Maharashtra News Updates 14th April 2023 : शनिवारी पनवेल , नवी मुंबईतील शाळांना सुट्टी; महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी वाहतूक कोंडी होणार असल्याने प्रशासनाचा निर्णय

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Apr 2023 09:22 PM
Navi Mumbai News: शनिवारी पनवेल , नवी मुंबईतील शाळांना सुट्टी; महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी वाहतूक कोंडी होणार असल्याने प्रशासनाचा निर्णय

Navi Mumbai News: आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार रविवारी देण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा रविवारी खारघर येथे आयोजित केला असून लाखोच्या संख्येने श्री सदस्य येणार आहेत. यामुळे मोठी वाहतूक कोंडी नवी मुंबई, पनवेल भागात होणार आहे. खबरदारी म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या स्कूल बस या वाहतूक कोंडीमध्ये अडकू नयेत यासाठी खबरदारी म्हणून नवी मुंबई , पनवेलमधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

Karnataka News: बेळगावमधील काही गावात पाणी टंचाईची शक्यता; कर्नाटक महाराष्ट्राकडे दोन टीएमसी पाणी मागणार

Karnataka News: बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावरील गावात आगामी काही दिवसात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील कृष्णा नदीवरील हिप्परगी बॅरेजमध्ये दोन टीएमसी पाणी सोडण्यात यावे. यासाठी सरकारी पातळीवर आवश्यक ती  उपाय योजना करणे आवश्यक असल्याची  मागणी बेळगावचे प्रादेशिक आयुक्त डॉ. गौतम बगादी यांनी कर्नाटक सरकारकडे पत्राद्वारे केली आहे.

Sangli News: सांगली: जत तालुक्यातील दरीबडचीत वीज पडून वयोवृद्ध शेतकरी व दोन म्हैशीचा मृत्यू

Sangli News:  जत तालुक्यातील दरीबडची  येथे वीज पडून एक वयोवृद्ध शेतकरी व दोन म्हशींची जागीच मृत्यू झाला. संगप्पा सनाप्पा पुजारी (वय 70) यांचा जागीच मृत्यू झाला. जनावर घेऊन घरी जाताना ही पाच वाजता ही घटना घडली.  आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. सायंकाळी पाच वाजता विजेच्या गडगटासह पावसाला सुरुवात झाली वादळे वाऱ्यासह, वीजेच्या गडगडाट, वीज चमकू लागल्याने जनावरे घेऊन दुधाळवस्ती येथील घरी येत होते. दरीबडची-मुचंडी  रस्त्यापासून हुनचिनकोडी जवळील शेतात घटना घडली. 

Unseasonal Rain Satara: सातारा: महाबळेश्वरात गारांसह दमदार पाऊस, स्ट्रॉबेरी आणि बलबेरीचं मोठं नुकसान

Satara News: सातारा:  महाबळेश्वरात तुफान गारांसह पाऊस, 


स्ट्रॉबेरी आणि बलबेरीचं मोठं नुकसान


पाऊस आणि गारांमुळे पर्यटक भारावला


शेतकऱ्यांचे मात्र नुकसान 


स्ट्रॉबेरी आणि बलबेरीचं मोठं नुकसान

Kolhapur News: बिंदू चौकात अमल महाडिक आणि ऋतुराज पाटील आमने-सामने येणार; संध्याकाळी 7.30 वाजता काय होणार, कोल्हापुरकरांचे लक्ष

कोल्हापुरात सतेज पाटील विरुद्ध महाडिक हा संघर्ष आता बिंदू चौकात चर्चा करण्यापर्यंत पोहोचला आहे...काल सतेज पाटील यांनी बिंदू चौकात येऊन चर्चा करण्याचा आव्हान केल्यानंतर आज अमल महाडिक यांनी बिंदू चौकात चर्चेला येण्याची तयारी केली..अगदी थोड्या वेळात म्हणजे साडेसात वाजता सतेज पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील हे बिंदू चौकामध्ये येणार आहेत...तर महाडिक कुटुंबीयांकडून अमल महाडिक हे बिंदू चौकामध्ये चर्चेसाठी येणार आहेत... आतापर्यंत सर्वच राजकीय पक्ष बिंदू चौकात चर्चेसाठी या असे म्हणत होते... मात्र आता प्रत्यक्षात सतेज पाटील गट आणि महाडिक गट बिंदू चौकात उपस्थित राहणार आहे...

Pune- Mumbai Express Way: पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील अवजड वाहतुकीला दोन दिवस बंदी

Pune- Mumbai Express Way:  पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील अवजड वाहतुकीला दोन दिवस बंदी घालण्यात आली आहे. शासनाकडून आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. खारघर येथे 16 एप्रिलला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी धर्माधिकारींचे 15 ते 20 लाख समर्थक येतील. ही शक्यता गृहीत धरून आज रात्री 12 ते 16 एप्रिलच्या रात्री 12 पर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यातून अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वाहतूक करणाऱ्या वाहनांना मात्र वगळण्यात आलेलं आहे. राज्यपालांच्या आदेशाने असं परिपत्रक काढण्यात आलं असून महामार्ग वाहतूक पोलिसांना याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांना मालमत्ता करात मोठा दिलासा; तिप्पट दर रद्द, लाखो रुपये वाचणार

Navi Mumbai News : नवी मुंबईतील स्थानिक आगरी कोळी प्रकल्पग्रस्तांनी उभा केलेल्या गरजेपोटी घरांना पालिकेच्या माध्यामातून मालमत्ता कर लावण्यात आला आहे. तिप्पट दराने मालमत्ता कर लावण्यात आल्याने एका कुटुंबाला पाच लाखापासून 20 लाखापर्यंत हा मालमत्ता कराच्या नोटीसा नवी मुंबई महानगरपालिकेने पाठवल्या आहेत. या विरोधात भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी गेल्या सहा महिन्यापासून शासन दरबारी पाठपुरावा सुरु केला होता. जादा लावलेल्या मालमत्ता कराबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिलासा देत गरजेपोटी घरांचा लावलेला तिप्पट दर रद्द केला आहे.

मुंबईत G-20 च्या निमित्ताने ठिकठिकाणी लावलेल्या लाईट्समुळे प्रकाश प्रदूषण, अतिप्रकाशाचा वाहनाचालकांना त्रास; सपा आमदार रईस शेख यांचा आरोप

Mumbai News : मुंबईत G-20 च्या निमित्ताने ठिकठिकाणी लाईट्स लावण्यात आले आहेत. 


या लाईट्सच्या बिलाचा भार मात्र मुंबई महापालिकेला सहन करावा लागत आहे. 


प्रत्येक वॅार्ड ॲाफिसच्या रस्त्यावर लावण्यात आलेल्या विजेच्या बिलात वाढ झाली आहे.


ही वाढ 12-15 टक्के दिसत असती तरी त्यामुळे प्रकाश प्रदूषण होत आहे. वाहन चालवताना चालकांना अतिप्रकाशामुळे त्रास होत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केला आहे. 


अनेक ठिकाणी हे लाईट्स आता तुटायला लागले आहेत. त्यामुळे जनतेच्या पैशाचा हा अपव्यय करु नका अशी मागणी ही त्यांनी केली आहे..


या संदर्भात रईस शेख हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आयुक्त यांना पत्र लिहिणार आहेत

Ratnagiri News: खेड पंचायत समितीमधील ठाकरे आणि शिंदे गटातील चकमक प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या 20 ते 25 जणांविरोधात गुन्हा दाखल
Ratnagiri News: खेड पंचायत समितीमधील ठाकरे आणि शिंदे गटातील चकमक प्रकरणी माजी आमदार संजय कदम यांच्यासह उद्धव ठाकरे गटाच्या 20 ते 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  खेडच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.  शिंदे गटाचे तालुकाप्रमुख सचिन धाडवे यांनी तक्रार दिली होती. लाठ्या काठ्या घेऊन पाठलाग करून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. सचिन धाडवे यांनी माझ्या जीवीताला संजय कदम यांच्याकडून धोका असल्याचा देखील  आरोप केला आहे.  जलजिवन मिशन अंतर्गत अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील बैठकिला उद्धव ठाकरे गटाचे नेते व्यासपीठावर असल्या कारणावरून राडा झाला होता. भा द वि क 143,144,147  अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
सोन्याचे दरात गेल्या चोवीस तासात सातशे रुपयांची वाढ, दर GST सह 63,300 वर

सोन्याचे दरात गेल्या चोवीस तासात सातशे रुपयांची वाढ होऊन जीएसटीसह 63300 इतक्या उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. आज पर्यंतचा हा सर्वाधिक भाव आहे. 

फॉरेक्स कॉईनच्या नावाखाली हिंगोलीतील व्यापाऱ्याची 3 लाख 92 हजार रुपयांना फसवणूक, पुण्यातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
Hingoli News : फॉरेक्स कॉईनच्या नावाखाली हिंगोलीतील व्यापारी प्रवीण बगडिया यांना पुण्यातील एका भामट्याने तीन लाख 92 हजार रुपयांना गंडा घातल्या प्रकरणी हिंगोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली शहरातील व्यापारी प्रवीण बगडिया यांना पुण्यातील राहुल राणे याने आमची टीसीएम लाईव्ह कंपनी असल्याचे सांगितले. या कंपनीचे फोरेक्स कॉइन खरेदी करा, याचा भविष्यात खूप फायदा होईल, असं बोलून 3 लाख 92 हजार रुपयांची मागणी केली. व्यापारी बगडिया यांनी नेट बँकिंगद्वारे संबंधित आरोपीला 3 लाख 92 हजार रुपये पाठवले. परंतु पैसे पाठवूनही कॉईन मिळालेच नाहीत. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर बगडिया यांच्या तक्रारीनंतर हिंगोली पोलिसात आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर येण्याची शक्यता; सावरकर वादानंतर काँग्रेसचं डॅमेज कंट्रोल?

राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर येण्याची शक्यता
---
लवकरच होणार राहुल आणि  ठाकरेंची भेट
----
सावरकर वाद आणि लोकसभा निवडणुकीवर चर्चा करणार
-----
पहिल्यांदाच भेटणार उद्धव ठाकरे आणि  राहुल गांधी 
-----
सावरकर वादानंतर काँग्रेसचं डॅमेज कंट्रोल?

मंत्री दादा भुसेंच्या वाहनाला कट मारुन पळणाऱ्या पिक अपला पाठलाग करत पकडले, वाहनातून केली जात होती अवैध गोवंश वाहतूक

Nashik News : नाशिकच्या मालेगाव दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री दादा भुसे यांच्या वाहनाला एका भरधाव वेगाने जाणाऱ्या पीक अप वाहनाने कट मारत पळण्याचा प्रयत्न केला. यानंतर मंत्री भुसे यांनी त्याचा पाठलाग करत रस्त्यावर उतरुन गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली. या वाहनातून अवैधरित्या गोवंश वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाल्याने मंत्री भुसे यांनी हे वाहन पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दादा भुसे हे मालेगाव दौऱ्यावर आल्यानंतर ग्रामीण भागात भेटीसाठी जात असताना हा प्रकार घडला. दरम्यान, या घटनेमुळे अवैध गोवंश वाहतूक पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे..

Palghar News: मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गावरील खड्ड्यात पडून 17 वर्षीय युवकाचा मृत्यू


Palghar News: मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचा ठेका असलेल्या मोंटो कार्लो या कंपनीने खोदलेल्या खड्ड्यात पडून एका 17 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दीप सुनील शेलार अस या 17 वर्षीय युवकाच नाव असून तो पालघरमधील बोरशेती येथील रहिवासी होता . त्याने आत्ताच दहावीची परीक्षा ही दिली होती.पाय घसरून दिप या खड्ड्यात पडला असून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दीपच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात मनोर पोलीस ठाण्यात एडीआर दाखल झाला असून मनोर पोलीस अधिक तपास करत आहेत. या सगळ्या घटनेमुळे मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचा ठेका असलेल्या कंपन्यांचा मनमानी कारभार आणि निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. 


Badlapur Fire: बदलापूरमध्ये एका केमिकल कंपनीत उभ्या असलेल्या टँकरला अचानक लागली आग

Badlapur Fire: बदलापूरमध्ये एका केमिकल कंपनीत उभ्या असलेल्या टँकरला अचानक आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली, मात्र आगीत टँकर जळून खाक झालाय. टँकरमध्ये केमिकल असल्याने आगीने काही क्षणात रौद्ररुप धारण केलं होतं. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2023: नागपूरच्या संविधान चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जल्लोष

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2023: नागपूरच्या संविधान चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गुरुवारी रात्री त्यांच्या प्रतिमेजवळ हजारोच्या संख्येने नागरिक आणि तरुण जमले होते. बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर त्या ठिकाणी जोरदार जल्लोष करण्यात आलाय.. ढोल ताशा आणि डीजेच्या संगीतावर हजारो तरुणांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जल्लोष केला. 

Sangli News: सांगलीत तळीरामाचा घरगुती कारणातून शोले स्टाईल आत्महत्याचा ड्रामा

Sangli News: सांगलीच्या विश्रामबाग या ठिकाणी रात्री एका तळीरामाने अपार्टमेंवर चढून शोले स्टाईल आत्महत्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. एका चार मजली अपार्टमेंटवर चढून आत्महत्येच्या प्रकारामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. सुनील प्रजापती असे या मद्यपी व्यक्तीचं नाव आहे. घरगुती भांडणाच्या रागातून दारू पिऊन त्याने थेट इमारतीच्या कठड्यावर जाऊन हा  धिंगाणा सुरू केला. या घटनेचे गांभीर्य ओळखून सांगली महापालिकेचे अग्निशमन दल देखील घटनास्थळी दाखल झाले. सुमारे पाऊण तास या ठिकाणी तळीराम सुनील प्रजापतीचा हा शोले स्टाईल आत्महत्याचा ड्रामा सुरू होता.


अखेर पोलिसांनी गनिमी काव्याने मागून पोहचत काठड्यावर थांबलेल्या सुनील प्रजापतीला धाडसाने पकडून ताब्यात घेतले. त्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा श्वास सोडला. पोलीस प्रशासनाकडून मदधुंद सुनील प्रजापतीची समजूत काढण्याचा प्रयत्न सुमारे पाऊण तास सुरू होता.  सुनील प्रजापती  हा याच इमारतीमध्ये वॉचमन म्हणून काम करणाऱ्या महिलेचा जावई असून त्याची पत्नी आणि तो या ठिकाणी राहतात. घरगुती वादानंतर दारू पिऊन त्यांनी हा आत्महत्याचा ड्रामा केला असल्याचे समोर आले आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. राज्यभरातही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवानद केलं जाणार आहे. त्यानिमित्ताने कार्यक्रमांचे स्वरुप कसं असेल याची माहिती खालीलप्रमाणे, 


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती


देशात आणि राज्यात आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 


मुंबई महानगर पालिकेकडून विवध सेवा सुविधांसह तयारी


- चैत्यभूमी परिसरात महानगरपालिकेकडून सुशोभीकरण आणि अनुयायांसाठी करण्यात आली सुयोग्य व्यवस्था.
- समाजमाध्यमांवर थेट प्रक्षेपणासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत लेजर शो आणि छायाचित्र प्रदर्शन.
- यंदाच्या जयंती दिनानिमित्त नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
- यंदा पहिल्यांदाच अनुयायांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आयोजित एका विशेष लेजर शोचे आयोजन माता रमाबाई व्ह्युईंग डेक येथे सायंकाळी करण्यात येणार आहे.
- तसेच बीएमसीकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी महानगरपालिकेचे एक हजार कर्मचारी कार्यतत्पर असणार आहेत.


परभणी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त परभणीत विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 7.30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर महावंदना होणार आहे. या वंदनेला प्रचंड मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. 


धुळे - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शहरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आंबेडकरी अनुयायांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर अभिवादन केले जाणार आहे... तर शहरातील संदेश भूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्श झाला आहे.


चंद्रपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरात रॅली काढून अनेक संघटना बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करतात. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार देखील बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करतील.


वर्धा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वर्धा शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आंबेडकर चौकामध्ये विविध रॅली आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत... सकाळपासूनच आंबेडकर अनुयायी अभिवादन करण्यासाठी पोहचील


वर्धा - महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्‍ययनरत पुतळ्यासमोर 132 मेणबत्त्या व दिवे प्रज्ज्वलित करून 132 फुगे हवेत सोडण्यात येणार आहे. यावेळी प्र-कुलगुरु शुक्लउपस्थित राहणार आहेत.


अकोला - सध्याच्या सावरकर वादाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी आमदार अमोल मिटकरी यांच्या नेतृत्वात 100 युवक शहरातील अशोक वाटिका येथे सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आम्ही सारे फुले शाहू आंबेडकर नावाच्या भगव्या टोप्या घालून स्टॉल लावणार आहेत.


गोंदिया - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गोंदिया जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गोंदिया शहरात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 


भंडारा - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भंडारा शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भंडाऱ्यात येण्याची शक्यता आहे.


पंतप्रधान मोदी आज आसामच्या दौऱ्यावर 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम दौऱ्यावर असणार आहेत. आज दुपारी 12 वाजता एम्स गुवाहाटीला ते पोहचतील आणि परिसराचं निरीक्षण करतील. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.