Maharashtra News Updates 23rd May 2023 : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबई दाखल; उद्या उद्धव ठाकरे यांची घेणार भेट
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Shiv Sena: मुंबईतील प्रभाग क्रमांक 121च्या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका चंद्रावती मोरे आणि शाखाप्रमुख मनीष नायर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना-शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती पाहून ते आपल्या प्रभागातील प्रलंबित विकासकामे नक्की पूर्ण करतील याची खात्री वाटल्यानेच आज शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे चंद्रावती मोरे यांनी यावेळी सांगितले
Nanded News: लोहा शहराला पाणीपुरवठा करणारा सुनेगाव तलाव आटला आहे. या तलावात केवळ दोन दिवसा पुरेल एवढे पाणी उरले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा २०१९ सारखी भीषण पाणीटंचाई निर्माण होते की काय, अशी अवस्था निर्माण झाली आहे.
लोहा शहराला सुनेगाव तलावातून पाणी पुरवठा होतो. आता या तलावात जवळच्या तीन चार गावांना पाणीपुरवठा होत असतो. या गावांत पाणीपुरवठा उद्भवन विहिरीचे काम सुरू आहे. काही गावाला पाणी पुरवठा सुरू आहे. लिंबोटी धरणातून नदीद्वारे सुनेगाव तलावात पाणी सोडले जाते. त्यानंतर शहराला पाणी पुरवठा होतो. उन्हाळ्यात पाणी समस्या तीव्र होणार हे गृहीत धरून व तलावातून रब्बी हंगामाला पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे तहावाने आता गाळ गाठला आहे. तलावात खड्ड्या खड्यात पाणी आहे आणि ते फार तर दोन दिवस जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Mumbai: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबई दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि खासदार संजय सिंह हेदेखील आहेत. उद्या अरविंद केजरीवाल आणि आपचे नेते शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
मलकापूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे मलकापूर-बुलढाणा मार्गावर अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले, वाहतूक काही काळासाठी ठप्प
अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत
Sangli News : आमचा जयंत पाटील यांना पाठिंबा आहे अशी प्रतिक्रिया तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील यांनी सांगलीत बोलताना दिली. आगामी विधानसभा ही रोहित लढणार की तुम्ही या प्रश्नावर बोलताना मात्र हसत सुमनताई यांनी पुढची निवडणूक मी कr रोहित लढणार हे आता सांगू शकणार नाही, असे सांगत आमदार सुमनताई पाटील यांनी यावर भाष्य करणे टाळले.
Beed News: पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये द्या असा प्रस्ताव सरकारला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पाठवल्यानंतर आष्टी मध्ये पंचायत समिती परिसरात सुनील केंद्रेकर यांचे आभार मानणारे बॅनर मनसेच्या शेतकरी संघटनेच्या वतीने लावण्यात आले असून केंद्रकरांच्या भूमिकेचे मनसेच्या वतीने फटाके वाजवून स्वागत करण्यात आलं आहे.
Pune News : पुण्यात होत असलेल्या पीएमआरडीए मेट्रोसाठी इंजिनीअरची भरती करण्यासाठी चक्क पाटण्यामध्ये जाहिरात काढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पीएमआरडीए मेट्रोचे काम करणाऱ्या टाटा कंपनीकडून ही जाहिरात काढण्यात आली आहे. टाटा कंपनीच्या मते ही जाहिरात त्यांनी ज्या कंत्राटदाराला कंत्राट दिले आहे त्याने ही जाहिरात काढली आहे. त्याचबरोबर इंजिनीअरच्या या भरतीसाठी आधी पुण्यातही जाहिरात काढण्यात आली होती. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही असा दावा टाटा कंपनीने केला आहे. मात्र पुण्यात जर ही जाहिरात काढण्यात आली होती तर ती कुठे आणि कधी प्रकाशित झाली होती हे मात्र टाटा कंपनीने अद्याप स्पष्ट केलेलं नाही.
Nanded News: गेल्या काही दिवसांपासून अनेक दिवसांपासून प्रत्येकाच्या भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर्स लागलेत. चव्हाण कुटुंबातील तिसरी पिढी म्हणजे माजी मंत्री अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया यांचंही नाव आता चर्चेत आलंय. गेल्या काही दिवसांत श्रीजया या वडील अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक कार्यक्रमात दिसून आल्यात.. तर येत्या 26 रोजी त्यांचा वाढदिवस आहे त्यामिमित्ताने "भावी आमदार"अशा आशयाचे शुभेच्छा देणारे होर्डिंग नांदेड शहरात झळकल्याचं पहायला मिळत आहेत.
Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीतील जागावाटप मेरिटनुसार होईल प्रत्येक पक्षाने जागांची चाचपणी केली पाहिजे असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी केलंय.. तसंच प्रदेश काँग्रेसने संभाव्य जागांसाठी समित्या नेमल्याची माहितीही नाना पटोलेंनी दिली. दरम्यान आज काँग्रेस कार्यकारिणीची महत्वाची बैठक होणार आहे
राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागलं.. त्यानंतर त्यांना माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मनोहर जोशी यांच्यावर आयसीयु मध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती मिळतेय. थोड्याच वेळात हिंदुजा रुग्णालयाकडून अधिकृत माहिती देखील दिली जाणार आहे.. दरम्यान, जोशी यांची विचारपूस करण्यासाठी उद्धव आणि रश्मी ठाकरे हिंदुजा रुग्णालयात गेले होते.
Jalgaon Crime : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात रेल्वे कर्मचाऱ्याने बायको आवडत नाही म्हणून टोकाचा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर....
आजच्या विज्ञान-तंत्रज्ञान्याचा युगातही मासिक पाळीविषयीचे समाजात अज्ञान आणि गैरसमज असणे ही दुर्दैवाची बाब असून याबात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यसाठी हे पाऊल उचलले आहे. वाचा सविस्तर....
Mumbai News: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना खासदार संजय राऊत यांचा फोन
जयंत पाटील यांची ईडीची चौकशी झाल्यानंतर संजय राऊत यांनी जयंत पाटलांशी फोनवरून केली चर्चा
आम्ही तुमच्या पाठीशी असल्याच सांगत संजय राऊत यांनी दिल समर्थन
यापुढे अशा घटना घडत राहतील आपण लढत राहू अस ही संजय राऊत म्हणाले
Beed News: बीडच्या जिल्हा परिषदेमध्ये बदल्यांचा लाभ घेण्यासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करणाऱ्या 41 शिक्षकांची जे जे रुग्णालयामध्ये तपासणी करण्यात येणार आहे.. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात काही दिवसापूर्वी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढून बदलीचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाची कारवाई केली होती आणि त्यानंतर या शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती. या सर्व प्रकरणानंतर न्यायालयाने माफी नाम सादर करून शिक्षकांना पुन्हा कामावर रुजू करण्याचे आदेश दिले होते मात्र 41 शिक्षकांनी अद्यापही माफी नामे साधना केल्याने त्यांची जे जे रुग्णालयामध्ये तपासणी करण्यात येणार आहे.
2000 Rupees Note Exchange: आजपासून सर्व राष्ट्रीयकृत बँकेमध्ये 2 हजारांच्या नोटा बदलून मिळणार आहेत.... २० हजारपर्यंतच्या नोटा एकाच दिवशी बँकेत जमा करुन बदलून घेता येणार आहेत...मात्र त्याआधी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अत्यंत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलंय. कुणीच घाबरून जाऊ नये, २ हजारांच्या नोटा आम्ही काढून घेत आहोत, मात्र त्या वैध आहेत, असं आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले. हे सर्व केवळ चलनाचं व्यवस्थापन आहे. रिझर्व बँक वेळोवेळी काही नोटा चलनातून काढत असते, असंही दास म्हणाले. त्याचसोबत, नोटा बदलण्यास चार महिन्यांचा कालावधी आहे, त्यामुळे चिंतेचं कारण नसल्याचंही ते म्हणाले...दरम्यान 2 हजारच्या नोटा बदलताना कोणतीही स्लिप भरण्याची किंवा कोणतही ओळखपत्र दाखवण्याची गरज नाहीये. या नोटा आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत बदलून मिळणार आहेत.
Amravti Accident: अमरावतीजवळील दर्यापूर-अंजनगाव मार्गावर भीषण अपघात. अपघातात ५ जणांचा मृत्यू तर ७ जण गंभीर जखमी. एकाच कुटुंबातील 12 जण लग्नसमारंभानंतर दर्यापूरच्या दिशेने येत असताना झाला अपघात.
