Maharashtra Live Updates 29th May 2023 : मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी 'शिवतीर्थ'वर दाखल झाले आहेत. या भेटीबाबत अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.
12 जूनला विरोधी पक्षाची बिहारची राजधानी पटना येथे बैठक
बैठकीला महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार
नितीश कुमार यांनी आयोजित केलेल्या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विरोधी पक्षातील बहुतेक नेते हजर राहणार
मागील एक महिन्यात विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर आता विरोधी पक्षाची एकजूट करण्यासाठीं नितीश कुमार यांचा पुढाकार
Beed News: बीडच्या शिरूर तालुक्यातील जांब येथे जलजीवन अंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये विहीर आणि पाण्याच्या टाकीची मंजुरी नसल्याने सरपंच आणि गावकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जाम गावाला नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी उथळा तलाव या ठिकाणाहून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. मात्र या कामांमध्ये विहिरीची आणि टाकीची मंजुरी नसल्याने संतप्त गावकऱ्यांनी हे आमरण उपोषण सुरू केलं आहे.
Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या. अशातच अवधूतवाडी पोलिसांनी दोन चोरांसह 11 दुचाकी किंमत पाच लाख 25 हजार किमतीच्या दुचाकी जप्त केल्या श्रीकृष्ण भारत सोळंकी आणि सुरेश उर्फ विकास दत्तात्रय सुरोशे असे या चोरांची नावे आहेत.
Nashik Rains Updates: गेल्या काही दिवसांपासून ब्रेक घेतलेल्या अवकाळी पावसाने आज पुन्हा विजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली...अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचीही चांगलीच धांदळ उडाली...व्यापारी व शेतकरी यांच्या खळ्यावरील उघड्यावर वाळत टाकलेली मका या पावसाने पुन्हा भिजली असून मका झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मात्र तारांबळ उडाली...
Pune Rain Update : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तर काही परिसात गारपीटीला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या या पावसाने अनेक पुणेकरांची तारांबळ उडाली आहे. दिवसभर पुण्यात उकाडा जाणवत होता. मात्र पावसामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
Pune Rain Update : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तर काही परिसात गारपीटीला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या या पावसाने अनेक पुणेकरांची तारांबळ उडाली आहे. दिवसभर पुण्यात उकाडा जाणवत होता. मात्र पावसामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
Pune News: पुण्यातील कल्याणी नगर येथील IT पार्क कंपनीच्या इमारतीत आग
इमारतीच्या पाचव्या मजल्यावर लागली आग
अनेक कर्मचारी आत अडकले असून बाहेर काढण्याचे काम सुरु...
अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी...
अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु
Raigad News: रायगडच्या महाड तालुक्यातील आंबिवली गावात मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होवून 6 वर्षांच्या चिमुरडीला गंभीर दुखापत झालीय. स्फोट झाल्यानंतर महाड येथील ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
Sangli News: सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिऊर येथे भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने बाप लेकीचा जागीच मृत्यू झाला. आत्माराम पवार आणि त्यांची मुलगी तृप्ती पवार हे दोघे घरगुती कामासाठी इस्लामपूर होऊन कोकरूडकडे निघाले होते. दुचाकीवरून जात असताना ते बीऊर येथे गेले असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली. तृप्ती पवार ही इंजिनियर असून ती पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करीत होती. सुट्टी निमित्त काही दिवसांसाठी ती इस्लामपूर येथे घरी आली होती. वडिलांसोबत कोकरूड येथे कामानिमित्त जात असताना अपघातात बाप लेकीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
Gondia Accident: गोंदिया कोहमारा महामार्गावर ट्रकच्या धडकेत एका 24 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पायल लाखनकर असे मृत तरुणीचे नाव असून ती गडचिरोली जिल्ह्यातील रहिवाशी असल्याची माहिती आहे. मृत तरुणी ही गोरेगावकडून कोहमाराकडे जात असताना भडंगा गावाजवळ ट्रकनं मागून जोरदार धडक दिली, यात पायल हिचा जागीच मृत्यू झाला असून तिची 2 वर्षीय मुलगी जखमी झाली आहे. अपघातानंतर एक तासापर्यंत गोरेगाव पोलीस घटनास्थळी पोहोचलेले नव्हते. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांमध्ये पोलिसांच्या विरोधात चांगलाच आक्रोश पाहायला मिळाला.
Share Market Update: सेन्सेक्स 450 अंकांनी वधारला तर निफ्टी 125 अंकांनी वर
निफ्टी बॅंक उच्चांकी स्तरावर, बाजार उघडताच 44 हजार 300 च्या पार, ह्या आधी रेकाॅर्ड स्तर आॅक्टोबर 2022 साली 44 हजार 151 पर्यंत गेला होता
अमेरीकेतील डेट सीलिंगसंदर्भात सहमती झाल्याने बाजारात तेजी
डाॅलरच्या तुलनेत रुपया 82.58 वर उघडला
Jalna Crime News: जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात देवगाव येथे दोन भाव मध्ये जमिनीच्या वादातून लाठ्या काठ्यांनी मारहाण झाली यात दोन्ही कुटुंबातील 5 जण जखमी झालेत. यापैकी 1 जण गंभीर जखमी आहे, जखमींना जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं असून गंभीर जखमींना उपचारासाठी संभाजीनगर येथील खाजगी दवाखान्यात हलवण्यात आलं आहे. सकाळपर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
Sindhudurg Chipi Airport News: कोकणच्या सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेमधील चिपी विमानतळावरून आता अनियमित विमानसेवा सुरू आहे. एक दिवसाआड मुंबई ते चिपी आणि चिपी ते मुंबई विमानसेवा सुरू आहे. मोठा गाजावाजा करत ही कोकणातील विमानसेवा मी सुरू केली हे सांगण्यासाठी सर्वच पक्षाचे राजकीय पक्षांचे पुढारी पुढे आले होते आणि आपल असं योगदान आहे हे सांगत होते. मात्र आता हीच विमानसेवा अनियमित झाली असून याकडे कोणत्याही राजकिय पक्षाचा लक्ष नाही आहे. येत्या काळात ही विमानसेवा बंद होईल की काय अशी भीती स्थानिकांना आहे. पर्यटन वाढीसाठी हे विमानतळ एक महत्त्वाचा दुवा ठरेल असं म्हटल जायचं मात्र आता अनियमित विमानसेवा असल्याने याकडे राजकिय नेत्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
Maharashtra News: महाराष्ट्रातील नांदेड येथील आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या घरातून 25 लाख रुपयांची चोरी झाली आहे.
आमदार शिंदे यांच्या चालकाने हाताशी धरून ही चोरी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
एवढेच नाही तर थांबलेल्या आमदाराने श्याम डाय दाद शिंदे यांना फोन करून 30 रुपयांची मागणी केली.
1 जूनपर्यंत पैसे न मिळाल्यास रायगडला जाऊन स्वत:चे नुकसान करून आमदाराची सोशल मीडियावर बदनामी करू, असे आरोपीने आमदाराला सांगितले.
या प्रकरणी शिंदे यांच्या पीएच्या फिर्यादीवरून ना.म.जोशी पोलिसांनी चालक चक्रधर पंडित मोरे व त्याच्यासह अभिजित कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना 1 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान लोढा बेलोसिमो को ऑप हाऊ सोसायटी येथे घडली.
Pune Crime : पुणे शहरात कर्वेनगर परिसर आणि उपनगरामध्ये अल्पवयीन मुलांकडून बेफाम पद्धतीने गाड्या चालवल्या जातात. हा बेफामपणा महिलेच्या जीवावर भेतला असून तिचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांकडून युवकावर कारवाई करण्यात आली. हिंगणे होम कॉलनीमध्ये बेफामपणे वाहन चालविणाऱ्या, सायलेन्सर आणि कर्णकर्कश हॉर्नमधून आवाज काढणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी रहवाशी करत आहेत. कर्वेनगर येथील हिंगणे होम कॉलनीत सध्या अनेक तरुण बेफाम पणे गाड्या चालवत आहेत, जोरजोरात कर्कश हॉर्न वाजवत आहेत, बुलेटच्या सायलेन्सर मधनं फटाकडे वाजवत आहेत, गाड्या रेस करत आहेत. या सगळ्याचा परिसरातील नागरिकांना भयंकर त्रास होत आहे, याच्यावर उपाययोजना करणे फार गरजेचे आहे, अशा बेफाम आणि उन्नम्त झालेल्या वाहन चालकांवर त्वरित कारवाई करणे फार गरजेचे आहे.
Baramati News: विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. सकाळपासून अजित पवारांनी बारामतीतील विविध कामांची पाहणी सुरू केली आहे. पाहणी झाल्यानंतर अजित पवार जनता दरबार घेणार आहेत. त्यानंतर बारामतीतील विविध विकास कामांचा शुभारंभ अजित पवार करतील.
Modi Government 9 Years: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला (BJP Government) नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या प्रवासातील मोदी सरकारचं (Modi Government) यश सांगण्याची जबाबदारी आता केंद्रीय मंत्र्यांवर देण्यात आली आहे. सोमवारी (29 मे) केंद्रीय मंत्री देशभरात एकाच वेळी पत्रकार परिषद घेणार आहेत. या दरम्यान देशातील प्रत्येक राज्याच्या राजधान्यांमध्ये केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.
Delhi Wrestlers Protest : दिल्लीच्या जंतर-मंतरवर (Jantar Mantar) लैगिंक शोषणाविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना (Wrestlers Protest) पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतलं. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून महिला कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात अनेक पुरुष कुस्तीपटूही सहभागी झाले होते. रविवारी आंदोलक महिला कुस्तीपटूंसह पुरुष कुस्तीपटूंना ताब्यात घेऊन त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. यासोबतच आंदोलक कुस्तीपटूंवर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. कुस्तीपटूंवर दंगल भडकावण्यासह इतर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nandurbar News: सातपुड्याच्या दुर्गम भागात नेहमीच आरोग्य सेवा संदर्भात ओरड होत असते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेले कुपोषण बालमृत्यू आणि माता मृत्यू त्याच्यासोबत सिकलसेल अशा विविध आजारांच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तसेच विविध आजार आणि पावसाळ्यात होणारे सर्पदंश यासारख्या गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात किंवा ग्रामीण भागातून ग्रामीण रुग्णालयापर्यंत रेफर करण्यासाठी आवश्यक असलेल्या रुग्णवाहिकाच खराब असल्याने या भागातील आरोग्य सेवांवर प्रश्न निर्माण केले जात आहे.
Nashik Breaking : नाशिकमध्ये पहिल्यांदाच शिक्षण संस्थेविरोधात फौजदारी गुन्हा दाखल, अनाधिकृत शाळा बंद न केल्याने नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिकरोड परिसरातील एमराल्ड हाईट्स पब्लिक स्कुलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
बालकांच्या मोफत आणि सक्तीचे शिक्षण अधिनियमाचे उल्लंघन केल्याची महापालिका शिक्षण विभागाची तक्रार
Unseasonal Rain in Maharashtra: राज्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर पुढील 3 दिवस कमाल तापमान 2-4 अंश सेल्सिअसनं वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. केरळात मान्सून 4 जूनपर्यंत दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात येत असताना मुंबई देखील जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सून पूर्व पावसाची शक्यता आहे.
Monsoon Updates: आठवडाभरात मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. तर राज्यातील काही भागात या आठवड्यात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज असून काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. दरम्यान यावेळी मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज असून जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
9 Years Of Modi Government: मोदी सरकारची 9 वर्ष, भाजप राबवणार जनसंपर्क अभियान; आज देशभरात केंद्रीय मंत्र्यांची पत्रकार परिषद
Modi Government 9 Years: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला (BJP Government) नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या प्रवासातील मोदी सरकारचं (Modi Government) यश सांगण्याची जबाबदारी आता केंद्रीय मंत्र्यांवर देण्यात आली आहे. सोमवारी (29 मे) केंद्रीय मंत्री देशभरात एकाच वेळी पत्रकार परिषद घेणार आहेत. या दरम्यान देशातील प्रत्येक राज्याच्या राजधान्यांमध्ये केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.
जेथे भाजपचे सरकार असेल तिथे केंद्रीय मंत्री त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह पत्रकार परिषद घेतील आणि जिथे भाजपचं सरकार नसेल तिथे केंद्रीय मंत्री पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसह माध्यमांना संबोधित करतील. यावेळी मोदी सरकारच्या गेल्या 9 वर्षातील सर्व कामगिरीवर आधारित सादरीकरणही करण्यात येणार आहे. तसेच, मोदी सरकारनं केलेल्या महत्त्वपूर्ण कामाचा, प्रकल्पांचा आढावा घेतला जाईल.
'या' शहरांमध्ये प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) मुंबईत, अनुराग ठाकूर (Anurag Thakur) अहमदाबादमध्ये, मीनाक्षी लेखी (Meenakshi Lekhi) बेंगळुरूमध्ये, हरदीप पुरी (Hardeep Singh Puri) लखनौमध्ये, अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) गुवाहाटीमध्ये, भूपेंद्र यादव (Bhupender Yadav) भोपाळमध्ये, अर्जुन राम मेघवाल (Arjun Ram Meghwal) हैदराबादमध्ये, जितेंद्र सिंह (Jitendra Singh) चेन्नईमध्ये, गजेंद्र सिंह (Gajendra Singh Shekhawat) पटना, मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) कोलकात्यात स्मृती इराणी (Smriti Irani) रोहतकमध्ये आणि पीयूष गोयल (Piyush Goyal) जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.
Wrestlers Protest: "आमच्यावर FIR दाखल करण्यास केवळ 7 तास अन् बृजभूषण यांच्याविरोधात..."; सुटकेनंतर बजरंग पुनियानं दिल्ली पोलिसांवर साधला निशाणा
Wrestlers Protest News: दिल्लीच्या (Delhi) जंतरमंतरवर (Jantar Mantar) महिला कुस्तीपटुंच्या आंदोलनात (Wrestlers Protest News) सहभागी असलेल्या बजरंग पुनियाला (Bajrang Punia) पोलिसांनी मध्यरात्री सोडलं. बाहेर आल्यानंतर बजरंग पुनियानं दिल्ली पोलिसांवर (Delhi Police) निशाणा साधला आहे. बजरंग पुनिया म्हणाला की, हे या देशाचं दुर्दैव आहे, ज्याच्यावर वारंवार लैंगिक छळाचे आरोप होत आहेत, असा आरोपी संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाला उपस्थित होता.
बजरंग पुनिया म्हणाला की, दिल्ली पोलिसांनी आमच्याविरुद्ध केवळ 7 तासांत एफआयआर (FIR) नोंदवला, पण बृजभूषण (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यासाठी त्यांना 7 दिवस लागले. तसेच, बजरंग पुनियानं कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत पुढची रणनिती काय असेल? याबाहतही माहिती दिली. बजरंग पुनिया म्हणाला की, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत घरी जाण्यात काहीच अर्थ नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -