मुंबई : महाविकास आघाडी स्थापन होऊन आता जवळपास अडीच वर्ष होत आली आहेत असं असताना भाजपनं मिशन 2024 च्या नावाखाली मोर्चेबांधणी सुरू केली. खरंच हे मिशन 2024 आहे की, त्याआधी राज्यात राजकीय भूकंप झालाच तर त्यासाठी भाजप आतापासून तयारी करते याची चर्चा सुरू झाली.


खरंतर  2024 च्या निवडणुकीला तब्बल अडीच वर्ष शिल्लक असतानाच भाजपने प्रमुख डझनभर नेत्यांवर येणाऱ्या काळातील निवडणुकांसाठी दोन लोकसभा आणि बारा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली. काल भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली. यात हा निर्णय घेण्यात आला. यात प्रत्येक नेत्याला दोन लोकसभा मतदारसंघ आणि बारा विधानसभा मतदार संघाची मोर्चे बांधणी करण्यासाठी सांगण्यात आले. येणाऱ्या 15 ते 30 एप्रिल दरम्यान डझनभर नेते संबंधित जिल्ह्यात प्रवास  करणार आहे


कुठल्या नेत्यावर कुठल्या जिल्ह्याची जबाबदारी?



  • देवेंद्र फडणवीस - सोलापूर, अहमदनगर 

  • चंद्रकांतदादा पाटील - ठाणे ग्रामीण आणि  नाशिक 

  • रावसाहेब दानवे - बुलढाणा नंदूरबार 

  • सुधीर मुंनगंटीवार - बीड, जालना

  • प्रविण दरेकर - पालघर, मिरा भाईंदर 

  • गिरीष महाजन - उस्मानाबाद, हिंगोली

  • आशिष शेलार - रत्नागिरी, सिंधुदुर्ग

  • पंकजा मुंडे - कोल्हापूर, सांगली

  • चंद्रशेखर बावनकुळे - अकोला, अमरावती

  • श्रीकांत भारतीय - नांदेड, परभणी

  • संजय कुटे - दक्षिण रायगड,उत्तर रायगड

  • रविंद्र चव्हाण - सातारा, पुणे ग्रामीण

  • संभाजी पाटील निलंगेकर - गोंदिया, भंडारा


2024  च्या विधानसभा निवडणुकीसाठी आणखी अडीच वर्षाचा कालावधी तर लोकसभेसाठी दोन वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. असताना भाजपने आतापासूनच दिग्गज नेत्यांच्या खांद्यावर प्रत्येकी दोन जिल्ह्यांची धुरा देऊन मोर्चेबांधणीला का सुरू केली?  भाजपचं खरेच मिशन 2024 ची तयारी करतंय की त्याआधी काही राजकीय डावपेच खेळण्यासाठी मैदान तयार केलं जातंय? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha