Gokul Milk Price Hike : गोकुळच्या दूध दरासंदर्भात (Gokul Milk Price Hike) मोठी बातमी समोर आली आहे. गोकुळनं  आपल्या दूध विक्री किंमतीत चार रुपयांची वाढ केली आहे. शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आली आहे. यापुढे गोकुळ’ फुल क्रीमच्या दुधाची ग्राहकांसाठी विक्री किंमत ही 58 रुपये लीटर अशी राहणार असल्याचं संघाच्या वतीनं कळविण्यात आलं आहे. हे दर उद्यापासून (16 एप्रिलपासून) अंमलात येणार आहे


शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर गोकुळनं दूध विक्री किंमतीत चार रुपयांची वाढ केली. हे दर 16 एप्रिलपासून म्हणजेच (15 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून) लागू होणार आहेत.  गोकुळच्या फुल क्रिम, प्रमाणित, गाय आणि टोण्ड दुधाच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. गोकुळचे फुल क्रिम दूध (1 लिटर) 58 रुपये दराने आणि फुल क्रिम दूध (500 मिली) 29 रुपये दराने मिळणार आहे.  नवे दर केवळ कोल्हापूर शहरासाठी लागू असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गोकुळ दुधाच्या खरेदी विक्रीत वाढ झाल्यानं ग्राहकांना चांगलाच फटका बसणार आहे.



'गोकुळ'चं दूध एका वैशिषट्यपूर्ण पॅकिंग असलेल्या पिशवीतून वितरीत केले जाते.  या पॅकिंगचं वैशिष्ट्य म्हणजे यात पाच लेअर्स असतील. त्यामुळे एकदा दूध पॅक झालं की, त्यात भेसळ करणं अशक्य होईल. सध्या दररोज एकूण सरासरी 13 लाख लीटर दुधाची विक्री केली जात आहे. यात मुंबई शहरात एकूण सरासरी 9 लाख लीटर दुधाची विक्री केली जाते.