CIDCO Housing Lottery : घर खरेदीसाठी अनेक जण दिवाळीचा (Diwali 2022) मुहूर्त साधतात आणि हाच दिवाळीचा मुहूर्त साधत सिडकोनं (CIDCO) नवी मुंबई (Navi Mumbai News) परिसरात 7 हजार 849 घरांची लॉटरी जाहीर केली आहे. खारकोपर आणि बामणडोंगरी परिसरात ही घरं बांधली जाणार आहे. नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळच हा गृहप्रकल्प असणार आहे. 


सिडकोच्या लॉटरीत कोणती घरं? 


नवी मुंबईतील खारकोपर, बामणडोंगरी येथे सिडकोनं जाहीर केलेली घरं आहेत. प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ, ट्रान्सहार्बर रोड नजीक हा प्रकल्प आहे. जर तुम्हीही घर घेण्याचं स्वप्न पाहत असाल, तर सिडकोच्या घरांच्या लॉटरीसाठी आजपासून नोंदणी करता येईल. त्यासोबतच सिडकोनं ऑगस्ट 2022 मध्ये काढलेल्या 4 हजार 158 घरांच्या नोंदणीसाठी 3 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 






सिडकोनं जाहीर केलेल्या लॉटरीमध्ये 7849 घरं ही नवी मुंबईतील उलवे नोडमधील खारकोपर पूर्व 2, ए 2 बी आणि पी3, बामणडोंगरी येथील आहेत. ही घरे नवी मु्ंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नेरूळ-उरण रेल्वे मार्गाजवळ आहे. नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा, खारघर नोडमध्येही सिडकोच्या लॉटरीतील घरं आहेत. परवडणाऱ्या दरातील या 4158 घरांपैकी 404 घरं ही पंतप्रधान आवास योजनेतंर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि 3 हजार 754 घरं सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत. त्यात 245 व्यापारी गाळ्यांची लॉटरी काढण्यात आली होती. 


सिडकोच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्वीटही करण्यात आलं आहे. या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नवी मुंबईतील उलवे नोडमधील खारकोपर आणि बामणडोंगरी येथे 7849 घरे विक्रीसाठी उपलब्ध!" 


सिडकोकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उत्पन्न मर्यादा ही तीन लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्याशिवाय, दोन लाख 50 हजार रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सदनिका उपलब्ध असणार आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :   


CIDCO Lottery: सिडकोचे सामान्यांना दिवाळी गिफ्ट; 7849 परवडणाऱ्या घरांच्या लॉटरीची घोषणा