Maharashtra Live Updates: वर्धा: टँकरची दुचाकीला धडक,माय-लेकीचा जागीच मृत्य; बाजारवाडा फाट्याजवळील अपघात

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 May 2023 11:44 PM
Mumbai Fire: ब्रीच कँडी रुग्णालयाजवळील इमारतीला आग

Mumbai Fire: ब्रीच कँडी रुग्णालयाजवळील इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आग लागली असून धुराचे लोट दूरवर पसरत आहेत.

Nashik News: मालेगाव: बसमध्ये झाली चोरी, बस पोलीस स्थानकाच्या दारी; मालेगाव येथील प्रकार

Nashik:  सोन्याची पोत व पैसे बसमध्ये चोरी झाल्याचे महिला प्रवाशानी सांगितल्यानंतर रस्त्यावर धावणारी बस थेट नाशिकच्या मालेगाव मधील ' छावणी ' पोलिसात दाखल झाली..नाशिकच्या मालेगाव बस स्थानक येथून सटाणा येथे प्रवाशांना घेवून जाणारी बस मोसमपुल येथून नवीन प्रवाशी गाडीत चढल्यानंतर गाडी पुन्हा सटाण्याच्या दिशेने धावू लागली..तेव्हा हा प्रकार घडला

मविआ सरकारने बुलेट ट्रेन, मेट्रो कारशेड सारख्या प्रकल्पांना ब्रेक लावला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती


मविआ सरकारने बुलेट ट्रेन, मेट्रो कारशेड सारख्या प्रकल्पांना ब्रेक लावला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती 

Niti Aayog Meeting: मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाबाबत निती आयोगाच्या बैठकीत उल्लेख केला आणि केंद्राकडे मदत करण्याची मागणी केली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

Niti Aayog Meeting:  मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाबाबत निती आयोगाच्या बैठकीत उल्लेख केला आणि केंद्राकडे मदत करण्याची मागणी केली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती 

Chandrapur News: चंद्रपूर: वाघोली-बुटी परिसरात धुमाकूळ घालणारी वाघिण आज अखेर जेरबंद; ग्रामस्थांवर केला होता हल्ला

Chandrapur News:  चंद्रपूर:  चंद्रपूर जिल्ह्यातील वाघोली-बुटी परिसरात धुमाकूळ घालणारी वाघिण आज अखेर जेरबंद करण्यात आली आहे. गेल्या २० दिवसात या वाघिणीच्या हल्ल्यात २ महिलांचा मृत्यू झाला आहे. गावाजवळील शेतशिवारात ग्रामस्थांवर हल्ला करणाऱ्या या वाघिणीला ठार करा अशी ग्रामस्थांची मागणी होती. त्यामुळे वनविभागाने सुमारे 50 ट्रॅप कॅमेरे आणि 100 कर्मचाऱ्यांसह वाघिणीसाठी शोधमोहीम राबविली होती. अखेर आज व्याहाड खुर्द जंगलात ही वाघिण आढळली. त्यानंतर वनविभागाने वाघिणीला डार्ट मारून बेशुद्ध केले आणि विशेष वाहनाने चंद्रपूरच्या शुश्रुषा केंद्रात रवाना केले. वैद्यकीय तपासणी करून वाघिणीला नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याची प्राथमिक माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

Chandrapur News: चंद्रपूर: वाघोली-बुटी परिसरात धुमाकूळ घालणारी वाघिण आज अखेर जेरबंद; ग्रामस्थांवर केला होता हल्ला

Chandrapur News:  चंद्रपूर:  चंद्रपूर जिल्ह्यातील वाघोली-बुटी परिसरात धुमाकूळ घालणारी वाघिण आज अखेर जेरबंद करण्यात आली आहे. गेल्या २० दिवसात या वाघिणीच्या हल्ल्यात २ महिलांचा मृत्यू झाला आहे. गावाजवळील शेतशिवारात ग्रामस्थांवर हल्ला करणाऱ्या या वाघिणीला ठार करा अशी ग्रामस्थांची मागणी होती. त्यामुळे वनविभागाने सुमारे 50 ट्रॅप कॅमेरे आणि 100 कर्मचाऱ्यांसह वाघिणीसाठी शोधमोहीम राबविली होती. अखेर आज व्याहाड खुर्द जंगलात ही वाघिण आढळली. त्यानंतर वनविभागाने वाघिणीला डार्ट मारून बेशुद्ध केले आणि विशेष वाहनाने चंद्रपूरच्या शुश्रुषा केंद्रात रवाना केले. वैद्यकीय तपासणी करून वाघिणीला नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याची प्राथमिक माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

Wardha News: वर्धा: टँकरची दुचाकीला धडक,माय-लेकीचा जागीच मृत्य; बाजारवाडा फाट्याजवळील अपघात

Wardha News: पत्नी व दीड वर्षीय दोन मुलीला दुचाकीवर बसवून नेरपिंगळाई येथे लग्नसमारंभात जात असतानाच मागाहून भरधाव आलेल्या टँकरने दुचाकीला हुलकावणी दिली. यात अनियंत्रीत दुचाकी टँकरखाली आल्याने पत्नी व एक दीड वर्षी मुलगी टँकरच्या मागील चाकात चिरडल्या गेली. या अपघातात माय लेकीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बाजारवाडा फाटा परिसरात झाला. निलिमा राजकुमार सयाम (27), तनुष्का राजकुमार सयाम अशी मृतकांची नावे आहे. तर राजकुमार नामदेव सयाम (27) व दीड वर्षीय मुलगी ही किरकोळ जखमी झाली आहे.

Palghar News: पालघर: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; डहाणू,  तलासरी परिसरात धक्क्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Palghar News:  पालघर: पालघर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. डहाणू,  तलासरी तालुक्यातील परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. संध्याकाळी 5:16  वाजण्याच्या सुमारास 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला धक्का जाणवला. त्यानंतर 5:24 च्या सुमारास 3.3 रिश्टर स्केलचा दुसरा धक्का जाणवला. मागील काही महिन्यांपासून थांबलेलं भूकंपाच सत्र पुन्हा एकदा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण  आहे. 

Parbhani News: शेतकऱ्याला तीन हजार रुपयाची लाच मागणाऱ्या महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यावर परळीत गुन्हा दाखल

Parbhani News: परळीमध्ये सिंचन विहिरीच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी 3000 रुपयांची लाच लागणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यासह अन्य एका जनावर परळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी तालुक्यातील परेवली येथील एका शेतकऱ्याचा सिंचन विहिरीच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून ही लाच मागण्यात आली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून या अभियंत्याला अटक करण्याचा प्रयत्न केला मात्र ही बाब लक्षात येताच अभियंताने लाच स्वीकारली नाही. यावेळी पोलिसात गुन्हा दाखल करून या घटनेची तपासणी केली असता यामध्ये अभियंतासह एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Nashik APMC Election : नाशिक बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदाची आज निवडणूक

Nashik APMC Election : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक आज पार पडणार आहे. बाजार समितीचे आवारातील सभागृहात ही प्रक्रिया होणार असून मतदान होऊन महिना उलटला असल्याने सर्वांनाच या निवडणुकीत उत्सुकता लागून आहे. सध्या देविदास पिंगळे यांचे पारडे जड असून सभापतीपदी त्यांची निवड निश्चित मानली जात असली तरी उपसभापती पदी कोणाला संधी मिळते, याची उत्सुकता आहे.

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची अवैध वाळू वाहतूकवर कारवाई

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने जिल्ह्यात अवैध धंद्या विरुध्द धडाकेबाज कारवाया सुरू केल्याने अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान याच विशेष पथकाने पैठण पोलीस ठाणे हद्दीत अवैध व बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकवर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे अशीच कारवाई दोन दिवसांपूर्वी सिल्लोड आणि वैजापुरात देखील विशेष पथकाने केली आहे.



Monsoon : मान्सून 4 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता

Monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस अंदमान निकोबारपासून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. मान्सून 4 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होऊ शकतो. मात्र यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  याचबरोबर देशातील अनेक राज्यांत तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाजदेखील वर्तवण्यात आला आहे.

Kolhapur News: कोल्हापूर- पन्हाळ गडावर आज सर्व व्यवहार बंद

Kolhapur News: कोल्हापूर- पन्हाळ गडावर आज सर्व व्यवहार बंद राहणार  आहेत.  धार्मिक स्थळाच्या तोडफोडप्रकरणी पन्हाळावासियांनी निर्णय घेतला आहे. आरोपींना तात्काळ
अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

BRS:  बीआरएस पक्षाच्या सदस्य नोंदणीला सुरुवात, सदस्य नोंदणीला सकारात्मक प्रतिसाद

BRS:  तेलंगणा राज्यातल्या बीआरएस पक्षानं महाराष्ट्रातही जम बसवायला सुरुवात केलीये.  नांदेडमध्येही बीआरएसनं सदस्यांची संख्या वाढवण्यासाठी सदस्य नोंदणी सुरु केलीय..आणि याच सदस्य नोंदणीला चांगला प्रतिसादही मिळतोय. नांदेड मधल्या उत्तर विधानसभा मतदारसंघापासून बीआरएसने सदस्य नोंदणीला सुरुवात केलीय. त्याला सर्वसामान्य लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पक्षाचे नेते प्रवीण जेठेवाड यांनी सांगितलंय. 

Cotton Price :  बीडमध्ये कापसाच्या दरात 500 रुपयांची घसरण, कापसाचे दर सात हजारांवरून साडेसहा हजारांवर

Cotton Price :  काही दिवसांपूर्वी सात हजार रुपये क्विंटल असलेल्या कापसाचे भाव अचानक साडेसहा हजार रुपये क्विंटलवर आले आहेत. कापसाला जास्त भाव मिळावा या हेतुने शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेला कापूस विक्रिसाठी बाहेर काढला... मात्र कापसाची आवक वाढल्याने कापसाच्या किंमतीत मोठी घट झाली... सध्या कापसाला साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे

Jejuri News: जेजुरी विश्वस्त निवडीचा वाद...स्थानिकांचे उपोषण सुरू.

Jejuri News:  जेजुरी मंदिराच्या श्री मार्तंड संस्थानच्या विश्वस्तपदाच्या निवडीचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. स्थानिकांना डावलून बाहेरच्यांची विश्वस्तपदी नेमणूक केल्याने हा वाद उफाळलाय..  सात विश्वस्तांपैकी केवळी एकच विश्वस्त स्थानिक असल्याने जेजुरीकर आक्रमक झालेत.

Nagpur News : नागपुरातील चार मंदिरांमध्ये आजपासून वस्त्र संहिता लागू

Nagpur News : नागपुरातील चार मंदिरांमध्ये आजपासून वस्त्र संहिता लागू करण्यात आलीये. महाराष्ट्र मंदिर महासंघाने हा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता मंदिरात अंगप्रदर्शन, असभ्य, अशोभनीय आणि तोकडे कपडे घातल्यास प्रवेश दिला जाणार नाहीये... पहिल्या महिन्यात नागपुरातील 25 तर राज्यभरातील 300 मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून करण्यात येणार आहे.. वाचा सविस्तर 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


आज नीति आयोगाची बैठक, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार 


दिल्लीत आज होणाऱ्या नीति आयोगाच्या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्र शासित प्रदेशाचे राज्यपाल सहभागी होणार आहेत.  केंद्र आणि राज्य सरकारमधील संघर्षामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी या बैठकीवार बहिष्कार टाकलाय. पंतप्रधान जर सुप्रीम कोर्टाचे आदेश जुमानत नसतील तर सामान्य लोकांनी न्यायासाठी कोणाकडे जायचं असं केजरीवाल म्हणतायत. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, तेलंगनाचे मुख्यमंत्री केसीआर,  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे या बैठकीला उपस्थित रहाणार नाहीत.


जेजुरी विश्वस्त निवडीचा वाद...स्थानिकांचे उपोषण सुरू


जेजुरी मंदिराच्या श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्तपदाच्या निवडीचा वाद चिघळण्याची शक्यता आहे 7 पैकी केवळ एकच स्थानिक विश्वस्ताची निवड, तर सहा जण बाहेरगावचे विश्वस्त नेमल्याने आक्षेप. विश्वस्तांची निवड प्रक्रिया गेली सहा महिने सुरु होती. या विश्वस्त पदावर जेजुरीतील स्थानिकांची निवड करावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे.  चार दिवसांपूर्वी पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नवीन विश्वस्त मंडळ जाहीर केली आणि वादाला सुरूवात झाली.  स्थानिक या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. सरकारला जाग आणण्यासाठी वाघ्या मुरळ्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय


नागपूरातल्या चार मंदिरात आजपासून वस्त्र संहिता


आजपासून नागपुरातील चार मंदिरात वस्त्र संहिता लागु महाराष्ट्र मंदिर महासंघानी घेतलाय.  पहिल्या महिन्यात नागपुरातील 25 तर राज्यभरातील 300 मंदिरांमध्ये ही वस्त्र संहिता लागू करण्याचा प्रयत्न महासंघाकडून करण्यात येणार.  मंदिरात अंगप्रदर्शन, असभ्य, अशोभनीय आणि तोकडे कपडे घालून प्रवेश करण्यास या संहिते अतर्गत मनाई आहे गोपाळ कृष्ण मंदिर, धनतोली, संकटमोचन पंचमुख हनुमान मंदिर, बेलोरी, ब्रहस्पती मंदिर, कोन्होलीबारा, दुर्गामाता मंदिर, हिलटॉप मंदिरात आजपासून वस्त्र संहिता.


 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस 


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्या घरी आयोजित कार्यक्रमाला देशभरातून त्यांचे चाहते भेटायला येतात. सकाळी 9 वाजल्यापासून नितीन गडकरी हे समर्थकांच्या भेटीगाठी घेत असतात.


स्वराज्य भवन'चा भव्य लोकार्पण सोहळा


पुणे येथे स्वराज्य संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन छत्रपती संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेचे राज्य मध्यवर्ती कार्यालय पुणे शहरात साकारण्यात आले असून, शिवाजीनगर येथे असलेल्या या कार्यालयाचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या लोकार्पण सोहळ्यानंतर बालगंधर्व सभागृह येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.