Abdul Sattar On Uddhav Thackeray: मराठवाड्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादचा दौरा करणार आहे. दरम्यान त्यांच्या याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. 'मी उद्धव ठाकरे साहेबांचा प्रोग्राम पाहिलं, त्यांचा 24 मिनिटांचा त्यांचा दौरा आहे. त्यामुळे या 24 मिनिटांत ते नुकसानीची किती पाहणी करणार',असा खोचक टोला सत्तार यांनी लगावला आहे. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत सत्तार हे बोलत होते. 


यावेळी बोलतांना सत्तार म्हणाले की, किमान आमच्यामुळे विरोधीपक्ष रस्त्यावर उतरत आहे. तर उद्धव ठाकरे यांनी नक्कीच पाहणी दौरा करावा, मात्र सर्वच पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे त्यांनी शेतकऱ्यांवर आलेल्या या संकटावरून राजकारण करू नयेत. त्यांना काय करायचे ते करावे पण राजकारण करू नयेत. मी आतापर्यंत 9 जिल्हे आणि 70 तालुक्यात फिरून नुकसानीची पाहणी केली आहे. उद्धव ठाकरे यांचा दौरा मी पहिला असून, त्यांचा 24 मिनिटांचा दौरा आहे. त्यामुळे या 24 मिनिटांत ते नुकसानीची किती पाहणी करणार?, असा खोचक टोला सत्तार यांनी लगावला आहे. 


किमान आमच्यामुळे रस्त्यावर तरी उतरले...


पुढे बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो की, अडीच वर्षानंतर का होईना पण ते दौरा करत आहेत. आमच्यामुळे तरी विरोधक रस्त्यावर उतरत आहेत. ज्या वेळी सत्तेत होते त्यावेळी काय केलं तर माहिती मिळेल. कोणी पुतळे जाळले तरी आम्हाला काही फरक पडत नाही, असा टोलाही यावेळी सत्तार यांनी विरोधकांना लावला आहे. 


उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर...


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील दहेगाव आणि पेंढापूर या दोन गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार आहे. यावेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा देखील जाणून घेणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 


असा असेल उद्धव ठाकरेंचा दौरा....



  • दुपारी 12.15 वा. औरंगाबाद विमानतळाहुन दहेगाव ता. गंगापुर कडे प्रयाण

  • दुपारी 01.00 वा. दहेगाव ता. गंगापुर येथे आगमन व दहेगाव शिवार येथे पीक नुकसानीची पाहणी

  • दुपारी 01.15 वा. पेंढापूर ता. गंगापुरकडे प्रयाण

  • दुपारी 01.30 वा. पेंढापूर ता. गंगापुर येथे आगमन व पीक नुकसानीची पाहणी

  • दुपारी 01.45 वा. पत्रकारांशी संवाद

  • दुपारी 02.45 वा. चिकलठाणा विमानतळ औरंगाबाद प्रयाण