Aurangabd News: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे सोमवारी मुंबई (Mumbai) दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिवसेना आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या याच टीकेला अनेक शिवसेना नेत्यांनी उत्तर दिले आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावरून जहरी टीका केली आहे. अहमदशाह, आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा आता अमित शाह अशा शब्दात त्यांनी अमित शहांवर टीका केली आहे. 


अंबादास दानवे यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट करतांना म्हटले आहे की, अहमदशाह, आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा आता अमित शाह..दिल्लीवरून किती शहा आले माझ्या राज्याचे राज्य जिकण्यासाठी, पण गद्दारांची साथ घेऊन पण मराठी मावळा चवताळून उठला तसाच आजही तेच करायची वेळ आली. जनता शिवसेनेसोबतच! जय महाराष्ट्र!


हेच तर शिवसेनेचं नैतिक यश


मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपने गेल्यावर्षी सुद्धा बैठका घेतल्या होत्या. तसेच आत्ताप्रमाणेच मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात घेण्याचा निश्चय गेल्यावर्षी भाजपने केला होता, पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे यावेळी सुद्धा ते अयशस्वीच ठरणार असल्याचं अंबादास दानवे म्हणाले. तर अमित शहा यांचेसारखे देशपातळीवरील भाजपचे नेते मुंबईत येतात हे शिवसेनेचं नैतिक यश असल्याचं दानवे म्हणाले. 


यांना आम्ही जमनीवर आणू …


उद्धव ठाकरे यांना जमिनीवर आणलं पाहिजे अशी टीका अमित शहा यांनी केली असल्याचा प्रश्नाला उत्तर देतांना अंबादास दानवे म्हणाले की, उद्धव ठकरे हे जमिनीवरच आहे. मुळात भाजपच आकाशात असून, त्यांना जमिनीवर आणण्याचे काम आम्ही करणार असल्याचं दानवे म्हणाले. 


आजींना अश्रू अनावर...


विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी सिन्नर तालुक्यातील सर्वाधिक नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. दरम्यान दानवे यांना आपल्या व्यथा सांगताना एका शेतकरी आजींना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. पावसात आपल्या घरातील सर्वच काही वाहून गेल्याचे सांगत त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. यावेळी दानवे यांनी त्यांना धीर देत मदत करण्याचे आश्वासन दिले. 


महत्वाच्या बातम्या...


Amit Shah Mumbai Tour: मुंबईत वर्चस्व केवळ भाजपचं असावं, उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा; अमित शाह यांनी दंड थोपटले


Devendra Fadnavis : BMC ची ही शेवटची निवडणूक असल्याचे समजून लढा: देवेंद्र फडणवीस