Dr. Narendra Dabholkar Case LIVE Updates: 11 वर्षांनी दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल; तीन आरोपी निर्दोष, तर दोन दोषी

Dabholkar Case Verdict LIVE: 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दाभोलकर यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या करण्यात आलेली. याचप्रकरणी आज निकाल जाहीर होणार आहे.

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 10 May 2024 11:24 AM
Dabholkar Murder Case Verdict LIVE : डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर दोषी; सश्रम जन्मठेपेची शिक्षा

Dabholkar Murder Case Verdict LIVE : डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणाचा निकाल आज जाहीर करण्यात आला. तब्बल 11 वर्षांनी प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला. याप्रकरणी तीन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं असून दोन आरोपींना दोषी ठरवलं गेलं आहे. प्रकरणातील आरोपी वीरेंद्रसिंह तावडेवर कट रचल्याचा आरोप होता, परंतु सरकारी पक्ष पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळे निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच, पुनाळेकर आणि भावे विरोधातही आरोप सिद्ध होत नाही, त्यामुळे त्यांनाही निर्दोष ठरवलं जात आहे. कळसकर आणि अंदुरे यांनी दाभोलकरांची हत्या केल्याचं सिद्ध होतंय, त्यामुळे दोघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

Narendra Dabholkar Case LIVE : 11 वर्षांनी दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल; तीन आरोपी निर्दोष, तर दोन दोषी

Narendra Dabholkar Case LIVE : 11 वर्षांनी दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल; तीन आरोपी निर्दोष, तर दोन दोषी

Narendra Dabholkar Case LIVE : डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणाच्या निकाल वाचनाला सुरुवात, न्याय मिळणार?

Narendra Dabholkar Case LIVE : तब्बल 11 वर्षांनी आज डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी निकाल दिला जाणार आहे. न्यायाधीशांनी निकाल वाचनाला सुरुवात केली आहे. 

Dabholkar Murder Case Verdict LIVE : दाभोलकर प्रकरणाचा निकाल; कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात

Dabholkar Murder Case Verdict LIVE : तब्बल 11 वर्षांनी आज दाभोलकर प्रकरणाचा निकाल. न्यायाधीश कोर्टरुममध्ये दाखल झाले असून कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. कोर्टारुममध्ये सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी, बचावपक्षाचे वकील प्रकश साळशिंगेकर, सीबीआयचे तपास अधिकारी, आरोपी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे कोर्टात उपस्थित आहे. 

Dr. Narendra Dabholkar Case Verdit : कोण होते डॉ. नरेंद्र दाभोलकर?

Dr. Narendra Dabholkar Murder Case LIVE Updates : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1945 रोजी सातारा जिल्ह्यात झाला. एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर डॉक्टर होण्याऐवजी त्यांनी समाजकार्यात स्वत:ला गुंतवून घेतले. 1982 सालापासून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत त्यांचा पूर्ण सहभाग होता. 1989 मध्ये त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. ही संस्था कोणत्याही प्रकारची सरकारी किंवा परकीय मदत न घेता काम करते. मात्र, अनेक कट्टर उजव्या विचारसरणीच्या संघटना त्यांना हिंदूविरोधी मानत होत्या. त्यांच्या हत्येनंतर गोविंद पानसरे, कर्नाटकात प्राध्यापक एमएम कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली.

Dabholkar Murder Case Verdict LIVE : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड खटला; न्यायाधीश पी.पी. जाधव कोर्ट परिसरात दाखल

Dabholkar Murder Case Verdict LIVE : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड खटला


पुणे सत्र न्यायालयतील विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश पी.पी. जाधव कोर्ट परिसरात दाखल

Narendra Dabholkar Case : डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा तपास सुरुवातीला चुकीच्या दिशेनं, नेमकं काय घडलेलं?

Narendra Dabholkar Case : अगदी दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेचा तपास होण्यासाठी सुरुवातीलाच चुकीच्या दिशेने झाला. या हत्येचा तपास जेव्हा पुणे पोलिसांकडून करण्यात येत होता तेव्हा त्यांनी चुकीच्या आरोपींना ताब्यात घेतलं. त्यानंतर हा तपास सीबीआयकडे गेला. सीबीआयकडून देखील या प्रकरणात चुकीचा तपास झाल्याचं समोर आलं. कारण सीबीआयने कोर्टात दावा केला होती सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी दाभोळकरांची हत्या केली.


काँब्रेड पानसरे, एम एन कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास कर्नाटक एआयटी करुन करण्यात येत होता. त्या तपासाच्या दरम्यान कर्नाटक एसआयटीच्या निदर्शनास आलं की, हे हत्याकांड करणारा गट एकच आहे. त्यामुळे कर्नाटक एसआयटीच्या तपासामधून उलघडा झाला की दाभोळकरांची हत्या ही शरद कळस्कर आणि सचिन अंधुरे या दोघांनी केली आहे. पण हा सगळा उलघडा होण्यासाठी 2018 उजाडलं. त्यामुळे सुरुवातीची पाच वर्ष हा तपास चुकीच्या दिशेने होत असल्याने या प्रकरणाचा खटलाच उभा राहिला नाही. 

Dr. Narendra Dabholkar Case LIVE: दाभोलकरांची हत्या नेमकी कशी झाली?

Dr. Narendra Dabholkar Murder Case LIVE Updates : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी कायमच अंधेश्रद्धेविरुद्ध आवाज उठवला होता. नेहमीप्रमाणे 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात मॉर्निंग वॉक गेले होते. मॉर्निंग वॉक ओटोपून घरी जात असताना मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. पुण्यातील विठ्ठल रामजी पुलावर दाभोळकरांची हत्या करण्यात आली होती. शरद कळस्कर आणि सचिन अंधुरे अशी मारेकऱ्यांची नावं असल्याचं पुढे तापासातून समोर आलं.


या दोघांनी पाठिमागून दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या. ही सर्व घटना या पुलावर सफाई काम करणाऱ्या दोघांनी आणि इतर काही लोकांनी प्रत्यक्षात पाहिली. त्यामुळे याच पुलावरुन अंनिसकडून निर्धार रॅली काढण्याचा अंनिसने घेतला.  दाभोळकरांनी कायमच पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला होता. त्यामुळे समाजातून त्यांच्यावर अनेकदा टीका टीपण्णी देखील केली जात होती. त्यामुळेच दाभोळकरांची हत्या झाली असल्याचं म्हटलं जातं. 

Narendra Dabholkar Murder Case LIVE : दाभोलकरांची हत्या कधी आणि कशी?

Narendra Dabholkar Murder Case : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 च्या सकाळी सव्वासातच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी अगदी जवळून त्यांच्यावर पिस्तुलाच्या गोळ्या त्यांच्यावर झाडल्या होत्या. ज्यात एक गोळी डॉ. दाभोलकरांच्या छातीत दुसरी डोक्यात गेली होती. दाभोलकरांच्या हत्येच्या घटनेनं महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली होती.


पुरोगामी महाराष्ट्रात अशाप्रकारे एखाद्या विचारवंताची हत्या होते, हे वास्तव कित्येकांना अस्वस्थ करणारे ठरलं. पण हत्येचं हे सत्र इथंच थांबलं नाही, त्यानंतर कालांतरानं कॉम्रेड गोविंद पानसरे (2015), एम.एम कलबुर्गी (2015) आणि पत्रकार गौरी लंकेश (2017) यांचीही अश्याचप्रकारे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आणि या सा-या हत्या एकमेकांशी कश्या जोडलेल्या आहेत?, याचा तपास अजुनही सुरूच आहे.

Narendra Dabholkar : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी काय निकाल येणार? न्याय मिळणार का?

Narendra Dabholkar : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी (Narendra Dabholkar Murder Case) पुणे सत्र न्यायालय आज आपला निकाल जाहीर करणार आहे. दाभोळकर यांच्या हत्येच्या 11 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागणार आहे. मात्र प्रत्यक्ष खटला 15 सप्टेंबर 2021 रोजी पुण्यातील विशेष न्यायालयात सुरू झाला होता. याप्रकरणी आपला राखून ठेवलेला निकाल शुक्रवारी 10 मे रोजी देण्यात येणार आहे. 


याप्रकरणी पाच आरोपींविरोधात खटला चालवण्यात आला. ज्यात वीरेंद्र तावडे, सचिन अंदूरकर, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांचा समावेश आहे. यापैकी संजीव पुनाळेकर व विक्रम भावे हे सध्या जामीनावर बाहेर आहेत.  विशेष सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव काय निकाल देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे.

Dabholkar Case LIVE : दाभोलकर प्रकरणी पुणे सत्र न्यायालय निकाल देणार

Dabholkar Murder Case LIVE : तब्बल 11 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागतोय. 20 ऑगस्ट 2013 या दिवशी सकाळी सव्वासात वाजता पुण्यात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दाभोलकर यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पाच आरोपींविरोधात खटला चालवण्यात आला. वीरेंद्र तावडे, सचिन अंदूरकर, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे हे आरोपी आहेत. यापैकी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे सध्या जामीनावर बाहेर आहेत. विशेष सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव काय निकाल देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. 

Dr. Narendra Dabholkar Case LIVE Updates : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी आज पुणे सत्र न्यायालय निकाल जाहीर करणार

Dr. Narendra Dabholkar Murder Case LIVE Updates : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पुणे सत्र न्यायालय आज निकाल जाहीर करणार, तब्बल 11 वर्षांनी लागणाऱ्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

Dabholkar Case LIVE : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा निकाल आज

Dabholkar Murder Case LIVE : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा निकाल आज लागणार आहे. तब्बल 11 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागतोय. 20 ऑगस्ट 2013 या दिवशी सकाळी सव्वासात वाजता पुण्यात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दाभोलकर यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पाच आरोपींविरोधात खटला चालवण्यात आला. वीरेंद्र तावडे, सचिन अंदूरकर, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे हे आरोपी आहेत. यापैकी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे सध्या जामीनावर बाहेर आहेत. विशेष सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव काय निकाल देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. 

पार्श्वभूमी

Dr. Narendra Dabholkar Murder Case: अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे. तब्बल 11 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागतोय, विशेष सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव काय निकाल देतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 


आज याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाकडून निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील सर्व अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.