सांगली : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या चांदोली बुद्रुक येथील जानाईवाडी नजीक असलेल्या डोंगरास आज दुपारी अज्ञातांकडून लावण्यात आलेल्या आगीमुळे वनसंपदेचे प्रचंड नुकसान झाले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पानजीक वणवा लागण्याची या महिन्याभरातली ही दुसरी घटना आहे. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने  वेगाने आग सगळीकडे पसरत होती. धुराचे लोट अभयारण्यात पसरले होते. या आगीमध्ये डोंगररांगातील झाडे-झुडपे अनेक जीवजंतू, सरपटणारे प्राणी, जळून खाक होत असून वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे.  आग विझवण्यासाठी वन्यजीव विभागाकडे प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने अथवा त्यासाठी लागणारी कोणतीही सक्षम यंत्रणा नसल्याने वन्यजीवचे कर्मचारी आग विझविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते.


 सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चांदोली बुद्रुक येथील जानाईवाडीनजीक डोंगरास गुरुवारी 4 च्या सुमारास आग लावली. महिन्याभरात दुसऱ्यादा या अभयारण्यत आग  लागली असल्याने ही आग लागली की लावली याबाबत संशय व्यक्त केला जातोय.  या आगीत वनसंपदेचे प्रचंड नुकसान झाले असून, वन्यजीव कर्मचाऱ्यांकडून आग शमविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. चांदोली वनपालांच्या मते, अडीच एकर क्षेत्रात आग लागली होती. मात्र हे क्षेत्र जास्त असण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकाऱ्यांचा संपर्क न झाल्यामुळे या आगीत नेमके किती क्षेत्र जळून खाक झाले, हे समजू शकले नाही. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पानजीक वणवा लागण्याची या महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. वाऱ्याचा वेग असल्याने तितक्याच वेगाने आग सगळीकडे पसरत होती. धुराचे लोळ परिसरात पसरले होते. या आगीमध्ये डोंगररांगातील झाडेझुडपे अनेक जीवजंतू, सरपटणारे प्राणी जळत असून, वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे.


काही लोकांकडून या परिसरातील डोंगररांगांना आगी लावल्या जात आहेत. या डोंगररांगांमध्ये आंबा, जांभूळ, सागवान, निलगिरी, अशोका, भेडा, गेळी, अंजनी, कुंभा, आंबिरा, हिरडा, नरक्या अशा विविध प्रकारच्या झाडांप्रमाणे करवंद, तोरणा, आवळा अशी झुडपे आहेत. अभयारण्याला लागूनच या डोंगररांगा असल्याने अनेक वन्यप्राण्यांचे अस्तित्व या डोंगररांगांमध्ये टिकून आहे. आगीत सरपटणारे प्राणी, दुर्मिळ व औषधी वनस्पती तसेच अनेक वन्यजीव जळून खाक होत आहेत.वन्यजीव विभागाकडे प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने अथवा त्यासाठी लागणारी कोणतीही सक्षम यंत्रणा नसल्याने आग शमविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.