Maharashtra News Live Updates : Kirit Somaiya : किरीट सोमय्याला ईडीकडून कमिशन मिळत; चंद्रकांत खैरे यांचा आरोप
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे ईडीचे दलाल असून इन्कम टॅक्स विभागाला ज्याप्रमाणे खबऱ्यांना काहीतरी द्यावं लागतं तसेच सोमय्याचं काम आहे अशी टीका ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली.
छत्रपती संभाजीनगर येथे अहमदनगर रोडवरील कायगाव टोका प्रवरासंगम गोदावरी नदीत चार जण बुडाले आहेत. वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील चार तरुण मढीच्या यात्रेसाठी निघाले होते. गोदावरी नदीत अंघोळीसाठी उतरले, सुरुवातीला दोन जण बुडाले, त्यांना वाचवण्यासाठी दोघे गेले होते. तेही बुडाले आहेत. बुडालेल्या चारही तरुणांचा शोध सुरू आहे.
खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात 14 मार्चला संभाजी ब्रिगेडच्या वतीने तुळजापूरला विद्रोह मोर्चा आयोजीत करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतरण करून त्यावर शिक्कामोर्तब केला. असे असताना छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या शहरांच्या नावाला विरोध करणाऱ्या, औरंगजेबाचे फोटो कार्यक्रमात लावून त्याचे उदातीकरण करणाऱ्या इम्तियाज जलील यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने विद्रोह मोर्चा तुळजापूर येथे आयोजित केलेला आहे. या मोर्चात छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती असलेला रथ मोर्चाबरोबर मार्गक्रमण करणार आहे.
Jalgaon News : जिल्हा मध्यवर्ती आणि सहकारी बँकेत पुढील एक वर्षासाठी आज राष्ट्रवादीकडून रवींद्र भैया पाटील यांचे नाव अध्यक्ष पदासाठी निश्चित झाले असून पुढील वर्षांसाठी ते जिल्हा बँक अध्यक्ष राहणार आहेत. तर दुसरीकडे उपाध्यक्षपदासाठी शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील याचे चिरंजीव अमोल चिमणराव पाटील यांचे निश्चित झाले असून जिल्हा बँकेत उपाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली आहे. आता काही वेळातच अधीकृतपणे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडणार असून औपचारिक घोषणा बाकी आहे.
Beed Accident : बीड सांगवी घाटामध्ये कारचा अपघात होऊन यामध्ये अंबाजोगाई येथील चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. काही दिवसापूर्वीची याच घाटामध्ये एका शिक्षकाची गाडी दरीत पडून त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अंबाजोगाई येथील चार तरुण बीडकडे येत असताना गाडी घाटातल्या दरीमध्ये कोसळून हा अपघात झाला. या अपघातामध्ये चारही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. गेला काही दिवसापासून बीड सांगवी घाटामध्ये अपघाताचे प्रमाण वाढला असून या ठिकाणी रस्त्याच्या कडेला कठडे उभारावेत अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामती शहरात त्यांनी विविध विकास कामांची पाहणी केली. अजित पवारांनी विद्या प्रतिष्ठान येथे बैठक घेतल्या. यावेळी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीची चौकशी सुरू करण्यात आली याबाबत विचारले असता त्यांनी यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीय.
Nafed onion Reality Check : कृषी उत्पन्न बाजार समितीतून नाफेडने कांद्याची खरेदी करावी, सरकारच्या या घोषणेला दहा दिवस उलटून गेलेत तरीही अद्याप नाफेडचे अधिकारी बाजार समितीत पोहचले नाहीत. सुनील निरगुडे हे आजही नाशिक बाजार समितीत कांदा घेऊन आले होते, मात्र व्यापाऱ्यांकडूनच त्यांच्या मालाची खरेदी झाली, नाफेड कुठेच दिसत नाही असा दावा त्यांनी केलाय,
Sangli River Issue : सांगलीजवळील अंकली पुलाच्या खाली काल मोठ्या संख्येने मासे मृत झाले होते. आज दुसऱ्या दिवशीही अंकली पुलाच्या खाली नदी पात्रात मोठ्या संख्येने मासे मृत पडल्याचे दिसून येतेय. दोन दिवसांमध्ये लाखो मासे नदीत रसायन मिश्रित पाणी मिसळल्याने कृष्णा नदीमध्ये मरून पडलेत. माशांच्या या मृत्यूमुळं नदीकाठी प्रचंड दुर्गंधी देखील पसरली आहे. दरम्यान महापालिका आयुक्तांच्या घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मृत मासे फेकत निषेध केला तर प्रदूषण नियंत्रण मंडळाने दत्त इंडिया कारखाना आणि सांगली महापालिकेला नोटीस बजावत जुजबी कारवाईला सुरुवात केलीय मात्र कृष्णेच्या प्रदूषणवर कायमचा तोडगा कधी याचे उत्तर कुणाकडेच नाही.
Hingoli News : वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये एक लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले होते. या काळात ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस दिला त्या शेतकऱ्यांचा उसाचा मोबदला आणि वाहतूक त्याचबरोबर तोडणीचा खर्च असे एकूण 23 कोटी रुपये कारखान्याकडे थकीत आहेत. हे पैसे देण्याची क्षमता नसल्यास पत्र कारखान्याचे अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी साखर आयुक्तांना दिले होते. याची गंभीरपणे दखल घेत साखर आयुक्त आणि हा कारखाना जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे शेतकरी चांगलेच हैराण झाले आहेत कारण, या उसाच्या पैशावर अनेक शेतकऱ्यांनी वर्षभराचे नियोजन केलं असतं परंतु आता हे पैसेच मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आढळून आले आहेत, या साखर कारखान्याच्या जप्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठित केली असून त्या समितीच्या माध्यमातून साखर कारखान्याच्या संपत्तीची चौकशी केली जात आहे.
Nagpur News : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण नागपूर विद्यापीठात एमकेसीएल या वादग्रस्त कंपनीची ऑनलाईन परीक्षा घेणे आणि निकाल लावण्याबद्दल केलेली नियुक्ती चौकशी समितीच्या अहवालात नियमबाह्य ठरल्याची माहिती आहे. त्यामुळे एमकेसीएल चा अट्टाहास धरणाऱ्या कुलगुरू सुभाष चौधरी यांच्या संदर्भात नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी भाजप आमदार प्रवीण दटके यांनी केली आहे.
Use Mask in Crowded Place : गर्दीच्या ठिकाणी मास्क (Mask) वापरण्याचं आवाहन निती आयोगानं केलं आहे. भारतात नव्या H3N2 इन्फ्लूएंझा (H3N2 Influenza) विषाणूच्या संसर्गाने चिंता वाढवली आहे. देशात या संसर्गामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. H3N2 इन्फ्लूएंझामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे. H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूचा (H3N2 Virus) संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सध्या देशात सर्दी, ताप आणि खोकला या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हा नवा व्हायरस असून ICMR नं हा विषाणू H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरस असल्याची माहिती दिली आहे. सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब ही H3N2 इन्फ्लूएंझा संसर्गाची लक्षणे आहेत.
अहमदनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रम स्थळी आगमन...
पारनेर तालुक्यातील 'कन्हैया ऍग्रो'च्या विस्तारित प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाला फडणवीस यांची उपस्थिती...
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पोपटराव पवार यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती...
सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याचा दावा करत पुणे म्हाडाकडून दर काही महिन्यांनी हजारो फ्लॅटची सोडत काढली जाते. परंतु म्हाडाच्या लॉटरीत जेवढ्या घरांचा दावा केला जातो त्यापैकी किती घरं प्रत्यक्षात ग्राहकांना मिळतात याचा शोध घेतला असता अतिशय भयानक परिस्थिती समोर आली. केवळ खाजगी बिल्डरांची घरं म्हाडाच्या सोडतीच्या माध्यमातून ग्राहकांच्या माथी मारणं आणि त्या बिल्डरांनी घर वेळेत न दिल्यास जबाबदारी झटकण्याचा प्रकार पुणे म्हाडाकडून सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.
Mumbai Crime News: मुंबईत (Mumbai News) एक धक्कादायक घटना घडली. एका प्रेमी युगुलानं टेकडीवरुन उडी मारुन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना मुंबईत घडली. मुंबईच्या कांदिवली (Kandivali News) भागात ही घटना घडली असून दोघांचाही यात मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ माजली असून पोलिसांकडून (Mumbai Team) तपास सुरू आहे.
हिंगोली : टोकाई सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्याचे थकीत पैसे 23 कोटी रुपये देणे शक्य नसल्याचे पत्र साखर आयुक्तांना लिहिलं. यावरून राष्ट्रवादीचे वसमतचे आमदार राजेश नवघरे यांनी विधानसभेमध्ये सवाल उपस्थित केला आहे. घाम गाळून शेतात पिकवलेला ऊस कारखान्याला देणे हे शेतकऱ्याचे पाप आहे का? शेतकऱ्यांना उसाचे पैसे नाही दिले तर ते शेतकरी आत्महत्या करतील त्यामुळे त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम सहकार मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी करावं अशी विनंती आमदार नवघरे यांनी विधानसभेत केली आहे
मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 92 पर्यंत वाढली आहे. मुंबईत शुक्रवारी 21 नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यामधील 20 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं नव्हती. नव्याने सापडलेल्या रुग्णांपैकी पाच रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. गुरुवारी मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 82 होती, एका दिवसात 10 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे.
Mumbai News : एका प्रेमी युगुलाने टेकडीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मुंबईच्या कांदिवली समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. हाऊस कीपिंगचे काम करणारा 21 वर्षीय प्रियकर आणि 15 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी हे कांदिवली पूर्वेत जानुपाडा परिसरात शेजारीच राहत होते. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र यांच्या प्रेमाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने दोघांनीही उंच टेकडीवरून उडी मारून आत्महत्या केली. दोघांचाही यात मृत्यू झाला आहे. मयत तरुण तरुणी दोघेही एकाच समाजातील असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. मात्र तरीही दोघांच्याही घरच्यांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता. याच कारणातून दोघांनी उंच टेकडी वरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच समता नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. समता नगर पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत.
Fire News : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील जुन्या स्टोअर रुमला आग लागल्याची घटना घडली. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली घटना.
अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश आलं. स्टोअर रूममध्ये जुने साहित्य आणि मुदत संपलेली औषधे जळाल्याची प्राथमिक माहिती.
नवापूर तालुक्यात बीजगाव येथे वन विभागाने कारवाई करत 48 सागवानी लाकडांचा तीन लाख रुपये किंमतीचा सागवान मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चिंचपाडा वनक्षेत्र कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून शेतात जाऊन तपासणी केली असता झोपडीत गोल व चिरकाम केलेले साग नग लाकूड मिळून आले एकूण 3.070 घनमीटर असून, साग नग आणि तयार सागवानी माल एकूण 48 नग मिळून आले. अंदाजे माल किंमत 3 लाख रुपये आहे. सदर सागवानी लाकूड जप्त करून खाजगी वाहनाने विक्री आगार नवापूर येथे पावतीने जमा केला. चिंचपाडा वनक्षेत्रातील वन विभागाच्या पथकाने ही दुसरी कारवाई करण्यात आली आहे. या अगोदरही बोरपाडा गावातील 90 हजाराचे अवैधरीत्या साग झाडांचे लाकूड जप्त केले आहे. सध्या नवापूर तालुक्यात वन विभागाने छापा टाकून केलेल्या कारवाईमुळे अवैधरित्या लाकूड व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून सलग होत असलेल्या अशा कारवाईमुळे चोरट्या लाकूड तोडीला आळा घालण्यासाठी वन विभागाची करडी नजर ठेवून ॲक्शन मोडमध्ये आले असल्याचे दिसून येत आहे.
महसूलचे अधिकारी सोमवारी जाणारा सामूहिक रजेवर
नायब तहसीलदारांच्या ‘ग्रेड- पे’ वाढीसाठी सामूहिक रजा आंदोलन
3 एप्रिल पासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार
महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचा इशारा
प्रत्येक विभागीय आयुक्त कार्यालय समोर करणार धरणे आंदोलन
राज्यातील आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी म्हणून केवळ विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारीच राहणार हजर?
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील भर जहागीर येथील गोविंदराव सानप, न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई ,खंडपीठ नागपूर यांनी आज दिनांक 9 मार्च 2023 रोजी स्थायी न्यायमूर्ती पदाची शपथ,शपथविधी कार्यक्रमांमध्ये सन्मानपूर्वक घेतली.
सानप साहेब हे मूळचे भर जहागीर तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथील सर्वसाधारण कुटुंबामध्ये जन्मलेली व्यक्ती असून,त्यांचे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षणात सुरुवात करून अकोला येथे विधी पदवी प्राप्त केली व त्यांनी मालेगाव जी.वाशिम येथे न्यायालयामध्ये वकिली व्यवसायास सुरुवात केली. मालेगाव येथे वकील म्हणून कार्यरत असताना मेट्रोपॉलिटन न्यायाधीश म्हणून त्यांची 1996 मध्ये नियुक्ती झाली आणि त्यानंतर त्यांनी टाडा न्यायालयाचे न्यायाधीश,प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश म्हणून सेवा दिली .उच्च न्यायालयाचे रजिस्टर म्हणून ते राहिले आणि गतवर्षी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नियमीत न्यायमूर्ती म्हणून मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे काल झालेल्या समारंभामध्ये न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
चंद्रपुरात यंदा पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या फिल्म फेस्टिवलचे आज उद्घाटन होणार आहे. याबरोबरच महाराष्ट्र राज्य असोसिएशन आणि जळगाव जिल्हा कबड्डी असोशिएशनतर्फे 21 व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते केला जाणार आहे.
स्व.किशनलालजी प्रेमचंदजी काठोटीवाले ( बडे पहेलवान) यांच्या स्मृतिद्वाराचे लोकार्पण
जालना येथे स्व.किशनलालजी प्रेमचंदजी काठोटीवाले ( बडे पहेलवान) यांच्या स्मृतिद्वाराचे लोकार्पण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानव यांच्या हस्ते होणार आहे.
नाशिकमध्ये आज रहाडीचे पूजन
नाशिकची पेशवेकालीन रहाडी मधील रंगपंचमी रविवारी साजरी होणार आहे... आज रहाडीचे पूजन, साफसफाई रंगपंचमीची तयारी केली जाणार आहे.
जळगाव जिल्हा कबड्डी असोशिएशनतर्फे 21 व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ
महाराष्ट्र राज्य असोसिएशन आणि जळगाव जिल्हा कबड्डी असोशिएशनतर्फे 21 व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते केला जाणार आहे... सायंकाळी 5 वाजता जळगाव शहरातील सागर पार्क येथे हा शुभारंभ होईल
राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर
राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते पूर्वपट्ट्यातील पाणीटंचाई संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत.
नागपूरमध्ये करुणा त्रिपदीचे सामूहिक गायन
शालेय विद्यार्थी करणार करुणा त्रिपदीचे सामूहिक गायन.. श्री गुरु मंदिर परिवारातर्फे सकाळी 8 वाजता करुणा त्रिपदीचे सामूहिक गायन रेशीम बाग परिसरातील भट सभागृहात आयोजित करण्यात आले आहे... या उपक्रमात नागपुरातील विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत
चंद्रपुरात 35 वे 2 दिवसीय महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन
आजपासून चंद्रपुरात 35 वे 2 दिवसीय महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन होणार आहे… राज्यभरातून येणार पक्षिमित्रांची मांदियाळी... वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कार्यक्रमाला उपस्थिती... जिल्ह्यातील ‘माळढोक’ व ‘सारस’ पक्षी संरक्षण व संवर्धनावर होणार चर्चा, भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अमरावतीत दोन दिवसीय फगवा महोत्सवाच आयोजन
मेळघाटात पर्यटन संचालनालयातर्फे दोन दिवसीय फगवा महोत्सवाच आयोजन मेळघाटातील धारणी तालुक्यातील मौजे कोठा येथील ग्रामज्ञानपीठ बांबू केंद्र येथे करण्यात आले आहे. दुपारी 2 वाजता खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते महोत्सवाचा शुभारंभ होईल... मेळघाटातील आदिवासी संस्कृतीचे सौंदर्य जगासमोर आनणे हा या मागचा उद्देश आहे. आदिवासी बांधवांच्या नृत्य स्पर्धा, कोरकू संस्कृती दर्शन, नैसर्गिक रंग तयार करण्याची प्रात्यक्षिके, जंगल भ्रमण, जंगल सफारी असे अनेक ठळक उपक्रमांच आयोजिन करण्यात आले आहे.
पंतप्रधान “पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान- पीएम विकास” या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये मार्गदर्शन करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 मार्च 2023 रोजी, “पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान” पीएम विकास या योजनेबद्दल होणाऱ्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये सकाळी 10 वाजता मार्गदर्शन करणार आहेत. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी संबंधित लोकांकडून सूचना, सल्ले आणि कल्पना जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने आयोजित केलेल्या 12 वेबिनार मालिकेपैकी हे एक वेबिनार असेल.“पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान” म्हणजेच, पीएम विकास या योजनेचे उद्दिष्ट, कारागीर/कलाकाराना देशांतर्गत तसेच जागतिक पुरवठा साखळीशी जोडून देत, त्यांच्या वस्तू/सेवा/उत्पादने यांची गुणवत्ता सुधारणे, त्यांची संख्या (प्रमाण) वाढवणे असे आहे.
या वेबिनार मध्ये चार चर्चात्मक सत्रे होणार असून त्यांच्या संकल्पना खालीलप्रमाणे असतील :
1. रास्त दरात वित्तीय सेवा उपलब्ध करणे, यात डिजिटल व्यवहारांवर विशेष सवलत आणि सामाजिक सुरक्षा यांचा समावेश असेल.
2. अद्ययावत कौशल्य प्रशिक्षण आणि आधुनिक साधने तसेच तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणे.
3. देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठाशी जोडून त्यांना विपणन प्रक्रियेत मदत करणे.
4. योजनेचे स्वरूप, लाभार्थ्यांची ओळख पटवणे आणि अंमलबजावणी आराखडा.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -