Marathwada Unseasonal Rain Update: मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) आधीच शेतकरी संकटात सापडला असताना, आता पुन्हा एकदा काल (7 एप्रिल) मराठवाड्यातील (Marathwada) अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान शुक्रवारी मराठवाड्यात 4.1 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर वादळी वाऱ्यासह वीज पडल्याने लहान-मोठ्या 25 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 3 व्यक्ती जखमी झाले असून, छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाला आहे. मात्र काल झालेल्या अवकाळी पावसामुळे 33 टक्के पेक्षा अधिक नुकसान विभागात कुठेच झाला नसल्याचा प्रथमिक अंदाज प्रशासनाकडून देण्यात आला आहे. 


शुक्रवारी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल 



  • सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर 
      मौजे सिरसाळा येथील अंबादास भिका राठोड यांचा वीज पडून मृत्यू 
      5 गाई वीज पडून मृत्यू 

  • सोयगाव, छत्रपती संभाजीनगर 
      3 व्यक्ती वीज पडून जखमी (मौ.वरखेडी ता.सोयगाव) 1 
      1  बकरी वीज पडून मयत (रा.वेताळवाडी) 

  • कन्नड, छत्रपती संभाजीनगर
    1 बैल वीज पडून (रा.लोहगाव)
    2 बैल वीज पडून (रा.देवपूर)

  • फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर 
    1 बैल वीज पडून (रा.रांजणगाव)

  • पैठण, छत्रपती संभाजीनगर 
    1 गाय व 1 बैल वीज पडून (रा.मुलांनी वडगाव)

  • जालना 
    1 गाय वीज पडून रा. कडवंची 

  • भोकरदन, जालना 
    1 बैल वीज पडून (रा. वालसावंगी)
    1  गाय वीज पडून (रा.आडगाव)

  • लातूर
    1 म्हैस वीज पडून (रा. नेलवाड ता.निलंगा)

  • उमरगा, उस्मानाबाद 
    2 म्हैस वीज पडून (रा.कुन्हाली)
    1 म्हैस वीज पडून (रा. हिप्परगाव)
    1 म्हैस वीज पडून (रा.नाई चाकुर)


मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानभरपाईसाठी 84 कोटी 75 लाखांची गरज


मराठवाड्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून, प्रशासनाकडून पंचनामे करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत 99 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहे. मराठवाडा विभागात 8 ते 20 मार्चदरम्यान झालेल्या गारपीट, अवकाळी पावसामुळे एकूण 1 लाख 22 हजार 18 शेतकऱ्यांचे समारे 60 हजार 402 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी 84 कोटी 75 लाख 19 हजार रुपयांची मागणी सुधारित दरांनुसार प्रशासनाने शासनाकडे केली आहे. ज्यात जिरायत पिकासाठी 20 कोटी 92 लाख, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 51 कोटी 59 लाख, फळपिकांच्या नुकसानीसाठी 12 कोटी 23 लाख, असे सुमारे 84 कोटी 75 लाख 91 हजार रुपयांची मदत नुकसान भरपाईसाठी लागणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Marathwada : मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानभरपाईसाठी 84 कोटी 75 लाखांची गरज; प्रशासनाचा प्रस्ताव