Maharashtra News LIVE Updates : महाराष्ट्रात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा हवामान विभागाने वर्तवला अंदाज ..

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 May 2024 02:22 PM
Devendra Fadnavis : शरद पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळे यांना जागा...- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : इंडिया आघाडीत सगळेच इंजिन... - देवेंद्र फडणवीस
कोणीच डब्बा व्हायला तयार नाही...- देवेंद्र फडणवीस
इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो...- देवेंद्र फडणवीस
त्यात फक्त सोनियाजी आणि प्रियंका गांधीला जागा..- देवेंद्र फडणवीस
उद्धव चे इंजिन मध्ये फक्त आदित्यला जागा...- देवेंद्र फडणवीस
शरद पवारांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुळे यांना जागा...- देवेंद्र फडणवीस

Ajit Pawar : मोदींच्या सांगण्यावरून पुतीन यांनी युद्ध थांबवले- अजित पवार

Ajit Pawar : मोदींच्या सांगण्यावरून पुतीन यांनी युद्ध थांबवले- अजित पवार


रशिया आणि युक्रेनमधे युद्ध सुरु होते. आपली मुले तिथे अडकली होती. - अजित पवार


मोदींनी पुतीनला फोन लावला आणि आमची मुले सुखरुप यावीत अशी मागणी केली.- अजित पवार


 त्यावेळी पुतीनने आपल्या मुलांना घेऊन निघणार्या   विमानांचे टेक ऑफ होईपर्यंत युद्ध थांबवले.  अशी प्रतिमा मोदींची जगात आहेत.- अजित पवार

Pune : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल, उद्या संध्याकाळी तोफ धडाडणार

Pune : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल


उद्या संध्याकाळी राज ठाकरेंची तोफ पुण्यात धडाडणार


पुणे लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची सभा


आज संध्याकाळी राज ठाकरे पुण्यातील पक्ष कार्यालयात बैठक घेण्याची शक्यता


बैठकीला पुणे शहरातील मनसे नेते पदाधिकारी उपस्थितीत राहणार

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसच्या आज 85 फ्लाईट्स रद्द 

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसच्या आज 85 फ्लाईट्स रद्द 


प्रवाशांना फ्लाईट्स रद्द झाल्याची अग्रीम सूचना केली असल्याची विमान कंपनीची माहिती

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंची ‘मशाल‘ दहशतवाद्यांच्या हाती, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंची ‘मशाल‘ दहशतवाद्यांच्या हाती, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका


1993 च्या बॉम्बस्फोटचा आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान उबाठा गटाच्या प्रचारात


आज बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल? जनाब उद्धव ठाकरे, थोडी तरी लाज बाळगा


उद्धव ठाकरे ‘मशाल‘ दहशतवाद्यांच्या हाती देऊन पुन्हा मुंबई आणि देश पेटवायचा मनसुबा आहे का?


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक्सवरून उद्धव ठाकरेंना सवाल

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस कोल्हेंच्या घरी पोहचले, भेटीनंतर कोपरगाव शहरात प्रचारसभा

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस कोल्हेंच्या घरी पोहचले...
कोपरगावच्या भाजप माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या घरी भेटीला...
गेल्या काही दिवसांपासून कोल्हे परिवाराची नाराजी...
आज उपमुख्यमंत्री कोल्हे परीवाराच्या भेटीला...
भेटीनंतर कोपरगाव शहरात प्रचारसभा...
सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री शिर्डी मतदारसंघात..

Pune : शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ रॅलीचं आयोजन

Pune : शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ रॅलीच आयोजन


पुण्यातील कोंढवा परिसारत अमोल कोल्हे यांची प्रचार रॅली


आमदार रोहित पवार देखील अमोल कोल्हे यांच्या प्रचार रॅलीत


शिरूर लोकसभा मतदार संघातील कोंढवा परिसरात अमोल कोल्हे यांचा प्रचार

High Court : एखादा भूखंड ताब्यात घेण्याचा निवडणूक आयोगाला काय अधिकार?, हायकोर्टाचा संतप्त सवाल

High Court : एखादा भूखंड ताब्यात घेण्याचा निवडणूक आयोगाला काय अधिकार?, हायकोर्टाचा संतप्त सवाल


पिंपरी चिंचवड महापालिका, मेट्रोरेल प्राधिकरण, राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला हायकोर्टानं खडसावलं


राज्य निवडणूक आयोगाला दुुपारपर्यंत खुलासा करण्याचे निर्देश जारी


पिपंरी चिंचवड येथील मेट्रो इकोपार्कमधील उद्यानाची जागा ताब्यात घेतल्याविरोधात पर्यावरणप्रेमींची हायकोर्टात याचिका


उद्यान लोकांसाठी बंद करून तिथं ईव्हीएम, व्हिव्हिपॅटसाठीचं गोदाम आणि ट्रेनिंग सेंटर उभारण्याचं काम सुरू


बांधकामाकरता इथं लावण्यात आलेली झाडंही तोडण्याची परवानगी मागितल्याचा याचिकेतून आरोप

Bhandara Rain : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात पुन्हा दमदार अवकाळी पाऊस.

Bhandara Rain : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात पुन्हा दमदार अवकाळी पाऊस.....


विजांचा कडकडाट....नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या प्रशासनाच्या सूचना....


मंगळवारी आलेल्या दमदार अवकाळी पावसानंतर एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा भंडाऱ्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे.


सकाळपासून मेघ दाटून आल्यानं सर्वत्र काळोख पसरला आणि त्यानंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं जिल्ह्यात हजेरी लावली.


दोन दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी जोरदार पावसाचा जिल्ह्यातील 157 गावातील 1519.50 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनानं तयार केला आहे. त्यानंतर आजच्या पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे

Navi Mumbai : आज तुर्भे स्टोर्स ते नेरुळ या ठिकाणी महायुतीची प्रचार रॅली सुरू 

Navi Mumbai : आज तुर्भे स्टोर्स ते नेरुळ या ठिकाणी महायुतीची प्रचार रॅली सुरू 


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळात रॅली मध्ये सामिल होतील 


महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचार रॅली मध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मनसे रिपाई पीआरपी आणि रासपा या सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत

Ratnagiri : दापोली मुरुड येथील साई रिसॉर्टचा अनधिकृत भाग अखेर पाडला 

Ratnagiri : दापोली मुरुड येथील साई रिसॉर्टचा अनधिकृत भाग अखेर पाडला 


उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार साई रिसॉर्ट चा तिसरा मजला हटवला


साई रिसॉर्ट चे मालक सदानंद कदम यांनी स्वतःहून पाडले बांधकाम 

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात कोपरगाव येथे पोहचणार, सभेपूर्वी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची घेणार भेट

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात कोपरगाव येथे पोहचणार..
सभेपूर्वी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची घेणार भेट..
कोल्हे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा करणार..
पालकमंत्री विखे यांच्या विरोधात आहे कोल्हेंची नाराजी..
नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस थेट कोल्हेंच्या घरी जाणार

Dharashiv : परांडा तालुक्यातील कुंभेफळ येथील मतदान बूथवर पोलीस कर्मचाऱ्याचा गोंधळ

Dharashiv : परांडा तालुक्यातील कुंभेफळ येथील मतदान बूथवर पोलीस कर्मचाऱ्याचा गोंधळ .....



मद्यधुंद अवस्थेतील पोलिस हवालदाराने मतदान केंद्रावर गोंधळ घातल्या प्रकरणी परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा....


लोककसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी परंडा हद्दीत गस्तीवर असणाऱ्या पोलिस हवालदार शंकर जयराम डोंगरे (रा.मालेगाव, जि. नाशिक) याने दारूच्या नशेत मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतोय..



 तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी परंडा तालुक्यातील कुंभेफळ येथील मतदान केंद्रावर नियुक्त असलेल्या पोलिसाने मध्ये धुंद अवस्थेत चांगलाच गोंधळ घातला होता, सार्वजनिक शांतता भंग केल्यामुळे .परंडा पोलिसांनी शंकर डोंगरे या पोलीस कर्मचाऱ्यावर पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे

IMD : पुढील 3 तासांत नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट, गारपीट, आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता

IMD नागपूर यांनी पुढील 3 तासांत नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट, गारपीट, आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिलाय.

Dharashiv : माजी.खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात धाराशिव जिल्ह्यातील मुस्लिम समाज आक्रमक!

Dharashiv : माजी.खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात धाराशिव जिल्ह्यातील मुस्लिम समाज आक्रमक!


सकल मुस्लिम समाजाची भूमआणि कळंब पोलिसात निवेदन देऊन कारवाईची मागणी


लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता शांत झाली मात्र... 



उस्मानाबाद .लोकसभा मतदार संघाचे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवलेल्या अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ एका सभेमध्ये माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील व जाती धर्मात तेढ निर्माण होईल वक्तव्य केल्याने,  जाती धर्मा च्या नावावर मते मागता येत नाही याची पूर्ण कल्पना असून देखील जाणून बुजुन धर्माच्या नावाने मते मागण्याचे काम रवींद्र गायकवाड यांनी करून निवडणूक आचारसंहितेचे  उल्लंघन केलं असल्याचा आरोप मुस्लिम समाजाकडून आरोप होत आहे

Anil Patil : शरद पवार यांनी पक्ष विलीनीकरणाबाबत केलेले वक्तव्य याचा आश्चर्याचा धक्का बसला - अनिल पाटील

Anil Patil : शरद पवार यांनी पक्ष विलीनीकरणाबाबत केलेले वक्तव्य याचा आश्चर्याचा धक्का बसला 


शरद पवारांच्या वक्तव्यानंतर झोप उडाली 


बरं झालं अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला 


काँग्रेस मध्ये जाण्यापासून आम्हाला लांब ठेवलं किंवा ते पाप आमच्या हातून घडू नये हा निर्णय अजित पवारांनी घेतला 


चुकून मुकून दोन तीन खासदार निवडून आले तर त्यांच्या आधारावर देशाचे राजकारण होऊ शकत नाही 


त्यामुळे संजय राऊत यांना हाताशी धरून शरद पवारांनी शिवसेना आपल्या मुठी मध्ये करून ठेवली 


आणि म्हणूनच येणाऱ्या काळात शिवसेनेसोबत काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे संकेत शरद पवारांनी दिले 

Ratnagiri : कोकण पदवीधर उमेदवारी महायुतीने मनसेचे वैभव खेडेकर यांना जाहीर करावी, मनसैनिकांची मागणी 

Ratnagiri : कोकण पदवीधर उमेदवारी महायुतीने मनसेचे वैभव खेडेकर यांना जाहीर करावी - मनसैनिकांची मागणी 


लवकरच राज ठाकरे यांची कोकणातील पदाधिकारी घेणार भेट 


पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्या असून येत्या 10 जूनला ही निवडणूक होणार असल्याचे जाहीर झाले आहे


राज्यातील चार मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना महायुतीने उमेदवारी द्यावी अशी मागणी कोकणातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे,

Ratnagiri : मुंबई पोलीस दलातील शिपाई विलास यादव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Ratnagiri : मुंबई पोलीस दलातील शिपाई विलास यादव यांच्यावर अंत्यसंस्कार


शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार 



विलास यादव मूळ खेड चा सुपुत्र


वरवली देऊळवाडी त्यांचे मूळ गाव


निवडणुकीच्या ड्युटीवर असताना झाले निधन


डोंबिवली येथे झाले अंत्यसंस्कार 

Pune : पुण्यात हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यानींचे त्यांना न विचारता फोटो, व्हिडिओ काढले, 2 जणांवर गुन्हा दाखल

Pune : पुण्यातील नामांकित सीओईपी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यानींचे त्यांना न विचारता फोटो, व्हिडिओ काढले


या प्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


अर्या गिरीश काळे आणि  विनीत सुराणा या दोघा जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


मिळालेल्या माहितीनुसार, आर्या आणि विनीत हे दोघे ही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आर्या हिने हॉस्टेलमधील विद्यार्थिनींचे चे चोरून व्हिडिओ फोटो काढून तिचा मित्र विनीत सुराणा याला पाठवले. या प्रकरणी आर्या आणि विनीत सुराणा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे


नेमके हे कृत्य त्यांनी का केले याचा तपास पोलीस करत आहेत..

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसची आज देखील 74 उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती 

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसची आज देखील ७४ उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती 


१३ मे पर्यंत एअर इंडिया एक्सप्रेसनं नवं शेड्युल्ड देत उड्डाणे कमी केल्याची माहिती 


दररोज एअर इंडिया एक्सप्रेसची जवळपास ३८० विमानं उड्डाणे घेतात 


१३ मे पर्यंत प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार 

Politics - उद्या इंडीया आघाडीचे शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेणार

Politics - आज संध्याकाळी इंडीया आघाडीचे नेते घेणार केंद्रीय निवडणुक आयुक्तांची भेट घेणार होते
- नव्याने मिळालेल्या माहितीनुसार ही भेट शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे 
- उद्या इंडीया आघाडीचे शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेणार

Politics : देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे आज शिर्डी लोकसभा मतदारसंघात

Politics : देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे आज शिर्डी लोकसभा मतदारसंघात


महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ कोपरगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलंय..


महायुतीच्या प्रचारापासून अलिप्त असलेल्या कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे आज प्रचारात सक्रिय होत आहेत..


पालकमंत्री विखे पाटलांमुळे नाराज असलेल्या कोल्हे यांची नाराजी दूर करण्यात भाजपच्या वरिष्ठांना यश आल्याने महायुतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसतेय..


कालच श्रीरामपूर येथे पार पडलेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर घणाघाती टिका केली होती..


आज श्रीरामपूर येथे ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी उध्दव ठाकरे यांची सभा होणार आहे..


त्यामुळे उध्दव ठाकरे कालच्या टिकेला काय उत्तर देतात हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे..


तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्यासाठी सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा कोपरगाव येथे सभा होणार आहे..


एकंदरीतच तिरंगी लढत होत असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात आज सभांचा धडाका बघायला मिळणार आहे.

Suhas Kande : तर भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, राष्ट्रवादी तुतारी चिन्हाचे काम करत असल्याचा आ.कांदे यांचा आरोप

Suhas Kande : तर भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा : आ.सुहास कांदे...


राष्ट्रवादी ( अजित पवार ) तुतारी चिन्हाचे काम करत असल्याचा आ.कांदे यांचा आरोप..


महायुतीचा धर्म न पाळता नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष हा विरोधी असलेल्या  ' तुतारी ' या चिन्हाचा प्रचार व प्रसार करीत आहे...


मंत्रीपदे महायुतीकडून घ्यायची अन् प्रचार आणि प्रसार मात्र महायुतीचा धर्म न पाळता करायचा यापेक्षा मंत्री भुजबळांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देवून खुशाल ' तुतारीचा प्रचार करावा असे जाहीर आव्हान आ.सुहास कांदे यांनी केले.

Pune : डेक्कन क्वीन रेल्वेच्या C 2 डब्याखाली पुणे ते मुंबई दरम्यानच्या प्रवासात आग लागली

Pune : डेक्कन क्वीन रेल्वेच्या C 2 डब्याखाली पुणे ते मुंबई दरम्यानच्या प्रवासात आग लागली.  


रेल्वेचे ब्रेक लावल्याने निर्माण झालेल्या घर्षणातुन ही आग लागली असण्याची शक्यता आहे.  


डेक्कन क्वीन कर्जत जवळ आली असता ही घटना घडली.  


त्यानंतर रेल्वेतील अग्नीशमन यंत्रणेद्वारै ही आग विझवण्यात आली आणि डेक्कन क्वीन मुंबईकडे मार्गस्थ झाली.

Pune : गैरसमजातून पुण्यात एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला, 3 जणांना अटक

Pune : गैरसमजातून पुण्यात एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला


पुण्यातील कोंढवा भागातील घटना


३ जणांना पोलिसांकडून याप्रकरणी अटक


मिळालेल्या माहितीनुसार, गुप्ता हे त्यांच्या पानाच्या दुकानात बसले होते. अचानक ३ अनोळखी व्यक्तींनी यांनी फिर्यादी यांच्या दुकानाजवळ येवून, फिर्यादी यांचे टपरीवरील सामान खाली फेकुन नुकसान करुन, त्यातील एकाने त्याचेजवळील कोयत्याने फिर्यादी यांच्यावर वार केले

मतदार संघाच्या निवडणुकाची तारीख पुढे ढकलण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी

मुंबई, कोकण, नाशिक शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकाची तारीख पुढे ढकलण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी


15 जून पर्यंत शाळांना सुट्टी असताना   10 जूनला अनेक शिक्षक परगावी असल्याने याचा फटका मतदानावर होण्याची  शक्यता


 मुंबई शिक्षक आणि पदवीधर  मतदारसंघ, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार संघात येत्या 10 जूनला या चार जागांसाठी निवडणुका पार पडणार आहेत 


 या संबंधित तारखा काल निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या... मात्र दहा जूनला निवडणुका घेतल्यास मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणावर घटनेची शक्यता असल्याचं महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रात सांगण्यात आला आहे 

Nashik - नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नावाने पोलिसांनी काढली तडीपारीची नोटीस

Nashik - नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नावाने पोलिसांनी काढली तडीपारीची नोटीस


- बडगुजरांचा नोटीस घेण्यास नकार 


- बडगुजर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत कायदेशीर सल्ला घेणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पाठ फिरताच ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याविरोधात नोटीस 


- सलीम कुत्ता डान्स प्रकरणी सुधाकर बडगुजर हे नाव राज्यभर आले होते चर्चेत 
-

 Raj Thackeray : राज ठाकरे यांची उद्या पुण्यात सभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही दुसरी सभा

 Raj Thackeray : राज ठाकरे यांची उद्या पुण्यात सभा...


उद्या सायंकाळी पाच वाजता सारसबाग येथे होणार राज ठाकरेंची सभा...


महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही दुसरी सभा...


आधी नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभा झाल्यानंतर उद्या पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे घेणार सभा...


उद्याच्या सभेसाठी राज ठाकरे मुंबईतून पुण्याकडे रवाना..

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसकडून सीक लिव्हप्रकरणी 25 वरिष्ठ क्रू मेंबर्सना कामावरून काढले 

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसकडून सीक लिव्हप्रकरणी 25 वरिष्ठ क्रू मेंबर्सना कामावरून काढले 


एअर इंडिया एक्सप्रेसच्या सूत्रांची माहिती 


सोबतच, आज एका टाऊन हाॅल मिटिंगचे देखील मॅनेजमेंटकडून आयोजन 


कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने १३ मे पर्यंत एअर इंडिया एक्सप्रेसकडून कमी उड्डाणांसह शेड्युल्ड

Mumbai : 17 मे च्या सभेसाठी शिवाजी पार्क मैदान कोणाला मिळणार? दोन्ही पक्षांकडून सभा घेण्यासाठी महापालिकेकडे अर्ज 

Mumbai : 17 मे च्या सभेसाठी शिवाजी पार्क मैदान कोणाला मिळणार?


 शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन्ही पक्षाकडून शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी महापालिकेकडे अर्ज 


परवानगी संदर्भात महापालिकेकडून अद्याप कुठलाही निर्णय नाही 


 2016 च्या  शासन निर्णयानुसार दोन्ही पक्षांचे अर्ज निवेदनासह राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याची महापालिकेची माहिती 


महाराष्ट्र राज्य नगर विकास विभाग यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने  शिवाजी पार्क मैदानासाठी सर्वात आधी अर्ज केल्याचा केलाय दावा 


शिवाजी पार्क मैदान न मिळाल्यास  बीकेसीतील मैदानाचा  दोन्ही पक्षांकडे पर्याय, मात्र आग्रह शिवाजी पार्क मैदानासाठी 


 17 मेला महाविकास आघाडी आणि महायुती  दोघांकडून होणार शक्तिप्रदर्शन आणि प्रचाराच्या सांगता सभेचे आयोजन

Ajit Pawar - भाजप बरोबर जाण्याची चर्चा झाल्याचं शरद पवार किमान आता मान्य करत आहेत - अजित पवार

Ajit Pawar - भाजप बरोबर जाण्याची चर्चा झाल्याचं शरद पवार किमान आता मान्य करत आहेत - अजित पवार
- ⁠सहा सहा मिटींग झाल्या भाजप सोबत. जायचे नव्हते तर मिटींग का झाल्या. - अजित पवार
- ⁠कधी कधी संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी ते असे विधान करतात. On पक्ष कॅाग्रेस मध्ये विलीन करण्याबाबत. - अजित पवार
- ⁠मला वाटत नाही उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष कॅाग्रेस मध्ये विलीन करतील.- अजित पवार
- ⁠शरद पवार यांना जे वाटतं तेच ते करतात. - अजित पवार
- निलेश लंके यांना परत घेतले नाही का… हे फक्त बोलण्यासाठी असतं. *राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कोणी कायमचा मित्र नसतो.- अजित पवार

Pune Crime : गाडीची लाईट चमकवली म्हणून 20 जणांच्या टोळक्याकडून 2 तरुणांना बेदम मारहाण, पुण्यातील प्रकार

Pune Crime : गाडीची लाईट चमकवली म्हणून 20 जणांच्या टोळक्याकडून 2 तरुणांना बेदम मारहाण


पुण्यातील कोंढवा परिसरात राडा


या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ आता समोर आला आहे


कोंढवा पोलिसांनी दोन्ही बाजूच्या 10 ते 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे

Dhule : धुळ्यात तरुणाचा मारहाणीत मृत्यू, आरोपीवर कारवाई करण्याची मागणी, काही जणांकडून पोलिसांच्या वाहनावर दगडफेक

Dhule Crime : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील एका तरुणाचा मृत्यू


या तरुणाला मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत काही जणांनी


मारहाण करणाऱ्यांच्या घरावर दगडफेक करण्यासह पोलिसांच्या वाहनावरही दगडफेक केल्याची घटना काल रात्री उशिरा घडली आहे


या  घटनेत पोलिसांच्या एका वाहनाची काच देखील फुटली आहे


या घटनेत थाळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक पावरा हे किरकोळ जखमी झाले आहेत

Bhandara : अवकाळीचा 157 गावातील 4373 शेतकऱ्यांना फटका

Bhandara Rain : अवकाळीचा 157 गावातील 4373 शेतकऱ्यांना फटका


सर्वाधिक फटका मोहाडी तालुक्याला


दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह आला होता अवकाळी पाऊस


याच्या नुकसानीचा प्राथमिक नजर अंदाज अहवाल जिल्हा प्रशासनानं तयार केला आहे.


यात १५७ गावातील १५१९.५० हेक्टर क्षेत्रातील शेती बाधित झालेली आहे.


यामुळं ४३७३ शेतकऱ्यांच्या शेतातील शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.


वादळी वाऱ्यासह आलेल्या या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका मोहाडी तालुक्याला बसल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे.


भात पिकांसह पालेभाजी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून हा प्राथमिक नजर अंदाज अहवाल आहे.


प्रत्यक्ष सर्व्हेक्षणानंतर नुकसानीच्या आकडेवारीत बदल होऊ शकतो.

Bhandara Fire : भंडाऱ्यातील बडा बाजार येथील बिसेन हॉटेलला भीषण आग, मोठ्या प्रमाणामध्ये धुराचे लोट पसरले

 


Bhandara Fire : भंडाऱ्यातील बडा बाजार येथील बिसेन हॉटेलला भीषण आग


अग्निशमन दलानं वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली


भंडारा शहरातील अगदी गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या बडा बाजार परिसरातील हॉटेल बीसेनला अचानक आग लागली.


आगीचे धूर पहाटे फिरायला निघालेल्या नागरिकांच्या लक्षात येताच अग्निशमन विभागाला याची माहिती देण्यात आली.


अग्निशमन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठत आगीवर वेळीच नियंत्रण मिळवलं.


लोकेश कारेमोरे यांच्या बिसेन हॉटेलच्या तिसऱ्या माळ्यावर शेव, चिवडा, खारा, मिठाई, डालडा स्टोअर असल्यानं तिथं ही आग लागली


खूप मोठ्या प्रमाणामध्ये धुराचे लोट बाहेर निघत होते


अशा वेळी काच फोडून वेंटिलेशन करण्यात आले. 


अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आग विझवली.


दरम्यान, हॉटेल मधील ७ एलपीजी व्यावसायिक गॅस सिलेंडर लगेच बाहेर काढल्यामुळे मोठी जीवित हानी टाळली. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.

Buldhana : बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात केवळ 17% टक्के पाणीसाठा शिल्लक.

Buldhana : बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात केवळ 17% टक्के पाणीसाठा शिल्लक.


बुलढाणाकरांना करावा लागणार भीषण पाणी टंचाईचा सामना..


बुलढाणा जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे..


अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे..


बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात आजघडीला केवळ 17 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची चिंताजनक माहिती आहे..


हा पाणीसाठा मे महिना पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक असल्याने बुलढाणा शहर वासियांना भीषण पाणी टंचाई चा सामना करावा लागणार आहे .. 



तर बुलढाणा शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन बुलढाणा नगर परिषदचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे..

Chandrakant Khaire : मुख्यमंत्र्यांच्या सभेला भाडोत्री गर्दी, पैसे देऊन लोकांना आणलेलं; चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप

Chandrakant Khaire : मुख्यमंत्र्यांच्या सभेला भाडोत्री गर्दी, पैसे देऊन लोकांना आणलेलं; चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप


 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बजाजनगर येथे झालेल्या जाहीर सभेला भाडोत्री गर्दी होती.


पैसे देऊन लोकांना आणण्यात आले होते


असा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी केला.


पैसे देऊन लोकांना आणण्यात आल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Sahil Khan : अभिनेता साहिल खानचा तुरूंगातील मुक्काम वाढला, न्यायालयाने आणखी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली

Sahil Khan : अभिनेता साहिल खानचा तुरूंगातील मुक्काम वाढला,


साहिल खानला बुधवारी न्यायालयाने आणखी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली


साहिल खान हा महादेव बेटिंग अॅप प्रकरणातील मुख्य आरोपीच्या संपर्कात असल्याचे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे


पोलिसांकडून साहिल खानने केलेले सर्व व्यवहारा संदर्भात बॅक व्यवहाराचा लेखाजोखा तपासणयात येत आहे.

Crime : महादेव बेटिंग अॅपशी संबधित 1 हजार कोटी रूपये शेअर मार्केटमध्ये गुंतवले, ईडीच्या तपासात समोर

 Crime : महादेव बेटिंग अॅपशी संबधित 1 हजार कोटी रपये आरोपीने बनावट कंपन्यांच्या मदतीने शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे


या प्रकरणात अटकेत असलेल्या सूरेश चौकानीच्या चौकशीतून काही कोटी हे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचे समोर आले आहे


तसेच या प्रकरणात हरी शंकर टिबरेवाल या व्यक्तीचे नावही समोर आले आहे. 


त्याने महादेव अॅपशी संबधित स्टाय एक्सचेजच्या अॅप माध्यमातून कोट्यावधची गुंतवणूक  शेअर बाजारात केल्याची माहिती ईडीच्या तपासात समोर



१ हजार कोटीच्या आसपासमधील रक्कम भारतातच काही बनावट कंपन्या, बनावट खाती बनवून भरले गेल्याचा ईडीला संशय


याच कंपन्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केल्याची काही कागदपत्रे ईडीच्या हाती लागल्याची सूत्रांची माहिती

Washim : वाशिम संत्रा पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात, संत्र बाग उपटून फेकली

Washim : वाशिम संत्रा पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात...


संत्र बाग फेकली उपटून.


विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत आल्याचं चित्र आहे.


संत्र्याला योग्य दर मिळत नसल्यानं वाशीमच्या पिपंळगाव बु येथील शेतकऱ्यानं आपली चार एक्कर क्षेत्रातील 6 वर्ष जपलेली संत्रा बाग थेट जेसीबी लावून 600 झाडे उपटून फेकली.


यावर्षी  शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या संत्र्यांना कवडीमोल दराने विक्री करावा लागतोय


भाव मिळत नाही, नैसर्गिक संकटात नेहमी बाग सापडते


त्यामुळे शेतकरी जुबेर खान यांनी दहा लाख रुपये खर्चून उभी केलेली संत्रा बाग अखेर उपटून फेकली

सोळाव्या वित्त आयोगाने (XVIFC) त्याच्या संदर्भ अटींशी संबंधित मुद्यांवर सर्वसामान्य नागरिक आणि संस्थांकडून मागवल्या सूचना

सोळाव्या वित्त आयोगाने (XVIFC) त्याच्या संदर्भ अटींशी संबंधित मुद्यांवर सर्वसामान्य नागरिक आणि संस्थांकडून मागवल्या सूचना


सोळाव्या वित्त आयोगाने (XVIFC) पुढे नमूद केल्यानुसार आयोगासाठीच्या संदर्भ अटींबद्दल, तसेच आयोग स्वीकारू शकेल अशा सामान्य दृष्टिकोनाबाबत सर्वसामान्य नागरिक, स्वारस्य असलेल्या संस्था आणि व्यक्तींकडून सूचना/विचार आमंत्रित केले आहेत. सोळाव्या वित्त आयोगाच्या कामाशी संबंधित अन्य मुद्यांवर देखील विचार मागवले आहेत.

Crime : विमान विक्रीच्या नावाखाली नेदरलॅन्डच्या कंपनीची साडे चार कोटींची फसवणूक 

Crime : विमान विक्रीच्या नावाखाली नेदरलॅन्डच्या कंपनीची साडे चार कोटींची फसवणूक 


आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतील वाहतूक कंपनीच्या एका संचालकाला बुधवारी केली अटक 


सुप्रीम ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशन प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक अमित अग्रवाल असे या अटक आरोपीचे नाव आहे


नेदरलॅन्ड येथील कंपनी  ट्रॅक' एअर बी व्ही चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिशेल नीफेल यांचे प्रतिनिधी विशाल शुक्ला यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. 


विमान खरेदी विक्रीत टप्या टप्याने पैसे उकळून व्यवहारातील विमानाबाबत कायदेशीर विवाद राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणासमोर सुरू असल्याचे अग्रवाल यांनी लपवून फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

Mumbai : शेअर रिक्षात सह प्रवाश्याकडून महिलेशी गैरवर्तन, भीतीने धावत्या रिक्षातून महिलेची उडी

Mumbai : शेअर रिक्षात सह प्रवाश्याकडून महिलेशी गैरवर्तन, भितीने धावत्या रिक्षातून महिलेने उडी घेतल्याची घटना बोरिवलीत घडली आहे


बोरिवली पश्चिमेकडील पोईसर येथून रेल्वे स्थानकासाठी शेअर रिक्षा आहेत. बुधवारी सकाळी पिडीत तरुणी रिक्षात बसली.


 रिक्षामध्ये आधीच एक प्रवासी बसलेला होता. रिक्षा बोरिवली रेल्वे स्थानकाकडे निघाली. रिक्षा सुरू होताच तरुणीशेजारी बसलेल्या व्यक्तीने तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला.


 सुरुवातीला तरुणीने दुर्लक्ष केले मात्र त्याचे चाळे थांबत नसल्याने तिने रिक्षाचालकाच्या निदर्शनास आणून त्याला रिक्षा थांबविण्यास सांगितले. 


त्याने तरुणीच्या विनंतीकडे लक्ष दिले नाही. रिक्षा चालकही थांबवत नसल्याचे पाहून तरुणीने धावत्या रिक्षामधून उडी मारली.


या घटनेत पिडीत तरुणीही किरकोळ जखमी झाली असून
 या घटनेची बोरिवली पोलिसांनी तत्परतेने दखल घेत, रिक्षाचालक आणि छेड काढणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली.

Weather Update : महाराष्ट्रात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा हवामान विभागाने वर्तवला अंदाज 

Weather Update : मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट


विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता 


महाराष्ट्रात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज 


हवामान विभागाने वर्तवला अंदाज 


पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाची हजेरी


काही भागात गारपीटही झाली

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.