Aurangabad News: औरंगाबाद जिल्ह्यात येत्या (Aurangabad District) 27,28 फेब्रुवारीला जी-20 (G-20) राष्ट्रसमूहाची महिला परिषद होणार असून, त्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. यासाठी शहरात रस्त्यांचे  सुशोभीकरण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे शहरातील मुख्य रस्ते आणि विमानतळाला जाणाऱ्या रस्त्यावरील रोड चकचकीत करण्यात येत आहे. मात्र याचवेळी शहरातील अंर्तगत रस्त्यांची मात्र दुरवस्था पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिक याबाबत सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. 


26 फेब्रुवारीला 19 देशांच्या 150 महिला सदस्यांचे शिष्टमंडळ शहरात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत वंदे मातरम् सभागृह आणि शहरातील रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये महिलांच्या विषयावर परिषद पार पडणार आहे. तसेच परिषदेच्या समारोपानंतर शिष्टमंडळ वेरूळ लेणीला भेट देणार आहे. त्यामुळे यासाठी गेल्या दोन महिन्यापासून प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे विमानतळाला जाणाऱ्या मुख्य रस्ता चकचकीत करण्यात आला आहे. सोबतच या रस्त्यावर सुशोभीकरण करण्यात येत आहे. मात्र याच मुख्य रस्त्यापासून आतमध्ये जाणाऱ्या अंर्तगत रस्त्यांची मात्र दुरवस्था पाहायला मिळत आहे. ज्या जालना रोडवरून जी 20 सदस्यांचे शिष्टमंडळ जाणार आहे, त्याच जालना रोडवरील नेक्सा शोरूमपासून अगदी 40 मीटर अंतरावर भला मोठा खड्डा पडला आहे. विशेष म्हणजे या खड्ड्यात पाणी तुंबल्याने वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत या भागातील नागरिकांनी सोशल मीडियावरून आपल्या व्यथा मांडल्या आहेत. 



अशी सुरु आहे तयारी... 


26 फेब्रुवारीला 19 देशांच्या 150 महिला सदस्यांचे शिष्टमंडळ शहरात येणार असल्याने महानगरपालिका, स्मार्ट सिटी आणि जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. ज्या भागातून हे  शिष्टमंडळ जाणार आहेत, त्या परिसरातील अतिक्रमण काढले जात आहे. आत्तापर्यंत असे 100 पेक्षा अधिक अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले आहे. ज्यात बीबी का मकबरा परिसरातील अतिक्रमण देखील काढले गेले आहेत. तर याच परिसरातील रस्त्यांचे कामे देखील हाती घेण्यात आले आहेत. पण फक्त जी 20  शिष्टमंडळाच्या अनुषंगानेच सद्या अनेक कामे केली जात असल्याने, इतर विकास कामे प्रलंबित पडल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे शहरातील सर्वच भागातील प्रलंबित विकास कामे आणि रस्त्यांचे कामे करण्याची मागणी नागरिक करत आहे. 


असा असणार 20  शिष्टमंडळा दौरा... 



  • 26 फेब्रुवारीला 19 देशांचे 150  सदस्यांचे शिष्टमंडळ शहरात येतील 

  • त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय महिला बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी देखील असतील. 

  • 27 फेब्रुवारीला वंदे मातरम् सभागृहात महिला परिषदचेचा शुभारंभ होणार 

  • त्यानंतर हे शिष्टमंडळ रात्री हॉटेल रामामध्ये भोजन करणार 

  • या परिषदेचे दुसरे सत्र 28 फेब्रुवारीला हॉटेल रामामध्ये होणार आहे. 

  • त्यात महिलांच्या विविध विषयांवर चर्चा होऊन समारोप केले जाईल. 

  • त्यानंतर शिष्टमंडळ वेरूळ लेणीला भेट देतील. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad Water Issue: नवीन जलवाहिनी टाकायची कशी?; औरंगाबादच्या पाणीपुरवठा योजनेतील विघ्न सुरुच