बीड : मुलीच्या लग्नानंतर अवघ्या सात दिवसातच कर्जाच्या विवंचनेतून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.  बीडच्या वडवणी तालुक्यातील देवडी या गावात घटना घडली आहे. आसाराम दत्तू सांगळे (44 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच नाव असून सात दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या मुलीचं कन्यादान केलं होतं


यापूर्वी शेतीसाठी घेतलेले कर्ज आणि त्यातच मुलीच्या लग्नात झालेला खर्च यामुळे कर्जाचा डोंगर वाढतच गेला आणि याच विवंचनेतून आसाराम यांनी शेतात असलेल्या आपल्या राहत्या घरी विष प्राशन केलं हा प्रकार त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्यांना बीडच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल मात्र उपचारादरम्यान आसाराम सांगळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला 


कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी आणि त्यातही पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यान शेतकऱ्यांच मोठ आर्थिक नुकसान होतं आणि त्यातच आता महागाईचा भडका झाल्याने सर्वसामान्य शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून असल्याने वाढत्या महागाईत शेती व्यवसाय हा आता बट्ट्याचा ठरू लागला आहे. 


आत्महत्या केलेले शेतकरी आसाराम सांगळे गेल्या चार दिवसांपासून अस्वस्थ होते कर्ज कसं खेळायचं हा प्रश्न त्यांना भेडसावत होता आणि याच विवंचनेतून त्यांनी आपला आयुष्य संपवला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं आणि दोन मुली असा परिवार असून आत्महत्येच्या या घटनेनंतर निवडी गावात मात्र हळहळ व्यक्त व्यक्त होत आहे. 


संबंधित बातम्या :