मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona Update) चढ उतार  होताना  दिसत आहे.  शुक्रवारी राज्यात  69 रुग्णांचे निदान झाले आहे.  राज्यातील  ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील  एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 681 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या चोवीस तासात  एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 132 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


राज्यात आज एका कोरोना रुग्णांचा मृत्यू


राज्यात आज एका कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,27, 112  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 98, 25, 249 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 


राज्यात सध्या  681 अॅक्टिव्ह रुग्ण 


राज्यात सध्या 681 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 341 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल  अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 50 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.


देशात गेल्या 24 तासांत नवीन 949 कोरोना रुग्णांची नोंद


 देशात कोरोना विषाणूच्या संसर्गात किंचित घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 949 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाला असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 1 हजार 7  कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 191 इतकी झाली आहे. गुरुवारी दिवसभरात देशात 810 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21  हजार 473  इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 7 हजार रुग्ण कोरोा संसर्गमुक्त झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.26 टक्के इतका झाला आहे.