Marathwada Unseasonal Rain Damage : मराठवाड्यात (Marathwada) मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आणि आतापर्यंत 99 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर मराठवाडा विभागात 8 ते 20 मार्चदरम्यान झालेल्या गारपीट, अवकाळी  पावसामुळे एकूण 1 लाख 22 हजार 18 शेतकऱ्यांचे समारे 60 हजार 402 हेक्टरवरील नुकसान झाले आहेत. तर झालेल्या नुकसानीसाठी 84 कोटी 75 लाख 19 हजार रुपयांची मागणी सुधारित दरांनुसार शासनाकडे करण्यात आली आहे. ज्यात जिरायत पिकासाठी 20 कोटी 92 लाख, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 51 कोटी 59 लाख, फळपिकांच्या नुकसानीसाठी 12 कोटी 23 लाख, असे सुमारे 84 कोटी 75 लाख 91 हजार रुपयांची मदत नुकसान भरपाईसाठी लागणार आहे.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आधी अतिवृष्टी आणि त्यानंतर मार्च महिन्यात दोनदा अवकाळी पावसाचा सामना करावा लागला. मार्च महिन्यात 4 ते 9 मार्च आणि 15 ते 21 मार्च या कालावधीत अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे कडधान्य, फळ पिके, भाजीपाला, गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, संत्रा, इत्यादी पिकांचे नुकसान झाले होते. तर राज्यभरातील 1 लाख 99 हजार 486 हेक्टरवरील पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. दरम्यान मराठवाड्यात देखील अवकाळी पावसामुळे एकूण 1 लाख 22 हजार 18  शेतकऱ्यांचे समारे 60 हजार 402 हेक्टरवरील नुकसान झाले आहेत. आता या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 84  कोटी 75 लाख 19 हजार रुपयांची मागणी सुधारित दरांनुसार शासनाकडे करण्यात आली आहे.

नुकसानभरपाई मागणी आकडेवारी...

जिल्हा  बाधित शेतकरी  एकूण नुकसान (हेक्टर) मदत मागणी 
छत्रपती संभाजीनगर  35015 13525.07 22 कोटी 17 लाख 41 हजार 
जालना  4215 1969.49 03 कोटी 67 लाख 88 हजार 
परभणी  5999 3960.81 04 कोटी 37 लाख 47 हजार 
हिंगोली  6526 3838.72 06 कोटी 04 लाख 49 हजार 
नांदेड  365432 21579.50 30 कोटी 52 लाख 13 हजार 
बीड  8503 3802.02 05 कोटी 99 लाख 99 हजार 
लातूर  22565 10367.83 10 कोटी 56 लाख 55 हजार 
धाराशिव  2652 1949 01 कोटी 39  लाख 27 हजार 
एकूण  122018 60402.44 84 कोटी 75 लाख 19 हजार 

इतर महत्वाच्या बातम्या : 

अवकाळी पावसामुळे राज्यातील दोन लाख हेक्टरवरील पिकांची माती; नुकसानीचे पंचनामे पूर्ण