Pratap Sarnaik : पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील (Swargate bus rape case) अहवाल अधिकाऱ्यांनी असादर केला आहे. या अहवालात नेमकं काय आहे, याबाबतची माहिती मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी विधानसभेत सांगितली. स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये महिलेवर दत्तात्रय गाडे (Dattatreya Gade) या आरोपीनं महिलेवर अत्याचार केला होता. यानंतर पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेला अटक केली होती.
नेमकं काय म्हणाले प्रताप सरनाईक?
दरम्यान, आज मंत्री प्रताप सरनाईत यांनी विधानसभेत या प्रकरणासंदर्भात अहवालातील माहिती दिली. याप्रकरणी आगार प्रमुखांनी हलगर्जीपणा दाखवली म्हणून चौकशी करून दोषी आढळल्यास निलंबित करण्याचे आदेश दिले होते. तसेच 22 सुरक्षा रक्षकांना तात्काळ बदलून नवे सुरक्षा रक्षक नेमण्याचे निर्देश दिले होते. वरिष्ठ आगार निरिक्षक, कनिष्ठ निरिक्षक, सहाय्यक वाहतूक अधिक्षक अशा चार अधिकाऱ्यांना निलंबित केले असल्याचे सरनाईक म्हणाले. जयेश पाटील, वरिष्ठ आदर व्यवस्थापक तसेच कनिष्ठ वाहतूक व्यवस्थापक, आणखी दोन अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळं ही घटना घडली आहे. चारही कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचे सरनाईक म्हणाले. यापुढे हलगर्जीपणा केल्यास शिक्षेला सामोरे जावे लागेल. ही खरी शिवशाही आहे. अशा घटना घडल्या तर चुकीला माफी नाही हेच सांगायचे आहे असे सरनाईक म्हणाले.
गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड
या प्रकरणातील नराधम आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती आहे. तर या नराधमाने याआधी देखील महिलांना, तरूणींना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती असल्याची माहिती आहे. गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात दिसून आले आहे. त्याने बलात्काराच्या या घटनेव्यतिरिक्तही काही मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यासाठी तो आपण पोलिस असल्याचे भासवायचा. त्याच्या संपर्कामध्ये आलेल्या राजकीय व्यक्ती आणि पोलिस कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे. दत्ता गाडेवरती आत्तापर्यंत सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या शक्यतेनुसार, आरोपी दत्तात्रय गाडे सातत्याने स्वारगेट बस स्टँडवर वारंवार जात असावा. त्यामुळे त्याला परिसरातील पूर्ण माहिती होती. त्याचाच फायदा घेऊन त्याने पीडित तरुणीला एसटी स्टँडवरील निर्जनस्थळी घेऊन जाऊन बलात्कार केल्याचीशक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या: