Maharashtra News LIVE Updates : संजय राऊतांच्या सांगली दौऱ्यात काँग्रेस नेत्यांची पाठ
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
प्रकाश आंबेडकरांसाठी माझा हात नेहमी पुढे आहे. आमची भूमिका प्रामाणिक आहे. आमच्यासाठी संविधान सर्वोपरी आहे. त्यासाठी सर्व मानापमान बाजूला ठेवू असे मन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं. आम्ही पण हिंदू आहोत, आम्हाला पण धर्माचा अभिमान आहे पण धर्माचा वापर राजकारणासाठी करणार नाही असे पटोले म्हणाले.
पुण्यात पोलीस चौकीत पोलीस कर्मचाऱ्याने केली आत्महत्या
पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळ्या झाडत आत्महत्या केली
खडक पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याने केली आत्महत्या
लोहिया नगर पोलीस चौकीत केली आत्महत्या
पुणे पोलीस दलातली कर्मचाऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केली
भारत दत्ता अस्मर असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून आज पहाटे त्याने आत्महत्या केल्याचे समजत आहे
काँग्रेसला जागावाटपात आलेल्या अपयशाचं खापर माझ्यावर फोडण्याचा प्रयत्न केला जातोय
भाजप नेते अशोक चव्हाणांचा काँग्रेस नेत्यांवर पलटवार
काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही
महाराष्ट्र काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा दोघेही जुमानत नाहीत
चव्हाणांची काँग्रेस नेत्यांवर टीका
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार
अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द
अर्जात त्रुटी असल्याने उमेदवारी अर्ज करण्यात आला रद्द
मंत्री दादा भुसे
नाशिक लोकसभेची स्टँन्डींग जागा ही शिवसेनेची...
नैसर्गिक रित्या ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे हा दावा कायम आहे....
या क्षणाला देखील आमचा दावा...
विद्यमान खा.हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून मतदारसंघात चांगली कामे केलीत...
महायुतीचे नेते जो काही निर्णय करतील , तस मार्गक्रमण करणे शिवसैनिकांच काम ...
लोकशाही प्रकियेत काही गोष्टी मागे पुढे होत असतात...
काही ठिकाणी स्थानिक बाबी लक्षात घेऊन बदल करावा लागला मात्र बहुतांशी ठिकाणी विद्यमान खासदार आहेतच...
महायुतीमध्ये सर्वांचे एक विचार आहेत...
मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री चर्चा एकत्र करतायत...
आरपीआय गट महायुतीचा भाग , एकदिलाने काम करणार...
खा.आठवलेंना वरिष्ठ पातळीवर सन्मान दिला जाईल हा आम्हाला विश्वास....
महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या पेचाला अशोक चव्हाण जबाबदार
काँग्रेस नेत्यांची खासगीत बोलताना माहिती
महाविकास आघाडी मधील जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेत अशोक चव्हाणांची भूमिका महत्त्वाची होती
या चर्चे दरम्यान काँग्रेसचे पारंपरिक मतदार संघावर दावा करण्या ऐवजी इतर मतदार संघावर दावा केला
त्यामुळे आत्ता ठाकरे गट आणि शरद पवार गटाने सांगली,भिवंडी आणि मुंबई तील काही मतदार संघावर त्यांनी दावा केला आहे
रामटेक,कोल्हापूर आणि अमरावती हे मतदार संघावर ठाकरे गटाचा दावा होता पण हे मतदार संघ काँग्रेस च्या वाट्याला आल्यामुळे सांगली,भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईचा पेच हा वाढला
त्यामुळे अशोक चव्हाण यांनी जाणीवपूर्वक पक्षांतर करण्यापूर्वी हा घोळ केला का? हा संशय काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुदतीपूर्व होणार तुरुंगातून सुटका!!!!
2006 च्या शासन निर्णयाच्या आधारे कुख्यात डॅान अरुण गवळी ने शिक्षेतून सुट देण्याची मागणी केली होती
अरुण गवळीच्या त्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पुर्ण झाली होती.. मात्र कोर्टाने निकाल राखून ठेवला होता.. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने अरुण गवळी यांची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहे मात्र त्या संदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही दिला आहे...
मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात तसेच इतर गुन्हेगारी कृत्य यासाठी गवळी ला दोन वेळेला जन्मठेपेची शिक्षा झाली होती..
सध्या अरुण गवळी नागपूच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे...
काय आहे 2006 चा शासन निर्णय...
वयाची 65 वर्षे पूर्ण झालेल्या अशक्त, निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्याला शिक्षेत सूट मिळते...
त्यानुसारच डॉन अरुण गवळीची शिक्षेतून मुदतीपूर्व सुटकेची मागणी केली होती.. आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्याची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे...
आम्ही एकनिष्ठ आणि निष्ठावंत आहोत आणि राहणारच. तुमचा बॉस दरवेळी बदलत असतो. आता तुमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय आणि तुम्ही तिथे वॉचमनगीरी करताय हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितल असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणे यांच्यावर केली. तुम्हाला एकच सल्ला, तुमचे वडील केंद्रीय मंत्री असून देखील त्यांना तिकीट मिळालेलं नाही. आपण वॉचमन असल्याने त्यांना तिथून तिकीट देण्यासाठी प्रयत्न करावेत. तरच तुमच्या वॉचमनगिरीचा आणि बॉसचा वडिलांना फायदा होईल असे नाईक म्हणाले.
राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला
या जाहीरनाम्यात - हमीभावासाठी कायदा
- 30 लाख सरकारी नोकऱ्या
- आरक्षणाची मर्यादा वाढवणार
- गरीब महिलांना 1 लाखाची मदत
- प्रशिक्षणासाठी 1 लाख
संजय राऊत यांच्या सांगली दौऱ्याला काँग्रेस नेत्यांची पाठ
सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते दौऱ्याला गैरहजर राहणार
विशाल पाटील हे मुंबई आहेत तर,विश्वजीत कदम हे पुण्यात आहेत आणि सांगली जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष विक्रम सावंत हे जत या मतदार संघात आहेत
सांगली लोकसभा मतदार संघावर काँग्रेस कडून दावा करण्यात आला आहे आणि या लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी मधे मैत्रीपूर्ण लढत घेण्यात यावी असा प्रस्ताव राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दिला होता पण त्यावर अजून दिल्लीतील काँग्रेस नेत्यांकडून उत्तर आलं नाही आहे
सांगलीतील काँग्रेस नेत्यांची ठाकरे गटावर नाराजी
संजय राऊत
विश्वजीत कदम आणि विशाल पाटील आमचेच,त्यांची नाराजी लवकरच दूर होईल असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं.
सांगलीची जागा शिवसेनाचं लढणार,
विशाल पाटील आणि पतंगराव कदम यांच्या विषयी आम्हाला आस्था आणि प्रेम आहे.
विशाल पाटील संसदेत कसे जातील याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेणार.
आरबीआयकडून यंदाच्या आर्थिक वर्षातलं पहिलं पतधोरण जाहीर
यंदा देखील रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही
आरबीआयकडून रेपो रेट ६.५ टक्क्यांवर कायम
व्याजदरात कोणतेही बदल होणार नाहीत
फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो रेटमध्ये शेवटची वाढ झाली होती
३-५ एप्रिल दरम्यान पतधोरण समितीची बैठक पार पडली
मुंबई युथ कॉंग्रेसने संजय निरूपम यांच्या घराबाहेर ही पोस्टर्स लावली आहेत. अखिल भारतीय कॉंग्रेस समितीने पक्षशिस्तभंग केल्याने संजय निरूपम यांची हकालपट्टी केली. या निर्णयासाठी आभार मानले आहेत. या निर्णयाचं स्वागत होत आहे.
संजय निरूपम यांनी पक्ष नेत्यांचा अवमान करत टीका केल्यास त्यांना मुंबईत फिरू देणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे
रत्नागिरी - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सभांचा धडाका
उद्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर आणि जयगड इथं जाहीर सभा
महायुतीचा उमेदवार कोण याबाबत अद्यापही उत्सुकता
नारायण राणे यांच्या नावाची जोरदार चर्चा; किरण सामंत यांचे नाव देखील चर्चेत पण, अद्याप अधिकृत घोषणा नाही
छगन भुजबळ लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत
- भुजबळ कुटुंबियाकडून नाशिक जिल्हा बँकेचे कर्ज भरण्यास सुरुवात
- 2011 साली आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर ( कारखाना) साठी घेण्यात आले होते नाशिक जिल्हा बँकेतून कर्ज
- पहिल्या टप्प्यात भुजबळ कुटुंबियांकडून साडेसहा कोटी रुपये भरण्यात आले
- वन टाइम सेटलमेंट योजनेत थकीत कर्ज भरण्यात येत असल्याची माहिती
- 28 कोटी रुपयापैकी पाहिल्या टप्प्यात भुजबळ कुटुंबीयांकडून साडेसहा कोटी रुपये भरण्यात आले
- उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने भरणार असल्याचे बँकेला सांगितले
- छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची सध्या आहे चर्चा सुरू
- बँकेच्या थकीत कर्ज प्रकरणी कोणी तक्रार घेऊ नये यासाठी थकीत कर्ज भरण्यास सुरवात केल्याची देखील चर्चा
Bhandara : भंडारा जिल्ह्यातील तुमसर इथं एका किरायच्या घरात आयपीएल क्रिकेटच्या सुरू असलेल्या सट्टा अड्ड्यावर तुमसर पोलिसांनी छापा टाकला. सट्टा अड्डा चालविणारे बुकी लाईन होल्डींग मशिनच्या माध्यमातून सट्टा घेत होते. या कारवाईत मोबाईल फोन्स, चार्जिंग डिवाईस, लॅपटॉप, रेकॉर्डर, लाईन होल्डींग मशिन असा एकूण सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाई दरम्यान, पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह चौघांना ताब्यात घेतलं असून अन्य दोघे फरार अशा सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या करवाईनं आयपीएल वर सट्टा खेळणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई आयपीएस रश्मिता राव यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
मतं मिळविण्यासाठी नाना पटोलेंनी गिधाडांच्या वृत्तीनं वागू नये- बावनकुळे
अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्याबद्दल नाना पटोलेंचं निंदनीय वक्तव्य
नाना पटोलेंनी घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चींतू नये- बावनकुळे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची नाना पटोले यांच्यावर सडकून टीका
अकोल्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं असंवेदनशील वक्तव्य
उत्तर पश्चिम मुंबईमधून संजय निरुपय यांची शिवसेनेकडून चाचपणी सुरू
संजय निरुपम यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश होण्याची शक्यता
संजय निरुपम सोबत शरद पोंक्षे,सचिन पिळगावकर आणि सचिन खेडेकर या मराठमोळ्या कलाकारांची देखील चाचपणी सुरू
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -