Maharashtra News Updates 02 March 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
महावितरण कंपनीच्या गडचिरोली मुख्यालयापुढे गडचिरोली जिल्ह्यातील ग्राम वीजसेवकांनी आजपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले. पेसा ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या या ग्राम वीजसेवकांनी गेली अनेक वर्षे आपली सेवा दुर्गम -नक्षलग्रस्त भागात दिली आहे. त्यांना पुनर्नियुक्तीचे आदेश सहजपणे दिले जात असताना यंदा मात्र ते आदेश जारी झालेले नाहीत. अशा स्थितीत त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. या सर्व 156 ग्राम वीज सेवकांनी बेमुदत उपोषण आंदोलन करून आपल्या न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. मानधन वाढ ,कौशल्य प्रशिक्षण, विमा कवच व महावितरण कंपनीत सामावून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने कॉपीमुक्त अभियान राबवले जातं आहे. परंतु हे कॉपीमुक्त अभियान फक्त नावापुरतेच आहे की काय, असा प्रश्न निर्माण होतोय. कारण हिंगोली जिल्ह्यातील रामेश्वर तांडा येथील माध्यमिक आश्रम शाळेच्या 10 वीच्या परीक्षा केंद्रावर कॉफीचा सुळसुळाट पाहायला मिळाला आहे. परीक्षा केंद्राच्या मागच्या बाजूने आणि खिडकीच्या जवळ कॉपी देताना नागरिक मोबाईल कॅमेरात कैद झाले आहेत. दरम्यान हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होतोय.
शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसोबत त्यांच्या विविध मागण्या संदर्भात बैठक घेतली. या सकारात्मक बैठकीनंतर बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिकांवरील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे. बारावी बोर्ड परीक्षा सुरू असताना आपल्या विविध मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता.
गोंदिया जिल्हयात 160 शाळांमध्ये 25 टक्के जागेवर आरटीई अंतर्गत आर्थिक आणि दुर्बल घटकात मोडणा-या विद्यार्थ्यांना खासगी प्रवेश दिले जाते, त्या मुळे आर्थिक आणि दुर्बल घटकात मोडणाऱ्या 10 हजार विद्यार्थाना चांगले शिक्षण मिळत आहे. मात्र येणाऱ्या सत्र पासून या विद्यार्थाना चांगल्या शिक्षणा पासून वंचित राहावे लागणार असल्याचे चित्र गोंदियात दिसत आहेत, गोंदिया जिल्ह्यातील 160 अश्या शाळा आहेत. ज्या मध्ये शासनाच्या आरटीई कायदा अंतर्गत शिक्षण घेत आहेत. मात्र या 160 शाळेला मागील 2012-13 ते 2021-22 पर्यंत शासना कडून मिळणारे अनुदान मिळत नसून या शाळेतील संचालकांनी या वर्षीच्या सत्र पासून शाळेत आरटीई कायदा अंतर्गत येत असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश घेणार नसल्याचे आरटीई गोंदिया जिल्हाध्यक्ष आर.डी. कटरे यांनी सांगितले आहे. त्याच प्रमाणे जे शाळा या वर्षी वर्षीच्या सत्र पासून आरटीई कायदा अंतर्गत विद्यार्थाना प्रवेश देणार नाही किंवा नाकारणार त्या शाळेवर नियमानुसार कार्यवाही करू असे शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये म्हणाले आहे.
तळकोकणातील सावंतवाडी तालुक्यातील कुंभवडे गावातील भारती गावडे या महिलेवर गवारेड्याचा हल्ला केला आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यांना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक ऊपचार केल्यावर अधिक उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात हलविले. महिलेच्या छातीला, पायाला, आणि डोक्याला दुखापत झाली आहे. गवारेड्याची ठोकर एवढी जबरजस्त होती की महिला जाग्यावर बेशुद्ध पडली. स्थानिक ग्रामस्थांनी महिलेला आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं.
Pradyot Kishore Manikya Debbarma : भारताच्या पूर्वेकडील राज्य त्रिपुरा (Tripura), मेघालय (Meghalaya) आणि नागालँडमधील (Nagaland) विधानसभा निवडणुकीचा निकाल (Assembly Election 2023) आज (2 मार्च) थोड्याच वेळात हाती येणार आहे. या विधानसभा निवडणुकीत सध्या त्रिपुरा निवडणुकीत राजघराण्याची जोरदार चर्चा आहे. त्रिपुराच्या राजघराण्यातील प्रद्योत किशोर देबबर्मा यांच्याकडे राज्यात किंगमेकर म्हणून पाहिलं जात आहे. देबबर्मा यांचा पक्ष टिपरा मोथाने एक्झिट पोलमध्ये सर्वांनाच चकित केलं आहे. त्यांच्या टिपरा मोथा (TIPRA Motha Party) पक्षानं एक्झिट पोलमध्ये सर्वांनाच चकित केलं आहे.
SC On Adani Hinderburg Case: अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या (Adani Hinderburg Case) चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) समिती गठित करण्यात आली आहे. सहा जणांची समिती सुप्रीम कोर्टाकडून स्थापन करण्यात आली आहे. शेअर बाजारातील घसरणीचे कारण आणि गुंतवणुकदारांचे नुकसान याची चौकशी ही समिती करणार आहे. निवृत्त न्यायमूर्ती अभय मनोहर सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये ओ पी भट्ट, के वी कामथ, इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि आधारचे प्रवर्तक नंदन नीलकेणी, जस्टिस देवधर आणि सोमशेखर सुंदरेशन यांची निवड करण्यात आली आहे.
Dindora Project Agitation : वर्धा नदीच्या पात्रात मानवी साखळी तयार करून दिंडोरा प्रकल्पग्रस्तांनी आज आंदोलन केले. या आंदोलनात चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले होते. 1993 मध्ये होवू घातलेल्या निप्पोन डेनरो उद्योगाला पाणी मिळावे यासाठी दिंडोरा प्रकल्प तयार करण्यात आला होता. या साठी चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील 32 गावांची 1400 हेक्टर जमीन अधिग्रहित आली होती. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांना 1997 मध्ये 20 हजार रुपये एकरी मोबदला देण्यात आला होता मात्र निप्पोन डेनरो प्रकल्प रद्द झाल्यामुळे या प्रकल्पाचे काम सुरु होऊ शकले नाही. 2017 ला हा प्रकल्प सिंचन प्रकल्प म्हणून जाहिर झाला त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांनी 2013 च्या जमीन अधिग्रहण कायद्याप्रमाणे मोबदला देण्याची, भूमिहीन शेतकऱ्यांना पर्यायी जमीन देण्यासह मच्छीमार आणि शेतमजूरांना विशेष पॅकेज देण्याची मागणी केली आहे.
Adani-Hindenburg issue: अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाकडून समिती गठीत करण्यात आली आहे. सहा जणांची समिती सुप्रीम कोर्टाकडून स्थापन करण्यात आली आहे. शेअर बाजारातील घसरणीचे कारण आणि गुंतवणुकदारांचे नुकसान याची चौकशी ही समिती करणार आहे. निवृत्त न्यायमूर्ती अभय मनोहर सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे . या समितीमध्ये ओ पी भट्ट, के वी कामथ, इन्फोसीसचे सहसंस्थापक आणि आधारचे प्रवर्तक नंदन नीलकेणी, जस्टिस देवधर आणि सोमशेखर सुंदरेशन यांची निवड करण्यात आली आहे.
Election Results 2023 LIVE UPDATES: ईशान्येकडील तीन राज्यांसाठी, 2 मार्च म्हणजे, आज महत्त्वाचा दिवस आहे. आज विधानसभा निवडणुकांची मतमोजणी पार पडणार आहे. आज त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील. निकालांसह, तिन्ही राज्यांना त्यांचे नवे मुख्यमंत्री मिळतील. त्रिपुराच्या 60 -सदस्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी 16 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. त्रिपुरामध्ये 88 टक्के मतदान झालं होतं, मेघालयात 76 टक्के मतदान आणि नागालँडमध्ये 84 टक्के मतदान पार पडलं होतं.
Sanjay Raut News: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज (2 मार्च) पुन्हा एकदा विधानभवनात (Vidhan Bhavan) सत्ताधारी आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या आक्रमकतेला कसं उत्तर द्यायचं यासाठी महाविकास आघाडीनं (Maha Vikas Aghadi) रणनीती आखली आहे. तर दुसरीकडे विधिमंडळाची हक्कभंग समिती स्थापन झाली असून संजय राऊत यांना नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्तांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. आयुक्तांच्या निवडीसाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश आहे.
Ahmednagar Athare Patil School : अहमदनगर शहरातील आठरे पाटील पब्लिक स्कुल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांना फी भरली नाही म्हणून मागील चार ते पाच दिवसांपासून शाळेच्या गेट बाहेर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांच्या पालकांनी विनंती करून देखील विद्यार्थ्यांना बाहेरच ठेवलं जातं असल्याचं पालकांचे म्हणणे आहे. लाखो रुपये फी भरून देखील किरकोळ फी बाकी असताना आणि ती फी देखील भरण्याची पालकांची तयारी असताना विद्यार्थ्यांना बाहेर ठेवलं जातं असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
Chiplun Water ATM : कोकणात या दिवसांत कडक उन्हाळ्यात पाण्याची भूजल पातळी कमी होते परिणामी विहारी, बोरवेल आटल्या की पाण्यासाठी वणवण फिरावं लागते. याचाच विचार करून चिपळूण तालुक्यातील सावर्डे या ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याचे ATM मशीन बसवून त्याचें त्याचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याच हस्ते करण्यात आले. आता सावर्डे वासियांना या पिण्याच्या पाण्याच्या atm मशीन वरुन एक रुपयांत एक लिटर शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे.
Share Market Opening Bell : आज शेअर बाजारात (Stock Market) सुरुवातीच्या सत्रात घसरण झाली आहे. बाजारात जोरदार विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स (Sensex) 220 अंकांनी घसरला असून निफ्टी (Nifty 50) 17400 च्या खाली गडगडला आहे. आयटी आणि ऑटो शेअर्समध्ये मोठी घसरण दिसत आहे. शेअर बाजारात आयटी सेक्टरची परिस्थिती बिकट आहे. विक्री होणाऱ्या शेअर्समध्ये आयटी शेअर्स आघाडीवर आहेत. जागतिक बाजारातील संथ व्यवहारांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होताना दिसत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर आता शिंदेंना चक्क सोन्याचा धनुष्यबाण भेट देण्यात आलाय. अंबरनाथच्या माजी नगराध्यक्षा आणि युवती सेना राज्य कार्यकारिणी सदस्या प्रज्ञा बनसोडे यांनी हा एक तोळे वजनाचा अस्सल सोन्याचा धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट दिला. हा सोन्याचा धनुष्यबाण पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील काही काळ अचंबित झाले.
Kasara Fire News : मुंबई -आग्रा महामार्गांवर नवीन कसारा घाटात पहाटेच्या सुमारास नाशिकहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक कंटेनरला अचानक भीषण आग लागली चालकाने तत्परता दाखवत सदर कंटेनर महामार्गाच्या बाजूला उभा केल्याने मोठा अनर्थ टळला, सदर घटनेची माहिती मिळताच टोल कंपनीची अग्निशमन यंत्रना घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आग विझवली पण कंटनेर मधील माल आणि गाडी पूर्णतः अगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती, या घटनेत जीवित झाली हानी परंतु वाहनाचे पूर्ण नुकसान झाले आहे.
Mumbai News: मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलांचा मुंबई विद्यापीठाच्या गेट बाहेरच मुक्काम
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आजपासून महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाने दहावीच्या परीक्षेसाठी जय्यत तयारी केली आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाने पावले उचलली असून भरारी पथके नियुक्त केली आहेत. विधिमंडळ अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादाचे पडसाद आजही उमटण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या घडामोडी आहेत. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी आहे. तर, सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्ष प्रकरणी सुनावणीचा आज शेवटचा दिवस आहे.
तीन राज्यात विधानसभा निवडणूक मतमोजणी
मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारी रोजी 88 टक्के मतदान झाले होते. तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. नागालँडमध्ये 84 टक्के तर मेघालयमध्ये 76 टक्के मतदान झाले होते. आज तिन्ही राज्यात मतमोजणी होणार आहे. या राज्यात सत्तांतर होणार की सत्ताधारी पक्ष कायम राहणार,
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज पुन्हा एकदा विधान भवनात सत्ताधारी आक्रमक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या आक्रमकतेला कसं उत्तर द्यायचं यासाठी महाविकास आघाडी रणनीति आखणार आहे. विधिमंडळाची हक्कभंग समिती स्थापन झाली असून संजय राऊत यांना नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक
- महाविकास आघाडीची आज संध्याकाळी मुंबईतील सीसीआय येथे बैठक होणार आहे. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना बैठकीसाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे. बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे अजित पवार उपस्थित राहणार. बैठकीत अधिवेशनातील पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे.
आजपासून दहावी बोर्ड परीक्षा सुरू
आजपासून दहावी बोर्ड परीक्षा सुरू होणार आहे. राज्यात 15,77,256 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. राज्यातील 5033 परीक्षा केंद्रावर ही बोर्ड परीक्षा होणार आहे. बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी विशेष अभियान राज्यभरात राबविले जात आहेत.
मुंबई
- राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी बारावी बोर्ड पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यांच्या विविध मागण्यांबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक होणार आहे.
- खासदार नवनीत राणा यांच्या बनावट जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी शिवडी दंडाधिकारी कोर्टात आज सुनावणी. कोर्टात राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात कोर्टात सतत गैरहजर राहिल्यानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.
- पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांनी सीबीआयच्या कारवाईविरोधात हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी.
- पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी.
छत्रपती संभाजीनगर
- गॅस दरवाढ, इंधन दरवाढी विरोधात शहर जिल्हा कॉंग्रेसकडून आंदोलन
जालना
- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर जिल्हा दौऱ्यावर आहेत.वर्धा
- उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या शिवगर्जना अभियान आज वर्धा येथे होणार आहे. खासदार अरविंद सावंत जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
- स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण व्हावे, यासाठी 21 फेब्रुवारी ते 5 मार्च सिंदखेडराजा ते नागपूर विदर्भ राज्य निर्माण यात्रा वामनराव चटप यांच्या नेतृत्वात सुरू आहे. ही यात्रा सकाळी हिंगणघाट शहरात येणार आहे.
अकोला
- शिवसंवाद यात्रेनिमित्त सुषमा अंधारे आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या जिल्ह्यात पाच सभा होणार आहेत.
यवतमाळ
- शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे याची संजय राठोड याच्या बालेकिल्ला मध्ये जाहीर शिवगर्जना सभा होणार आहे.
- विद्या चव्हाण प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी महाराष्ट्र यांची जनजागार यात्रा यवतमाळ येथे येत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -