Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळीचा कहर, शेती पिकांना मोठा फटका; तर वादळी वाऱ्यामुळं कार्यक्रमात अडथळा


Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rains) थैमान घातलं आहे. या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी होत आहेत. त्यामुळं बळीराजा संकटात सापडला आहे. राज्यातील नंदूरबार, बुलढाणा, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात अवकाळी पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. त्यामुळं कांदा, मका, भाजीपाला यासह फळपिकांचं मोठं नुकसान झालं आहे.


बुलढाणा  जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस, बळीराजा संकटात.


बुलढाणा जिल्ह्यात मागील आठवड्यापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या शेतात असलेले कांदा, मका, भाजीपाला, फळबाग या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, मेहकर तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा जीव पुन्हा टांगणीला लागला आहे.


Honeytrap: पुण्यातील DRDO संचालकांना एटीएसकडून अटक, हनिट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला माहिती दिल्याचा संशय


Pune DRDO Director Arrested : पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या अर्थात डीआरडीओच्या संचालकाला एटीएसकडून अटक करण्यात आली आहे. हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला काही संवेदनशील माहिती दिल्याचा संशय  एटीएसला संशय आहे. एटीएसने त्यांच्यावर मुंबईमध्ये गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास आता पुणे पोलिस करत आहेत. डॉ. प्रदीप कुरुलकर असं अटक केलेल्या संचालकांचं नाव आहे.


डीआरडीओ ही संस्था देशाच्या लष्करासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या हत्यारांची निर्मिती करते. या संस्थेच्या पुण्यातील संचालकांना अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संचालकाने व्हिडीओ चॅटच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षेसंबंधी संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करुन एटीएसने त्यांना अटक केली आहे. 


पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या संचालकांनी त्यांच्या कार्यालयामधून पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटीव्ह (PIO) चे हस्तक असलेल्या व्यक्तीसोबत ही संवेदनशील माहिती शेअर केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअॅपद्वारे व्हाईस मेसेज, व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्कात राहिले असल्याची माहिती आहे. त्यानंतर दहशतवादी विरोधी पथकाने त्यांच्यावर कारवाई केली आहे.