Maharashtra Live Updates : बारसू आंदोलकांच्या भेटीसाठी आलेले ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत पोलिसांच्या ताब्यात

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Apr 2023 01:59 PM
Ratnagiri News: ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत पोलिसांच्या ताब्यात

Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसूमध्ये वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय.. . बारसू रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केलाय. स्थानिकांना ठाकरे गटाने पाठिंबा दिलाय दरम्यान, बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलनादरम्यान ठाकरे गटाचे खासदार विनायक 
 राऊत यांच्यासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय..  अर्ध्या तासापासून विनायक राऊत आणि त्यांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात आहेत.. 

Mahavikas Aghadi: मविआच्या मुंबईत होणाऱ्या वज्रमूठ सभेचा दुसरा टीझर रिलीज

Mahavikas Aghadi: मविआच्या मुंबईत होणाऱ्या वज्रमूठ सभेचा दुसरा टीझर रिलीज झाला आहे. 1 मे रोजी बीकेसी मैदानात सभा  होणार  आहे.


 





Solapur: सोलापूरच्या सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी पालिकेने नोटीस

Solapur: सोलापूरच्या सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी पालिकेने नोटीस दिली आहे. 45 दिवसात चिमणी पाडा, अन्यथा महापालिकेतर्फे चिमणी पाडण्यात येईल, असा  इशारा महानगरपालिकेना दिला आहे

Bhiwandi : भिवंडीमधील वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक

Bhiwandi : भिवंडी मधील वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. शहरात दुचाकी आणि रिक्षा चोरीच्या  घटनांमध्ये वाढ होत असताना भिवंडी शहरातील गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. 

जळगावच्या चिंचोली गावाजवळ वादळी वाऱ्यामुळे कंटेनर उलटला

Jalgaon News:  जळगावच्या चिंचोली गावाजवळ वादळी वाऱ्यामुळे कंटेनर उलटला आहे. अपघातात दोघांचा चिरडल्यानं मृत्यू झाला  तर एक जण जखमी आहे 

Latur News: लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, लातूर-जहीराबाद राष्ट्रीय महामार्ग ठप्प

Latur News: लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय.  कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील जमखंडी येथील पुलावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने लातूर-जहीराबाद राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला आहे. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत झालेल्या तुफान पावसामुळे या ठिकाणी पुलावरून पाणी वाहत आहे.

सिंहगड किल्ला परिसरात एकाच कुटुंबातील दहा जणांवर मधमाशांचा हल्ला

Pune News : सिंहगड किल्ला परिसरात एकाच कुटुंबातील दहा जणांवर मधमाशांनी हल्ला केला. सिंहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूला असलेल्या हवेली तालुक्यातील खामगाव मावळ येथे ही घटना घडली.

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक कधी? युवा सेनेचा विद्यापीठाला सवाल
Mumbai University Senate Election : मागील आठ महिन्यापासून मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक झालेली नाही. सिनेट निवडणुकीच्या मतदार नोंदणी प्रक्रिया नोव्हेंबरमध्ये सुरु होऊन तीन वेळा मतदार नोंदणीसाठी मुदत वाढवून देण्यात आली. 12 जानेवारीला ही मतदार नोंदणीची मुदत संपली असताना सुद्धा अद्याप निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर न केल्याने युवासेने विद्यापीठात जाऊन सिनेट निवडणूका कधी होणार असा प्रश्न विचारला. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेना शिष्टमंडळाने मुंबई विद्यापीठ प्रभारी प्र कुलगुरु डॉ.अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. सुनील भिरुड यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर तसेच लवकरच होऊ घातलेल्या सिनेट निवडणुकीबाबत चर्चा केली. मुंबई विद्यापीठात परीक्षांचे गोंधळ तर कधी वेळापत्रक गोंधळ तर कधी हॉल तिकीटचे गोंधळ सुरु आहेत. त्यामुळे विद्यापीठात सुरु असलेला हा गोंधळ पाहता विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सिनेट सदस्य नसताना विद्यार्थ्यांना सुद्धा अडचणींना तोंड द्यावे लागत आहे आणि त्यामुळेच आता युवासेना निवडणूक कधी घेणार असा प्रश्न विचारत आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..


28th April Headlines: आज दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने काही जिल्ह्यात मंत्री, आमदार, बडे राजकीय नेते यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. स्थानिक पातळीवर या निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या आघाड्यादेखील चर्चेचा विषय ठरल्या आहेत. तर, मॉरिशसमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन होणार आहे.


कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक 


47 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. तर 30 एप्रिलला उर्वरित 88 बाजार समित्यांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान एकूण 253 कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूकांपैकी 18 बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाल्या आहेत. या निवडणुकी अंतर्गत एकूण 4 हजार 590 जागा निवडून द्यायच्या आहेत आणि उमेदवारांची संख्या 10 हजार 345 इतकी आहे. त्यापैकी सहकारी संस्थांच्या मतदार संघामध्ये 2 हजार 805 जागांपैकी 18 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित जागांसाठी 6 हजार 230 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.


रत्नागिरी 


- कोकणातले रिफायनरी विरोधक प्रशासनासोबतच्या बैठकीनंतर आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आज राजापूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे विरोधातल्या या आंदोलनाचा आज महत्वाचा दिवस आहे. रिफायनरी विरोधक आज आंदोलनाचा पवित्रा घेण्याची शक्यता आहे.  
 


मुंबई 


- अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालय आज निकाल सुनावणार आहे. या प्रकरणी अभिनेता सूरज पांचोली हा आरोपी आहे. 3 जून 2013 रोजी जियानं आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यासाठी तिचा प्रियकर आणि अभिनेता सूरज पांचोलीला जबाबदार धरत जियाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोपात हा खटला चालवण्यात आला आहे.


- नाकावाटे घ्‍यावयाच्या इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) कोविड प्रतिबंधक लसीकरण मुंबई महानगर पालिकेकडून सुरू करण्यात येणार आहे. 60 वर्षे वयावरील पात्र नागरिकांना, कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) लसीची प्रतिबंधात्मक मात्रा घेता येणार आहे.
 


पुणे


- केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून पुणे रेल्वे स्थानकावर नवीन सुरक्षा यंत्रणेची पाहणी करण्यात येणार आहे. 


सांगली


- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले जिल्हा दौऱ्यावर आहेत. विविध कार्यक्रम, उद्घाटन करणार आहेत. 


नंदुरबार 


- नंदुरबार येथील आकाशवाणीच्या एफएम केंद्राचे उद्घाटन देशाचे माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थित होत असून सातपुड्याच्या डोंगर भागात आता रेडिओची सेवा मिळणार आहे. 


दिल्ली 


- पालघर साधू हत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग केलं जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यास विरोध केला होता. मात्र शिंदे सरकारने प्रतिज्ञापत्र देऊन हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची विनंती केली होती.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.