Maharashtra News Updates : आठवडाभरात बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचे 28 रुग्ण
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Corona : आठवडाभरात बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचे 28 रुग्ण आढळले आहेत. तर जिल्ह्यात H3N2 चे पाच संशयित रुग्ण आढळले हेत. आज सायंकाळपर्यंत त्यांचे अहवाल येण्याची शक्यता आहे. राज्यात फक्त बुलढाणा सामान्य रुग्णालयात प्रत्येक संशयित रुग्णाच्या पाच टेस्ट केल्या जात आहेत. यामध्ये एन्फ्लूएंझा A आणि B, स्वाईन फ्ल्यू आणि कोवीड.
Girish Bapat passes away : गिरीषजी बापट यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. जनसंघाच्या काळापासून पुणे शहरात गेली पाच दशके सक्रिय राजकारणात असणारे, पूर्वीपासून विधिमंडळात व आता लोकसभेतील माझे जीवलग सहकारी, पुण्यामध्ये भाजपच्या जडणघडणीतील एक प्रमुख व क्रियाशील नेतृत्व होते अशा शब्दात मंत्री नितीन गडकरी यांनी गिरीष बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली.
राजकीयदृष्ट्या भाजपला अतिशय प्रतिकूल काळ असताना पुण्यात भाजपला वाढवण्यात, मजबूत करण्यात गिरीषजींचे मोठे योगदान राहिले आहे. एक मृदुभाषी, संवेदनशील आणि लोकांसाठी झटणारा सुसंस्कृत लोकप्रतिनिधी म्हणून गिरीषजी कायम स्मरणात राहतील.
महाराष्ट्रात विधिमंडळात अनेक वर्षे आम्ही सोबत काम केले. ते माझे अत्यंत जवळचे आणि कौटुंबिक मित्र होते. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली ही पोकळी कधीही न भरुन येणारी आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण काळात सावरण्याची शक्ती देवो. ॐ शांती.
Girish Bapat passes away : पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
Girish Bapat passes away : पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. याबाबतची माहिती पुणे भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.
काही वेळापूर्वीच बापट यांचे निधन झाले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा तत्कालीन बॉडीगार्ड वैभव कदम याने आत्महत्या केल्याची घटना घडली. अनंत करमुसे प्रकरणाच्या वेळी तो आव्हाड यांचा बॉडीगार्ड होता. त्याला देखील करमुसे प्रकरणात आरोपी करण्यात आले होते. सध्या ठाणे पोलिसांकडून त्याची चौकशी सुरु होती अशी सूत्रांची माहित आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट, मात्र दबावामुळे केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Hingoli News : 2019 साली जानेवारी ते जुलै या कालावधी दरम्यान झालेल्या स्वस्त धान्य घोटाळा प्रकरणी 33 लाख रुपये वसुली पात्र रक्कम न भरल्याने तत्कालीन तहसीलदार गजानन शिंदे कारकून आणि स्वस्त धान्य दुकानदार अशा एकूण वीस जनावर हिंगोली पोलिसात रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिमालय घोरपडे यांच्या तक्रारीवरून हिंगोली पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2019 साली तीन कोटी रुपयाहून अधिक रक्कमेचा स्वस्त धान्य घोटाळा हिंगोली जिल्ह्यात झाला होता या प्रकरणात पुरवठा विभागाने अतिरिक्त धान्याची रक्कम भरणा करण्याच्या नोटीस संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांना बजावल्या होत्या काहींनी ही रक्कम भरली सुद्धा परंतु त्यापैकी 33 लाख रुपये वसूल पात्र रक्कम न भरल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हिंगोली पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत
Hingoli News : 2019 साली जानेवारी ते जुलै या कालावधी दरम्यान झालेल्या स्वस्त धान्य घोटाळा प्रकरणी 33 लाख रुपये वसुली पात्र रक्कम न भरल्याने तत्कालीन तहसीलदार गजानन शिंदे, अव्वल कारकून आणि स्वस्त धान्य दुकानदार अशा एकूण 20 जणांवर हिंगोली पोलिसात रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परीविक्षाधीन तहसीलदार असलेल्या हिमालय घोरपडे यांच्या तक्रारीवरुन हिंगोली पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2019 साली तीन कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचा स्वस्त धान्य घोटाळा हिंगोली जिल्ह्यात झाला होता. या प्रकरणात पुरवठा विभागाने अतिरिक्त धान्याची रक्कम भरणा करण्याच्या नोटीस संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांना बजावल्या होत्या. काहींनी ही रक्कम भरली सुद्धा परंतु त्यापैकी 33 लाख रुपये वसूल पात्र रक्कम न भरल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत
Amruta Fadnavis Case : अमृता फडणवीस यांच्याकडे खंडणी मागितल्याचं प्रकरण
बुकी अनिल जयसिंघानी हाच खरा सूत्रधार, राज्य सरकारचा आरोप
अनिल जयसिंघानीच्या जामीनाला विरोध करत मुंबई पोलिसांनी दाखल केलं उत्तर
शुक्रवारी अनिल जयसिंघानी आणि त्याचा चुलत भाऊ निर्मल जयसिंघानीच्या जामीनावर सुनावणी होणार
Kalyan News : कल्याण स्टेशन परिसरातील दीपक हॉटेलसमोर स्कायवॉकवरुन पडून एका वृद्ध कुष्ठरोगी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना काल रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडली. ही महिला 55 ते 60 वर्षे वयाची असून तिने स्कायवॉकवरुन उडी मारली की ती खाली पडली याविषयी स्पष्टता नाही. महिलेची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. महिलेचा मृतदेह कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या (Minister Nitin gadkari) कार्यालयात धमकीचे फोन करणारा कुख्यात गँगस्टर जयेश पुजारीनं (Jayesh Pujari) बेळगाव आणि नागपूर पोलिसांच्या (Nagpur Police) चौकशीत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. जयेश पुजारीला काहीही करुन बेळगावच्या तुरुंगातून बाहेर निघायचे होते. त्यासाठीच तुरुंगातून असे काही कृत्य करायचे की दुसऱ्या ठिकाणी गुन्हा नोंद होऊन तिथे नेण्यासाठी पोलिस इथून बाहेर काढतील आणि संधी मिळताच पळून जायचं अशी त्याची योजना होती. पुजारीला जन्मठेपेची शिक्षा झालीय. त्यामुळं त्याने जेलमधून पळून जाण्यासाठी जेलमधूनच गडकरींच्या कार्यालयात फोन करुन धमकी दिली होती. मात्र सध्या तरी पोलिस त्याच्या स्पष्टीकरणावर समाधानी नसून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या (Minister Nitin gadkari) कार्यालयात धमकीचे फोन करणारा कुख्यात गँगस्टर जयेश पुजारीनं (Jayesh Pujari) बेळगाव आणि नागपूर पोलिसांच्या (Nagpur Police) चौकशीत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. जयेश पुजारीला काहीही करुन बेळगावच्या तुरुंगातून बाहेर निघायचे होते. त्यासाठीच तुरुंगातून असे काही कृत्य करायचे की दुसऱ्या ठिकाणी गुन्हा नोंद होऊन तिथे नेण्यासाठी पोलिस इथून बाहेर काढतील आणि संधी मिळताच पळून जायचं अशी त्याची योजना होती. पुजारीला जन्मठेपेची शिक्षा झालीय. त्यामुळं त्याने जेलमधून पळून जाण्यासाठी जेलमधूनच गडकरींच्या कार्यालयात फोन करुन धमकी दिली होती. मात्र सध्या तरी पोलिस त्याच्या स्पष्टीकरणावर समाधानी नसून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra News Live Updates : राहुल गांधी यांच्या समर्थनात आणि मोदी-अदानींच्या हितसंबंधाच्या मुद्यावरून आजपासून देशभरात काँग्रेसचे जय भारत सत्याग्रह सुरू होणार आहे. तर, आज मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिबिराला शरद पवार संबोधित करणार आहेत.
- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टामध्ये आज सकाळी प्रकरण मेन्शन केलं जाण्याची शक्यता. त्यानंतर सुनावणीची नवी तारीख निश्चित होईल. 92 नगरपालिकांमधील ओबीसी आरक्षण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका या संदर्भात ही सुनावणी होणार आहे. गेल्या आठ महिन्यांपासून या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झालीच नाही
- राहुल गांधींच्या समर्थनार्थ आणि देशाची लूट थांबवण्यासाठी मोदी अदानी हितसंबंधांबाबत निर्भीडपणे प्रश्न विचारण्यासाठी काँग्रेसचा जय भारत सत्याग्रह आजपासून सुरू होणार आहे. 8 एप्रिल पर्यंत देशभरात काँग्रेस वेगवेगळे राबवणार आहे.
- पालघरमधील 2 साधू आणि ड्रायव्हर हत्याप्रकरणाची चौकशी CBI ला देण्याच्या मागणीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी
चंद्रपूर
- अयोध्या येथील निर्माणाधीन राममंदिरासाठी महाराष्ट्रातून जाणाऱ्या सागवनाचे आज बल्लारपूर येथे काष्टपूजन कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर शोभायात्रेच्या स्वरूपात सागवानाची लाकडे चंद्रपुरात आणली जाणार.
शिर्डी
- आजपासून शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला होणार प्रारंभ होणार आहे. पहाटे काकड आरती आणि ग्रंथ मिरवणुकीने प्रारंभ होणार आहे.
पुणे
- शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात आज पोलीस तक्रार करण्याची शक्यता आहे.
मुंबई
- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील चेंबुरमध्ये सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादीच्यावतीने चेंबूरमध्ये युवा मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित तरुणांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत.
- भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्य एन एम जोशी मार्ग, वरळी पोलिस स्थानकात दुपारी 3 वाजता जाणार आहेत. यावेळी किशोरी पेडणेकर कुटुंबियांसंबंधित असलेली किश कॉर्पोरेट कंपनीने बेस्ट ड्रायव्हर/ कामगारांचा पगार आणि पीएफ बुडविला असा भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप आहे
- महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या एसआरए घोटाळा प्रकरणी दाखल याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
- पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
नागपूर
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या नेतृत्वात आज व्हेरायटी चौक येथील गांधी चौक ते संविधान चौक दरम्यान काँग्रेस पक्षाचा लॉंग मार्च निघणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्यांचे लोकसभा सदस्यत्व ज्या पद्धतीने रद्द करण्यात आले त्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग
- भाजप आमदार नितेश राणे यांची कणकवली प्रहार भवन येथे दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. शिवसेना ( शिंदे गट) आणि भाजप यांची संयुक्त पत्रकार परिषद असणार आहे.
नाशिक
- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर असून ते पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. कांदा उत्पादक शेतकरीची भेट घेण्याची शक्यता आहे.
वाशिम
- पोहरादेवी इथं आज भारत राष्ट्र समिती पक्षाची विदर्भातील पहिली सभा होणार आहे. त्यामध्ये तेलंगाना राज्यातील एक-दोन मंत्री उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. अनेक पक्ष बदलून BRS मध्ये प्रवेश घेतलेले माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -