PM Kisan Samman Nidhi: देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकराने (Modi Government) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 31 मार्च 2019 रोजी सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये प्रती दोन हजार रुपयांची रक्कम जमा केली जाते. मात्र यात अनेक बनावट शेतकऱ्यांकडून (Fake Farmer) देखील अनुदान लाटले जात असल्याचे समोर आल्याने, शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान मराठवाड्यातील 5 लाख 69 हजार 675 शेतकऱ्यांनी अजूनही ई-केवायसी पूर्ण केलेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याला मुकावे लागणार आहे. 

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सुरु केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ सुरवातीला सरसकट अनुदान बँक खात्यात जमा करण्यात आले. याचवेळी सरकारी,कर्मचारी-अधिकारी यांच्यासह प्राप्तिकर भरणारे देखील या योजनेचा लाभ घेत होते. त्यामुळे अशा लोकांना अनुदान मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले. यासाठी लाभ घेणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. पण यात अनेक शेतकऱ्यांनी अजूनही केवायसी केले नसल्याचे समोर आले आहे. राज्यातील हा आकडा 21 लाख 2 हजार 90 8  असून, मराठवाड्यात 5 लाख 69 हजार 675शेतकऱ्यांनी अजूनही ई-केवायसी पूर्ण केलेली नसल्याचे समोर आले आहे. ज्यात सर्वाधिक बीड जिल्ह्यातील 1 लाख 40 हजार 550 शेतकऱ्यांनी अजूनही ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. 

ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय आकडेवारी 

अ.क्र. जिल्हा  शेतकरी संख्या 
1 औरंगाबाद  79 हजार 51 
2 लातूर  48 हजार 881
3 उस्मानाबाद 44 हजार 406
4 हिंगोली 33 हजार 367 
5 परभणी 59 हजार 638
6 नांदेड  86 हजार 405 
7 जालना  80 हजार 377
8 बीड  1 लाख 40 हजार 550 

PM Kisan Yojana : आता केवळ आधार कार्डद्वारे तपासली जाणार नाही PM किसान योजनेचे स्टेटस, सरकारने केला मोठा बदल