Maharashtra News Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही बँकांवर मोठ्या कारवाईची मोठी बातमी येत आहे.
आरबीआयने शुक्रवारी देशातील 5 सहकारी बँकांवर काही निर्बंध लादले आहेत.
यात औरंगाबादच्या आदर्श महिला नागरी सहकारी बँकचा देखील समावेश आहे.
बँकेतून पैसे काढण्याची मर्यादाबाबत काही निर्बंध लादण्यात आले आहे.
या बँकांची ढासळलेली आर्थिक स्थिती पाहता हे निर्बंध लादण्यात आले असल्याचं आरबीआयने म्हटले आहे.
शेवगाव तालुक्यातील सीमा हद्दीपासून जवळच असलेल्या नजीक बाबुळगाव ता. शेवगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या डीसलरी विभागात मोठा स्फोट झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली असून दर पाच मिनिटाला स्फोट होत असल्यामुळे घटनास्थळ बचाव कार्य करण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना शर्यतीचा प्रयत्न सुरू केलेला आहे.
अधिक माहिती अशी की पैठण तालुक्यातील सीमा हद्दीचा जवळच असलेल्या नजीक बाभूळगाव ता. शेवगाव जिल्हा अहमदनगर येथील गंगामाई साखर कारखान्यात नेहमीप्रमाणे डीसलरी विभागात कामगार काम करीत असताना अचानक कसलातरी स्फोट झाल्याचा मोठा आवाज येऊन कारखान्याला भीषण आग लागल्यामुळे कामगारांनी आपला जीव मुठीत धरून पळापळी सुरू केली. आग लागली घटनेची माहिती दोन्ही तालुक्यातील शासकीय यंत्रणाला मिळतात मंगल व रुग्णव आहे का घटनास्थळ दाखल झाले आहे.
खरिपाच्या मे आणि जून महिन्यात पेरणी करण्यात आलेल्या हळद काढणीला सुरुवात झाली आहे. अनेक नैसर्गिक अडचणीचा सामना करत आता हळद कादाह्नी करत आहे. अतिवृष्टी आणि वातावरणातील बदलामुळे हळदीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाशीम जिल्ह्यात सहा हजार ११२ हेकटर क्षेत्रावर हळदीचा पिक पेरा केल्या गेला होता. नकद पिक म्हणून हळद पिका कडे वळले होते . मात्र आता कमी मिळणारे दर आणि त्यात वातावरणाचा फटका हळद पिकावर सर्वाधिक होतांना दिसतोय.
पैठण शेवगांव रोडवरील गंगामाई साखर कारखाण्यात डिसलरी विभागात स्फोट..पैठण एमआयडीसी अग्निशमन दल बचाव कार्यासाठी रवाना झाले आहे.
सोलापुरात एकाच झाडाला गळफास घेऊन प्रेमी युगुलाने आत्महत्या केलीय. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेतील मृत मुलगी ही अल्पवयीन आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे गावात एका झाडाला प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. सुरज चव्हाण असे या घटनेत मुर्त्यू झालेल्या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. सुरज हा मोहोळ तालुक्यातला रहिवासी आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत हिंगोली शहारातील रामलीला मैदानावर गडकरी यांची भव्य सभा होणार आहे. त्यासाठी स्टेज च्या उभारणीचे काम मागील पाच दिवसापासून सुरू होते वातानुकूलित आशा स्टेज ची निर्मिती करण्यात आली आहे आज नितीन गडकरी यांच्या हस्ते रिसोड सेनगाव हिंगोली आणि कानेरगाव नाका हिंगोली ते वारंगा या महामार्गाचे लोकर पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर दहा कोटी रुपयांच्या विकास कामाचा सुद्धा भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे त्यासाठी भव्यवस्थेची उभारणी करण्यात आली आहे
Pune Kasaba: पुण्यातील कसबा पोट निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. उद्या सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होईल. मतदान उद्या होणार असेल तरी मतदान केंद्रावर आजच मतदान पेट्या पोहोचणार आहेत. एकूण 76 केंद्र असणार आहेत तर 270 बूथ असणार आहेत. तर 9 मतदार केंद्र ही सेन्सिटिव्ह म्हणून जाहीर केली आहेत.. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथून या पेट्या मतदान केंद्रावर या पेट्या नेण्यात येत आहेत.
Buldhana News: बुलढाणा आगाराला एसटी बस संख्या कमी असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शिक्षणाचे नुकसान होत होते. या बाबत विद्यार्थ्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्याकडे तक्रार केली असता आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्याला चाळीस एसटी बस उपलब्ध करून देण्याची मागणी एसटी विभागाचे महाव्यवस्थापक शेखर चने यांच्याकडे केली होती. या प्रयत्नातून पहिल्या टप्प्यात बुलढाण्याला पहिल्या टप्यात 10 एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, ज्यांना आ संजय गायकवाड यांनी सेवेत समाविष्ट केल्या.
Ratnagiri News: कोकणातील प्रमुख सणांपैकी एक असलेला शिमगोत्सव.शिमगोत्सवात प्रत्येक ग्रामदैवतांच्या या सणाची एक प्रत्येक ग्रामस्थांच्या मनात आधाराची भावना आणि पिढ्यानपिढ्या या उत्सवाची परंपरा लाभलेली आहे.अशा या भक्तीपूर्ण उत्सवाला प्रारंभ झाला आहे.गावातील ग्रामदैवताच्या पालख्या सजू लागल्या आहेत.जिल्ह्यात 1 हजार 399 पालख्या धुलीवंदनापर्यंत भक्तांच्या भेटीला येणार आहेत.तर 1 हजार 315 ठिकाणी सार्वजनिक तर 2 हजार 854 खाजगी होळ्या उभारण्याला प्रारंभ झाला आहे.
Marathi Bhasha Din: मराठी भाषा दिनानिमित्त 27 फेब्रुवारीला ठाकरे गटाच्या वतीने 'जागर मराठी भाषेचा' कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
AIMIM : नवी मुंबईत एमआयएमचं पहिल राष्ट्रीय अधिवेशन सुरू होतंय. आजपासून या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. दोन दिवस हे अधिवेशन असणारे. या अधिवेशनाला आमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांच्यासह देशातील अन्य महत्वाचे नेते उपस्थित राहाणार आहेत.
Jagdeep Dhankhar : कृषीक्षेत्र (Agriculture sector) भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे गौरवोद्गार देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी काढले. देश उभारणीत 'अन्नदात्याच्या' योगदानाची दखल धनकड यांनी घेतली. जगदीप धनखड यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय कृषी संशोधन संस्थेचा (Indian Agricultural Research Institute)चा 61 वा दीक्षांत समारंभ झाला. या कार्यक्रमात धनकड बोलत होते. देशाच्या प्रगतीसाठी कृषीशिक्षण, संशोधन, अभिनव प्रयोग केंद्रस्थानी असायला हवेत अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
Pune News: राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी होतील, असं भाकीत विधानसभेतील विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केलंय... पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलंय. राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील का या प्रश्नावर बोलताना त्यांनी हे भाकीत केलंय...
Agriculture News : देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ (chilli Market) म्हणून नंदुरबार बाजार समितीची (Nandurbar Market Committee) ओळख आहे. सध्या या बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मिरचीची खरेदी सुरु आहे. यावर्षी फेब्रुवारी अखेरपर्यंत बाजारात दोन लाख क्विंटल ओल्या लाल मिरचीची (Red chilli) खरेदी करण्यात आली आहे. मार्च महिन्यात 25 हजार क्विंटल मिरचीची आवक होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पार्श्वभूमी
25 February Headlines : Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
पुण्यातील कसबा पेठेतील रविवार पेठ गंज पेठ आणि बहुतांश भागात भाजपकडून पैशाचे वाटप सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकरांनी केलाय. या प्रकारात पोलिस देखील सहभागी असून याचा निषेध करण्यासाठी धंगेकर आज कसबा गणपती समोर उपोषणाला बसणार आहेत. याशिवाय आजपासून शिवसेनेच्या ठाकरे गटाचं शिवगर्जना अभियान सुरू होणार. 25 फेब्रुवारी ते 3 मार्चदरम्यान शिवसेनेचे नेते, उपनेते यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी प्रत्येक मतदार संघात जाऊन जनतेशी संवाद साधणार आहेत.
रविंद्र धंगेकरांच कसबा गणपती समोर उपोषण
भारतीय जनता पक्षाकडून पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप करत असल्याचा रवींद्र धंगेकर यांनी आरोप केलाय. कसबा पेठेतील रविवार पेठ गंज पेठ आणि बहुतांश भागात भाजपकडून पैशाचे वाटप सुरू आहे. या संपूर्ण प्रकारात पोलिसही सहभागी असल्याचा धंगेकरांचा आरोप आहे. याचा निषेध करण्यासाठी धंगेकर आज कसबा गणपती समोर सकाळी 10 वाजल्यापासून उपोषणाला सुरवात करणार आहेत.
नवी मुंबईत एमआयएमचं पहिल राष्ट्रीय अधिवेशन
एमआयएमचं पहिल राष्ट्रीय अधिवेशन दोन दिवस नवी मुंबईत होत आहे. अधिवेशनाला आमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांच्यासह देशातील महत्वाचे नेते हजेरी लावणार आहेत. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत ओवेसी पक्षातील पदाघधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. सकाळी 9.30 वाजता असदुद्दीन ओवेसी यांची रामाडा हॉटेल इथं पत्रकार परिषद होईल. सायंकाळी 7 वाजता मुंब्र्यात भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून ओवेसी लोकांशी संवाद साधणार आहेत. 2
शिवसेनेच्या ठाकरे गटाचं शिवगर्जना अभियान
आजपासून शिवसेनेच्या ठाकरे गटाचं शिवगर्जना अभियान सुरू होणार. 25 फेब्रुवारी ते 3 मार्चदरम्यान शिवसेनेचे नेते, उपनेते यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी प्रत्येक मतदार संघात जाऊन जनतेशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेची झालेली पडझड पहाता ठाकरेंकडून थेट जनतेला साद घालायला सुरूवात केलीय. या अभियानात ठाकरे गटाकडून शिंदे गटाला थेट लक्ष केल जाईल. पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यापासून ठाकरेंकडून थेट ग्रामीण पातळीवर संवाद साधायला सुरूवात केलीय.
काँग्रेस अधिवेशनाचा आज दुसरा दिवस
रायपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेस अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. सकाळी 10 वाजता काँग्रेस अध्यक्षांचं भाषण होणार असून त्यानंतर लगेच सोनिया गांधींचं भाषण होणार आहे.
सुकेश चंद्रशेखरच्या खटल्याची सुनावणी
मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरच्या खटल्याची आज राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणीत सुकेश चंद्रशेखर याने आम आदमी पार्टीला (आप) 60 कोटी रुपये दिल्याचे न्यायालयाला सांगितले होते आणि ही बाब दिल्लीच्या राज्यपालांना लेखी दिली आहे, असं सुकेशने सांगीतलं होत. सुकेशवर दोनशे कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -