Maharashtra News Updates 24th February 2023 : कोकणात आजपासूनच होळीची लगबग सुरु, काही गावांमध्ये देव आणि पालखी सजवायला सुरुवात

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Feb 2023 07:09 PM
अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष रमेश कदम यांना न्यायालयीन कोठडी

मोहोळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष रमेश कदम यांना न्यायालयीन कोठडी


अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्ज योजनेतून आजीच्या नावे पदाचा गैरवापर करून कर्ज घेऊन अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 


सोलापूर सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये रमेश कदम यांच्यावर गुन्हा दाखल आहे.


या अपहाराच्या प्रकरणात पोलिसांनी रमेश कदम यांना अटक केली होती.


त्यानंतर सोलापूर कोर्टाने त्यांना तीन दिवस पोलीस कस्टडी दिली होती.


मात्र आज झालेल्या युक्तिवादात त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.


आरोपी माजी आमदार रमेश कदम यांच्या वकिलाने केलेल्या युक्तीवादामुळे पोलिसांनी मागितलेली दोन दिवसांची पोलीस कस्टडी नाकारण्यात आली आहे 


माजी आमदार रमेश कदम यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून महामंडळाच्या निधीचा अपहार करण्याच्या गैरहेतूने आपली आजी बायमा गणपत यांच्या नावाने दुग्ध व्यवसायाचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे

चिंचवडमध्ये 14 लाखांची रोकड जप्त

कसबा आणि चिंचवड येथील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. त्याचवेळी पोलिसांनी चिंचवडमध्ये 14 लाख रुपयांच्या रोकडसह एका कारला ताब्यात घेतले आहे. पैशांबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Sudhir Mungantiwar : राज्यातील 75 हजार विद्यार्थ्यांना मोफत व्याघ्र सफारी; आगामी बजेटमध्ये होणार घोषणा

Sudhir Mungantiwar : राज्यातील किमान 75 हजार विद्यार्थ्यांना मोफत व्याघ्र सफारी घडविण्याची राज्य सरकारची योजना असून लवकरच याची आगामी बजेटमध्ये घोषणा केली जाणार आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. जंगलव्याप्त क्षेत्रातील नागरिकांनी जंगलांचे संरक्षण केले असून त्यांचा जंगलावर हक्क आहे आणि त्यामुळेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त विद्यार्थ्यांना ही जंगल सफारी घडवली जाणार आहे. राज्यातील ताडोबा, नवेगाव-नागझिरा, उमरेड-कऱ्हाडला आणि मेळघाट या व्याघ्र प्रकल्पात विद्यार्थी सफारी करणार आहेत. जंगलाप्रति शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये यामुळे जनजागृती निर्माण होईल असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न उपोषण
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद कार्यालय शासन नियम व निर्णयानुसार अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग परिमंडळ  कार्यवाही करीत नसल्याने सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कर्मचाऱ्यांनी आज ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर एक दिवशी अर्धनग्न मुक उपोषण केले या या आंदोलनात ६०ते ८५ वयोगटातील पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने सहभाग घेत अर्धनग्न होऊन हाताची घडी व तोंडावर बोट ठेवून मुक उपोषण केले या वेळी  महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम १५ नुसार सर्व तेरा संवर्ग कर्मचान्यांचे पदनामांतर करुन अभियांत्रिका सहाय्यक पदावर समाविष्ट करणे व वेतन निश्चित करणे,अश्वासित वरिष्ठ वेतन श्रेणीचा दुसरा लाभ अनुज्ञेय करावे अशा विविध मागण्या घेऊन हे उपोषण करण्यात आले.

 
वाशिम मध्ये पार पडला 501 जोडप्याचा सामूहिक विवाह सोहळा

एकीकडे नवरदेवाला नवरी मिळत नाही म्हणून नवरदेव आंदोलन करतांना दिसतात मात्र वाशिम मध्ये सर्वधर्मीय 501 जोडप्याचा सामूहिक विवाह सोहळा पार पडलाय. यात मूकबधिर, अंध, अपंग जोडप्याचाही समावेश होता.  या सामूहिक विवाह सोहळ्यात बऱ्याच जोडप्यांची आधीच लग्न उतकलेलं असतांना सुद्धा  केवळ शासकीय  अनुदानासाठी  याठिकाणी पुन्हा लग्न  केल्याची जोरदार चर्चा होत्या.  


 

 
पाथर्डी बंदला उस्फुर्त प्रतिसाद

पाथर्डी शहरातील सराफ व्यावसायिक बंडूशेठ चिंतामणी यांच्यावर चोरट्याने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज पाथर्डी शहरात सर्वपक्षीय नेत्यांनी बंदची हाक दिली होती...या बंदला व्यासायिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला...यावेळी शहरातून मुकमोर्चा देखील काढण्यात आला होता...शहरातील सराफ व्यापारी बंडूशेठ चिंतामणी हे नेहमी प्रमाणे दुकान बंद करून घराकडे निघाले असता त्यांना रस्त्यातच अडवत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने खुनी हल्ला केला त्यांच्या ताब्यातील  सोन्याचा दागिण्यांची पिशवी घेऊन चोरट्यांनी पोबारा केला...या घटनेत चिंतामणी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना आधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून  त्यांना अहमदनगरला तात्काळ हलविण्यात आले आहे... या घटनेतील आरोपीचा शोध लावावा आणि तालुक्यातील वाढती गुन्हेगारी रोखावी या मागणीसाठी पाथर्डी शहर बंद करून पाथर्डी पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढण्यात आला.

75 हजार विद्यार्थ्यांना मोफत व्याघ्र सफारी घडविण्याची योजना

राज्यातील किमान 75 हजार विद्यार्थ्यांना मोफत व्याघ्र सफारी घडविण्याची राज्य सरकारची योजना असून लवकरच याची आगामी बजेटमध्ये घोषणा केली जाणार आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या बाबत माहिती दिली आहे. जंगलव्याप्त क्षेत्रातील नागरिकांनी जंगलांचे संरक्षण केले असून त्यांचा जंगलावर हक्क आहे आणि त्यामुळेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त विद्यार्थ्यांना ही जंगल सफारी घडवली जाणार आहे. राज्यातील ताडोबा, नवेगाव-नागझिरा, उमरेड-कऱ्हाडला आणि मेळघाट या व्याघ्र प्रकल्पात विद्यार्थी सफारी करणार आहेत. जंगलाप्रति शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये यामुळे जनजागृती निर्माण होईल असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविॅद केजरीवाल मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेणार 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविॅद केजरीवाल मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेणार 


संध्याकाळी ७ः३० च्या सुमारास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार 


मुख्यमंत्री अरविॅद केजरीवालांसोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील मातोश्रीवर जाणार

Ahmednagar News : चोरट्याचा व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला; हल्ल्याच्या निषेधार्थ पाथर्डीत बंदची हाक

Ahmednagar News : पाथर्डी शहरातील सराफ व्यावसायिक बंडूशेठ चिंतामणी यांच्यावर चोरट्याने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज पाथर्डी शहरात सर्वपक्षीय नेत्यांनी बंदची हाक दिली होती. या बंदला व्यासायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी शहरातून मूकमोर्चा देखील काढण्यात आला होता. शहरातील सराफ व्यापारी बंडूशेठ चिंतामणी हे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घराकडे निघाले असता त्यांना रस्त्यातच अडवत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने खूनी हल्ला केला. त्यांच्या ताब्यातील सोन्याच्या दागिन्यांची पिशवी घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. या घटनेत चिंतामणी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना आधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना अहमदनगरला तात्काळ हलविण्यात आले आहे. या घटनेतील आरोपीचा शोध लावावा आणि तालुक्यातील वाढती गुन्हेगारी रोखावी या मागणीसाठी पाथर्डी शहर बंद करून पाथर्डी पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढण्यात आला.

पवई जेव्हीएलआर द्रुतगती मार्गावर पवई सुवर्ण मंदिर जवळ रस्ता खचला, वाहनचालकांची तारांबळ

पवई जेव्हीएलआर द्रुतगती मार्गावर पवई सुवर्ण मंदिर जवळ अचानक रस्ता खचल्याने वाहनचालकांची एकच तारांबळ उडाली. यामुळे विक्रोळी वरुण अंधेरीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही दिवसांपूर्वी येथे पालिकेने काम केले होते. मात्र हा रस्ता निकृष्ट दर्जाच बनवल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. अचानक रस्ता खचल्याने जेवीएलआरवर वाहतूक कोंडी झाली असून पालिका अधिकारी, वाहतूक पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले आहे. रस्ता  दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

कोकणात आजपासूनच होळीची लगबग सुरु, काही गावांमध्ये देव आणि पालखी सजवायला सुरुवात

Ratnagiri Holi : तारखेनुसार मार्च महिन्याच्या सहा तारखेपासून शिमगोत्सवाची सुरुवात होणार असली कोकणात मात्र आजपासूनच होळीची लगबग पाहायला मिळत आहे. फागपंचमीच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील काही गावांमध्ये देव आणि पालखी सजवायला सुरुवात झाली आहे. तर काही गावांमध्ये आता शिवरीचं झाड तोडून त्याची होळी केली जात आहे. त्यामुळे गावांमध्ये आता हळूहळू शिमग्याची लगबग वाढली आहे. होळी रे होळी आशा घोषणांनी सध्या आसमंत दुमदुमून जात आहे. त्यामुळे आजपासून सुरु झालेला हा उत्सव पुढील महिना ते दीड महिना सुरु राहणार आहे. हळूहळू आता चाकरमानी देखील कोकणात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येकाच्या घरी पालखी जाणार असल्यामुळे कोकणी माणसाचा आनंद द्विगुणित झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना हायकोर्टाकडून सकारात्मक प्रतिसाद, मलिक गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचं मान्य

Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना हायकोर्टाकडून सकारात्मक प्रतिसाद


नवाब मलिक गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचं हायकोर्टाकडून मान्य


मलिकांच्या जामीनावर पुढील आठवड्यात तातडीची सुनावणी घेण्याचं हायकोर्टाने मान्य केलं

बीडमध्ये बँक व्यवस्थापकाचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरुन लिपिकाने लांबवले 75 लाख 26 हजार रुपये
Beed News : बँक व्यवस्थापकाचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरुन बँकेत काम करणाऱ्या लिपिकाने तब्बल 75 लाख 26 हजार रुपये स्वतःच्या खात्यात वळवण्याचा प्रकार आष्टीमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी लिपिक असलेल्या भारत अनारसे याच्याविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टी येथील महेश मल्टीस्टेट या बँकेचे शाखा व्यवस्थापक असलेले नवनाथ पांडुरंग अनारसे यांच्या मोबाईलवरील बँकेची एसएमएस सेवा बंद करण्यात आला. त्यांच्या युजर आयडी आणि पासवर्ड वापरुन अकाऊंटमधून 75 लाख 26 हजार रुपयाची रक्कम आपल्या खात्यात वळवली होती. या प्रकरणी आता भरत अनारसेविरोधात आष्टी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.
केडगाव बायपास इथे गोळ्या झाडून एकाची हत्या
Ahmednagar News : अहमदनगरच्या केडगाव बायपास येथील बंद पडलेल्या समाधान हॉटेलजवळ एका 40 वर्षीय व्यक्तीची डोक्यात गोळी घालून हत्या झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली आहे. शिवनाथ होले असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अरुण शिंदे आणि शिवनाथ होले हे मध्यरात्री दारु पित असताना केडगाव बायपास रोडकडून तीन अनोळखी इसम त्यांच्या जवळ आले. त्यातील एकाकडे हातात चाकू आणि दुसऱ्याकडे इसमाच्या हातात पिस्तूल होती. त्यातील एकाने अरुण शिंदे यांच्या गळ्याला चाकू लावून तुमचे खिशातील पैसे काढा असे म्हणाला...त्यावेळी शिवनाथ होले यांनी विरोध केल्याने त्या तिघांपैकी एकाने त्यांच्या हातात असलेले पिस्तूलने शिवनाथ होले याच्या दिशेने गोळी झाडली. यात शिवनाथ होले यांचा मृत्यू झाला. इतरांनी अरुण शिंदे यांना खाली पाडून मानेला चाकू लावून बळजबरीने तीन हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल काढून डोळयात मिर्ची पावडर फेकून ते अनोळखी तीन इसम केडगाव बायपास रस्त्याचे दिशेने पळून गेले, असं फिर्यादीत म्हटलं आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे.
पुणे-बंगळुरु महामार्गावर धारवाडजवळ कारची ट्रकला धडक, अपघातात पाच जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी
Belgaon News : पुणे-बंगळुरु महामार्गावर धारवाडजवळ कार आणि ट्रक अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाले तर चौघे जण गंभीर जखमी झाले. गुरुवारी (23 फेब्रुवारी) रात्री हा अपघात घडला. रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला वाचवायला जाऊन कारने ट्रकला धडक दिली. या अपघातात कारमधून प्रवास करणारे चार जण तर रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. अपघातातील जखमींना हुबळी इथल्या किमस हॉस्पिटलमधे दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. अपघातातील मृत व्यक्ती बेळगाव जिल्ह्यातील कित्तुर तालुक्यातील अवरादी गावचे आहेत. अपघातात गंभीर जखमी झालेला मंजुनाथ मुद्दोजी याची अग्निवीरमध्ये निवड झाली होती. त्याला सोडण्यासाठी कुटुंबीय कित्तूरहून हुबळीला निघाले होते. त्यावेळी हा अपघात घडला. अपघाताचे वृत्त कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कारमधील जखमींना बाहेर काढून उपचारासाठी हुबळी इथे पाठवले.
बुलेट ट्रेन जमीन अधिग्रहणाबाबत गोदरेजला दिलासा नाहीच, हायकोर्टाच्या निकालात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

बुलेट ट्रेन जमीन अधिग्रहणाबाबत गोदरेजला दिलासा नाहीच


हायकोर्टाच्या निकालात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार


मात्र सदर जागेसाठी अतिरिक्त किंमत मागण्यासाठी राज्य सरकारकडे अर्ज करण्याची गोदरेजला मुभा


त्या अर्जावर राज्य सरकारनं सहा आठवड्यांत निर्णय देण्याचे निर्देश

माढ्यातील मोडलिम्ब इथे लग्नासाठी आलेली खाजगी बस पेटली, सुदैवाने दुर्घटना टळली

Solapur News : माढा तालुक्यातील मोडलिम्ब येथे विवाहासाठी आलेल्या खाजगी बसने अचानक पेट घेतल्याने विवाह मंडपात अग्नितांडव सुरु झाले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी झाली नसली तरी बस जळून गेली आहे. काल (23 फेब्रुवारी) रात्री पुणे इथून नवरदेवाचं वऱ्हाड या खाजगी बसमधून आले होते. वऱ्हाडी कार्यालयात उतरले आणि थोड्याच वेळात बसने अचानक पेट घेतला. तातडीने गाडीत बसलेल्या चालकाला खाली उतरवून नागरिक आणि वऱ्हाडी मंडळींनी बस विझवण्याचा प्रयत्न सुरु केला. दरम्यान शेजारी असणारी सर्व वाहनेही तातडीने हलवल्याने मोठी दुर्घटना टळली. रात्री उशिरा बस विझवण्यात यश आले असले तरी तोपर्यंत ही बस जळून खाक झाली होती.

प्रकल्पांना जारी करत असलेले प्रारंभ प्रमाणपत्रे व भोगवटा प्रमाणपत्रे ही संकेतस्थळावर जाहीर करा, नगर विकास विभागाचे राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना आदेश

सर्वसामान्य लोकांची विकासकाकडून होणारी फसवणूक रोखण्यासाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय


प्रकल्पांना जारी करत असलेले प्रारंभ प्रमाणपत्रे व भोगवटा प्रमाणपत्रे ही संकेतस्थळावर जाहीर करावी लागणार


राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना नगर विकास विभागाचे आदेश


प्राधिकरणांना संकेतस्थळावरील माहिती ही सतत अद्ययावत करण्याचेही निर्देश


महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींना 31 मार्च 2023 पर्यंतची मुदत


अनधिकृत बांधकामांचा बसणार चाप


 


 

राहातामध्ये आयोजित गौतमी पाटीलच्या आणखी एका कार्यक्रमात तुफान राडा, पोलिसांचा हुल्लडबाजांवर लाठीचार्ज

Gautami Patil Show Ruckus : गौतमी पाटीलच्या आणखी एका कार्यक्रमात तुफान राडा झाला. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे आयोजित कार्यक्रमात हा राडा झाला असून हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज करावा लागल. त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांची मात्र एकच पळापळ झाली आणि आयोजकांना कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. तर मोठ्या बंदोबस्तात गौतमीला कार्यक्रम स्थळावरून बाहेर काढावे लागले

पाथर्डीत सोन्याचांदीच्या व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला, व्यापारी आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून आज पाथर्डी बंदचं आवाहन

Ahmednagar News : पाथर्डीतील सोनेचांदीचे व्यापारी बंडूशेठ चिंतामणी यांच्यावर खुनी हल्ला झाल्याची घटना गुरुवारी (23 फेब्रुवारी) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. यामुळे व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज व्यापारी आणि सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी पाथर्डी बंदचे आवाहन केले आहे. शहरातील नवी पेठेतील सोनेचांदीचे व्यापारी बंडूशेठ चिंतामणी हे नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास दुकान बंद करुन आपल्या घरी जात होते. त्यांना रस्त्यातच अडवत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने त्यांच्यावर खुनी हल्ला करुन त्यांच जवळ असलेली सोन्याचा दागिन्यांची पिशवी पळवली. या घटनेत चिंतामणी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना नागरिकांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन अहमदनगरला तात्काळ हलवण्यात आले आहे.. दरम्यान या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून व्यापार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. प्रताप ढाकणे यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. झालेल्या घटनेबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. दरम्यान पाथर्डी तालुक्यात गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे म्हणत याच्या निषेधार्थ पाथर्डी बंदची हाक देण्यात आली आहे.

औरंगाबादेत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी निविदा देणाऱ्या तीन कंपनी आणि त्यांच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Aurangabad News : प्रधानमंत्री आवास योजनेसाठी निविदा देणाऱ्या तीन कंपनी आणि त्यांच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ई-निविदा प्रकरणात अटीचा भंग केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे. त्यांच्यावर गैरमार्गाचा वापर करुन महापालिकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. रमरथ कन्ट्रक्शन, ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस आणि जग्वार ग्लोबल सर्विसेस यांचे मालक आणि जॉईंट व्हेंचरविरोधात फसवणुकीसह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिका उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या तक्रारीवरून शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल रात्री उशिरा गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सगळ्या निविदा सिंगल आयपीवरुन भरल्या असल्याचं उघडकीस आलं. एकाच लॅपटॉपवरुन ही निविदा चारही कंपन्यांनी अपलोड केल्याचे समोर आलं.

अहमदनगरमधील अमरापूर इथे आज शेतकरी विकास मंडळाच्या वतीने रास्ता रोको

Ahmednagar News : अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील अमरापूर इथे शेतकरी विकास मंडळाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे. पांढरे सोने अर्थात शेतकऱ्याच्या कापसाला योग्य भाव मिळावा, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अनुदान मिळावे, पीक विम्याचे अनुदान मिळावे  या आणि इतर मागण्या घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह याची अमित शाहांना थेट धमकी


पंजाबमधील 'वारीस पंजाब दे' (Waris Punjab Ke) संघटनेचा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंहने (Amritpal Singh) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना थेट धमकी दिली आहे. खलिस्तानी चळवळीच्या (Khalistan Movement) विरोधात जाल तर इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांना चुकवावी लागलेली किंमत तुम्हालाही चुकवावी लागेल अशी उघड धमकी त्याने दिली आहे. अमित शाह यांनी हिंदू राष्ट्राची मागणी करणाऱ्यांचं समर्थन केलं तर ते गृहमंत्रीपदावर कसे राहतील हेदेखील पाहून घेऊ असंही तो म्हणाला.


उद्धव ठाकरेंनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायला हवं होतं, पण... : राहुल नार्वेकर


उद्धव ठाकरेंनी राजीनामा न देता विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायला हवं होतं, पण त्यांनी तसा निर्णय का घेतला हे माहिती नाही असं राहुल नार्वेकर म्हणाले. विश्वासदर्शन ठरावाला सामोरं जाणं हे अपेक्षित होतं असंही ते म्हणाले. ते एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते. राज्यातील सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकरांनी अनेक प्रश्नावर संवाद साधला. 


IND W vs AUS W : भारताचं फायनलचं स्वप्न भंगलं, ऑस्ट्रेलियाचा पाच धावांनी विजय


अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पाच धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने टी 20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. तर पुन्हा एकदा उपांत्य फेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ निर्धारित 20 षटकात आठ बाद 167 पर्यंत पोहचू शकला. भारतीय फलंदाजांनी ठरावीक अंतराने आपल्या विकेट फेकल्या. तसेच ऑस्ट्रेलियाच्या फिल्डर्सनी जबरदस्त फिल्डिंग केली. हरमनप्रीत कौर आणि जेमिमा यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. क्षेत्ररक्षण हा दोन्ही संघातील मोठा फरक दिसून आला. भारताने खराब फिल्डिंग केली.. झेल सोडले, धावा वाचवण्यात अपयश आले. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने जबरदस्त फिल्डिंग केली.


स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून पोलिसाने संपवलं जीवन, भायखळा कारागृहाबाहेरची घटना 


मुंबईच्या भायखळा (Byculla) कारागृहाबाहेर तैनात असलेल्या एका पोलिसाने स्वतः च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या (Police committed Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (23 फेब्रुवारी) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. श्याम वरगडे असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. ते ताडदेव लोकल आर्म युनिट 2 मध्ये कार्यरत होते.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.