Aurangabad News: औरंगाबाद ही पर्यटनाची राजधानी आहे की खड्यांची असा प्रश्न आता शहरातील प्रत्येक वाहनधारकांना पडत आहे. कारण काही तुरळक रस्ते सोडले तर औरंगाबादेत पहावं तिकडे खड्डेच खड्डे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील रस्त्यांची सर्वत्र खड्ड्यांची चाळण झाली आहे. तर जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर शहर खड्डेमय झाले असून, विकास कामांचा दावा करणाऱ्या प्रशासनाची पोलखोल झाली आहे. 


औरंगाबाद शहरातील खड्ड्यांची परिस्थिती...



  • औरंगाबाद शहरातील रस्ते 1300 किलोमीटर आहे.

  • शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या 20 हजार आहे.

  • दरवर्षी रस्त्यांचा घसारा 20 टक्के होतो.

  • दरवर्षी 260 किलोमीटरवर खड्डे पडतात.

  • त्यासाठीचा खर्च 3 कोटी रुपये करण्यात येतो.

  • प्रती किलोमीटरचा खर्च 1 लाख 15 हजार रुपये आहे.

  • एक किलोमीटरमधील खड्ड्यांची संख्या 50 आहे.

  • प्रती खड्डा खर्च 2500 रुपये खर्च केला जातो.


जिकडे-तिकडे खड्डेच खड्डे...


औरंगाबादच्या कुठल्याही रस्त्यावर जा तुम्हाला खड्डेच खड्डे पहायला मिळेल. अगदी महत्वाच्या अमरप्रित ते त्रिमूर्ती चौक, देवानगरी, अथवा बसस्थानक परिसर असो, सगळीकडे खड्ड्यांचेच साम्राज्य पाहायला मिळते. आता तर पावसाळा सुरु झाला आहे आणि पहिल्याच जोरदार पावसाने शहराची अशी अवस्था झाली आहे. रस्त्यांच्या याच खड्ड्यांमुळे नागरिकांना पाठदुखीची मानदुखीचा सुद्धा त्रास सहन करावा लागत आहे.


दोनशे कोटी खर्चूनही खड्डेच...


गेल्या काही वर्षात औरंगाबाद शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी तब्बल 200 कोटींचे रस्ते करण्यात आले आहे. पण एवढे करूनही नागरिकांचे हाल काही संपत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहनधारकांना खड्यातून मार्ग काढण्याची कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे खड्डे बुजवण्यासाठी मनपा तांत्रिक पद्धतीऐवजी मुरूम किंवा डांबर टाकून ते खड्डे बुजवण्याची पद्धत वापरत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे 15 दिवसांतच खड्डा पुन्हा ब्रम्हराक्षसासारखा जिवंत होतो.


महत्वाचे बातम्या...


Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे 30 दिवसांत 9 बळी; आरोग्य विभागात खळबळ


मराठवाड्यातील 3 हजार 640 गावांना अतिवृष्टीचा फटका; पावणेचार लाख हेक्टरवरील पिकांचा चिखल