Maharashtra News Updates 14th May 2023 : अकोल्यात उद्या होणाऱ्या अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; संचार बंदी, इंटरनेट बंदीमुळे निर्णय
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Akola News: अकोला: अमरावती विद्यापीठ अंतर्गत उद्या अकोल्यातील 11 वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर होणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अकोल्यातील काही भागात लागू असलेली संचार बंदी तसेच इंटरनेट सेवेवरील बंधने आदी या कारणामुळे प्रशासनाने असा निर्णय घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगर: राजपूत समाज आहे त्यांच्या समोरील भामटा शब्द काढून टाकण्याचा निर्णय घेत असून आणि केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. राजपूत समाजासाठी आर्थिक महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले.
Jalgaon News: महावितरण कंपनीच्या वीज तारां मध्ये झालेल्या शॉर्ट सर्किट मुळे जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील वावडदा गावातील शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी जानकीराम पाटील यांच्या दोन एकर उसाच्या शेताला आग लागून पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वावडदा येथील शेतकरी जानकी राम पाटील हे स्वतः ऊस उत्पादन करून स्वतःच उसाची रसवंती चालवत आपला उदरनिर्वाह करतात.
Sharad Pawar LIVE: कर्नाटकाने देशाला एक संदेश दिला आहे - शरद पवार
Sharad Pawar LIVE: भाजपाला हरवू शकतो हे कर्नाटक निवडणुकांनी दाखवून दिलं - डी.राजा
Sharad Pawar LIVE: राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची मोट बांधण्यासाठी सिल्वर ओकवर बैठक.
MVA Meeting: सुप्रिम कोर्टाचा निर्णय ठाकरेंविरोधात नाही.
MVA Meeting: भाजपाकडून संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न - नाना पटोले
MVA Meeting: आम्ही सगळे एकत्र आहोत आमच्यात कोणतेही वाद नाहीत - नाना पटोले
MVA Meeting: मविआत कोणतेही मतभेद नाहीत - नाना पटोले
MVA Meeting: भविष्यात राज्यातील घटनाबाह्य सरकारच्या विरोधात लढणार - नाना पटोले
MVA Meeting: आगामी निवडणुकांसाठी मविआची वज्रमुठ घट्ट करणार - जयंत पाटील
Kishor Aware Murder case : पुण्यातील तळेगावच्या जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणाने नवं वळण घेतलं आहे. माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्यासाठी या हत्येचं कट रचल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं आहे. आता गौरवने हा कट का रचला?, त्यामागचं कारण हे जुन्या नगरपरिषद इमारतीपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. माजी नगरसेवक भानू खळदे यांच्याविरोधात वृक्षतोड केल्याची तक्रार किशोर आवारे यांनी नगरपरिषदेच्या सीईओकडे केली होती. मात्र बांधकाम साईटच्या मार्गालगतची ही वृक्षतोड परवानगीने होती, असा दावा भानू खळदे यांनी केला होता. मात्र यावरुन आवारे यांनी भानू खळदे यांना सर्वांदेखत मुस्काडात लावली. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलगा गौरव खळदेनी हत्येचा कट रचल्याचं समोर आलं आहे.
Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray : राज्यात अधूनमधून 2019 मधील पहाटेच्या शपथविधीवरुन विविध दावे केले जातात. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शपथविधीसंदर्भात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मोठा दावा केला आहे. यामुळे शपथविधीच्या चर्चांमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धडा शिकवण्यासाठी होता, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. एका माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत सुधीर मुनगंटीवार यांनी हा दावा केला आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Sunil Kanugolu: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (Karnataka Election 2023) निकाल समोर आले आहेत. कर्नाटकात (Karnataka) काँग्रेसनं बाजी मारली असून भाजपचा (BJP) राज्यातून सफाया केला आहे. या विजयानंतर काँग्रेसच्या गोटात आनंदाची लाट असतानाच, त्यांच्यात या विजयाचं श्रेय वाटून घेण्यासाठी चढाओढही सुरू आहे. काँग्रेसच्या या विजयात अनेक वाटकेरी आहेत. ज्यांच्यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा भारताच्या दक्षिणेकडील राज्यांत परतली आहे. काँग्रेसच्या विजयाच्या मानकऱ्यांबाबत बोलायचं झालं तर अनेक नावं समोर येतात. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यापासून ते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (D. K. Shivakumar) यांच्यापर्यंत, काँग्रेसच्या विजय अनेक नावांमध्ये विभागला जाऊ शकतो, परंतु या सर्वांमध्ये एक नाव आणि चेहरा आहे, ज्याच्या बाजूनं सर्व एकमतानं उभे राहतील. कर्नाटकात काँग्रेसच्या विजयासाठी रणनीती बनवणाऱ्या आणि या निकालाची पटकथा लिहिणारं ते नाव म्हणजे सुनील कानुगोलू (Sunil Kanugolu).
काँग्रेसचे मुख्य रणनीतिकार
सुनील कानुगोलू ही अशी व्यक्ती आहे जी कर्नाटकातील काँग्रेसच्या प्रमुख रणनीतीकारांपैकी एक आहेत. संपूर्ण निवडणुकीदरम्यान, त्यांनी जनतेशी विस्तृत आणि तपशीलवार संपर्क साधला. त्यासाठी त्यांनी रणनिती आखली. भाजपची निवडणूक भाषणं आणि अजेंड्याला छेद देत त्यांनी भ्रष्टाचार, गैरकारभाराच्या आरोपात अडकलेल्या भाजपशासित सरकारचा पर्दाफाश केला. विधानसभा निवडणुकीत एवढ्या मोठ्या यशाचं संपूर्ण श्रेय काँग्रेस कार्यकर्त्यांना जातं, पण प्रचाराच्या नवनवीन पद्धती शोधून काढणं, लोकांची नाडी जाणून घेण्यासाठी वेगवेगळी सर्वेक्षणं करणं आणि त्याद्वारे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रणनिती आखणं ही जबाबदारी सुनील कानुगोलू यांच्या खांद्यावर होती. काल जाहीर झाल्यालेल्या निकालांवरुन ते स्पष्ट झालं की, त्यांनी ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
Sameer Wankhede : "देशभक्त असल्याची शिक्षा मिळतेय"; CBI छापेमारीनंतर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया
Sameer Wankhede : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वानखेडे यांच्यावर सीबीआयनं भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात इतर अनेक अधिकारी आणि खासगी लोकांचीही नावं आहेत. सीबीआयनं समीर वानखेडे यांच्या घरावर एक दिवस आधी छापा टाकला होता. आता यासंदर्भात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचं वक्तव्य समोर आलं आहे. देशभक्त असल्याची शिक्षा मिळत असल्याचं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.
शुक्रवारी केंद्रीय अन्वेषण विभागानं समीरच्या मुंबईतील घरावर छापा टाकला आणि 13 तास चौकशी केली. वानखेडे 2021 पासून चर्चेत आहे, जेव्हा त्यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह काही जणांना मुंबईतील क्रूझवर अटक केली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -