Aurangabad Diwali: गेल्या दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दिवाळी देशभरात साजरी करण्यात आली. त्यामुळे सर्वच ठिकाणी दिवळाचा उत्साह पाहायला मिळाला. तर लक्ष्मीपूजनाला औरंगाबादकरांनी फटाके फोडण्याचा मनसोक्त आनंद घेतला. मात्र याचवेळी शहरात घडलेल्या वेगवेगळ्या दुर्घटनेत 16 जणांना इजा झाल्याने ते जखमी झाले आहेत. तर औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयात 6 मुलांवर उपचार सुरु असल्याचे देखील समोर आले आहे. 


औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली आहे. यावेळी लहान मुलांपासून तर मोठ्यांपपर्यत सर्वांनीच फटाके फोडून दिवाळी साजरी केली. पण याचवेळी औरंगाबाद जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी काही दुर्घटना घडल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे सकाळपर्यंत एकूण 16 जण फटाके फोडताना भाजले असल्याचे समोर आले आहे. ज्यात 6 मुलांचा देखील समावेश आहे. यापैकी अनेकांवर औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहे. ज्यात कुणाला हाताला तर कुणाच्या तोंडाला इजा झाली असल्याचे दिसून आले. 


10 वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्याला इजा... 


एका घटनेत शहरातील मिसरवाडी भागातील 10 वर्षाच्या मुलाच्या चेहरा आणि डोळ्याला फटाके फोडताना इजा झाली आहे. त्याच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तर घाटी रुग्णालयात फटाके फोडताना इजा झालेल्या एकूण 6 रुग्णांवर सद्या उपचार सुरु आहे. तर कालपासून आतापर्यंत एकूण 16 जणांनी घाटी रुग्णालयात उपचार घेतले आहे. 


फटाके फोडताना काळजी घ्या...


दिवाळीत फटाके फोडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. विशेष म्हणजे लहान मुलांवर फटाके फोडताना  लक्ष दिले पाहिजे. शक्य असल्यास इजा पोहचवणारे फटाके मुलांना देऊ नयेत. तसेच सर्वच फटाके फोडताना अंतर ठेवावे. सोबतच जवळच पाणी, वाळू ठेवावी. तसेच हातात फटाके फोडण्याचे धाडस करणे टाळावे, असेही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. 


Mumbai Crime: दिवाळीत फटाके फोडण्यावरून वाद, अल्पवयीन मुलांनी केली तरूणाची हत्या