Maharashtra News Updates 13th April 2023 : सोलापूर: मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर भीमा नदी पात्रात बुडून नेपाळ येथील चौघांचा मृत्यू

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Apr 2023 11:10 PM
Karnataka Election: महाराष्ट्र एकीकरण समितीकडून बेळगाव मतदार संघातून ॲड.अमर येळुरकर यांची उमेदवारी जाहीर

Karnataka Election:  महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव मतदार संघातून ॲड.अमर येळुरकर यांची उमेदवारी घोषित केली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांच्या कडून अर्ज मागवले होते.इच्छुक उमेदवारांचे अर्ज आल्या नंतर निवड समितीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन आणि जनमानसाचा कौल ध्यानात घेऊन उमेदवारी जाहीर केली.

Solapur News: सोलापूर: मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर भीमा नदी पात्रात बुडून नेपाळ येथील चौघांचा मृत्यू

Solapur News:  मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे असणाऱ्या भीमा नदीच्या पात्रामध्ये नेपाळ देशातील चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

Mumbai News:  दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरण, आरोपी अरमान खत्रीला 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Mumbai News:  दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरण, आरोपी अरमान खत्रीला 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी


दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणी आरोपी अरमान खत्रीला १५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे


मुंबई पोलिसांनी आरोपी अरमान खत्रीविरोधात आणखी दोन कलमे जोडली आहेत


भादंवि 506(2) IPC आणि 3(2)(va) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, 198 ही दोन नवीन कलमे जोडली 

Sharad Pawar : शरद पवार आणि काँग्रेसचे राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गेंची भेट

शरद पवार थोड्यावेळात दिल्लीत दाखल होत आहेत, आज त्यांची राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत भेट होणार आहे. अदानी प्रकरणावरून दिलेल्या वक्तव्यानंतर त्यांची ही पहिलीट भेट असेल. उद्या कर्नाटकसह आगामी विधानसभा निवडणुकांबाबत राष्ट्रवादीची रणनीती ठरवण्याबाबतही एक बैठक होण्याची शक्यता आहे. रात्री साडेआठ वाजता खरगेंच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे. अदानी प्रकरणातल्या वक्तव्यावरून पवारांच्या भूमिकेची चर्चा असताना पवार दिल्लीत काँग्रेस अध्यक्षांच्या भेटीला जाणार आहेत. 

Ratnagiri News: रत्नागिरी: चिपळूणमधील अलोरे भागांत गारांचा पाऊस, आंबा काजू पिकाला फटका

Ratnagiri News:  रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील अलोरे भागांत दुपारी गारांचा पाऊस पडल्याने गावातील रहिवाशांची धावपळ उडाली. तासभर पडलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा आला. मात्र, काही ठिकाणी आंबा काजू पिकाला फटका बसला आहे. 

बीडमध्ये ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यावरुन एक लाख 14 हजार रुपये लांबवले, पोलिसात गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरु

Beed News : ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यावरुन एक लाख 14 हजार रुपये लांबवणाऱ्या आरोपीविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. बीड येथील सिताराम आघाव यांच्या खात्यावरुन आरोपी लक्ष्मण घाडगे याने एक लाख 14 हजार रुपये लांबवल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दिली आहे. याप्रकरणी आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज केला होता. परंतु कोर्टाने हा अर्ज फेटाळला असून पोलीस आरोपी लक्ष्मण घाडगे याचा शोध घेत आहेत.

दापोली साई रिसॉर्ट प्रकरणातील आरोपी सदानंद कदम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

दापोली साई रिसॉर्ट प्रकरणातील आरोपी सदानंद कदम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ


सदानंद कदम यांना 27 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी


कदम हे सध्या आर्थर रोड कारागृहामध्ये कैद


माजी मंत्री अनिल परब यांचे निकटवर्ती आहेत कदम


अंमलबजावणी संचालनालयाने दापोली येथून कदम यांना याप्रकरणी केली होती अटक


कदम यांना 27 एप्रिलच्या सुनावणीत विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्याचे निर्देश

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाचा इशारा 

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाचा इशारा 


गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज काही ठिकाणी गारपिटीसह पावसाची शक्यता 


दक्षिण कोकणात उद्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज 


पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा इशारा

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल समोर, 23 हजार 699 हेक्टरवरील शेतीचे नुकसान 

- नाशिक जिल्ह्यात गेल्या 6 दिवसात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल समोर 


- 23 हजार 699 हेक्टरवरील शेतीचे नुकसान 


- 467 गावातील 36 हजार 442 शेतकऱ्यांवर ओढावले संकट 


- कांदा पिकाला सर्वाधिक फटका, तब्बल 18 हजार 346 हेक्टवरील कांद्याचे नुकसान 


- कांद्याखालोखाल डाळिंब, द्राक्ष आणि भाजीपाल्याला फटका

ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरेंची इंदुरिकर महाराज आणि गौतमी पाटील यांच्यावर टिका, म्हणाले...

ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरेंची इंदुरिकर महाराज आणि गौतमी पाटील यांच्यावर टिका 


दोघांनाही आपापल्या क्षेत्रातील लोकं नावं ठेवतात 


यांनी लावणीची संस्कृती बिघडवली आणि वारकरी सांप्रदायातील लोकंही महाराजांना नावं ठेवतात 


दोघांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे 


अशी खोचक टिका सदानंद मोरेंनी केली आहे 


काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय 


गेल्या आठवड्यात इंदुरिकर महाराज आणि गौतमी पाटील यांच्यात किर्तनांचे पैसे आणि लावणीचे पैसे यावरून जूंपल्याच पाहायला मिळालं होतं.

Political Update: महाविकास आघाडीच्या नागपूरच्या सभेच्या आयोजनाबद्दल विश्वासात घेत नसल्याने काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले आणि नितीन राऊत आयोजकांवर नाराज

महाविकास आघाडीच्या नागपूरच्या सभेच्या आयोजनाबद्दल विश्वासात घेत नसल्याने काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले आणि नितीन राऊत आयोजकांवर नाराज. त्यामुळे दोन्ही नेते आयोजनाच्या वेगवेगळ्या बैठकांपासून दोन हात लांब दिसत आहे. नितीन राऊत महाविकास आघाडीच्या नागपूरच्या सभेला गैर हजर राहण्याची शक्यता. 

बॉम्बे चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या 11व्या द्विवार्षिक आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन 

बॉम्बे चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या 11व्या द्विवार्षिक आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन 


परिषदेचे आयोजन बंदरे, शिपिंग आणि लॉजिस्टिक्ससंदर्भात करण्यात आलंय 


एक दिवसीय परिषदेत लोकसत्ताचे संपादक गिरीष कुबेर हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुलाखत घेणार 


संपूर्ण दिवसभर चालणाऱ्या या परिषदेला केंद्रातील चार मंत्र्यांची उपस्थिती 


2047 सालातील लॉजिस्टिक्सचं भविष्य ही यंदाच्या परिषदेची थीम


वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय बंदरे, शिपिंग जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनेवाल आणि केंद्रीय राज्यमंत्री बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्री श्रीपाद नाईक यांची उपस्थिती असेल

मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचे पावसामुळे हाल

Mumbai Rains : मुंबई पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचे पावसामुळे हाल झाले. पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची राहण्याची किंवा जेवणाची सोय नाही. त्यांना उघड्यावर झोपावे लागत आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील मैदानावर पोलीस भरतीसाठी चाचण्या होत आहेत. मात्र या पोलीस भरतीसाठी राज्यभरातून आलेल्या उमेदवारांना बिकट परिस्थितीत रस्त्यावर रात्र काढावी लागत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारांच्या तक्रारी, अडचणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे पोहोचवण्यात आल्या होत्या. परंतु त्यानंतरही राज्य सरकारच्या वतीने कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांना पावसात असे हाल सोसावे लागत आहेत.

Heat increased  : एकीकडे अवकाळीचा फटका तर दुसरीकडं उन्हाचा कडाका, चंद्रपूरचा पारा 42 अंशाच्या पुढं

Heat increased : राज्यात सध्या तापमानात (Temperature) चढ-उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) थैमान घातलं असतानाचं दुसरीकडं तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमान 40 अशांच्या पुढं गेलं आहे. उन्हाच्या झळा वाढल्यामुळं लोक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, चंद्रपूरमध्ये (Chandrapur) सर्वाधिक म्हणजे 42.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.

Solapur News:

Solapur News: अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील मठाचे महास्वामी श्रीकंठ शिवाचार्य यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल


नोकरीचे आमिष दाखवून 28 लाख उकळल्याचा श्रीकंठ शिवाचार्य यांच्यावर आरोप


अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर मधील एका शिक्षण संस्थेचे चेअरमन असलेल्या श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी एका तरुणाला शाळेत शिक्षकाची नोकरी लावतो म्हणून 28 लाख उकळून फसवणूक केल्याचा आरोप


फिर्यादी शांतवीरप्पा कळसगोंड यांनी दक्षिण अक्कलकोट पोलीस स्टेशनमध्ये याबाबत फिर्याद दाखल केली


आपल्या शाळेत एका शिक्षकाची जागा रिक्त असून महिन्यात 28 लाख रुपये दिल्यास शिक्षक म्हणून नियुक्ती करण्याचे आश्वासन देत फसवणूक केली


फिर्यादीने आपली जमीन विकून महाराजांना 28 लाख रुपये दिले मात्र तरीही  नोकरी न दिल्याने विचारपूस केल्यानंतर त्याला उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली


यामुळे पीडित तरुणाने अक्कलकोट दक्षिण  पोलीस स्टेशनमध्ये दिली फिर्याद


फिर्यादीच्या तक्रारीवरून श्रीकंठ शिवाचार्य यांच्याविरोधात कलम 420 अनुसार गुन्हा दाखल 

वज्रमूठ सभेचा विरोधकांनी धसका घेतलाय : अनिल देशमुख
Anil Deshmukh : नागपूर इथे 16 एप्रिल रोजी होत असलेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची वर्धा जिल्ह्याची नियोजन सभा पार पडली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. याशिवाय विरोधकांनी औरंगाबादच्या सभेचा धसका घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सज्ज व्हा! असे आवाहन अनिल देशमुख यांनी केले आहे. मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी झाली पाहिजे, बूथ कमिटी स्थापन झाल्या पाहिजे. याशिवाय नागपूर विभागात होत असलेल्या वज्रमूठ सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले पाहिजेत, यासाठी या वर्ध्याच्या नियोजन सभेत मंथन झाले. संपूर्ण महाराष्ट्रात वज्रमूठ सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे आणि नाशिकची जबाबदारी दिली आहे. औरंगाबादचा धसका घेऊन नागपूरच्या सभेला विरोध केला जात आहे. विरोधक विरोध करत असल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सांगितले आहे. 

 
राज्यातल्या कुणबी समाजाच्या राजकीय पक्ष स्थापनेसाठी हालचाली सुरु, 22 एप्रिल रोजी मुंबईत राजकीय पक्षाची होणार घोषणा

Ratnagiri News : राज्यातल्या कुणबी समाजाच्या राजकीय पक्ष स्थापनेसाठी हालचाली सुरु


22 एप्रिल रोजी मुंबईत राजकीय पक्षाची होणार घोषणा

 

रवींद्र नाट्यमंदिर इथे राजकीय पक्षाची केली जाणार अधिकृत घोषणा

 

स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या मैदानात उतरणार पक्ष

 

राज्यात कुणबी समाज मोठ्या संख्येने
अमित शाह यांची शनिवारी भाजपच्या नेत्यांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक, मिशन 45 आणि बीएमसी निवडणुकीचा आढावा घेणार

BJP Meeting : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची शनिवारी (15 एप्रिल) संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत अमित शहा मिशन 45 चा आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा आढावा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीला अवघे वर्ष उरले असताना राज्यात काय वातावरण आहे, यासोबतच मुंबई महानगरपालिका निवडणुका लागल्या तर मुंबईत भाजपची काय स्थिती आहे याचा आढावा अमित शहा या बैठकीत घेणार आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील चार उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील चार उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राजेश्वर हांडे, गौरी सावंत, गणेश राठोड, वैशाली देवकर यांची बदली झाली आहे. बुलढाणा उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांची यवतमाळ या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. तर उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत आता विशेष भूसंपादन अधिकारी या पदावर अहमदनगर इथे रुजू होतील तर जळगाव जामोदच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली देवकर यांना वाशीम येथे उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने महसूल व वनविभाग अंतर्गत उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापना केल्या आहेत. याबाबत बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले. 

नाशिकच्या सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलन, ठेकेदाराने तीन महिन्यांपासून वेतन न दिल्याने कामबंद आंदोलनाला सुरुवात

Nashik News : नाशिकच्या सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलन


तापोवन डेपोत आज सकाळपासून आंदोलनाला सुरुवात


ठेकेदारकडून तीन महिन्यांपासून वेतन दिले जात नसल्याने वाहकांनी छेडले कामबंद आंदोलन


जोपर्यंत वेतन नाही तोपर्यंत काम सुरु करणार नसल्याचा इशारा


कर्मचाऱ्यांनी याआधीही केले होते आंदोलन

Nandurbar News: धडगाव तालुक्यातील धावलघाट मधील चिचालाबारी शिवारात रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात आढळून आला बेवारस औषधसाठा

Nandurbar News: धडगाव तालुक्यातील धावलघाट मधील चिचालाबारी शिवारात रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात आढळून आला बेवारस औषध साठा...


औषध साठा कुणी फेकला आजुन उघड नाही


दोन ठिकाणी आढळून आला आहे साठा


काही ठिकाणी अर्धवट वापरलेले औषध तर काही ठिकाणी भरलेल्या औषधी


यात काही इंजेक्शन ors पॉकेट तसेच काही औषध बॉटल आणि गोळ्याचा समावेश


या अगोदरही दुर्गम भागात औषध साठा फेकण्याचा अनेक घटना आल्या होत्या समोर


औषधसाठा मुदत बाह्य आहे की वापराचा

Kolhapur News: करवीर पोलीस ठाण्यासमोर रात्री उशिरा आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचे आंदोलन

Kolhapur News: करवीर पोलीस ठाण्यासमोर रात्री उशिरा आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचे आंदोलन


करवीर तालुक्यातील कुरुकली इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर लावू न दिल्याने संताप


एका एसटी बसवर देखील जमावाकडून दगडफेक केल्याची माहिती


गावातील मुख्य रस्त्यावर होर्डिंग लावण्यास केली होती मनाई


कोल्हापूर येथील आणि कुरुकली गावातील आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी केलं आंदोलन

Maharashtra Weather : आज कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा

Maharashtra Weather : राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस  (Unseasonal rain) पडत आहे. याचा शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटका बसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात आजही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

Nitin Gadkari : मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरण, आरोपी जयेश पुजारीवर युएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होणार

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कार्यालयातील धमकीच्या कॉल प्रकरणी युएपीए कायदा लागू होणार आहे. धमकीच्या प्रकरणातील आरोपी जयेश पुजारी उर्फ शाकीर (Jayesh Pujari) विरोधात युएपीए म्हणजेच बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला जाणार आहे. याबाबतची माहिती एबीपी माझाला नागपूर पोलिसांमधील (Nagpur Police) उच्चपदस्थ विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात 13 एप्रिलचा दिवस एका दुःखद घटनेमुळे नोंद केला गेलाय. 13 एप्रिल 1919 हा असा दिवस होता, जेव्हा अमृतसर येथिल जालियनवाला बाग येथे शांततापूर्ण मेळाव्यासाठी जमलेल्या हजारो भारतीयांवर ब्रिटीशांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. बैसाखीच्या सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे भारताचा इतिहास बदलला गेला. तसेच आजच्याच दिवशी म्हणजे 13 एप्रिल 1699 रोजी शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली. 


1699 : गुरु गोविंद सिंग यांनी खालसा दलाची स्थापना केली (Dal Khalsa) 


बैसाखीच्या सणाच्या दिवशी, 13 एप्रिल 1699 रोजी शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंह (Guru Gobind Singh) यांनी खालसा दलाची स्थापना केली. खालसा दलाची स्थापना ही शीख धर्माच्या इतिहासातील महत्वाची घटना होती. शिखांचे नववे गुरु तेगबहादुर यांच्यानंतर श्री गुरु गोविंद सिंह हे 11 नोव्हेंबर 1675 रोजी शिखांचे दहावे गुरु म्हणून गादीवर विराजमान झाले होते. 


श्री गुरु गोविंद सिंग दररोज गुरुवाणीचे पठण करून आपल्या भक्तांना आणि अनुयायांना त्याचा सविस्तर अर्थ सांगत असत. धर्म आणि समाजाच्या संरक्षणासाठी गुरु गोविंद सिंह यांनी 1699 मध्ये खालसा दलाची स्थापना केली. खालसा पंथाच्या माध्यमातून त्यांनी जातीय भेद नष्ट करुन समानता प्रस्थापित केली. शीख बांधवामध्ये आत्म-सन्मानाची भावना वाढीस लावण्याचे महत्वपूर्ण काम श्री गुरु गोविंद सिंग यांनी केले. श्री गुरु गोविंद सिंहजी यांनी 42 वर्षे शत्रूविरुद्ध सामना केला. 1708 मध्ये त्यांनी नांदेड येथील सचखंड परिसरात आपला देह ठेवला. त्याच परिसरात सचखंड गुरुद्वारा आहे. 


1890 : दादासाहेब तोरणे यांचा जन्मदिन


मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक अशी ओळख असलेल्या रामचंद्र गोपाळ तोरणे उर्फ दादासाहेब तोरणे (Dadasaheb Torne) यांचा जन्म 13 एप्रिल 1890 रोजी झाला. भारतातील पहिले चलचित्र असलेल्या 'भक्त पुंडलिक'ची निर्मिती त्यांनी केली. 


1919 : जालियनवाला बाग हत्याकांड (Jallianwala Bagh) 


भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात 13 एप्रिल हा दिवस महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 13 एप्रिल 1919 रोजी, अमृतसरमधील जालियनवाला बाग (Jallianwala Bagh Massacre) या ठिकाणी शांततेने आंदोलन करण्यासाठी एकत्र जमलेल्या भारतीयांवर ब्रिटिश अधिकारी जनरल डायरने गोळीबार केला. या गोळीबारात शेकडो भारतीयांना आपला जीव गमवावा लागला. 


सन 1919 साली ब्रिटिश सरकार रौलेट कायदा आणण्याच्या तयारीत होते. या कायद्यामुळे कोणत्याही भारतीयला फक्त संशयावरुन, कोणताही खटला दाखल न करता तुरुंगात टाकण्याचा अधिकार ब्रिटिशांना मिळणार होता. भारतीयांनी या कायद्याला कडाडून विरोध केला. पण त्याला न जुमानता 8 मार्चपासून हा कायदा लागू करण्यात आला. याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलनं, निदर्शने सुरू झाली.


रौलेट कायद्याच्या विरोधात महात्मा गांधी यांनी 6 एप्रिल रोजी देशव्यापी आंदोलन घोषित केलं. त्यावेळी अमृतसरचे लोकप्रिय नेते डॉ. सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या या अटकेचा निषेध करण्यासाठी लोकांनी आंदोलन सुरू केलं. त्याच्या विरोधात ब्रिटिशांनी पंजाबमध्ये मार्शल लॉ पुकारला आणि कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ब्रिगेडियर जनरल डायर यांच्याकडे सोपवली.


13 एप्रिल रोजी अमृतसरमधील जालियनवाला बाग येथे रौलेट कायदा मागे घेण्यासाठी आणि नेत्यांची सुटका करण्यासाठी अमृतसरमधील हजारो लोक जालियनवाला बागेत एकत्र जमले. त्यावेळी या जमावावर जनरल डायरने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात हजाराच्या वर लोकांना आपला जीव गमवावा लागला, अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणच्या विहिरीत उड्या घेतल्या. नंतर या घटनेची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशनची नियुक्ती करण्यात आली. पण हंटर कमिशनने या गोळीबारात केवळ 379 लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. 


1942 : व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर 


प्रभात कंपनीच्या संस्थापकांपैकी एक असलेले व्ही शांताराम (V Shantaram) यांनी मतभेदामुळे 13 एप्रिल 1942 रोजी प्रभात कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला. शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम हे एक मराठी-हिंदी चित्रपट निर्माते, आणि दिग्दर्शक होते. प्रभातमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी राजकमल कलामंदिर ही स्वतःची चित्रपट निर्माती कंपनी काढली.


1956 : अभिनेते सतीश कौशिक यांचा जन्म 


दिवंगत अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी झाला. मिस्टर इंडिया या चित्रपटातील "कॅलेंडर"ची भूमिका त्यांची विशेष लोकप्रिय ठरली. याशिवाय त्यांच्या तेरे नाम, जाने भी दो यारो, हम आपके दिल मे रेहते है या चित्रपटातील विनोदी भूमिका लोकप्रिय ठरल्या. 


1973 : अभिनेते बलराज साहनी यांचे निधन  


धरती के लाल, दो बिघा जमीन, गरम हवा, छोटी बहन आणि काबुलीवाला या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या बलराज सहानी (Balraj Sahni) यांचं 13 एप्रिल 1973 रोजी निधन झालं. 


1984: भारताचे सियाचिनमध्ये ऑपरेशन मेघदूत (Operation Meghdoot) 


पाकिस्तानी सैन्य सियाचीन ग्लेशिअरवर ताबा मिळवण्यासाठी चढाई करणार असल्याची गुप्त माहिती भारतीय गुप्तचर संघटनेला (RAW) मिळाली. सियाचिन हे युद्धाच्या दृष्टीने मोक्याचं ठिकाण असून त्यावर जर पाकिस्तानने (Pakistan) ताबा मिळवला तर भारतासाठी ते धोक्याचं ठरणार होतं. त्यामुळे 13 एप्रिल 1984 रोजी भारतीय सैन्याने सियाचीनमध्ये 'ऑपरेशन मेघदूत' लॉन्च केलं. हाडं गोठवणाऱ्या थंडीत भारतीय सैन्याने जगातील या सर्वोच्च युद्धभूमीवर कब्जा मिळवला. भारताच्या दिशेला सियाचीनचा उभा चढ आहे, यामुळे ऑपरेशन मेघदूत अतिशय कठीण होतं. तर पाकिस्तानच्या बाजूची उंची फार कमी आहे. अशा परिस्थितीतही भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैन्यावर विजय मिळवला. त्यामुळे जगभरातील यशस्वी लढायांमध्ये 'ऑपरेशन मेघदूत'चाही समावेश होतो. हे एक वेगळंच युद्ध होतं, ज्यात भारतीय सैन्याने उणे  60 पासून उणे 70 अंश सेल्सिअस तापमानात सर्वात उंच युद्धभूमीवर जाऊन विजय मिळवला होता. तर पाकिस्तानसाठी हा लाजिरवाणा पराभव होता.


1997: टायगर वुड्सने वयाच्या 21 व्या वर्षी यूएस मास्टर्स चॅम्पियनशिप जिंकली. यासह, सर्वात कमी वयात ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला.


2000 : अभिनेत्री लारा दत्ताने विश्वसुंदरीचा किताब पटकावला


आजचा दिवस भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा असून याच दिवशी म्हणजे 13 एप्रिल 2000 रोजी लारा दत्ता (Lara Datta) हिने मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला. त्या आधी तिने फेमिना मिस इंडियाची स्पर्धाही जिंकली होती. लारा दत्ताने नंतर अंदाज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.