Nita Ambani : नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरने एक मोठी घोषणा केली आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इंडिया वीकेंड' चा पहिलाच मोठा ऐतिहासिक कार्यक्रम होणार आहे. 3 दिवसांचा हा कार्यक्रम असणार आहे. भारताच्या समृद्ध वारशाचे उत्सव साजरा करणारा हा महोत्सव असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 12 ते 14 सप्टेंबर 2025 दरम्यान डेव्हिड एच. कोच थिएटर इथं हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
लिंकन सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स येथे होणाऱ्या या तीन दिवसांच्या कार्यक्रमात भारताची समृद्ध सांस्कृतिक कलाकृती जागतिक व्यासपीठावर सादर केली जाणार आहे. यामध्ये संगीत, नाट्य, फॅशन, पाककृती आणि परंपरांचा समावेश असणार आहे. एनएमएसीसीच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी या उपक्रमाबद्दल उत्साह व्यक्त केला आहे. नेहमीच जगातील सर्वोत्तम गोष्टी भारतात आणणे आणि भारतातील सर्वोत्तम गोष्टी जगासमोर आणणे हेच ध्येय असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
या विशेष शोने कार्यक्रमाची सुरुवात होणार
नीता अंबानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महोत्सवाची सुरुवात भारतातील सर्वात भव्य नाट्यनिर्मिती 'द ग्रेट इंडियन म्युझिकल: सिव्हिलायझेशन टू नेशन' च्या अमेरिकेतील प्रीमियरने होईल. ज्याचे दिग्दर्शन फिरोज अब्बास खान यांनी केले आहे. या शोमध्ये भारताचा 5000 ईसापूर्व ते 1947 स्वातंत्र्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. नृत्य, कला, फॅशन आणि संगीताचे अद्भुत प्रदर्शन या कार्यक्रमात पाहायला मिळेल.
प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्याकडून 'स्वदेश फॅशन शो' सादर होणार
12 सप्टेंबर रोजी वीकेंड सुरु होईल. या काळात, भारतातील सर्वात मोठ्या नाट्यनिर्मिती 'द ग्रेट इंडियन म्युझिकल: सिव्हिलायझेशन टू नेशन' चा बहुप्रतिक्षित अमेरिकन प्रीमियर लिंकन सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स येथील डेव्हिड एच. कोच थिएटरमध्ये होणार आहे. यासोबतच, उद्घाटन समारंभात प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्याकडून 'स्वदेश फॅशन शो' सादर केला जाईल. या प्रदर्शनात भारतातील प्रसिद्ध पारंपारिक विणकर आणि कुशल कारागीरांचे प्रदर्शन केले जाईल. प्रसिद्ध शेफ विकास खन्ना प्राचीन ते आधुनिक भारतीय पदार्थसादर करतील. पाहुण्यांना सर्वोत्तम भारतीय फॅशन आणि कपडे, स्वादिष्ट चव तसेच नृत्य, योग आणि संगीत अनुभवांची ओळख करून दिली जाईल.
महत्वाच्या बातम्या: