Maharashtra News Updates 8th April 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे गटाचे मंत्री, आमदार अयोध्येत दाखल

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Apr 2023 11:16 PM
Mumbai News: मुंबईत दहशतवादी आल्याचा फोन खोटी माहिती देणारा, मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Mumbai News: मुंबईत तीन दहशतवादी आल्याची नियंत्रण कक्षाला कॉल करून खोटी माहिती देणाऱ्या अनोळखी इसमा विरुध्द मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्यात भादंविच्या 505(1), 505(2) आणि 182 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मुंबई पोलिसांनी या प्रकरणी प्राथमिक चौकशी केली असता तपासाअंती सदरचा कॉल हा खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता, कोणतीही भीती बाळगू नये आणि शांतता ठेवावी असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. 

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे गटाचे मंत्री, आमदार अयोध्येत दाखल

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे गटाचे मंत्री, आमदार अयोध्येत दाखल

आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा, तुकोबांची पालखीचे 10 जूनला प्रस्थान

Ashadhi Wari Palkhi : अखंड महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा झाली आहे. यंदा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 28 जूनला पालखी पंढरीत दाखल होईल तर आषाढी एकादशीच्या सोहळ्यात 29 जूनला तुकोबांची पालखी सहभाग घेईल अन प्रत्यक्षात याच दिवशी तुकोबा आणि विठुरायाची भेट घडेल. आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा होताच वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण पसरले असून आता ते पायी वारीच्या तयारीला लागला आहे.

Bhiwandi News : भिवंडी शहरातील टेमघर पाडा परिसरात अरिहंत सिटी सोसायटीमधील इमारतीला आग, 25 जण अडकल्याची भीती

Bhiwandi News : भिवंडी शहरातील टेमघर पाडा परिसरात अरिहंत सिटी सोसायटीमधील बी विंग इमारतीला  शॉकसर्किटने आग 


इमारतीत 20 ते 25 जण अडकले असल्याचे प्राथमिक माहिती


इमारतीत अनेक जण अडकून पडल्याने मदतीसाठी खिडकी गॅलरी तसेच टेरेसवरून हाक 


संपूर्ण इमारतीत धुराचे लोड पसरल्याने श्वास घेण्यास त्रास


भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल


अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे सर्दीचा प्रयत्न सुरू

Nashik sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार नाशिकमध्ये दाखल 

Nashik sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार हे दोन दिवसीय नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून आज मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे त्यांचे आगमन झाले. यावेळी छगन भुजबळ, समीर भुजबळ यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ नेते हेमंत टकले, माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार माणिकराव कोकाटे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Mumbai Local Mega Block Updates: तीनही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

Mumbai Local Mega Block Updates: उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत तांत्रिक कामं करण्यासाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पहिला ओपन वेब गर्डर टाकण्यासाठी कोपर आणि ठाकुर्लीदरम्यान पाचव्या सहाव्या मार्गिकेवर पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाउन मार्गावर तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रुज ते गोरेगांव अप-डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Mumbai News: तीन अतिरेकी मुंबईत आल्याचा मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन

Mumbai News: तीन अतिरेकी मुंबईत आल्याचा मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन


दुबईवरून शुक्रवारी पहाटे तीन अतिरेकी आल्याचं आणि त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा कॉलरचा दावा 


एकाचे नाव मुजीब सय्यद असून त्याचा मोबाईल नंबर आणि गाडीचा नंबर दिला पोलिसांना 


या इसमांचा दोन नंबरचा धंदा असल्याचा कॉलरने केला दावा 


 राजा ठोंगे नावाच्या इसमाने केला मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन 

Beed News: थकीत वेतन मिळन्यासाठी दुसऱ्या दिवशीही घंटागाडी कर्मचाऱ्यांच बीडच्या नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन सुरू

Beed News: बीडच्या नगरपालिकेमध्ये घंटागाडी वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केला आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. नगरपालिकेकडून देण्यात आलेल्या कचरा उचलण्या टेंडर गेल्या आठ महिन्यापूर्वी संपल असून अद्यापही या घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन मिळालेला नाही त्यामुळे त्यांनी बेमुदत काम आंदोलन सुरू केले असून नगरपालिकेसमोर ठिय्या मांडला आहे.

सप्तशृंगी देवीच्या यात्रेतून धुळे आगाराला सव्वा कोटींचे उत्पन्न
Dhule News : नांदुरी गडावरील सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातून जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यातून धुळे आगाराला एक कोटी 25 लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळाले असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यावेळी 25 लाख रुपयांचा महसूल अधिक मिळाला आहे. चैत्र पौर्णिमेनिमित्त नांदुरी गडावरील सप्तशृंगी देवीच्या गडावर खानदेशातून लाखो भाविक दरवर्षी दर्शनासाठी जात असतात या भाविकांसाठी एसटी महामंडळाच्या वतीने जादा बसेस सोडण्यात येतात. तसेच पदयात्रेने गडावर गेलेल्या भाविकांकडून परतीच्या प्रवासाला एसटीला पसंती देण्यात येते. चैत्र पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर 29 मार्च ते पाच एप्रिल दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातून जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. यातून 1 हजार 522 बसेसच्या फेऱ्या झाल्या असून दोन लाख 72 हजार 900 किलोमीटरचा प्रवास झाला आहे. या कालावधीत जवळपास 72 हजार प्रवाशांनी प्रवास केला असून यातून धुळे आगाराला एक कोटी 25 लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल 25 लाख रुपयांची वाढ झाली असून या माध्यमातून एसटीच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत झाली आहे.
Pune News: येरमाळा आणि तुळजापूरवरून देव दर्शन करून घराकडे निघालेली खाजगी ट्रॅव्हल्स बस पलटली

Pune News: येरमाळा आणि तुळजापूरवरून देव दर्शन करून घराकडे निघालेली खाजगी ट्रॅव्हल्स बस पलटली


पुणे सोलापूर महामार्गावरील मळद गावच्या हद्दीतील दुर्घटना


11 प्रवासी गंभीर जखमी


जखमींना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात हलविले


घटनास्थळी दौंड कुरकुंभ पोलिस दाखल


सर्व प्रवासी पुण्यातील असण्याची शक्यता


बसमध्ये 49 प्रवासी प्रवास करीत होते

Nashik Kushti : न्यायडोंगरी येथे पावसात रंगली कुस्त्यांची दंगल; राष्ट्रीय मल्ल देवेन थापा, सावेज पहेलवान यांची उपस्थिती

Nashik Wrestling in Rain : अवकाळी पावसाच्या सरी अंगावर बरसत असतांना कुस्तीच्या आखाड्यात दोन मल्ल एकमेकांना भिडले होते..असे दृश्य नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे पाहायला मिळाले. हनुमान जयंती निमित्त न्यायडोंगरी येथील ग्रामस्थांनी कुस्त्यांची दंगल आयोजित केली होती. या कुस्त्यांसाठी नेपाळ येथील राष्ट्रीय मल्ल देवेन थापा आणि उत्तराखंड येथील सावेज पहिलवान यांची उपस्थिती कुस्ती शौकिनांसाठी खास पर्वणी ठरली. ही कुस्ती बघण्यासाठी हजारो कुस्तीप्रेमींनी न्यायडोंगरी येथील लोकनेते कै.ॲड.विजय शिवराम आहेर हायस्कूलमध्ये मिळेल त्या ठिकाणी उभे राहून गर्दी केली होती.

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाची हजेरी

नांदेड जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावलीय, देगलूर-बिलोली आणि नायगांव तालुक्यात रात्री उशिरा पाऊस पडलाय. विजांच्या कडकडाटासह  वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झालाय. आजच्या या पावसामुळे उन्हाळी ज्वारी आणि हळदीच्या पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.

Kolhapur News : अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर एन आंबटकर यांची मृत्यूशी झुंज अपयशी

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश (Additional District Sessions Judge) आर एन आंबटकर (RN Aambatkar) यांची 18 दिवस मृत्यूशी दिलेली झुंज अपयशी ठरली आहे... 21 मार्च रोजी यड्राव फाटा या ठिकाणी मोटर सायकलने दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते..त्यानंतर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर गेल्या 18 दिवसांपासून उपचार सुरू होते... मात्र काल त्यांचा मृत्यू झाला... 21 मार्च रोजी रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी गेले होते... त्यावेळी यड्राव फाटा या ठिकाणी पाठीमागून एका मोटरसायकलने जोराची धडक दिली...रस्त्यावर आपटून आंबटकर यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली...रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली परंतु प्रकृती चिंताजनक होती... वैद्यकीय तज्ञांनी अखेरपर्यंत शर्तीचे प्रयत्न केले. मात्र त्यामध्ये डॉक्टरांना यश आलं नाही...हा अपघात आहे की घातपात या दिशेने पोलीस प्रशासन सूक्ष्म तपास करत आहेत...ज्या मोटरसायकलस्वाराने न्यायाधीश आंबटकर यांना धडक दिली त्याची पोलीस सखोल चौकशी करत आहेत...

Nagpur Rain : नागपुरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू

नागपुरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे..  


आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून नागपूरकरांना सूर्य दर्शन झालेले नाही... सकाळी 7 वाजल्या पासून हलक्या पावसाला सुरुवात झाली असून एप्रिल महिना असून ही वातावरणात गारवा जाणवत आहे...


काल संध्याकाळी ही मध्यम स्वरूपाचे पाऊस झाले होते... हवामान विभागाने गेल्या 24 तासात 13 मिलिमीटर पावसाची नोंद केली आहे...

Palghar News: राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार आज पालघर जिल्हा दौऱ्यावर

Palghar News: पालघर मधील मोखाडा येथील रयत शिक्षण संस्थेच्या नवीन इमारत उद्घाटन प्रसंगी राहणार उपस्थित. याच कार्यक्रमासाठी राज्याचे बांधकाम मंत्री आणि पालघर चे पालकमंत्री रवींद्र चव्हाण ही उपस्थित राहणार आहे. शरद पवार सकाळी 10 .30 वाजता कार्यक्रम स्थळी पोहोचतील. 

Sushma Andhare on Devendra Fadnavis: अंधारेनी केली फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

Sushma Andhare on Devendra Fadnavis: गृहमंत्री असताना जर अनिल देशमुख निष्पक्षपाती चोकशीसाठी राजीनामा देतात तेंव्हा स्वतःच्या बायकोच्या संदर्भाने चोकशी सुरू असताना फडणवीसांनी ही  राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी परभणीत केली आहे शिवाय त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आयोध्या दौऱ्यावर ही टीका करत अगोदर इथल्या आमच्या लेकी बाळीना आदराने आणि सन्मानाने वागवायला शिका नंतर कुठे जायचे ते जा असा टोलाही अंधारे यांनी लागवलाय.


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जनप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने सुषमा अंधारे आज परभणीत आल्या होत्या यावेळी त्यांनी आपली सभा संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणी सह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आयोध्या दौऱ्यावर टीका केली.
Dombivli News: डोंबिवली ठाकुर्ली 90 फीट रोडवर राडा

Dombivli News: डोंबिवली ठाकुर्ली रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास एका मद्यपी तरुणाने भर रस्त्यात एकच राडा घातला. या तरुणाने लाकडी दांडके हातात घेत रस्त्यावरून  येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना महिलांना लाकडी दांडक्याने मारहाण करत होता. जवळपास अर्धा तास या तरुणाचा राडा 90फिट रस्त्यावर सुरू होता. घटनेची माहिती मिळताच टिळक नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या तरुणाला ताब्यात घेतलं. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात दहशतीचा वातावरण पसरलं होतं. पवन केणे असं हा मद्यपी तरुणाचे नाव असून याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेत गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आजच्या दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवशीय आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री विमानाने आयोध्येसाठी रवाना होणार आहेत. राज्यात आज आवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात मुसळधार पाऊस आणि गारपीट... तर, कोल्हापूर,धुळे आणि छ. संभाजीनगरमध्ये हवामान विभागाकडून गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नई यांच्यात लढत होणार आहे. तसेच इतर अनेक महत्वाच्या घटना घडणार आहेत. जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी..


एकनाथ शिंदे आयोध्या दौऱ्यावर 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवशीय आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री विमानाने आयोध्येसाठी रवाना होणार आहेत. राज्यातून हजारो शिवसैनिक, आमदार, खासदार, मंत्री यांच्यासह मुख्यमंत्री रामलल्लाच्या दर्शनाला आयोध्येत पोहचले आहेत. शिवसेना नाव आणि धनुष्यबान चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांसह आयोध्या दौऱ्यावर येत आहेत... या दौऱ्याची शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आलीय. मुख्यमंत्री रविवारी रामलल्ला, हनुमान गढी दर्शन पूजन, मंदिराच्या बांधकाम जागेची पाहणी, शरयू आरती आणि लक्ष्मण किल्ला मंदिरात संतांचे आशीर्वाद घेणार आहेत. मुख्यमंत्री यांच्यासोबतच राज्यातून ठाणे आणि नाशिकमधून दोन ट्रेन्सदेखील रवाना झाल्या आहेत... या दोनही ट्रेन्समधून कार्यकर्ते आयोध्येत पोहचणार आहेत. आयोध्येत धनुष्यबान असलेले अनेक बॅनर्स लागले असून आजूनही बॅनर्स लावण्याच काम शिवसैनिकांकडून सुरू आहे... 3 हजार पेक्षा जास्त शिवसैनिक आयोध्येत येणार असल्यानं त्यांच्या रहाण्यासाठी धर्मशाळा आणि हॉटेल्सचं बुकिंग करण्यात आलयं. 


राज्यात सर्वदूर अवकाळी पावसाचा धुमाकूळ 


राज्यात सर्वदूर अवकाळी पावसाचा धुमाकूळ घातला आहे.  मदतीच्या प्रतीक्षेतील बळीराजाची पुन्हा दैना झाली आहे. विदर्भात मुसळधार पाऊस आणि गारपीट... तर, कोल्हापूर,धुळे आणि छ. संभाजीनगरमध्ये हवामान विभागाकडून गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. आजही राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जेनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे... तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.... तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीय.


आशिष देशमुख अजित पवारांच्या भेटीला 
पुणे – काँग्रेसमधून निलंबीत झालेले नेते आशिष देशमुख घेणार विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट... देशमुख राष्ट्रवादीत जाणार अशा चर्चा सुरू असताना होत असलेली ही भेट महत्वाची आहे. 


नागपुरात आज महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची बैठक
नागपूर -  नागपुरात आज महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची बैठक... 16 एप्रिल रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या सभेच्या तयारी संदर्भात ही बैठक होणार आहे... या बैठकीत नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व आमदार आणि स्थानिक नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे स्थानिक नेते उपस्थित राहणार आहे...  ही बैठक दुपारी 3.30 वाजता जट्टेवार सभागृहात होणार आहे...


पुणे  - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत  मावळमध्ये जाहीर मेळावा


नाशिक - पालकमंत्री दादा भुसे सकाळी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाई आढावा बैठक घेणार आहेत... त्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस शासकीय वाहनांचे उदघाटन करून मुंबईकडे रवाना होणार आहेत.


नाशिक - नाशिक करन्सी नोटप्रेसच्या हिंदू मजदूर सभेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार दुपारी 3 वाजता लावणार हजेरी


सांगली – सांगलीत आजपासून तिसऱ्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेला मिरजमध्ये सुरूवात होणार...  यामध्ये 17 राज्यातील 250 हुन अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपट्टू सहभागी होणार आहेत... दोन दिवस ही स्पर्धा चालेल. 


पालघर – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पालघर जिल्हा दौऱ्यावर... सकाळी मोखाडा येथील रयत शिक्षण संस्थेच्या नवीन इमारत उद्घाटन प्रसंगी राहणार उपस्थित... याच कार्यक्रमासाठी राज्याचे बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाणही उपस्थित असणार... त्यानंतर पवार नाशिक दौऱ्यावर जाणार


वाराणसी – भोजपुरी फिल्म अभिनेत्री अकांक्षा दुबे मृत्यूप्रकरणी अटक केलेला गायक समर सिंहला आज कोर्टात हजर करणार


हैद्राबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तमिळनाडू आणि तेलंगणा दौऱ्यावर... अनेक कामांच करणार उद्घाटन... सिकंदराबाद – तिरूपती वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार


वंचितचे इफ्तार पार्टीचे आयोजन
मुंबई -  वंचितच्या वतीने सायंकाळी 6 वाजता इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले असून वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन खान उपस्थित असतील... सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती असेल... ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाल्यानंतर भविष्यातली रणनीती नेमकी कशी असणार आहे, सुजात आंबेडकर नेमकं सध्या काय करताय, आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे काय भूमिका असेल अशा विविध मुद्द्यांवर वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांची मुलाखत करतो.


पंढरपूर -  सांगोला येथे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाला सुरुवात होणार... सकाळी ग्रंथदिंडीने सुरुवात होईल...  सकाळी 11.30 वाजता मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घघाटन होणार आहे... या सोहळ्याला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती आहे... आमदार शहाजीबापू पाटील स्वगताध्यक्ष आहेत


मनमाड - आजपासून  नांदगाव रेल्वे स्थानकावर कामायनी, कुशीनगर व जनता एक्सप्रेस या तीन गाड्यांचे थांबे पूर्ववत होणार असल्याने केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार ह्या नांदगाव येथे हिरवा झेंडा दाखवणार आहेत


अहमदनगर - भाजप आणि शिवसेना तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी यांच्या वतीने अहमदनगर शहरातून सकाळी 10 वाजता 'स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा'  काढली जाणार आहे... छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या गौरव यात्रेला सुरुवात होईल... खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत ही गौरव यात्रा होणार आहे.


शिर्डी -  गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित नाईट लँडिंग सुविधेला आज शिर्डी विमानतळावर सुरवात होणार असून दिल्लीहुन पहिलं विमान शिर्डी विमानतळावर दाखल होणार आहे... अवघ्या काही वर्षात शिर्डी विमानतळाला मोठा प्रतिसाद मिळत असून नाईट लँडिंग सुविधेनंतर साईभक्तांना 24 तास शिर्डीत येता येणार आहे


आयपीएलमध्ये डबल धमाल -


आयपीएलमध्ये आज दोन लढती होणार आहेत. यामध्ये चेन्नई आणि मुंबई यांच्या लढतीकडे सर्व क्रीडाप्रेमींचं लक्ष असणार आहे. मुंबई वानखेडे स्टेडिअमवर दोन वर्षानंतर खेळत आहे. मुंबई पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामना आज सायंकाळी होणार आहे. तर दुपारी राजस्थान आणि दिल्ली यांच्यामध्ये लढत होणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.