आग  आणखी वाढली तर कारखान्याच्या मशनरीला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. अग्निशमन विभागाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे.  

थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकाला मारहाण, छत्रपती संभाजीनगर येथील घटना

थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकाला मारहाण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर येथे समोर आली आहे. याप्रकरणी विद्युत सहाय्यक यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, लाईनमन दिनाच्या आदल्यादिवशी ही घटना घडली. विशाल गोवर्धन बैरागी ( वय 24  ) यांनी ही तक्रार दिली आहे. बैरागी हे वसुली पथकासोबत वाघदावाडी येथे गेले होते. यावेळी रामसिंग यांना थकीत वीज बिल का भरले नाही याबाबत विचारणा केली असता त्यांनी पथकाला शिविगाळ करून दगड फेकून मारला. यावरून सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या आदेशाने रामसिंग सरदारसिंग महेर ( रा.वाघदावाडी ता सिल्लोड ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Beed News : रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांवर तिघा जणांचा हल्ला पोलिसात गुन्हा दाखल
Beed News : बीडमध्ये रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांना तिघांनी  मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्मचारी कृष्णा बडे आणि अनिल घटमाळ हे रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना जालना रोडवर एका हॉटेल समोर गोंधळ सुरू असल्याचे दिसले. पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि यावेळी तिघा जणांनी पोलिसांवरच हल्ला केला. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात सुनील मोहिते, शुभम मोहिते यासह अन्य एका विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 
गस्तीवरील पोलिसांना मारहाण, बीडमध्ये तिघांवर गुन्हा दाखल

बीडमध्येमध्ये रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांना तिघांनी मारहाण केली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलिस ठाण्यातील कर्मचारी कृष्णा बडे आणि अनिल घटमाळ हे रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना जालना रोडवर एका हॉटेल समोर गोंधळ सुरू असताना ते त्या ठिकाणी पोहोचले. यावेळी तिघा जणांनी पोलिसांवरच हल्ला केला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात सुनील मोहिते, शुभम मोहिते यांच्यासह अन्य एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Sambhajinagar News : सहाय्यक पोलीस निरीक्षकाला 10000 रुपयाची लाच घेताना पकडलं

Sambhajinagar News : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाला 10,000 रुपयांची लाच घेताना पकडलं आहे. लाच लुचपत विभागाकडून या अधिकाऱ्याला अटक करण्यात आलं आहे. मानसिंग धुनावत असं या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. तक्रारदार यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने तक्रारी मधील नमूद गैर अर्जदाराकडून तक्रारदार यांचे पैसे काढून देण्यासाठी 10 हजारांचा पहिला हप्ता मागितला. या अधिकाऱ्याने एकूण 20 हजार रुपयांची लाच मागितली होती.

कळवा येथील उद्यानाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

कळवा येथील नवीन उड्डाणपूला खालील कळवेकर आणि ठाणेकरांसाठी उभारण्यात आलेल्या नवीन उद्यानाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे, महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर तसेच पालघर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक हे उपस्थित होते. 

राष्ट्रवादी महिला आघाडीचे महागाई विरोधात आंदोलन

महागाई विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडी तर्फे शनिवारी अनोखे आंदोलन करण्यात आले. चक्क रस्त्यावर चुली पेटवून महिला पदाधिकाऱ्यांनी वाढत्या महागाईचा निषेध केला. आयटीआय चौकात हे आंदोलन करण्यात आले.यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. आंदोलना दरम्यान राष्ट्रवादी महिला आघाडी तर्फे महिलांना मातीच्या चुली देऊन सिलेंडरच्या वाढत्या दराचा  यावेळी निषेध  करण्यात आलाय.

माथेरानची ई-रिक्षा बंद होणार? 3 महिन्याचा पायलट प्रोजक्ट ची मुद्दत आज संपणार

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माथेरानमध्ये 5 डिसेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर ई-रिक्षा सुरू झाली आहे. फक्त 35 रुपयांत रहिवासी व पर्यटकांना; तर विद्यार्थ्यांना पाच रुपयांत दस्तुरी नाका टॅक्सी स्टैंड ते सेंट झेवियर स्कूल, वन ट्री हिलपर्यंत जाण्याची सोय झाल्याने दिलासा मिळाला आहे. या प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पाला आज, 4 मार्च रोजी तीन महिने पूर्ण होत असल्याने उद्या, 5 मार्चपासून ई-रिक्षा चालणार की बंद होणार, याबाबत स्पष्टता नसल्याने नागरिक व पर्यटकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. राज्य सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करून यापुढेही ई-रिक्षा सुरू ठेवण्याची मागणी माथेरानकरांनी केली आहे.

Ahmadnagar News: कांद्याचे भाव घसरल्याने राष्ट्रवादीचे सुपा येथे रास्ता रोको

Ahmednagar News: कांद्याचे भाव घसरल्याने पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगर-पुणे महामार्गावर सुपा चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. राज्यात कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसह राष्ट्रवादीने आमदार लंके यांच्यासह शेतकऱ्यांनी आक्रोश आंदोलन केलं. एक तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.  सरकारनं कांद्याच्या निर्यात धोरणामध्ये तातडीने बदल करावे तसेच नाफेड मार्फत कांद्याची खरेदी करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.  शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असतानाही महसूल प्रशासन आंदोलनाकडे लक्ष देत नाही म्हणून लंके यांनी महसूल प्रशासनाचा निषेध केला हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे लंके म्हणाले सरकारने यावर योग्य निर्णय घेतला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही लंके यांनी दिला. 

होळी उत्सव पार्श्वभूमीवर तब्बल 19 लाखांची गोवा बनावटीची अवैध दारू स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग पथकाकडून जप्त

होळी उत्सव दोन दिवसांवर आलेला असताना उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातून महाराष्ट्रात बेकायदा गोवा बनावटीची दारू जिल्ह्यात आणली जात आहे. तब्बल 19 लाखांची गोवा बनावटीची अवैध दारू स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्गच्या पथकाकडून जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी गणेश पाटील याला ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपीच्या विरोधात सावंतवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करता आरोपी आणि मुद्देमाल सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Agriculture News : फडणवीसांचं आश्वासन, तरीही नाफेडकडून कांदा खरेदी नाही; बळीराजा मेटाकुटीला

 Agriculture News : शेतकऱ्यांना कुणी वाली आहे की नाही असा सवाल आता उपस्थित केला जातोय.  कारण एकीकडे मेथी, कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होताना दिसत आहे. तर दुसरीकडं कांद्याचे दर (onion Price) पडल्यानं शेतकरी मेटाकुटीला आला आहे.  अशातच  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (DCM Devendra Fadnavis) नाफेडकडून (Nafed) कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू होतील, अशी माहिती विधिमंडळात दिली होती. फडणवीसांनी गुरुवारी (2 मार्च) याबाबतची माहिती दिली होती.  प्रत्यक्षात मात्र, बाजार समित्यांना याबाबत काहीही कळवलेलं नाही. अद्याप खरेदी सुरु झाली नसल्यानं समिती आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.

Sanjay Raut : 'कसबा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है', विधानसभेला 200 तर लोकसभेला 40 जागा जिंकू : राऊत 

Sanjay Raut : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) म्हणून आम्ही एकत्र लढलो तर कसब्याचा (Kasba) निकाल लागतो आणि थोड जर इकडं तिकडं झालं तर चिंचवडप्रमाणे निकाल लागतो. हा दोन्ही ठिकाणच्या मतदारांनी दिलेला धडा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. कसब्याचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. 2024 पर्यंत महाविकास आघाडीनं मजबुतीनं एकत्रीतपणे काम केलं तर विधानसभेत 200 पेक्षा जास्त जागा निवडून येतील. तसेच लोकसभेला 40 जागा निवडून येतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.

कोकणात ठाकरे गट देणार राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, उद्धव ठाकरेंच्या खेडमधील सभेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठाकरे गटात करणार प्रवेश

Konkan Politics : कोकणात ठाकरे गट देणार राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का 


उद्धव ठाकरेंच्या खेडमधील सभेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठाकरे गटात करणारा प्रवेश


गुहागर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करणार ठाकरे गटात प्रवेश 


 उद्या उद्धव ठाकरेंची खेडमध्ये जाहीर सभा


गुहागर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आमदार


 राष्ट्रवादी मधून ठाकरे गटात येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नावाबाबत पाळली जातेय गुप्तता

Sandeep Deshpande : संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी दोन जण ताब्यात, भांडूप परिसरातून घेतलं ताब्यात 

Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande Attack) यांच्यावरील हल्लाप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईच्या भांडूप भागातून या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवली होती. तपासासाठी विशेष पथकाची देखील नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर अखेर आज दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

Sangli : जत तालुक्यातील सोन्याळ गावच्या हद्दीमध्ये गवा घुसला

Sangli : जत तालुक्यातील सोन्याळ येथील एका शेतात गव्याचे दर्शन झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या परीसरात दाखल झाले आहेत.यानंतर गवा रेडा बंडगरवाडी, विठुराया मंदिर परिसर आणि लकडेवाडी परिसरात फिरत होता. यामुळे शेतकरी आणि नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले होते. गवा  पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. जत तालुक्यातील सोन्याळ येथे  गवा रेड्याचा मुक्तसंचार सुरू आहे.  कित्येक वर्षांनंतर गवा  दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने त्याची दखल घेऊन गव्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी आणि सोन्याळ, लाकडेवडी ग्रामस्थ वर्गाकडून करण्यात येत आहे.  

Buldhana News: सिंदखेडराजा नाव कायम ठेऊन बुलढाणा जिल्ह्याच नाव 'जिजाऊ नगर' करा

Buldhana News: राजमाता जिजाऊंच जन्मस्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा शहाराच नामांतर न करता संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच जिजाऊ नगर असं नामांतर करण्याची मागणी आता जोर धरू  लागली असून जिल्ह्यातील सर्व पक्षियांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत पाठविलं आहे.

समृद्धी महामार्गावर पुलावरुन खाली कोसळलेल्या टँकरने पेट घेतला, चालक आणि क्लिनरचा होरपळून मृत्यू

Tanker Fire : समृद्धी महामार्गावर मोठा अपघात झाला. केमिकल घेऊन जाणारा टँकर पुलावरुन खाली कोसळल्याने टँकरने पेट घेतला. या आगीत ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर यांना होरपळून मृत्यू झाला. ही घटना रात्री अकराच्या सुमारास घडली.



Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकासप्रकल्पांचे लोकार्पण

Maharashtra News: महानगरपालिका आणि ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भुमिपूजन सोहळा आज दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.  ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तसेच, केंद्रीय पंचायती राज मंत्री कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, खासदार कुमार केतकर, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे हे नेते देखील उपस्थित राहणार आहेत. 

MSRTC ST Bus : एसटीच्या 'त्या' जाहिरात प्रकरणी कर्मचाऱ्यांचे निलंबन

MSRTC ST Bus : राज्य सरकारची प्रसिद्धी जाहिरात असलेली एसटी महामंडळाची दुरावस्था झालेल्या बसचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोची दखल घेत विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकार टीका केली होती. मात्र, जुनाट बसवर लावण्यात आलेल्या जाहिरातीसाठी एसटी कर्मचाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले. भूममधील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


महानगरपालिका आणि ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भुमिपूजन सोहळा आज दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. याबरोबरच बेस्ट बेकरी केस प्रकरणी मुंबई सत्र न्यायालय  निकाल देणार आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकासप्रकल्पांचे लोकार्पण


 महानगरपालिका आणि ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भुमिपूजन सोहळा आज दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.  ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तसेच, केंद्रीय पंचायती राज मंत्री कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, खासदार कुमार केतकर, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे हे नेते देखील उपस्थित राहणार आहेत. 
 
बेस्ट बेकरी केस प्रकरणी निकाल


बेस्ट बेकरी केस प्रकरणी मुंबई सत्र न्यायालय  निकाल देणार आहे. साल 2002 मध्ये गुजरातमधील वडोदरा इथं गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या हिसांचारातील एक गाजलेलं प्रकरण म्हणजे बेस्ट बेकरी हत्याकांड. या प्रकरणी जमावानं 14 जणांना अतिशय निर्घृणपणे मारलं होतं. याप्रकरणातील दोन फरार आरोपींविरोधात मुंबई सत्र न्यायालयाताल विशेष कोर्टात नुकताच खटला पूर्ण झाला आहे. त्यावर आज कोर्ट आपला राखून ठेवलेला निकाल जाहीर करणार आहे.. 


खासदार इम्तियाज जलिल यांचे उपोषण
 
औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर झाल्याच्या विरोधात आज खासदार इम्तियाज जलिल उपोषण करणार आहेत. जलिल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजल्यापासून साखळी उपोषण करणार आहेत. तर छत्रपती संभाजीनगर नामांतर झाल्याच्या समर्थनार्थ दुपारी 12 वाजता मनसेच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आलीय. टिव्ही सेंटरजवळ मनसेच्या वतीनं ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. 


 अहमनदनगरमध्ये राष्ट्रवादीचा जनआक्रोश मोर्चा


अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सकाळी 10 वाजता नगर - पुणे रोडवर शेतकरी जन आक्रोश आंदोलन रास्ता रोको होणार आहे. कांद्याचे दर कमी झाल्याने हे आंदोलन केले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तर संगमनेरमध्येही बसस्थानकासमोर सकाळी 9 वाजता नाशिक – पुणे महामार्गावर आंदोलन करण्यात येणार आहे. राज्याचे माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात या आंदोलनात सहभागी होणार आहेत. 
  
 अहमदनगरमध्ये सावता परिषदेचे पाचवे त्रैवार्षिक अधिवेशन


अहमदनगर येथे सावता परिषदेचे पाचवे त्रैवार्षिक अधिवेशन आज होणार आहे... या अधिवेशनासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे... सकाळी ११ वाजता नंदनवन लॉन्स अहमदनगर येथे दोन सत्रांमध्ये हे अधिवेशन होणार आहे... माळी समाज बांधवांच्या विविध प्रश्नांबाबत या अधिवेशनात चर्चा होणार आहे. 


संजय राऊतांची पुण्यात पत्रकार परिषद 


 शिवसेना खासदार संजय राऊत यांची सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद आहे. कसब्याचे नवनिर्वाचीत आमदार रवींद्र धंगेकर हे संजय राऊत यांना भेटणार आहेत. 


 कोल्हापुरात मोर्चा 


एकच मिशन जुनी पेन्शन या टॅगलाईन खाली आज कोल्हापुरात महामोर्चा निघणार आहे.. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा असून कुटुंबीयांसह या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. 


 महिला IPL


आजपासून महिला IPL च्या मॅचला होणार सुरूवात होणार आहे. 2023 चा पहिला महिला आयपीएल सीजन आजपासून खेळवला जात आहे. मुंबईतील दोन स्टेडियमवर या मॅच खेळवल्या जाणार आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.