Maharashtra News Updates: मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी ठाकरे गटाचेच कार्यकर्ते रोशनी शिंदेला मारतील, तिला संरक्षण द्यावे : मीनाक्षी शिंदे

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Apr 2023 09:32 PM
सचिन वाझेची जेलमधून सुटका नाहीच, माफीचा साक्षीदार या नात्याने जेलमधून सुटका मागत केलेला अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला
No Relief For Sachin Waze : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनलेल्या सचिन वाझेची जेलमधून सुटका करण्याची मागणी मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश एस.एच. गवलानी यांच्यापुढे वाझेच्या या अर्जावर सुनावणी झाली. सचिन वाझेने या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याकरता तयारी दर्शवली होती. त्याला सीबीआयने ना हरकत दिल्यावर कोर्टानेही मान्यता दिलेली आहे. याच पार्श्वभूमीवर जर आपण कारागृहात राहिलो तर मग माफीचा साक्षीदार होण्याचा उद्देश नष्ट होऊ शकतो, असा युक्तिवाद वाझेकडून या अर्जाद्वारे कोर्टाकडे करण्यात आला होता. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या अनिल देशमुखांसह त्यांचे निकटवर्तीय संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र आपल्याला अजूनही आरोपीच समजलं जातंय असा दावा वाझेनं या अर्जातून केला होता. मात्र सचिन वाझेला याप्रकरणी एक आरोपी म्हणून अटक केली होती. त्यामुळे आता जोपर्यंत तो दोषमुक्त किंवा निर्दोष सुटत नाही तोपर्यंत त्याला आरोपीच समजलं जाईल अशी भूमिका घेत सीबीआयने या अर्जाला केलेल्या विरोध केला होता. जो ग्राह्य धरत विशेष सीबीआय कोर्टानं वाझेचा हा अर्ज फेटाळून लावला.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात कंटेनर-टिप्पर समोरासमोर धडकले, दोघांचा जागीच मृत्यू

Gadchiroli Accident : कंटेनर आणि टिप्परची समोरासमोर धडक झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यातील डोंगरगाव पाटी इथे घडली. बुधवारी दुपारी कोरची-कुरखेडा मार्गावर कंटेनर महाराष्ट्रात येत होता, तर टिप्पर छत्तीसगडकडे जात होते. डोंगरगावजवळ पाटीजवळील घाटात या दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात झाला. ही धडक एवढी जबरदस्त होती की टिप्पर रस्त्याच्या मधोमध उलटला तर कंटेनरच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, याचवेळी त्या ठिकाणाहून दोन दुचाकी समोरासमोर आल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. तिघांनाही कुरखेडा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात दाखल करण्यात आले होते. अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

Pune News: आमदार महेश लांडगे यांना मागितली 30 लाखाची खंडणी; व्हॉट्सअॅपवर मेसेजद्वारे केली मागणी

Pune News:  पिंपरी चिंचवडमधील भाजपाचे आमदार महेश लांडगे यांना तीस लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आलीये. न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. लांडगे यांच्या कार्यालयातील मोबाईल नंबरच्या व्हाट्सएपवर मेसेज आला. त्या मेसेजमध्ये तीस लाखांची रक्कम पाठवण्यासाठी बँक खाते नंबर तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आमदार लांडगे यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी परिवर्तन हेल्पलाईन सुरू केलीये. त्यासाठी नागरिकांना पुरविण्यात आलेल्या नंबरवर मंगळवारी सायंकाळी हा मेसेज आला.

Bhandara News: तीन हजारांच्या लाचेसह पोलीस शिपायाला अटक; भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.....

Bhandara News:  जुगार अड्ड्यावर करण्यात आलेल्या कारवाईतून दुचाकी सोडण्यासाठी भंडाऱ्यातील कारधा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सचिन गजानन बुधे याने 5 हजारांची लाच मागितली. त्यातील 3 हजारांची लाच स्वीकारताना भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अंमलदार शिपाई सचिन बुधे याला कारधा पोलीस ठाण्यातच रंगेहाथ अटक केली. या कारवाईनं पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. 

Bhandara News: तीन हजारांच्या लाचेसह पोलीस शिपायाला अटक; भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.....

Bhandara News:  जुगार अड्ड्यावर करण्यात आलेल्या कारवाईतून दुचाकी सोडण्यासाठी भंडाऱ्यातील कारधा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सचिन गजानन बुधे याने 5 हजारांची लाच मागितली. त्यातील 3 हजारांची लाच स्वीकारताना भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अंमलदार शिपाई सचिन बुधे याला कारधा पोलीस ठाण्यातच रंगेहाथ अटक केली. या कारवाईनं पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. 

Nitesh Rane: स्वा. सावरकरांवर मी केलेली टीका गैरसमजातून; सावरकर कळल्यामुळे त्यांचा प्रचार करतोय: नितेश राणे

Nitesh Rane :  मला सावरकर उशिरा कळले आणि आता मला सावरकर कळल्यामुळे मी ही सावरकरांबद्दल प्रचार करत फिरतोय. आता जसं बोललो माझ्या मनामध्ये पण गैरसमज होते, पण मी ते गैरसमज दूर करून अभ्यास केला, समजून घेतलं आणि आज मी बोलतोय की मलाही सावरकरांचे विचार पटतात. 

धुळे-सोलापूर महामार्गावर दुचाकी आणि कारचा अपघात, दुचाकीस्वार जखमी

धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर गेवराई जवळ झालेल्या दुचाकी आणि कारच्या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.. गेवराईतून जाणाऱ्या बायपासवर हा अपघात झाला असून बीडकडे येणाऱ्या एका कारणे दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. सहा किलोमीटर असलेल्या या बायपास वर रस्ता ओलांडण्यासाठी सुविधा नसल्याने अनेक वेळा दुचाकीस्वार डिव्हायडरवरून रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्यामुळे स्थानिकांनी या ठिकाणी रस्ता ओलांडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

Thane News : हिंमत असेल तर 48 तासांत 'मातोश्री'वर या...सुषमा अंधारे यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आव्हान

Thane News :  हिंमत असेल तर 48 तासांत 'मातोश्री'वर या...असे आव्हान शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले आहे.

Thane Thackeray Sabha: हिंमत असेल तर मातोश्रीवर या; सुषमा अंधारे याचं बावनकुळेंना आव्हान

बावनकुळे म्हणतात की उद्धव ठाकरेंना घरातून बाहेर पडू देणार नाही, हिंमत असेल तर त्यांनी येत्या 48 तासात मातोश्रीवर या, मग बघू असं जाहीर आव्हान शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिलं आहे. बावनकुळेंमध्ये उद्धव ठाकरेंना घरी बसवण्याची ताकद असेल तर त्यांचं तिकीट फडणवीसांनी का कापलं? असा सवालही त्यांनी विचारला.

हनुमान जयंतीच्या पार्शवभूमीवर नागपूरमध्ये कलम 144 लागू, आज मध्यरात्रीपासून पुढच्या 24 तासासाठी जमावबंदी

Nagpur Hanuman Jayanti Section 144 : हनुमान जयंतीच्या पार्शवभूमीवर नागपूरमध्ये कलम 144 लागू.


आज मध्यरात्रीपासून पुढच्या 24 तासासाठी ही जमावबंदी लागू असणार आहे.


या काळात शहराती मध्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेशात काढण्यात आले.


अनोळखी व्यक्तीला आधार कार्ड शिवाय हॉटेल रुम देण्यास मज्जाव घालण्यात आला आहे.


राज्यातील वाढता धार्मिक तेढ बघता नागपूर पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.

हनुमान जयंतीच्या पार्शवभूमीवर नागपूरमध्ये कलम 144 लागू, आज मध्यरात्रीपासून पुढच्या 24 तासासाठी जमावबंदी

Nagpur Hanuman Jayanti Section 144 : हनुमान जयंतीच्या पार्शवभूमीवर नागपूरमध्ये कलम 144 लागू.


आज मध्यरात्रीपासून पुढच्या 24 तासासाठी ही जमावबंदी लागू असणार आहे.


या काळात शहराती मध्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेशात काढण्यात आले.


अनोळखी व्यक्तीला आधार कार्ड शिवाय हॉटेल रुम देण्यास मज्जाव घालण्यात आला आहे.


राज्यातील वाढता धार्मिक तेढ बघता नागपूर पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.

हनुमान जयंतीच्या पार्शवभूमीवर नागपूरमध्ये कलम 144 लागू, आज मध्यरात्रीपासून पुढच्या 24 तासासाठी जमावबंदी

Nagpur Hanuman Jayanti Section 144 : हनुमान जयंतीच्या पार्शवभूमीवर नागपूरमध्ये कलम 144 लागू.


आज मध्यरात्रीपासून पुढच्या 24 तासासाठी ही जमावबंदी लागू असणार आहे.


या काळात शहराती मध्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेशात काढण्यात आले.


अनोळखी व्यक्तीला आधार कार्ड शिवाय हॉटेल रुम देण्यास मज्जाव घालण्यात आला आहे.


राज्यातील वाढता धार्मिक तेढ बघता नागपूर पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.

भाजपमध्ये शंभरावर महाविकास आघाडीमधील कार्यकर्त्यांचा प्रवेश; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची माहिती 

भाजपमध्ये शंभरावर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. यावेळी आजचा सामना दैनिक हाती घेऊन त्यामधील  भाषेवरून न्यायालयात जाणार असल्याचे राणे यांनी म्हटले आहे. 

ठाणे : रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी ठाकरे गटाचा थोड्याच वेळात मोर्चा; पोलिसांना जाब विचारणार 

ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे गटातील महिला पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदेंना मारहाण केल्यानंतर ठाकर गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाकडून पोलिस आयुक्तालयावर आज मोर्चा धडकणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व आदित्य ठाकरे करणार असून आमदार जितेंद्र आव्हाडही उपस्थित राहणार आहेत. तसेच स्थानिक आमदारही असतील, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. पोलिस जनतेचे रक्षणकर्ते की शासनाचे पालनकर्ते आहेत? याचा पोलिसांना जाब विचारणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. 

केडीएमसीच्या बारावे येथील कचरा प्रकल्पाला आग, सुका कचरा पेटला, परिसरात धुराचे साम्राज्य 

Kalyan Dombivli News : केडीएमसी च्या बारावे येथील कचरा प्रकल्पाला आग


सुका कचरा पेटला, परिसरात धुराचे साम्राज्य 


अग्निशमन विभागाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल


आगीवर  नियंत्रण मिळण्याचे प्रयत्न सुरु

कर चुकवेगिरी प्रकरणी अनिल अंबानींना मुंबई उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा कायम

अनिल अंबानींना मुंबई उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा कायम


अनिल अंबानींविरोधात 28 एप्रिलपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे प्राप्तिकर विभागाला निर्देश


स्विस बँकेतील दोन खात्यांत 814 कोटी रुपयांहून अधिक रक्कम ठेवत 420 कोटींची कर चुकवेगिरी केल्याचं प्रकरण


याप्रकरणी प्राप्तिकर विभागानं अनिल अंबानींना ऑगस्ट 2022 मध्ये बजावलेल्या नोटीशाला हायकोर्टात आव्हान 


साल 2015 मध्ये तयार झालेल्या कायद्यानुसार साल 2006-07 आणि 2010-11 मधील व्यवहाराचे तपशील कसे मागितले जाऊ शकतात?, अंबानींचा सवाल

Maharashtra News: रवींद्र वायकरांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू

Maharashtra News: रवींद्र वायकरांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू


सत्ताधारी आणि विरोधक आमदारांच्या निधी वाटपात कोणतीही तफावत नाही


यासंदर्भातील समितीच्या शिफारशीनुसारच निधी वाटप झालेलं आहे


साल 2022 च्या बजेटनुसारचं हा निधी वितरीत केलाय, ज्याचा याचिकाकर्ता आमदार या नात्यानं एक भाग होते


राज्य सरकारची प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयात माहिती


महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी दाखल केलं प्रतिज्ञापत्र 


याचिकेला राज्य सरकारचा विरोध, याचिका फेटाळून लावण्याची मागणी


याप्रकरणी रिट नाही तर जनहित याचिका दाखल होते - राज्य सरकार


उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची हायकोर्टात याचिका


याचिकेची दखल घेत तूर्तास राज्य सरकारच्या आमदार निधी वाटपावर हायकोर्टानं दिली आहे स्थगिती

Mumbai News: शिवाजी पार्क परिसरातील धुळीवर तोडगा काढण्यासाठी शिंदे गट आणि मनसेचा पुढाकार

Mumbai News: एबीपी माझाने शिवाजी पार्क धुळीमुळे होणारे प्रदूषण आणि त्यामुळे स्थानिक रहिवाशांना होणारा त्रास समोर आणल्यानंतर


शिवाजी पार्क येथील धुळीच्या प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला पुढाकार


सात एप्रिल ला शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक खासदार राहुल शेवाळे आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे हे शिवाजी पार्क येथील रहिवाशांची खुली बैठक घेणार


या बैठकीला मुंबई महापालिका अधिकारी सुद्धा उपस्थित राहणार


शिवाजी पार्क येथे होत असल्यास धुळीच्या प्रदूषणामुळे रहिवाशांना मोठा त्रास होत असून श्वसनाचे आजार सुद्धा जडत आहे.


त्यामुळे या सगळ्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी रहिवाशांसोबत बैठक घेतली जाणार असून प्रशासनासोबत सुद्धा चर्चा केली जाणार आहे.

Hasan Mushrif: मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात हसन मुश्रीफांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी सुरू

हसन मुश्रीफांच्या अटकपूर्व जामीनावरील निकालाचं वाचन अद्याप पूर्ण नाही


आज संध्यकाळपर्यंत निकाल जाहीर न झाल्यास पुढची तारीख दिली जाईल


तोपर्यंत मुश्रीफांना अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम करण्यात येईल - कोर्ट


मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुरू आहे सुनावणी

Thane News: ठाणे स्थानकात लवकरच हेलिपॅड उभारण्यात येणार

Thane News: ठाणे स्थानकात लवकरच हेलिपॅड उभारण्यात येणार आहे. अपघात झाल्यास जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करता यावं, यासाठी ठाणे स्थानकातील नव्या व्यावसायिक इमारतीच्या छतावर हेलिपॅड तयार करण्यात येणार आहे. ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासाचा आराखडा रेल्वे विकास भूमी प्राधिकरणाने तयार केला असून त्यात फलाटावर अतिरिक्त जागेच्या निर्मितीचे नियोजन करण्यात आलेले आहे. ठाणे स्थानकावरील फलाटावर 55 हजार चौरस मीटरचे डेक उभारण्यात येणार आहेत. स्थानकातील अतिरिक्त गर्दी नियंत्रणासाठी सशुल्क आणि मोफत क्षेत्र उभारण्यात येणार आहे.

हसन मुश्रीफांच्या अटकपूर्व जामीवरील निकालाचं वाचन अद्याप पूर्ण नाही

हसन मुश्रीफांच्या अटकपूर्व जामीवरील निकालाचं वाचन अद्याप पूर्ण नाही


आज संध्यकाळपर्यंत निकाल जाहीर न झाल्यास पुढची तारीख दिली जाईल


तोपर्यंत मुश्रीफांना अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम करण्यात येईल - कोर्ट


मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुरू आहे सुनावणी

Maharashtra News: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिलासा मिळण्याची शक्यता

Maharashtra News: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिलासा मिळण्याची शक्यता


सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना मदत देण्याच्या संदर्भात आज निकष ठरणार


या मदतीचे निकष ठरवण्यासाठी अप्पर मुख्य सचिव नियोजन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती


ही समिती आपला अहवाल मंत्रीमंडळ बैठकीच्या समोर ठेवणार


या अहवालातील कोणत्या तरतुदी स्वीकारायच्या यावर मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय होणार

कणकवलीतील स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या पार्श्वभूमीवर नीतेश राणेंनी सावकारांवर केलेली ट्विट विरोधकांकडून व्हायरल
स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा आज कणकवलीत काढण्यात येत आहे. मात्र या गौरव यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आमदार नीतेश राणेंनी जुनी ट्विट व्हायरल केली जात आहेत.

 

कणकवली मधील स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे नेतृत्व आमदार नीतेश राणे करणार आहेत याचं पार्श्वभूमीवर नीतेश राणेंनी सावकारांवर केलेली ट्विट विरोधकांकडून व्हायरल केली जात आहेत.
Beed News: कुटुंबाला आनंदी ठेवू शकत नाही या विवंचनेतून 42 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Beed News: कुटुंबाला आनंदी ठेवत नसल्याच्या विंचनेतून बीडच्या गेवराई मध्ये 42 वर्षे तरुणांना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चेतन जयस्वाल अस या तरुणांच नाव असून उद्योगपती रवी जयस्वाल यांचा तो मुलगा होता. आत्महत्या करण्यापूर्वी चेतन जयस्वाल यांनी फेसबुक पोस्टवर आपण कुटुंबाला आनंदी ठेवत नसल्याच्या योजनेतून आत्महत्या करत असल्याचे सांगितलं होतं आणि त्यानंतर घराजवळ असलेल्या शेतामध्ये गळफास आत्महत्या केली आहे.

Sindhudurg News: चीपी विमानतळावर काल विमान 'टेकऑफ' घेताना बिघाड झाल्याने लगेच लँडिंग

Sindhudurg News: चीपी विमानतळावर काल विमान 'टेकऑफ' घेताना बिघाड झाल्याने लगेच लँडिंग करावे लागल्याची घटना घडली. विमान सुरक्षितरित्या धावपट्टीवर उतरविण्यात आले आणि पुन्हा एकदा विमान सेवा रद्द झाली. या विमानात सुमारे वीस प्रवासी होते. माञ अचानक विमानसेवा रद्द करण्यात आल्याने विमान प्रवासी नाराज झाले आणि 4 ते 5 तास विमानतळावर ताटकळत रहाण्याची वेळ आली आल्याने नाराजी व्यक्त केली.


चिपी विमानतळावर मुंबई वरून 1 वाजता विमान लँड होत मात्र ते 4.30 ला लँड झाले तर 4.30 वाजता सिंधुदुर्गातील प्रवाशांना मुंबईकडे घेऊन जात असताना बिघाड झाला. त्यामूळे लगेच लँड करण्यात आले. त्यामुळे महत्वाच्या कामासाठी जाणाऱ्या विमान प्रवाशांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. अचानक विमानसेवा रद्द करणे, अवाजवी वेळेत विमान प्रवास त्यामुळे एअरलाईन्सवर प्रवाशांची नाराजी दिसत आहे.

Wardha Crime: सेलू येथे दुकाने फोडणारे चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद

Wardha Crime: वर्ध्याच्या सेलू शहरात रात्रीत चोरट्यानी सहा दुकाने फोडलीयेत. शहराच्या मध्यभागी तसेच रस्त्यावर असणाऱ्या दुकानांना चोरट्यानी लक्ष केल्याने व्यवसायिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. चोरट्यांच्या चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्हीमधील दृश्यांमध्ये दिसून येत आहे. रॉडच्या सहाय्याने दुकानाचे शटर तोडून चोरट्यानी दुकानात प्रवेश केला आणि मुद्देमालावर डल्ला मारला आहे. सेलू शहरातील किराणा दुकान, हार्डवेअर, ऍग्रो एजन्सी, हॉटेल ला लक्ष करण्यात आले आहे. 

Thane News: ठाण्यात आज ठाकरे गट मोठा मोर्चा काढणार

Thane News: ठाण्यात आज ठाकरे गट मोठा मोर्चा काढणार आहे. रोशनी शिंदे प्रकरणात पोलिसांनी पक्षपातीपणा केला असा आरोप ठाकरे गटानं केला आहे. आणि त्याचा निषेध म्हणून शिवाजी मैदान ते पोलीस आयुक्तालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता मोर्चाला सुरुवात होईल. आदित्य ठाकरे, विनायक राऊत, जितेंद्र आव्हाड आणि विक्रांत चव्हाण मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना सोमवारी संध्याकाळी मारहाण करण्यात आली. उद्धव आणि रश्मी ठाकरेेंनी मंगळवारी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली. 

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे मला फडतूस म्हणाले. पण मी फडतूस नाही काडतूस आहे. झुकेगा नहीं साला... मैं घुसेगा : देवेंद्र फडणवीस

Maharashtra Politics: ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिक रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. राज्याला फडतूस गृहमंत्री लाभले अशी टीका त्यांनी केली होती. त्यांच्या या टीकेचा फडणवीसांनी खरपूस समाचार घेतलाय. उद्धव ठाकरे मला फडतूस म्हणाले. पण मी फडतूस नाही काडतूस आहे. झुकेगा नहीं साला... मैं घुसेगा अशी डायलॉगबाजी करत फडणवीसांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. 

Nagpur News: नागपूरच्या कोराडी परिसरात रामायणा कल्चरल सेंटर साकारण्यात आलंय

Nagpur News: नागपूरच्या कोराडी परिसरात रामायणा कल्चरल सेंटर साकारण्यात आलंय. आणि याचंच उद्घाटन करायला 27 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी रामायण कल्चरल सेंटरची पाहणी केली. या सेंटरमध्ये चित्ररूपात संपूर्ण रामायणाची आकर्षक स्वरूपात मांडणी करण्यात आलीय.

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोंडामार्गमधील तिलारी खोऱ्यात हत्तींचा धुमाकूळ सुरूच

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग मधील तिलारी खोऱ्यात हत्तींचा धुमाकूळ सुरूच
- केर, मोर्ले गावातून हत्तींचा मोर्चा आता वायंगणतड गावात 
 - तिलारी नदीपात्रातून वायंगणतड गावात रात्री हत्तींचा वावर, नारळ आणि नाचणीच्या शेतीची केली नासधूस

Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या बैठकीत नाना पटोले यांच्या स्वभावाची चर्चा, सूत्रांकडून माहिती

Maharashtra Politics: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वभावामुळे महाविकास आघाडीमध्ये अडचण निर्माण होत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालीये. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत नाना पटोलेंच्या स्वभावावर चर्चा झाल्याचं समोर आलंय. महाविकास आघाडीमध्ये बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण योग्य समन्वय साधतात. मात्र पटोलेंच्या स्वभावामुळे अडचण येत असल्याचं मत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडल्याचं सुत्रांकडून समजतंय.

Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्यात 12 पॉझिटिव्ह रुग्ण

Yavatmal News: गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोना सारख्या महामारीनं हाहाकार माजवला होता. आता पुन्हा या कोरोनाची पुनरावृत्ती होताना दिसून येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात मंगळवारी दहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आठ महिला तर दोन पुरुषांचा समावेश आहे. कोरोना रुग्ण हे बाबुळगाव येथील 3 दिग्रस येथील 2 यवतमाळ येथील 2, नेर येथील 3 रुग्णांचा समावेश आहे दोन रुग्ण उपचार घेत असून एकूण कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या 12 झाली आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहेत. 

Mumbai Local News: मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Mumbai Local News: मध्य रेल्वे मार्गावर सकाळी पावणेआठ ते सव्वा आठच्या दरम्यान दिवस स्थानकाजवळ पॉईंट फेल झाल्यामुळे वाहतूक थांबवण्यात आली होती. अप स्लो आणि डाऊन फास्ट ट्रॅक दरम्यान हा पॉईंट फेल झाला होता. यामुळे मध्य रेल्वेच्या सकाळच्या लोकल वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला. त्यामुळेच कळवा कारशेड इथून निघणारी लोकल कॅन्सल करण्यात आली. ही लोकल कॅन्सल झाल्याने कळवा येथून या लोकलमध्ये चढणारे प्रवासी तसेच ट्रॅकवर ताटकळत उभे राहिले, अखेर या सर्व प्रवाशांनी चालत ठाणे स्टेशनकडे येण्यास सुरुवात केली. त्यामुळे ठाणे ते कळवा ट्रॅकवर चालत जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी दिसून आली. 

 Mumbai Central Local Update: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रुळ बदलण्याच्या यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत

 Mumbai Central Local Update:  मध्य रेल्वे मार्गावर सकाळी पावणेआठ ते सव्वा आठच्या दरम्यान दिवा स्थानकाजवळ पॉईंट फेल झाल्यामुळे वाहतूक थांबवण्यात आली होती. अप स्लो आणि डाऊन फास्ट ट्रॅक दरम्यान हा पॉईंट फेल झाला होता.  यामुळे मध्य रेल्वेच्या सकाळच्या लोकल वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला. त्यामुळेच कळवा कारशेड इथून निघणारी लोकल कॅन्सल करण्यात आली. ही लोकल कॅन्सल झाल्याने कळवा येथून या लोकलमध्ये चढणारे प्रवासी तसेच ट्रॅकवर ताटकळत उभे राहिले.  अखेर या सर्व प्रवाशांनी चालत ठाणे स्टेशनकडे येण्यास सुरुवात केली. त्यामुळे ठाणे ते कळवा ट्रॅकवर चालत जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी दिसून आली,

Ahmednagar News: अहमदनगरच्या गजराजनगर परिसरात वारूळवाडी रोडवर दोन गटामध्ये तुफान दगडफेक

Ahmednagar: अहमदनगरच्या गजराजनगर परिसरात वारूळवाडी रोडवर दोन गटामध्ये तुफान दगडफेक झाल्याची घटना काल रात्री 8:30 ते 9:00 वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी समाजकंटकांनी दोन मोटरसायकल जाळत, स्विफ्ट कारची तोडफोड केली आहे. या घटनेनं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली. या दगडफेकीत दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र ही दगडफेक कोणत्या कारणाने झाली हे समजू शकलेलं नाही. घटनेमुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी गजराज नगर परिसरात आणि मुकुंदनगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय...याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान शहरात सध्या शांतता असून कोणीही कोणत्या अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कुणी अफवा पसरवली तर संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिला आहे.


 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आज दिवसभरात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. दख्खनचा राजा जोतिबाची आज यात्रा आहे. जोतिबाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्यदिवस असून साधारणपणे 10 लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे ठाण्यातील राजकीय वातावरण तापणार आहे. मविआकडून ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयावर टाळे ठोको आंदोलन होणार आहे. जाणून घेऊयात आज दिवसभरातील घडामोडी...


दिल्ली 


- संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यासाठी दोन दिवस राहिलेले असताना आज सुद्धा संसदेत गोंधळाची शक्यता आहे. कामकाजाच्या राहिलेल्या दिवसांसाठी विरोधी पक्षांची बैठक होणार आहे.


- 14 विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे. या याचिकेत विरोधी पक्षांनी सीबीआय आणि ईडी सारख्या संस्थाचा विरोधी पक्षांच्या नेत्यांना टार्गेट करण्यासाठी वापरला जात असल्याच म्हंटलं आहे.


- राउज एवेन्यू कोर्टात आज मनीष सिसोदियांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. मनी लॉड्रींग प्रकरणी मनीष सिसोदिया अटकेत आहेत.


कोल्हापूर 


- दख्खनचा राजा जोतिबाची आज यात्रा आहे. जोतिबाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्यदिवस असून साधारणपणे 10 लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. मानाच्या सासनकाठ्या जोतिबाच्या डोंगरावर दाखल झाल्यात. यात्रेसाठी होणारी गर्दी लक्षात घेत पोलिसांनी पार्किंग व्यवस्था, दर्शन रांगा अशी मोठी तयारी केली आहे. 


ठाणे 


-  शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचा आज पोलीस आयुक्त कार्यालयावर टाळे ठोको मोर्चा. ठाकरे गटाच्या युवा सेनेची पदाधिकारी रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आज आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दुपारी शिवाजी मैदान येथून मोर्चा निघणार आहे. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड सहभागी होणार आहेत.


मुंबई 


- राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर आज मोर्चा काढण्यात येणार आहे. ऊस तोडणी सातशे रुपये करण्यात यावी, ऊस तोडणी मशीन मालकांसाठी लवाद स्थापन करण्यात यावा तसेच प्रलंबित अनुदान देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेतर्फे आज आझाद मैदानावर मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे.


- ईडी तपास करत असलेल्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालय आपला निकाल जाहीर करणार आहे.


- राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय चंद्रकांत गायकवाड यांना ईडीने समन्स पाठवले आहे. चंद्रकांत गायकवाड यांना बुधवारी ईडी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. सोमवारी ईडीने गायकवाड निवासस्थानावर छापा टाकला आणि सर्च ऑपरेशनही केले


-  राज्य मंत्रिमंडळाची बैठक सकाळी 11 वाजता मंत्रालय येथे होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर ही पहिलीच मंत्रीमंडळ बैठक आहे. त्यामुळे महत्वाचे निर्णय होऊ शकतात.


अमरावती 


- हनुमान जन्मोत्सव हा अमरावतीत खूप मोठ्या थाटात साजरा केला जात आहे. एकीकडे खासदार नवनीत राणा यांचं सामूहिक हनुमान चालीसा पठण होणार तर दुसरीकडे काँग्रेसने हनुमान जन्मोत्सवाच्या पूर्व संध्येला भव्य मिरवणूक आयोजित केली आहे. हनुमान जन्मोत्सव मिरवणूकीत पाच ढोल पथक, उज्जैन महाकाल येथील प्रसिध्द झांच पथक, बाभूळगाव येथील संदल, पाच डिजे, पाच वारकरी दिंडी, पाच ढोल पथक आणि हरियाणा वरून हनुमानजी यांचे आकर्षण अवतार असे असून राजकमल चौक येथे हनुमंत रायाची आरती करून मोठ्या प्रमाणात हनुमान चालीसाचे पठण केले जाणार आहे.


पुणे 


- आरटीई प्रवेश प्रक्रियेत अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रवेशाची ऑनलाईन सोडत आज निघणार आहे. 


 नाशिक 


-  नाशिक शहरात महत्वपूर्ण बैठक. पाणीकपात संदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे.


 अहमदनगर 


- श्री काळभैरवनाथ सेवा मंडळाच्या वतीने यात्रेनिमित्त आज पारनेर येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षिस 1,11,000 रुपये, द्वितीय बक्षिस 71,000, तृतीय बक्षिस 51,000, चतुर्थ बक्षीस 31,000 रुपये असणार आहे.


- शेवगाव तालुका वंचित बहुजन आघाडीच्यावतीने विविध प्रश्नांसाठी तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय. 


यवतमाळ


- भारत राष्ट्र समिती (बीआरएस) चे नेते शंकर अण्णा धोंडगे पाटील यांची आज पत्रकार परिषद होणार आहे. जिल्ह्यातील तेलंगणा सीमेलगत असलेले पांढरकवडा, घाटंजी, झरीजामनि या भागात बीआरएसचा प्रभाव वाढत आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.