Maharashtra Beed News  : जिल्ह्यातील धावपटू अविनाश साबळे याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर चुणूक दाखविली आहे. अमेरिकेतील सन जुआन  येथे झालेल्या राऊंड रनिंग मध्ये त्याने तीस वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. विक्रमवीरअविनाश साबळे सध्या अमेरिकेत पुढील स्पर्धेसाठी तयारी करत आहे. आष्टी सारख्या छोट्याशा गावात जन्माला आलेल्या मांडवा गावच्या या तरूणाने सातासमुद्रापलीकडे आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवला आहे.


अविनाश पहिली ते पाचवीपर्यंत गावातील जिल्हा परिषद शाळेमध्येच शिकला. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्याचे आई-वडील वीटभट्टीवर काम करायचे आणि त्यातही त्यांना तो मदत करायचा. शाळेत जाताना आणि येताना तो धावण्याचा सराव करायचा आणि त्याच्या याच सरावामुळे 2005 मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत त्याने पहिला नंबर पटकावला होता.


अविनाश आता धावण्याच्या स्पर्धेमध्ये यशाचे एक-एक शिखर सर करतोय आणि त्यासाठी त्याला त्याच्या कुटुंबाची देखील मोलाची साथ मिळाली. मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी आणि सरावासाठी वेळप्रसंगी व्याजाने पैसे काढले आणि त्याचे शिक्षण व सराव चालू ठेवला. लष्करामध्ये अविनाशला नोकरी लागली, तरीही त्याच्यातला खेळाडू काही शांत बसाला नाही.


जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अविनाशने ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवता आला नसला तरी स्टीपलचेस प्रकारात जागतिक स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता. त्याने केलेल्या या नव्या विक्रमामुळे आता अविनाशला आशियाई क्रीडा स्पर्धेत 3 हजार मीटर स्टीपलचेस आणि 5 हजार मीटर या दोन्ही प्रकारात उतरवण्याची तयारी करत आहे. 


अविनाशने अमेरिकेत नुकताच धावण्याचा एक रेकॉर्ड देखील मोडीत काढला आहे. सॅन जुआन कॅपिस्टानो येथे झालेल्या साऊंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये 5 हजार मीटर शर्यतीत धावून धावपटू बहादूर प्रसाद याने केलेला 30 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे.


संबंधित बातम्या: