चंद्रपूर :  वाघांचा नंदनवन मानली जाणारी वैदर्भीय भूमी वाघांच्या शिकाऱ्यांसाठी ही नंदनवन ठरत आहे का?  कारण गेल्या काही काळात विदर्भात आणि शेजारच्या मध्यप्रदेशात वाघांच्या शिकारीच्या एक दोन नाही तर तब्बल सात घटना उघडकीस आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सात पैकी तीन वाघांचा बळी तर अंधश्रद्धेपायी गेला आहे. वन्य प्राण्यांच्या अवयवांच्या मदतीने काही मांत्रिक पैशांचा पाऊस पाडतात असा गैरसमज असलेले काही सुशिक्षित ही वाघाच्या शिकारीच्या गुन्ह्यात अडकले आहे.


 सहा ऑक्टोबर रोजी नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी वन परिक्षेत्राच्या हद्दीत वाघाच्या अवघ्या दहा दिवसाच्या बछड्याच्या अवयवांची विक्री करण्याच्या प्रयत्नात वन विभागाने लोमेश दाबले आणि कालिदास रायपुरे यांना अटक केली होती.  त्यांच्या चौकशीत त्यांनी अंधश्रद्धेपायी वाघाच्या बछड्याची शिकार केल्याची कबुली दिली.  वाघाच्या आणि इतर वन्य प्राण्यांच्या अवयवांचा वापर करून काही मांत्रिक पैशांचा पाऊस पाडू शकतात असा त्यांचा विश्वास होता आणि त्याच अंधश्रद्धेपायी गावाचा सरपंच असलेल्या लोमेश दाबले आणि आणि स्नातक असलेल्या कालिदास रायपुरेने वाघाच्या बछड्याची शिकार केली.


 वन विभागाच्या वाइल्ड लाईफ क्राइम कंट्रोल ब्युरोने गेल्या अडीच महिन्यात नागपूर व अवती भवतीच्या जिल्ह्यात वन तस्करांवर विरोधात नऊ वेगवेगळ्या कारवाया केल्या आहेत.  यामध्ये तब्बल 39 वन तस्करांना वाघांच्या व इतर वन्य प्राण्यांच्या अवयवांसह जेरबंद केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या वन तस्करांनी सात वाघांच्या शिकारीची कबुलीही दिली आहे. दुर्दैव म्हणजे सात पैकी तीन वाघ अंधश्रद्धेचे बळी ठरले आहे.


दरम्यान वाईल्ड लाईफ क्राइम कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी सर्व सातही वाघांची शिकार इतक्यातच झाली आहे असं नाही तर शिकार्‍यांनी गेल्या दीड ते दोन वर्षात कधीतरी या वाघांची शिकार केली असून कोरोनानंतर आता पुन्हा वन्य प्राण्यांच्या आणि खास करून वाघांच्या अवयवांचा आंतरराष्ट्रीय बाजार तेजीत आल्यामुळे आजवर लपवून ठेवलेले वाघांचे अवयव विक्रीसाठी बाहेर काढले असावे असा संशय व्यक्त केला आहे.


ज्या 39 वन तस्करांना वाईल्ड लाइफ क्राईम कंट्रोल ब्युरोने जेरबंद केल आहे  त्यापैकी काहीजण सुशिक्षित असून एक आरोपी गावाचा सरपंच तर दुसरा शाळेतील शिक्षक आहे.  काही ग्रॅज्युएट तरुणही झटपट पैशाच्या लालसेपायी वन्यप्राण्यांच्या जिवावर उठलेल्या वन तस्करीच्या चक्रव्यूहात ओढले गेले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात तंत्र-मंत्राच्या साहाय्याने वन्य प्राण्यांच्या अवयवांचा वापर करून पैशांचा पाऊस पाडता येतो.