Arvind Kejriwal Mumbai Visit: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल मुंबई दौऱ्यावर असून महाराष्ट्रातील नेत्यांची भेट घेणार आहेत. संध्याकाळी 7 पर्यंत मुंबईत दाखल होणार आहे. अरविंद केजरीवालांसमवेत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान, खासदार संजय सिंह आणि खासदार राघव चढ्ढा देखील दाखल होणार आहेत
Amravti News: अमरावती एमआयडीसी भागातील गोपाल नगर येथील महावितरण कार्यालयातील वरिष्ठ वीजतंत्रज्ञ मंगेश काळे यांनी वीज पुरवठा खंडित केल्याने त्यांना कार्यालयात जाऊन मारहाण करन्यात आली.
MIDC परिसरातील राहुल तिवारी यांनी गेल्या पाच महिन्यापासून विजेचे बिल न भरल्याने, वीजतंत्रज्ञ मंगेश काळे यांनी राहुल तिवारी याचे विजेचे कनेक्शन बंद केल्याने, याचा राग धरून काळे यांना राहुल तिवारी याने वीज वितरण कार्यालयात जाऊन बेदम मारहाण केली, मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
याप्रकरणी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी मंगेश काळे यांच्या तक्रारीवरून राहुल तिवारी याचेवर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी पुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला राजापेठ पोलिसांनी अटक केलेली आहे. मात्र, या घटनेने वीज कर्मचारी सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
Jayant Patil : ईडीच्या चौकशीनंतर थोड्याच वेळात जयंत पाटील शरद पवारांच्या भेटीला जाणार आहेत. साडेदहा वाजता सिल्व्हर ओकवरती शरद पवारांची भेट घेणार आहे. ईडीच्या चौकशी संदर्भात जयंत पाटील शरद पवारांना माहिती देणार आहेत.
Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust: उत्तर प्रदेशातील अयोध्येत (Ayodhya) उभारण्यात येत असलेल्या रामजन्मभूमी मंदिराच्या (Ram Mandir) बांधकामाचे काम जोरात सुरू आहे. राम मंदिराचं (Ram Mandir) किती बांधकाम पूर्ण झालं आहे? या संदर्भात राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र बांधकाम ट्रस्टचे प्रमुख नृपेंद्र मिश्रा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. अयोध्येतील राम मंदिराचा पहिला टप्पा 30 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणाार आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
ऊन पावसाचा खेळ मांडला! विदर्भात 5 दिवस पावसाचा अंदाज, काही जिल्ह्यात घामाच्या धारा
Weather in Maharashtra : महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर हवामान बदल होताना दिसून येत आहे. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. आता पुन्हा विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. विदर्भात पावसाचा जोर जास्त असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. विदर्भातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावं असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. दुसरीकडे मुंबईत तापमानात घट झाली असली तरी वाढलेली आर्द्रता घाम फोडत आहे. मुंबईत सध्या प्रचंड उकाडा वाढलेला असताना विदर्भात मात्र अवकाळी पावासाचं संकट उभं ठाकलंय. नागपूर वेधशाळेनं हा इशारा दिलाय. त्यामुळे एकीकडे प्रचंड उकाडा तर दुसरीकडे पाऊस असं विचित्र वातावरण सध्या राज्यात दिसून येतंय. मान्सून दाखल होईपर्यंत ही विचित्र परिस्थिती कायम राहणार असल्याचं वेधशाळेनं म्हटलं आहे.
पुढील 4 ते 5 दिवस राज्यात विविध जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतर काही ठिकाणी ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी घामाच्या धारा निघत आहेत. मुंबईसह काही नागरिक उकाड्याने त्रस्त आहेत.
Jayant Patil: राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांची आज तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ईडी कार्यालयातून (ED office) बाहेर आल्यानंतर जयंत पाटील हे जवळच असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. आपण ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं दिली असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
जयंत पाटील यांच्यावर आयएल अँड एफएस कंपनीशी संबंधित गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील काही वर्षांपूर्वी नोटीस देण्यात आली होती. या प्रकरणी दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेने पहिल्यांदा गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर गुन्ह्यातील आर्थिक व्याप्ती पाहता ईडीने हे प्रकरण आपल्याकडे घेतले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -