Anganwadi Worker Protest: महाराष्ट्र राज्य अंगणवाडी (Anganwad) कृती समितीच्या वतीने अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा आज तिसरा दिवस असून, यावर अजूनही कोणताही तोडगा निघालेला नाही. मात्र याचवेळी या संपाचा फटका लाखो बालकांना बसताना पाहायला मिळत आहे. कारण अंगणवाडी बंद असल्याने सहा वर्षापर्यंतची बालके पोषण आहारापासून वंचित राहत आहेत.
वेतनश्रेणी लागू करणे किंवा मानधनात वाढ करणे, नवीन मोबाईल उपलब्ध करून देणे, पेन्शन लागू करणे आदी प्रमुख मागण्यासाठी 20 फेब्रुवारीपासून पासून महाराष्ट्रात अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने अंगणवाडी सेविका-मदतनिस यांनी बेमुदत राज्यव्यापी संप पुकारलेला आहे. दरम्यान या काळात राज्यातील अंगणवाड्या बंद करून सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस संपात सहभागी झाल्या आहेत. या संपाचा आज तिसर दिवस आहे. तर या संपाचा फटका लाखो बालकांना बसताना पाहायला मिळत आहे. अंगणवाडी बंद असल्याने सहा वर्षापर्यंतची बालके पोषण आहारापासून वंचित राहत आहेत. सोबतच र्भवती मातांची तपासणी, लसीकरण, कुपोषण निर्मुलन आदी कार्यक्रमांवरही मोठा परिणाम होतांना पाहायला मिळत आहे.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या संपामुळे गरोदर मातेचा आहार, स्थनदा मातेचा आहार, झीरो ते तीन वर्षे वयोगटातील मुलांचा आहार, तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांचा आहार बंद झालेला आहे. सोबतच कुपोषण कमी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका-मदतनीस यांचेवर असते, याचा देखील फटका बसताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा संपावर कधी तोडगा निघणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
औरंगाबादेतील तीन हजार अंगणवाडी कर्मचारी संपात सहभागी
वेतनश्रेणी लागू करणे किंवा मानधनात वाढ करणे, नवीन मोबाइल उपलब्ध करून देणे, पेन्शन लागू करणे आदी प्रमुख मागण्या घेऊन राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी सोमवारपासून संपावर गेले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील तीन हजार अंगणवाडी कर्मचारी या संपात सहभागी झाल्या आहेत. प्रत्येक तालुक्यातील प्रकल्प कार्यालयावर आंदोलने, मेळावे घेण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.
यापूर्वी झालेली आंदोलनं!
- 15 नोवेंबर 2022: अंगणवाडी कर्मचारी संघटनाच्या कृती समितीच्या वतीने आझाद मैदा मुंबई येथे झालेले आंदोलन व महिला व बाल विकास मंत्री लोढा यांचेशी झालेली चर्चा
- 27 डिसेंबर2022: अंगणवाडी कर्मचारी संघटनाच्या कृती समितीच्या वतीने नागपूर येथे निघालेला मोर्चा व निवेदन. सरकारशी झालेली चर्चा.
- 28 डिसेंबर 2022: आयटकप्रणीत अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर निघालेला 40 हजार कर्मचाऱ्यांचा मोर्चा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले निवेदन व झालेली चर्चा
- आयटक प्रणीत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने ३ जानेवारीपासून सुरु असलेले राज्यव्यापी मोबाईल वापसी व इतर स्वरूपाचे आंदोलन
- 12 जानेवारी 2022: अंगणवाडी कर्मचारी संघटनाच्या कृती समितीच्या नेत्यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बाल विकास मंत्री व प्रधान सचिव यांचेशी मंत्रालयात झालेली चर्चा व देण्यात आलेली आश्वासने
इतर महत्वाच्या बातम्या: