Maharashtra News Live Updates : भाजप आमदार पडळकर यांच्या नेतृत्वातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Feb 2023 11:43 PM
उन्हाची तीव्रता लक्षात घेता हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या वेळेत बदल 

उन्हाची तीव्रता लक्षात घेता हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या वेळेत बदल 



सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू असणार जिल्हा परिषद शाळा 


जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी संदीप कुमार सोनटक्के यांनी काढले आदेश 



जिल्हा परिषदेची शाळा उद्यापासून सकाळी सात वाजता भरणार

आता लालपरीवर दिसणार छत्रपती संभाजीनगर नाव 

केंद्र शासनाने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामकरण केल्यानंतर राज्य शासनाने त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. राज्य शासनाच्या महसूल-वन आणि नगरविकास विभागाचे आदेश जारी होताच आता एसटी महामंडळाने देखील औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्याचे आदेश जारी केले आहेत. राज्यातील प्रत्येक एसटीच्या विभागाला पत्र पाठवून ज्या ठिकाणी औरंगाबाद हे नाव असेल त्या ऐवजी छत्रपती संभाजीनगर असे लिहिण्यात यावे असे आदेशात म्हटले आहे, तसेच हे आदेश येत्या 24 तासात अमलात आणण्याचेही या पत्रात एसटी महामंडळाने म्हटले आहे.

पुरंदर तालुक्यात अफूची शेती, पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात



पुरंदर तालुक्यातील सुपे खुर्द येथे खसखसीची शेती केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. खसखसीच्या बोंडाचा वापर अफू बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे या खसखसीच्या शेतीला निर्बंध आहे. मात्र तरी देखील काही शेतकरी खसखसीसाठी लागवड करतात आणि यानंतर पोलीस कारवाईला सामोरे जावे लागते. पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलंय.


 

 



 
दुचाकी आणि कार यांचा अपघात, दोन ठार
यवतमाळच्या वणी-वरोरा रोडवरील नायगाव जवळ कार व दुचाकीची धडक होऊन दोन तरुण ठार झाल्याची घडली.

वणी येथील तिन तरूण वरोरा येथे एका कार्यक्रमानिमित्य गेले होते. कार्यक्रम आटोपून वणी कडे दुचाकीने येत असताना नायगाव जवळ वणी कडून जाणारी कार व वरोऱ्याकडून वणी कडे येणाऱ्या दुचाकीत समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील आकाश गाउ(28),  अमोल मडावी (29) यांचा अपघातात मृत्यू झाला असून, तर रानु तुमराम(27) वर्ष हा गंभीर जखमी झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाच्या २ गटांमध्ये तुफान राडा

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या शिवसेनेची शिवगर्जना यात्रा सुरु आहे.  या यात्रेनिमित्त वरोरा शहरात आयोजित कऱण्यात आली होती. चंद्रकांत खैरे यांची जाहीर सभा, ही सभा दुपारी ३ वाजता निर्धारित कऱण्यात आली होती. मात्र त्या आधी भद्रावती शहरात खैरे यांची एक सभा आयोजित कऱण्यात आली, वरोरा येथील सभेच्या आधी भद्रावती शहरात सभा का आयोजित कऱण्यात आली. या साठी शिवसेना कार्यकर्ते होते नाराज, खैरे यांना भद्रावती येथील सभेत उशीर होत असल्याने त्यांनी आपल्या सभेत असलेल्या शिवसेनेच्या बाकी पदाधिकाऱ्यांना वरोऱ्याकडे रवाना केले. 

100 कोटींच्या कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

100 कोटींच्या कथित कोव्हिड घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखे ने बाळा कदम आणि राजीव साळुंके नावाच्या  लाईफलाईन लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. कोरोना काळात कोविड सेंटर आणि वैद्यकीय उपकरण खरेदी कंत्राटमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणी आजाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास ईडी आणि मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

Delhi : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा राजीनामा, सत्येंद्र जैन यांचाही मंत्रिपदाचा राजीनामा मंजूर

Delhi : मद्य विक्री घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याशिवाय, दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या दोघांचेही राजीनामे मंजूर करण्यात आले आहे. 

ST Workers Protest : भाजप आमदार पडळकर यांच्या नेतृत्वातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे

ST Workers Protest : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार पडळकर यांच्या नेतृत्वातील सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेच्या झालेल्या बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. एसटी कर्मचारी संघटनेचे एकूण 16 मागण्या होत्या त्यातल्या बहुतांश महत्त्वाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याने आंदोलन मागे घेत असल्याचं एसटी कर्मचारी संघटने कडून सांगण्यात आले. 

BJP: शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी आज भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडमणवी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. 

वऱ्हाडावर मधमाशांचा हल्ला , नवरदेवासह २५० वऱ्हाडी हल्ल्यात जखमी.

बुलढाणा - दुसरबिड येथे एका लग्न समारंभाच्या वेळी नवरदेव घोड्यावरून लग्नस्थळी जात असताना डी जे च्या आवाजाने झाडावरील आगमोहोळ चे असलेल्या मधमाशांनी या लग्नातील वऱ्हाडी मंडळीवर अचानक हल्ला केल्याने घोड्यासह नवरदेव धावत सुटला तर वर्हाडी मंडळी , बँडवाले, लग्न समारंभाचे फोटो व व्हिडिओ शूटिंग करणारा फोटोग्राफर सह सर्वच आपला जीव वाचविण्यासाठी सैरावैरा इकडेतिकडे पळत सुटले.यावेळी जवळपास २५० वरहाड्याना मधमाशांनी चावा घेतला ,तर नवरदेवाला तात्काळ जवळच्या एका खाजगी दवाखान्यात उपचार करून नंतर रात्री ८:०० वाजता हे लग्न मोजक्याच वर्याड्यांच्या उपस्थिती उरकण्यात आल. सर्व वराड्यांवर उपचार करण्यात आले असून सर्व धोक्याबाहेर आहेत.

Sangli News : शिराळा येथील वनक्षेत्रपाल सचिन जाधव निलंबित, कामात वरिष्ठांची फसवणूक केल्याचा ठपका

सांगली : कामात वरिष्ठांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत शिराळा येथील वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांना निलंबित करण्यात आले  आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील पोखर्णी येथे पुनर्वसन करण्यात आलेल्या झोळंबी वसाहतीमधील जमीन सपाटीकरण कामात गैरप्रकार केल्याचा जाधव यांच्यावर आरोप आहे. या सगळ्या कामाची तांत्रिक मान्यता न घेता परस्पर खोटे सही शिक्के वापरून व त्यावर सह्या करून सदरची अंदाजपत्रके वरिष्ठ कार्यालयास मंजुरीसाठी सादर केल्याची  तक्रार संभाजी ब्रिगेडचे राज्य सहसंघटक सुयोग औधकर यांनी केली होती. दरम्यान सचिन जाधव यांच्याच  मानसिक त्रासाला कंटाळून शिराळ्यातील एका महिला वनरक्षकाने आजपासूनच कुपवाड येथील वन विभागाच्या समोर आंदोलन देखील सुरू केलेय. 

Ahmednagar Attack on Kunal Bhandari : बजरंग दलाच्या संयोजकावर धारधार शास्त्राने हल्ला

अहमदनगर येथे बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांच्यावर जमावाने धारदार शास्त्राने प्राण घातक हल्ला केल्याची घटना समोर आलीये... या हल्ल्यात कुणाल भंडारी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत... दरम्यान या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात खुनाचा प्रयत्न करण्यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय... नासिर शेख, अल्तमश शेख, सादिक शेख मौलाना, सलमान अस्लम शेख, सलमान हिनू शेख, जाकीर तांबोळी, अश्पाक शेख, अफजल शेख आणि शहेबान जहागीरदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला...रामवाडी परिसरात कुणाल भंडारी यांच्यावर हल्ला झाला... हल्ल्याचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही मात्र, आरोपींवर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी ही मागणी करत हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते... यावेळी काहीकाळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं... मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत वातावरण शांत केले.

Hingoli Murder : मुलानेच केला वडिलांचा खून, कुऱ्हाडीने वार करत केला निर्घृण हत्या
हिंगोली जिल्ह्यातील सेलू गावात रहिवासी असलेल्या भाऊराव कबले यांचा त्याच्यांच मुलाने कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. भाऊराव कबले यांचा त्याच्याच अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री 9-10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून घरातल्या मंडळींनी मयताच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली होती. परंतु पोलिसांना गोपनीय सुत्राद्वारे माहिती मिळाल्यानंतर कुरुंदा पोलीस घटनस्थळी दाखल झाले आणि घटनेचे बिंग फुटले. कुरुंदा पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे.
Mumbai Crime : नूडल्सचं आमिष दाखवून तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; 42 वर्षीय शेजारी अटकेत

Mumbai Rape Case : मुंबई महिलांसाठी सुरक्षित नाही. दक्षिण मुंबईत एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या 42 वर्षीय आरोपीने तीन मुलींना नूडल्सचं आमीष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 42 वर्षीय व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

Amravati News : पालकमंत्री शोधा आणि 50 खोके मिळवा, ठाकरे गटाचं हल्लाबोल आंदोलन

अमरावती : 'पालकमंत्री शोधा आणि 50 खोके मिळवा', ठाकरे गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयातील असलेल्या पालकमंत्री कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन...


'अमरावतीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हरविले आहेत', अमरावती जिल्ह्याला वाऱ्यावर सोडलं असल्याचा युवसेनेचा आरोप...


यावेळी राणा दांपत्य यांचा बॅनरवर बंटी-बबली म्हणून उल्लेख.. राणा दांपत्य पालकमंत्र्यांना शोधून आणावे आणि 50 खोके मिळवा असा बॅनर दाखवून निषेध...


अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर पालकमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन...


यावेळी युवासेनेचे जिल्हप्रमुख आणि आजी-माजी युवासेना पदाधिकारी उपस्थित उपस्थित...

Byculla News: 42 वर्षीय शेजाऱ्यांने केले तीन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार, भायखळा परिसरातील धक्कादायक प्रकार

Byculla News: भायखळा परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भायखळ्यात 42 वर्षीय शेजाऱ्यांने  तीन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केले. नुडल्स देण्याच्या नावाखाली घरी बोलावून केल शारारिक शोषण केले. मुलींनी घरातून काढला पळ आणि आईला सांगताच प्रकार उघडकीस  आहे. सर जे जे मार्ग पोलिसांनी केली नराधमाला अटक केली आहे. बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत नराधमाला अटक करण्यात आली आहे. 

Sachin Tendulkar Statue : वानखेडे स्टेडियमवर उभारणार सचिन तेंडुलकरचा पुतळा

Sachin Tendulkar Statue on Wankhede Stadium : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) भारतरत्न क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरचा पुतळा (Sachin Tendulkar) उभारण्यात येणार आहे. सचिन तेंडुलकरच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त सचिनला खास भेट म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (Mumbai Cricket Association) वानखेडे स्टेडियमवर पुतळा उभारण्यात येणार आहे. एमसीएकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. वानखेडे स्टेडियमवरील सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचा काम चार ते पाच महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती एमसीएने दिली आहे. 

Yavatmal Temperature : उष्णतेचा फटका रब्बी आणि पालेभाज्या पिकांना

सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याचा परिणाम रब्बी पिके आणि भाजीपाल्यावर होत आहे, त्यामुळे येत्या काळात पुन्हा महागाई वाढू शकते. ज्या शेतकऱ्यांनी गहू आणि चणे पिकाची उशिरा लागवड केली, त्या पिकांचे उत्पन्न वाढलेल्या तापमानामुळे घटण्याची शक्यता कृषी शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. सध्या फेब्रुवारी महिन्यात दरवर्षी पेक्षा तापमान तीन ते चार डिग्री जास्त असल्याने हरभऱ्याची फुलं गळत आहेत आणि गव्हाच्या उंबया करपत आहे. शिवाय भाजीपाला पिकांचे उत्पन्न घटू शकते असे कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांना वाटते तर, त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढतील आणि गहू, चणे हे धान्य महाग होईल, असा अहवाल आरबीआयने दिला आहे.

Daund Copy Issue : दौंड विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत, नऊ शिक्षकांवर गुन्हा दाखल

दौंड तालुक्यातील केडगाव येथील जवाहरलाल माध्यमिक विद्यालयात 12 वी च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत केल्याने स्थानिक नऊ शिक्षकांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी बारावीची परीक्षा सुरू असताना भरारी पथकाने केडगाव येथील जवाहर विद्यालयात भेट देऊन तपासणी केली असता या ठिकाणी काही विद्यार्थी सामूहिक कॉपी करताना आढळून आले आणि या सर्व प्रकाराला या ठिकाणी उपस्थित असणारे शिक्षक अप्रत्यक्ष रित्या जबाबदार असल्याचे निदर्शनास आलं. या प्रकारानंतर पथकातील प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी किसन दत्तोबा भुजबळ यांनी यवत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. जालींदर नारायण काटे ( परिक्षा केंद्र संचालक), रावसाहेब शामराव भामरे ( उप केंद्र संचालक), कुचेकर प्रकाश, दिवेकर विकास, गोरगल शाम, काशीद कविता, गवळी जयश्री, होन सुरेखा, सोननवर अभय या नऊ शिक्षकांवर महाराष्ट्र गैरव्यहार प्रतिबंधक कायदा सन 1982 ( महाराष्ट्र विदयापीठ बोर्ड आणि इतर निर्दिष्ट परिक्षा कायदा 1982 चे कलम 8 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.



 

Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र एकीकरण समितीचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आज विविध मागण्यांचे निवेदन राज्य सरकारला देण्यासाठी सीमाभागातील नागरिक आझाद मैदानात 


बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी आंदोलनकर्त्यांची मागणी 


विरोधी पक्षनेते अजित पवार एकीकरण समितीला भेटण्यासाठी येण्याची शक्यता 


महाराष्ट्र एकीकरण समितीचे अंदाजे 1500 नागरिक आज आझाद मैदानात दाखल 


या समितीच्या शिष्टमंडळाचे निवेदन घेण्यासाठी दुपारी 1 वाजता मंत्री शंभूराजे देसाई, चंद्रकांत पाटील येणार असल्याची माहिती 


या विविध मागण्यांबाबत शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट होणार

Gondia Crime News : गोंदियातील 'त्या' वन्यजीव तस्करी प्रकरणात आत्मसमर्पित नक्षलवादीही सामील
Gondia Wildlife Trafficking : वन्य जीवांची शिकार करून तस्करी करणाऱ्या आरोपींना वनविभाग तसेच पोलिसांनी संयुक्त कारवाही करत पाच आरोपींना अटक केली असून यात एका नक्षल आत्मसमर्पित आरोपीचा समावेश आहे. या आरोपीने नवेगाव व्याघ्र प्रकल्पात दुर्मिळ असणाऱ्या काळ्या बिबट्याची शिकार केल्याची कबुली दिली आहे. हा बिबट पहिल्यांदा 2019 मध्ये कॅमेऱ्यामध्ये चित्रीत झाला होता.
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणीला सुरुवात

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणीला सुप्रीम कोर्टात सुरुवात झाली आहे.  अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू झाला आहे.

Mumbai Crime News : संशयित दहशवादी पोलिसांच्या ताब्यात, सरफराज मेमनची चौकशी
NIA Updates : संशयित दहशतवादी सरफराज मेमनला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईत एका धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याची माहिती NIA ने मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणांना याबाबत माहिती पुरवली होती. NIA ने माहितीच्या आधारे इंदोर पोलिसांनी सरफराज मेमनला ताब्यात घेतलं आहे. सरफराजच्या चौकशीसाठी महाराष्ट्र एटीएस इंदोरमध्ये दाखल झाली आहे. सरफराज मेमन हा चीन आणि पाकिस्तानमधून ट्रेनिंग घेऊन भारतात आल्याची माहिती NIA ने दिली होती. या माहितीच्या आधारे NIA ने पोलिसांना सतर्क राहण्याचं आवाहनही केलं होते. या माहितीच्या आधारे मुंबई पोलीस, एटीएस तसेच इतर यंत्रणाकडून तपास सुरु होता, आता त्यामध्ये यश आलं असून पोलिसांनी संशयित सरफराज मेमनला ताब्यात घेतलं आहे. संबंधित संशयित इसम सरफराजला इंदोर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्र एटीएस इंदोरमध्ये दाखल झाली असून त्यांची चौकशी करण्यात येईल. महाराष्ट्र एटीएस संशयित सरफराज मेमनची चौकशी करणार आहे.
PM Modi's Brother Hospitalized : पंतप्रधान मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल; किडनीसंबंधित आजाराने ग्रस्त

PM Modi's Brother Prahlad Modi Hospitalized : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे बंधू प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रल्हाद मोदी हे मृतपिंडासंबंधित आजाराने ग्रस्त आहेत. प्रल्हाद मोदी पंतप्रधान मोदी यांचे लहान भाऊ आहेत. त्यांच्यावर सध्या चेन्नईमधील अपोलो रुग्णालयात किडनी संबंधित आजारावर उपचार सुरु आहेत.

Mumbai Local:  खारकोपर स्थानकाजवळ लोकलचे तीन डबे घसरले

Mumbai Local:  खारकोपर स्थानकाजवळ लोकलचे तीन डबे घसरले आहेत. त्यामुळे नेरूळ आणि बेलापूरहून खारकोपरला जाणाऱ्या येणाऱ्या लोकल बंद करण्यात आल्या आहेत. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. घसरलेले डबे पुन्हा रुळांवर ठेवण्याचे काम सुरू आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. 




कोकणात शिमगोत्सवाची धूम, रत्नागिरीतील कोन्हवली गावात ग्रामदैवत श्रीरंग भैरीची पालखी पारंपरिप पद्धतीने नाचवली

Konkan Shimgotsav : कोकणात शिमगोत्सवाची धूम सुरु झाली आहे. पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या शिमगोत्सवात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातील कोन्हवली गावात ग्रामदैवत श्रीरंग भैरीच्या पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी पारंपरिक पद्धतीने पालखी नाचवली गेली. शिवाय लहान थोरांपासून प्रत्येक जण यावेळी सादर करण्यात आलेल्या खेळांमध्ये सहभागी देखील झाला.

पुण्यात उद्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन, तांत्रिक विभागाच्या परीक्षेचा पॅटर्न 2025 पासून लागू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर

MPSC Protest : पुण्यात उद्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन


एमपीएससी तांत्रिक विभागाच्या परीक्षेचा पॅटर्न 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी उद्यापासून विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर


राज्यभरातून विद्यार्थी उद्या पुण्यात येणार 


पुण्यातील बालगंधर्व चौकात विद्यार्थी बसणार उपोषणाला


सरकार जाणूनबुजून आम्हाला त्रास देत आहे


सरकारने ताट वाढलं पण ते रिकामे ठेवलं


मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार


आम्ही आंदोलनावर ठामच


विद्यार्थ्यांचा सरकार आणि आयोगाला इशारा

Pune MPSC Student Protest: पुण्यात उद्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन

Pune MPSC Student Protest:   पुण्यात उद्या एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहे. एमपीएससी तांत्रिक विभागाच्या परीक्षेचा पॅटर्न 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी उद्यापासून विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत.  राज्यभरातून विद्यार्थी उद्या पुण्यात येणार आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात विद्यार्थी उपोषणाला बसणार आहेत. 

Nashik News:  लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव सुरू

Nashik News:  लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव सुरू झाले आहेत. सोमवारी झालेल्या आंदोलनानंतर आजपासून पूर्ववत लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. सुरवातीच्या लिलावात साडेचारशे रुपयापासून बाजार खुला झाला आहे कमीतकमी कमी हजार रूपये भाव मिळावा या मागणीसाठी  आंदोलन केले होते. पालकमंत्री दादा भुसे यांच्यां मध्यस्थीनंतर आंदोलन घेण्यात आले होते मागे
-

Meghalaya Earthquake : मणिपूरनंतर आता मेघालय हादरलं, 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

Meghalaya Earthquake : मणिपूरनंतर (Manipur) आता मेघालय हादरलं आहे. मेघालयमध्ये (Meghalaya) 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल आहे. मेघालयमध्ये मंगळवारी (28 फेब्रुवारी) सकाळी 3.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला आहे. मणिपूरमध्ये पहाटे 2:46 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली 25 किमी खोलीवर होता. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.2 इतकी मोजली गेली आहे.

Pune Water Cut : पुण्यात गुरुवारी अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

Pune Water Cut : पुण्यात गुरुवारी (2 मार्च) अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद


रामटेकडी ते खराडी भागात जलवाहिन्यांवर बसवण्यात येणार फ्लो मीटर


गुरुवारी पाणीपुरवठा बंद तर शुक्रवारी कमी दाबाने होणार पाणीपुरवठा


पुणे महानगरपालिकेची माहिती


या भागात राहणार पाणी बंद


रामटेकडी, ससाणे नगर, हडपसर गावठाण, फुरसुंगी, सातव वाडी मगरपट्टा, वानवडी, केशवनगर मुंढवा गाव, गाडीतळ अशा मुख्य भागात राहणार पाणीपुरवठा बंद

Sangli Leopard Attack on Dog : पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला... सीसीटीव्हीत बिबट्या कैद.

 

कसबा पोटनिवडणुकीच्या निकालाआधीच भाजप आणि महाविकास आघाडीकडून बॅनरबाजी, रवींद्र धंगेकर यांच्यानंतर हेमंत रासने यांचेही बॅनर

Pune Bypoll Election : पुणे जिल्ह्यातील कसबा पोटनिवडणुकीच्या निकालाआधीच भाजप आणि महाविकास आघाडीकडून बॅनरबाजीला सुरुवात झाली आहे. रवींद्र धंगेकर यांच्या बॅनरनंतर हेमंत रासने यांचेही बॅनर लागले आहेत. विशेष म्हणजे पुण्यात पोट निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच बॅनरबाजीला उधाण आलं आहे. पुण्यातील मुख्य वस्तीत हेमंत रासने यांची आमदारपदी निवड झाल्याचे बॅनर लागले आहेत. तर सारसबाग आणि वडगाव चौकात रवींद्र धंगेकर यांची आमदारपदी निवड झाल्याचे बॅनर कार्यकर्त्यांनी निकालआधीच बॅनर लावले.

रील्स बनवण्याच्या नादात तरुणांनी जैन मुनींना उडवले, परभणीच्या बोरी तांड्याजवळील घटना, जैन मुनी सौम्यसागरजी यांच्यासह सेवेकरी जखमी

Parbhani News : परभणी जिल्ह्यात रील्स बनवण्याच्या नादात तरुणाई इतकी गुंतली आहे की यामुळे अपघात होत आहेत. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी तांडा इथे रील्स बनवणाऱ्या तरुणांच्या गाडीने पायी जाणाऱ्या जैन मुनींसह एका सेवेकऱ्याला उडवले. दोघांवरही जिंतूर इथे उपचार सुरु आहेत. परभणीच्या बोरी इथून जैन मुनी सौम्यसागरजी आणि इतर मुनींसह जिंतूरकडे जात होते. यावेळी बोरी तांड्याजवळ दोन दुचाकीवर चार युवक रील्स बनवत होते. यावेळी त्यांच्या गाडीने सौम्यसागरजी यांच्यासह त्यांचा सेवेकरी संकेत मोहारे याला जोराची धडक दिली ज्यात दोघे ही गंभीर जखमी झाले. यावेळी भक्तांनी तात्काळ मदतीसाठी वाहन आणलं. मात्र वाहनात बसण्यास जैन मुनींनी नम्रपणे नकार दिला. यावेळी स्ट्रेचरवर सौम्यसागर मुनी यांना जिंतूरला नेण्यात आले. सध्या त्यांच्यावर तिथे उपचार सुरु असून त्यांच्यासह सेवेकरी संकेत मोहारे यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार रील्स बनवणारे चारही तरुण अल्पवयीन असून त्यांच्याविरोधात तक्रार द्यायची नाही असा निर्णय जैन मुनी सौम्यसागर यांनी घेतला. परंतु या घटनेमुळे मात्र पुन्हा एकदा  तरुणाई रील्सच्या विळख्यात किती अडकली आहे हे समोर आलं.

विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह नगर-मनमाड महामार्गावर आंदोलन करणार

Ahmednagar Swabhimani Shetkari Sanghatna Rasta Roko : राज्यभर कांदा उत्पादक शेतकरी हवालादिल झाला असून बाजारभाव मिळत नसल्याने उभे पीक नष्ट करण्याची वेळ बळीराजावर आली आहे. कांद्याला हमीभाव आणि निर्यातीवर प्रोत्साहनपर अनुदान मिळावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह नगर-मनमाड महामार्गावर हे आंदोलन करण्यात येणार आहे.


प्रमुख मागण्या :


1) निर्यातीवर 500 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळावे.


2) कांद्याला 2500 रुपये प्रती क्विंटल हमीभाव मिळावा.


3) नाफेडमार्फत कांदा 2500 रुपये किंटल दराने खरेदी करावा.

तापमानाच्या वाढत्या प्रभावामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर, बुलढाण्यात 16 ठिकाणी उष्माघाताचे कक्ष स्थापन

Buldhana News : राज्यात पुढील काही दिवस सरासरीच्या तुलनेत तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याचा परिणाम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत होऊ शकतो. तेव्हा उष्माघाताचा फटका बसू नये म्हणून आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. बहुतांश मार्च महिन्यात उष्माघाताचे कक्ष स्थापन केले जातात. मात्र, यंदा फेब्रुवारी महिन्यातच 16 उष्माघाताचे कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अशातच हिल स्टेशन म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा शहरासह जिल्ह्याचे तापमान चाळिशीकडे आगेकूच करत आहे. तेव्हा यामुळे उष्माघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आली असून, जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडून 16 ठिकाणी उष्माघाताचे कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात एक तर, सामान्य रुग्णालयात दोन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. जिल्ह्यात प्रत्येक ग्रामीण रुग्णालयासह सामान्य रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन केला असून, औषधांचा मुबलक साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे.

Bhandara  Protsahan Rashi Issue : 50 टक्के भात उत्पादक शेतकरी राहणार प्रोत्साहन राशीपासून वंचित

राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दोन हेक्ट्ररपर्यंत 15 हजार रुपयांची प्रोत्साहन राशी घोषित केली होती. मात्र, आता तीन महिन्यांचा कालावधी लोटत असताना 24 फेब्रुवारीला राज्य शासनानं अध्यादेश काढला असून त्यात काही अटीशर्थी टाकल्याचे दिसून येते. त्यामुळे सुमारे 50 टक्के शेतकरी शासनाच्या प्रोत्साहन राशीपासून वंचित राहणार आहेत. ई-पिक नोंदणी करायची होती, त्यावेळी अनेक तांत्रिक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हता त्यामुळे ही पीक नोंदणी करताना त्यांना अडचणी निर्माण झाल्यात. तर अनेकांकडे अँड्रॉइड मोबाईल असताना सुद्धा ही नोंदणी शेतबांधावर करायची असल्याने तिथे मोबाईल कव्हरेजचा प्रॉब्लेम होता. यासह अनेक तांत्रिक अडचणीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागल्याने 50 टक्के शेतकऱ्यांची पीक नोंदणी झालेली नाही आता हे सर्व शेतकरी प्रोत्साहन राशीला मुकणार आहेत.

Santacruz Murder Case : सांताक्रुझ येथील बहुचर्चित स्लो पोईझनिंग हत्ये प्रकरणी आरोपपत्र दाखल
सांताक्रुझ येथील कपडा व्यापारी आणि त्याच्या आईची हत्या केल्या प्रकरणी व्यापाऱ्याची बायको आणि तिच्या प्रियकराविरुद्ध आरोपपत्र दाखल 

 

गुन्हे शाखेने सोमवारी केलं 1365 पानी आरोपपत्र किल्ला कोर्टात सादर

 

चार महिन्यांनी कमालकांत यांच्या मृत्यूच उलगडलं होत गूढ

 
Jalgaon News : निर्जलीकरण प्रक्रिया उद्योग सुरू करून शेतीचा यशस्वी प्रयोग

जळगाव : राज्यात गेल्या दिवसात कांद्याच्या आणि तमात्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याच्या शेतावर रोटर करून पीक नष्ट केल्याचं पाहायला मिळतं आहे. मोठ्या प्रमाणत खर्च करून आणि कष्ट करूनही शेतीसाठी केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांच्या ही वेळ असल्याच मानले जात आहे. एकीकडे असे चित्र असले तरी दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पळसखेड गावच्या वंदना पाटील यांनी शासनाच्या उन्नयान योजनेतून निर्जलीकरण प्रकल्प सुरू करून कांदा-टोमॅटोसह अनेक भाज्यांची पावडर तयार करून त्यापासून कांदा तोम्याटोच मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांच्या पुढे एक आदर्श निर्माण केला आहे.


 


 

Valsad Fire : वलसाडच्या सरिगाम GIDC मधील कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन आग

Valsad Fire : गुजरातच्या (Gujarat) वलसाड (Valsad) जिल्ह्यातील सरिगाम जीआयडीसीमधील कारखान्यात भीषण स्फोट झाला. सरिगाम G.I.D.C. वेन पेट्रोकेम अँड फार्मा (इंडिया) प्रा. या कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्याने कंपनीला भीषण आग लागली. शिवाय बॉयलरच्या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की तीन मजली कंपनी कोसळली. कंपनीची तीन मजली इमारत कोसळल्याने दोन जण जखमी झाले आहेत तर 3 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतं. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी लोक दबले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि बचावकार्य सुरु केले. दरम्यान भिलाड पोलिसांच्या ताफ्यानेही घटनास्थळी पोहोचून लोकांची गर्दी बाजूला करुन बचाव कार्य सुरु केलं.

Maharashtra Budget Session 2023 : विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा दिवस

राज्याचं अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. आज दुसऱ्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना देशद्रोही म्हटल्याने विरोधक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. तर, दुसरीकडे सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाबाबत सुनावणी होणार आहे. सलग तीन दिवस ही सुनावणी सुरू राहणार आहे.

Yavatmal Girl Fight : बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

यवतमाळच्या वणीमध्ये नगरपालिकेच्या शिवाजी पार्कमध्ये एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी झाली. दोन तरुणींसोबत एका तरुणाचं लपूनछपून रिलेशनशिप सुरू होतं. मात्र आज अचानक दोन्ही मुली आमनेसामने आल्या आणि सत्य समोर आलं. आणि मग काय याच कारणावरून दोन्ही तरुणींमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झालं. या हाणामारीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. 

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.


विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा दिवस


राज्याचं अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. आज दुसऱ्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना देशद्रोही म्हटल्याने विरोधक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. तर, दुसरीकडे सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाबाबत सुनावणी होणार आहे. सलग तीन दिवस ही सुनावणी सुरू राहणार आहे. 


दिल्ली 
- महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. आज ठाकरे गटाकडून उर्वरित युक्तिवाद होणार असून त्यानंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. आजपासून पुढचे सलग तीन दिवस खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे. आज ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत बाजू मांडणार आहे. त्यानंतर शिंदे गटाच्यावतीने जेष्ठ वकिल हरिश साळवे बाजू मांडतील. 


मुंबई
- राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. विविध मुद्यांवरून दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. 


- भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संबोधित करणार आहेत.


- एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आजपासून आमदार गोपाचंद पडळकर यांची सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेचे आझाद मैदानावर आत्मक्लेश आंदोलन करणार आहे. 


- सरकारने संपाची दखल न घेतल्यामुळे संतप्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे उद्यापासून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करणार आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने गेली साडेपाच वर्षे तर केंद्र शासनाने गेली साडेचार वर्षे मानधनात कोणतीही वाढ दिलेली नाही. 


- नवाब मलिक यांच्या जामिनावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. वैद्यकीय कारणास्तव मलिकांच्या जामिनावर तातडीनं सुनावणी घेणं हायकोर्टानं मान्य केले आहे.


नाशिक


- युवासेना अध्यक्ष खासदार श्रीकांत शिंदे ( शिवसेना- शिंदे गट)  नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. 
- मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत.
- संजय राऊत हे देखील सोमवारपासून नाशिक दौऱ्यावर आहेत.


अहमदनगर


- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत.
- ठाकरे गटाचे उपनेते विनोद घोसाळकर, विजय कदम यांच्या उपस्थितीत माऊली सभागृहात "शिवगर्जना" कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. 


चंद्रपूर 


- शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाकडून सध्या शिवगर्जना अभियान सुरू आहे. शिवसेनेचे माजी खासदार आणि नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर शहर, वरोरामध्ये शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.