Aurangabad News: कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असतानाच, सोमवारी शहरात दोन कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या तीस दिवसांत 9 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. तर सोमवारी आणखी 14 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे.
चौथ्या लाटेतील मृत्यू
अ.क्र. | तारीख | मृत्यू व्यक्ती |
1 | 26 जून | 58 वर्षीय पुरुष |
2 | 27 जून | 33 वर्षीय पुरुष |
3 | 05 जुलै | 72 वर्षीय महिला |
4 | 06 जुलै | 38 वर्षीय महिला |
5 | 10 जुलै | 84 वर्षीय महिला |
6 | 12 जुलै | 75 वर्षीय पुरुष |
7 | 16 जुलै | 68 वर्षीय महिला |
8 | 25 जुलै | 81 वर्षीय आणि 75 वर्षीय पुरुष |
आणखी 14 नवीन रुग्णांची वाढ
सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यात आणखी 14 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. ज्यात ग्रामीण भागातील 6 तर शहारतील 8 रुग्णांचा समावेश आहे. तर सोमवारी 20 नवीन रुग्ण बरे होऊन घरी गेले. तसेच अजूनही 306 सक्रीय रुग्ण आहेत. तर सोमवारी सिडको एन-8 येथील 81 वर्षीय पुरुष आणि जाधवमंडी येथील 75 वर्षीय पुरुष या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: एकादशीला मृत्यू हवा म्हणून, अंगाला गावरान तूप लावून वृद्धेने घेतले पेटवून